Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजुन एक धडा होता...३
अजुन एक धडा होता...३ रीत...........त्यात असं लिहिलेलं की,..... छत्री मधे पावसाच्या वेळी २ घांना घ्यावे...म्हणजे छत्री पकडणारे आपण मधे राहतो आणि बाजुचे दोघे भिजतात पण आपण छत्रीत घेउन त्यांच्यावर उपकार केलेले असतात म्हणुन ते काही बोलु शकत नाहीत....आणि याच्च धड्यात लेखक खुप पाउस पडत असताना चपला चिखलाने खराब होउ नये म्हणुन काढुन छत्रीच्या वरच्या तारांत अडकवुन ठेवतो.. आणी मालती भेटते. ती थोडावेळ छत्री पकडते तीला छत्री जड वाटते. आणि मग त्या छत्रीतल्या चपला टपकन तिच्या डोक्यात पडतात. ती रागाने लेखकाकडे बघते आणि तरातरा निघुन जाते...नाव नाही आठवत पण मस्त कॉमेडी होता हा धडा
अनिश्का, आम्हाला तो धडा
अनिश्का, आम्हाला तो धडा नव्हता पण मला आठवतोय कदाचित भावंडांच्या पुस्तकात वाचलाय.
आसू आणि हसू आठवतोय का कोणाला?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय स्टोरी होती???...नाव
काय स्टोरी होती???...नाव आठवतेय आसु आणि हसु असे....
सर्कशीतला प्रसंग होता. लेखक
सर्कशीतला प्रसंग होता. लेखक बहुतेक विदुषकाचं काम करत असतो. रिंगणात धावत्या घोड्यावर उडी मारून स्वार होताना त्याच्या पायातली शीर चमकते (की काय म्हणतात त्याला?) त्याला असह्य वेदना होत असतात पण विदुषक असल्याने चेहर्यावर पूर्णवेळ त्याला सतत हसूच ठेवणे भाग होते. असे काहीसे आठवतेय.
दुसरीला (?) एक धडा होता. आभाळाचे रंग की काहीतरी. त्यात असे होते की आधी निरनिराळ्या रंगांची देणगी फक्त आभाळालाच मिळाली होती. पृथ्वीवरच्या फुलांना सुंगंध होते पण रंग नव्हते. मग आभाळाला गर्व होतो. रंगहीन फुलांसमोर ते भाव खाऊ लागते. एकदा जोरजोरात गडगडाटासह मोठा पाऊस येतो आणि आभाळातले सारे सुंदर रंग पृथ्वीवरच्या फुलांवर सांडतात. निगर्वी फुलांना मग सुगंधांबरोबर सुंदर रंगही मिळतात.
इरावती कर्व्यांचा 'परिपूर्ती'
इरावती कर्व्यांचा 'परिपूर्ती' हा लेख. एका समारंभात इरावतींची ओळख अमक्याची मुलगी, अमक्याची सून, अमक्याची पत्नी अशी करून दिली जाते. त्यांना काहीतरी अपूर्ण वाटत राहते. काही दिवसांनी रस्त्याने जाताना त्यांच्या कानी शब्द पडतात : "अरे, ती बघ आपल्या वर्गातल्या अमक्याची आई जातेय" आंणी आपली ओळख परिपूर्ण झाली असे त्यांना त्या क्षणी वाटते.
हा पाठ वेळोवेळी आठवत राहतो.
अनू पण हा धडा तिसरीत नव्हता
अनू![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण हा धडा तिसरीत नव्हता गंंSSSSS सातवीतच होता.
त्यात एक एकांकिका पण होती. दुकानदार ग्राहकाला कसं फसवतो त्याची. तांदळात जितक्या जास्त आळ्या तितके ते जुने आणु चांगले ... साखर अर्धा किलो कमी भरली म्हणजे रस्त्यात मुंग्यांनी खावून संपवली टाईप्स संवाद होते.
हा छत्रीचा धडा आणि हा वर मी लिहिलेला धडा एकामागे एक होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
७वीत??? पण ५वी पर्यंत
७वीत??? पण ५वी पर्यंत पुस्तकात चित्र असायची...आणि या धड्यातील चित्र मला आठातायत.....७ वीत होता हे नाही आठवत....जाउदे...पण मस्त होता तो धडा
त्यात एक एकांकिका पण होती.
त्यात एक एकांकिका पण होती. दुकानदार ग्राहकाला कसं फसवतो त्याची. तांदळात जितक्या जास्त आळ्या तितके ते जुने आणु चांगले ... साखर अर्धा किलो कमी भरली म्हणजे रस्त्यात मुंग्यांनी खावून संपवली टाईप्स संवाद होते.>>>>>>>>>. हो हो आठवली ही एकांकिका
गजानन काका तुम्ही लिहिलाय तो
गजानन काका तुम्ही लिहिलाय तो नाही आठवत सर्कशीचा धडा
अनिश्का बेटा, राहू दे. नंतर
अनिश्का बेटा, राहू दे. नंतर आठवेल तुला तो.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सातवीला एक हरताळावर धडा होता. हरताळ फासणे म्हणजे मजकुरातल्या नको असलेल्या ओळींवर पिवळी पूड फासणे. ती पूड म्हणजे हरताळ. त्यावरून हरताळ फासणे हा वाक्प्रचार आला. त्याच धड्यात एकच गोष्ट कथन करताना वेगवेगळ्या व्यवसायातिल व्यक्तींच्या कथनात आपल्या व्यवसायाचा कसा प्रभाव पडतो हे होते. उदा. नेत्याने भाषणात खूप पाल्हाळ लावले तर न्हावी म्हणेल, 'काय पाणी लावत बसलाय नेता.' तर धोबी म्हणेल, 'नेत्याने भाषणाला फार खळ लावलीय.' इत्यादी.
कोण्या एके काळी म्हणजे कदाचोत
कोण्या एके काळी म्हणजे कदाचोत १ लीत असेल
दिनूचे बिल , नावाचा अत्यंत मार्मिक धडा होता
दिनुचे वडील डॉक्टर असतात ,त्याची आई एकदा आजारी पडल्याने दिनूच्या वडीलांच्या दवाखान्यात येते, चेक अप झाल्यानंतर दिनू गमतीने आईच्या हातावर बिल ठेवतो ज्यात गोळ्या औषधे, व इतर फी चा उल्लेख असतो,
नंतर घरी आल्यावर आई दिनूच्या हातात एक बिल ठेवते ज्यात तीने त्याला जन्म दिल्यापासून,पालन पोषण वगैरे वगैरे नमूद करुन प्रत्येक गोष्टीपुढे काही नाही असे लिहिलेले असते, ते वाचून दिनूला त्याची चूक कळते आणि तो रडू लागतो.
( हा धडा पहिलीली होता तेव्हा झेपला नव्हता नंतर लहान बहिन १ लीत असताना तेव्हा मी ४ थी त होतो तो कळाला होता)
दौलत नावच धडा होता एक..त्यात
दौलत नावच धडा होता एक..त्यात बैलाच्या शर्यतीच वर्णन होत..
अजुन एक होता..इयत्ता आठवत
अजुन एक होता..इयत्ता आठवत नाही.. प्रकाश पडला..त्यात एक गावकडला मुलगा शहरात शिकायला येतो..आणि पहिल्यांदाच बल्ब बघतो..
प्रकाशावरून आठवले. एक 'प्रकाश
प्रकाशावरून आठवले.
एक 'प्रकाश प्रकाश! उजेड उजेड!' हाही धडा सर्कशीतल्या एका प्रसंगावर होता. लेखक (रिंगमास्तर) वाघाच्या पिंजर्यात त्याला खिजवत प्रेक्षकांची करमणूक करत असतो. वाघ बर्यापैकी चिडलेला असतो. आणि अचानक लाईट्स जातात! आता सभोवती सर्कशीच्या अख्ख्या तंबूत अंधार आणि फक्त अंधार!!! पिंजर्यात चिडलेला वाघ आणि एकटा लेखक!
'प्रकाश प्रकाश! उजेड
'प्रकाश प्रकाश! उजेड उजेड!'
व्वा कित्तीतरी विस्मरणात गेलेले धडे आठवताहेत... त्याच त्या स्टोरीज ऐकणार्या पिढीला आपल्या शब्दांत या कथा सांगायला मिळाल्या तर किती मजा येइल! अर्थात त्यांना त्या किती समजतील, आवडतील ते देवच जाणो...
प्रकाश पडला!!
तिसरी चौथी इयत्तेतील धडे
तिसरी चौथी इयत्तेतील धडे आठवतात ????????????????????????![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
एक बांगडीवाला का काय धडा
एक बांगडीवाला का काय धडा होता..त्यात तो कुष्ठरोगी बायकांना बांगड्या भरायला जायचा तपोवन ला ..आन् त्याची बायको चिडचिड करायची..
हिंदीतले 'चुडीवाले बाबा'
हिंदीतले 'चुडीवाले बाबा' का?
नाही..मराठीतच होता..सणाच्या
नाही..मराठीतच होता..सणाच्या दिवशी तो तिकडे जातो म्हणून त्याची बायको चिडचिड करते..
हिंदीतले 'चुडीवाले बाबा'
हिंदीतले 'चुडीवाले बाबा' का?>>>>>>>>>>. मराठीत होता......मस्त होता तो....चुडीवाला होतं नाव
लक्षी आणि बंड्या अशी पात्र
लक्षी आणि बंड्या अशी पात्र असलेला एक धडा होता..रस्त्यावर खेळ करत फिरणार्या कुटुंबाची कथा होती त्यात
हो....लक्षीला डोक्यावरच्या
हो....लक्षीला डोक्यावरच्या रिकाम्या मडक्याचं ही ओझं वाटु लागलं होत.....
अजुन एक मशीन ची कथा होती...मानेवर ठेउन ती बाई चालत जाते मशीन विकायला,,...आणि ती मशीन पडुन मोडते...ती बाई गरीब असते...भाषा वेगळीच होती धड्यातली.... "तुह्यं कोन राह्यलं " ..."काहुन बोल्ली "... अशी काहीशी.....
जोखड म्हणुन पण होता
जोखड म्हणुन पण होता धडा...केव्हा काय ते नाही आठवत...
लाल चिखल, स्मशानातलं सोनं,
लाल चिखल, स्मशानातलं सोनं, महापुरुषांचा पराभव, आणि बुद्ध हसला, काळे केस, अंदमानातून सुटका, .... हे सगळे धडे आठवतायत.
एकदम नॉस्टॅल्जिक केलं ह्या धाग्यानं.
व्यंकोजीस पत्र हे तर हमखास आठवेल बर्याच लोकांना.
श्रियासह चिरंजीव, अखंड-लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजेश्री महाराज वेंकोजीराजे यांसि
अशी भारदस्त सुरुवात होती त्या धड्याची.
स्वरूप पहा- (बहुतेक विनोबांचा धडा होता हा)
एक गाडगेबाबांवरचाही धडा होता.
प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हाही एक होता. नक्की कितवीला ते आठवत नाही.
कविता जास्त आठवतात पण-
मर्ढेकरांची- पितात सारे गोड हिवाळा..
बालकवींची- पारवा (भिंत खचली कलथून खांब गेला)
बोरकरांची अभ्यासाला नव्हती पण पुस्तकात होती ती 'सांध्यसुंदरी' (इंद्रनील चंद्रकांत सांध्यसुंदरी ही, येइ हसत मधुर मंद विश्वमंदिरी ही)
माझ्या गोव्याच्या भूमीत
आरती प्रभूंची- मृत्यूत कोणि हासे (हीसुद्धा अभ्यासाला नव्हती. बरीच जड कविता होती)
एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकिन जी मी स्वप्राणाने...(कवी आठवत नाहियेत)
भ्रांत तुम्हा का पडे ( कवी बी?)
संतकाव्यही होतं अभ्यासाला-
कान्होपात्रेचा नको देवराया अंत पाहु आता
तुकोबांचा- उस डोंगा परी, रस नोहे डोंगा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
माउलींचा- आणि पृथ्वी जेया क्षेमा | नुभगे स्थावर जंगमा | जेयाचिये वाचे महिमा | अमृतासी.. असं गुरुमहिमेवरचं ओव्यांचं संकलन होतं..
आहा हा .... आता ती बालभारतीची कवितांची पीडीएफ उघडून वाचत बसणारे मी...
हिरकणीची कविता होती मधले
हिरकणीची कविता होती
मधले शब्द आठवत आहेत
रायगडाचा बुरुज सांगतो धन्य हिरकणी शिवबा वदले
आहे का कोणाला महिती याची ?? प्लीज शेयर करा
अजुन एक धडा होता. तोडणॅ सोपे
अजुन एक धडा होता. तोडणॅ सोपे जोडणॅ अवघड. बुद्धांचा होता. अंगुलीमल कि कायसे त्या डाकुचे नाव होते. बुद्ध त्याला झाडाची २ पाने तोडायला सांगतात आणि नंतर जोडायला सांगतात.
मागच्या प्रतिसादात लिहलेल्या एका धड्याबद्दल ( रणांगनावर्च्या सैनिकाला वाचवण्या बद्दल्चा होता तो). त्यातले नाव होते मिरचंदानी. बहुतेक कॅ. प्रधानांचा होता तो लेख.
कसरत धडा आठवतो का? मला कायम
कसरत धडा आठवतो का? मला कायम रस्त्यावर खेळ करणारे लोकं दिसले की तो धडा आठवतो
डॉ. पूर्णपात्र्यांच्या सोनाली
डॉ. पूर्णपात्र्यांच्या सोनाली सिंहिणीवर एक धडा होता. इयत्ता नाही आठवत.
सुकेशिनी म्हणून पण एक धडा
सुकेशिनी म्हणून पण एक धडा होता, गौतम बुद्ध यांच्या संदर्भात. गाडगेबाबांचे पण धडा होता, लाकूड फोडून देतात ज्यांनी त्यांना काम दिले त्यांच्याकडे म्हणजे कष्ट केल्याशिवाय कोणाकडेही काही घ्यायचे नाही असे त्यांचे तत्व होते.
लालू दुर्वे यांचेपण धडे होते एक दोन. प्राणी किंवा सर्कस या संदर्भात आता नीट आठवत नाही.
हिरकणीचा धडा होता आम्हाला.
हिरकणीचा धडा होता आम्हाला.
Pages