सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत.
राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ?
या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ.
माहिती लिहिणे अपेक्षित आहे.
बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते!
आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!
आत्तापर्यंतचे जबाबदारी पार पाडलेले माबोकर-
अल्पना मुक्तेश्वर कुलकर्णी mandard
बेफिकीर साती अशोक.
अग्निपंख यक्ष वर्षा म
पराग मासोळी रमा.
लिंबूटिंबू इन्ना राहुलतेज
नीधप लंपन अश्विनी डोंगरे
Resham- dor अरुंधती कुलकर्णी Saee
शलाका पाटील राजसी हिम्सकुल
जम्बो, रिया. , झकासराव
गिरीकंद , मी नताशा, इश्श
dmugdha , विक्रमसिंह, निवांत पाटील
जाई. ललिता - प्रीति , दिपु
भरत मयेकर, आशिता १३०५, इंद्रधनुष्य
संदीप आहेर, राजू ७६, सारिका.चितळे
देवकी, केदार जाधव , ओवी ,
साधना, सुजा, भान
मी- केदार, नुतनजे, गजानन
के अंजली,तुमचा अभिषेक ,अक्षरी
ऑर्किड, पियु ,शर्मिला फडके
इब्लिस, सावली, सस्मित
आशिका, वैशाली, नताशा
अनघा वरदा हर्पेन
नमो नमो करत डोळे झाकून, काय
नमो नमो करत डोळे झाकून, काय वाट्टेल ते उमेदवार घुसले असले, तरी कमळावर शिक्का मारा असं 'ते' म्हणताहेत.
>>>
ते म्हणजे कोण? भाजपवाले का? आमच्या इथे काँग्रेसवाले ही तसंच म्हणतायेत.
बाकी आमच्या इथे घरचा एरिया समजतच एकही काँ/रावाकाँ वाला फिरकला नाहीये. आढाळरावांचे लोकं मात्र येऊन गेले. मागच्या वर्षीही तेच निवडुन आलेले तरीही.
राजकारण सामान्यांना समजू नये म्हणूनच असतं हे माझं ठाम मत झालंय
आतमधे सर्वांचा अजेंडा जाऊ
आतमधे सर्वांचा अजेंडा जाऊ तिथे खाऊ यापलिकडे नाही.
आपल्या भागात चुकून काही काम झालं असेल तर ते करणारा उमेदवार आपला एवढंच बघितलेलं बरं. तेही झालेलं नसेल तर निगेटिव्ह व्होटींग नावाचा जोक आहेच.
<<
+१
आमच्याकडे शिवसेनावाले
आमच्याकडे शिवसेनावाले प्रचारफेरी वै काढुन गेलेत.
चौकात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचं संपर्क कार्यालय आहे पण जोर दिसत नाहिये.
बहुतेक उमेदवार त्यांच्या आवडीचा नाहिये.
त्यामानाने मनसे वाले प्रचारात पुढे आहेत.
पक्षापेक्षा उमेदवार किती
पक्षापेक्षा उमेदवार किती पात्र आहे मुंबई वा दिल्लीत जाण्यासाठी हे पाहून मतदान करणे हे जागरूकतेचे लक्षण मानले जावे. पक्ष असेल अखिल भारतीय पातळीवरील पण उमेदवार दगडराव असेल तर पक्षाने सांगितले म्हणून तसल्या दर्जापल्याड उमेदवाराला मतदान करणे म्हणजे आपल्या विवेकाचा अपमान समजावा.
मागच्या विधानसभेला आमच्या मतदार संघात राष्ट्रवादी कॉन्ग्रेसने कोल्हापूरच्या छत्रपतींना तिकिट दिले होते. महाराजांविषयी मनी जरूर आदर असतो या संस्थानिक प्रांतात पण त्यांची आमदार म्हणून निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता शून्य होती....मतदार लोक अक्षरश: संतापले होते आणि आम्ही सर्वांनी अगदी ठरवून शिवसेना उमेदवाराला मतदान केले कारण तोच एक तडफदार आणि पात्र वाटला होता...विशेष म्हणजे तोच उमेदवार विक्रमी मतांनी विजयीही झाला.
मतदाराच्या कृतीवरून पक्षधोरण बदलते असे चित्र दिसते खरे. विधानसभेवेळी जी चूक झाली ती आता लोकसभेच्या निवडप्रसंगी राष्ट्रवादी कॉन्ग्रेसने केलेली नाही. उमेदवार सर्वमान्यच आहे....दोन्हीकडील.
नीधप, इब्लिस व अशोक ह्यांचे
नीधप, इब्लिस व अशोक ह्यांचे ज्या (खालील) मुद्यावर एकमत झालेले दिसत आहे तो नीटसा पटला नाही.
>>>पक्षापेक्षा उमेदवार पाहून मत द्यावे<<<
आता अरुण भाटिया हा उमेदवार मनाला पटतो, पण ते अपक्ष आहेत. ते निवडून आले तरी त्यांना कोणत्यातरी सरकारात (पक्षी - पक्षात) काही प्रमाणात तरी सामील व्हावे लागेल किंवा बाहेर बसावे लागेल.
समजा भाजप हा पक्ष मला पटतो (/आवडतो वगैरे म्हणा) पण त्यांचा उमेदवार काही एक नकोसा इतिहास घेऊन आलेला आहे तर त्याला मत देणे म्हणजे चुकीच्या माणसाला मत देणे झाले! पण निदान तो जिंकून आला तर आपल्या 'आवडत्या' पक्षाचा माणूस जिंकल्यामुळे तो पक्ष सरकारात येण्याची शक्यता (थोडीशी तरी) वाढते व एकुणात तो पक्ष सत्तेवर आला तर हा चुकीचा उमेदवार लगेच काही भयंकर कृत्ये करू लागेल / शकेल असेही नाही.
म्हणून असे वाटते की लोकसभेसारख्या पातळीच्या निवडणूकीत मतदाराने पक्ष पाहून मत द्यावे.
खरेच आपल्याकडे मतदान तर भलताच
खरेच आपल्याकडे मतदान तर भलताच जोक आहे
आमच्याकडे
शिवसेना - श्रीरंग बारणे
राष्ट्रवादी कॉंग्रेस- राहुल नार्वेकर
शेकाप - लक्ष्मण जगताप
आप- मारुती भापकर
असे चित्र आहे
फारच नाउमेद करणारे चित्र आहे
बेफिकीर..... लोकसभा पातळीवर
बेफिकीर.....
लोकसभा पातळीवर अपक्षापेक्षा पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मत दिले पाहिजे हा मुद्दा केव्हाही योग्यच आहे. कारण अरुण भाटिया अपक्ष म्हणून विजयी झाले तरी राष्ट्रीय पातळीवर एकट्याने ते महत्त्वपूर्ण वा क्रांतिकारी बदल घडवून आणतील याची अंधुकशीही शक्यता नाही.
तुमच्या विचारानुसार लिहायचे झाल्यास आता या क्षणी महाराष्ट्रात दोनच पक्ष राष्ट्रीय दर्जाचे मानले जात आहेत. काँग्रेस आणि भाजप. या पक्षांनी ज्या दोन उमेदवारांना आपले "अधिकृत उमेदवार" म्हणून बिल्ले दिले आहेत, त्यापैकी व्यक्तिगत पातळीवर आपल्याला कुणीच जर आवडत नसले तरी (असे होण्याची शक्यता कमीही असू शकते) नाईलाजाने का होईना यापैकीच एका "लेस डेव्हिल" ला मतदान करणे प्राप्त होईल.....अजिबातच न करण्यापेक्षा, होकारार्थी भूमिका घेणे बरे.
मी विधानसभेच्या मतदानाच्यावेळी अपक्षाला मतदान न करता विरोधी पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराला मत दिले होते.
माझ्यामुळे ५ जण सुट्टीवर जाउ
माझ्यामुळे ५ जण सुट्टीवर जाउ शकले .. हे माझ्यासाठी महत्वाचे आहे ...
का द्यायचे लेस डेव्हिल ला मत?
का द्यायचे लेस डेव्हिल ला मत? मग घरी -हायले तर काय बिघडले?
मतदान करणे आपला हक्क आहे, पण तो बजावण्याची अत्यावश्यकता का? सक्ती का?
मतदान करणे आपला हक्क आहे, पण
मतदान करणे आपला हक्क आहे, पण तो बजावण्याची अत्यावश्यकता का? सक्ती का?>> हक्काबरोबरच ते कर्तव्यपण आहे म्हणून.
हक्काबरोबरच ते कर्तव्यपण आहे
हक्काबरोबरच ते कर्तव्यपण आहे म्हणून. स्मित<<<
उमेदवार्स कर्तव्येज पाळत नाहीत त्याचे काय पण मी म्हणतो!
विनिता.... चांगला आहे प्रश्न.
विनिता....
चांगला आहे प्रश्न. उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
एक लक्षात ठेवा की लोकशाहीत हा "मतदाना" चा हक्क मिळविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ते पुण्य आहे अशा अर्थाने कमाविलेला हक्क आहे. आता हक्क आहे म्हणजे एक सूज्ञ सुजाण नागरिक या नात्याने तो बजाविणे आलेच. मतदानाची सक्ती करता येत नाही हे सत्य पण त्याची आवश्यकता मात्र ठासून सांगितली जाते. राहता राहिला लेस डेव्हिलचा मुद्दा....तर हरेक ठिकाणी त्या वृत्तीचेच उमेदवार असतील असे मानले जात नाही. तरीही आपल्या स्वच्छ मनाला वाटत गेले की उभे राहिलेले सारेच उमेदवार अपात्र आहेत तर यंदापासून "नोटा" चा विकल्प सरकारने आपल्यासाठी ठेवलेला आहे. एकही उमेदवार माझे मत मिळविण्याच्या लायकीचा नाही...या ठिकाणाचे बटन तुम्ही दाबून आपल्या हक्काची अंमलबजावणी करू शकाल. निदान अशी मते पाहिली गेली तर पुढील खेपेपासून पक्षीय पातळीवर उमेदवाराबाबत अधिक गंभीरतेचे निकष लागले जातील.
तेव्हा तुम्ही मतदान...पॉझिटिव्ह वा निगेटिव्ह...कराच.
निगेटिव्ह मतदान केल्यास ते मत
निगेटिव्ह मतदान केल्यास ते मत बाद मतांबरोबरच धरले जातेय. तेव्हा ते खरेतर निगेटिव्ह व्होटिंग होणारच नाही.
मोजणी फक्त पॉझिटिव्ह मतांचीच होणार. त्यातून निवडून येणार कुणीतरी मग भले मेजॉरिटीने 'यातील एकही नाही! (म्हणजे निगेटिव्ह मत) असे मत दिले असले तरी.
याला काय अर्थ आहे?
तसे असले तर तो बिनडोकपणा
तसे असले तर तो बिनडोकपणा किंवा फसवेगिरी आहे.
हम नही सुधरेंगे!
अशोकराव, तुमचा वरील प्रतिसाद
अशोकराव,
तुमचा वरील प्रतिसाद पुस्तकी स्वरुपाचा वाटला. क्षमस्व!
आपल्याकडील अनेक पक्ष, त्यांचे उमेदवार, त्यांचे एकेकाचे इतिहास, त्यांचे अनुयायी आणि समर्थक ह्यांचे वर्तन अश्या असंख्य परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्समधून एखाद्या विशिष्ट पक्षाला / उमेदवाराला मत देण्यालायक मानण्याची शक्यता प्रचंड घटते.
आज मला सांगा, भाजप हा तथाकथित सुशिक्षित / सुसंस्कृतांचा वगैरे पक्ष मानला जायचा, पण तसे कुठे राहिले आहे? तसेच, व्यक्तीपूजा हा काही फक्त काँग्रेसला लागलेला शाप नसून भाजपलाही तो शाप आहे, आम आदमी पार्टीलाही आहे. प्रत्येकच पक्षाला आहे. प्रत्येकाच्या कोणी ना कोणी भ्रष्टाचार केलेला आहे / बेकायदा कामे केलेली आहेत.
मग आता कोणीच स्वच्छ नाही तरीही मतदान करणे ही आपण आपलीच केलेली थट्टा नाही का?
माझी वरची माहिती चुकीची असेल
माझी वरची माहिती चुकीची असेल तर प्लीज कुणीतरी योग्य माहिती द्या.
समजा एखाद्या ठिकाणी पंचेचाळीस
समजा एखाद्या ठिकाणी पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा (उदाहरणार्थ घेतलेला आकडा आहे हा) कमी मतदान झाले तर ते ग्राह्यच धरू नये म्हणजे मग काहीतरी बदलू शकेल बहुधा!
ह्म्म समजा ग्राह्य नाही धरले
ह्म्म समजा ग्राह्य नाही धरले तर त्यावर उपाय काय? फेरनिवडणुका? म्हणजे आपल्याच पैशांचा अपव्यय.
त्यातून नवीन उमेदवारही कशावरून धुतल्या तांदळासारखे असतील?
मागच्या आठवड्यात सकाळ मध्ये
मागच्या आठवड्यात सकाळ मध्ये बातमी होती ना की ज्यांचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी 2 फोटो व फोटो id proof आणले तर मतदान करता येईल अशा स्वरूपाची.
काही प्रश्नांची उत्तरे
काही प्रश्नांची उत्तरे लोकशाहीत नसतात इतकेच खरे म्हणावे लागेल.
असे कायम म्हटले गेले की आपण
असे कायम म्हटले गेले की आपण मत दिले नाही तर योग्य उमेदवार निवडून येणार नाही, पण इतकी वर्षे मत देऊन तरी कुठे कोण योग्य निवडून आलेय? पुण्यात, पिंपरीत तरी एक योग्य उमेदवार दाखवा....
नोटाचा विकल्प याच वर्षी आलाय आणि नीधप म्हणतात तसे मत बाद करायचा हा एक प्रकार आहे
मग आता कोणीच स्वच्छ नाही तरीही मतदान करणे ही आपण आपलीच केलेली थट्टा नाही का? >>> मग असे कर्तव्य करून आपण दुसरे काय करतो?
फेसबुकावर मधे एकाने लिहिले
फेसबुकावर मधे एकाने लिहिले होते की मतदान ही एक अंधश्रद्धा आहे. विचार करू जाता मला ते खरे वाटायला लागलेय.
मान्य मी खूप निराशावादी विचार करतेय पण आशावादी विचार सुचावेत अशी परिस्थिती नक्कीच नाहीये आजूबाजूची.
आता हक्क आहे म्हणजे एक सूज्ञ
आता हक्क आहे म्हणजे एक सूज्ञ सुजाण नागरिक या नात्याने तो बजाविणे आलेच.>>>हेच तर ऐकत आलो आपण वर्षानुवर्षे..असला जुलमाचा हक्क कशासाठी?
निदान अशी मते पाहिली गेली तर पुढील खेपेपासून पक्षीय पातळीवर उमेदवाराबाबत अधिक गंभीरतेचे निकष लागले जातील.>>>@अशोकराव /मामा : तुम्ही फारच पॉजिटिव्ह आहात..मला अशी आशा वाटतच नाही.
नीधप>>> +११
नीधप>>> +११
तसं नाही निधप समजा कुणीही
तसं नाही निधप
समजा
कुणीही नाही २५७२३२ मतं
काँग्रेस ५२३०७ मतं
आणि भाजपा ५२३०७ मतं
असं असेल तर परत निवडणूक होणार कारण कोणीही नाही जिंकेल पण
कुणीही नाही ५७२३२ मतं
काँग्रेस ५२३०७ मतं
आणि भाजपा २५२३०७ मतं
तर भाजपा जिंकेल. (काँग्रेस वाल्यांनी त्यांच्यापुढे २ लावून घ्या वाटल्यास) म्हणजे ती ५७२३२ मतं वाया गेली.
>>>विचार करू जाता मला ते खरे
>>>विचार करू जाता मला ते खरे वाटायला लागलेय.
मान्य मी खूप निराशावादी विचार करतेय पण आशावादी विचार सुचावेत अशी परिस्थिती नक्कीच नाहीये आजूबाजूची.<<<
पुन्हा सहमत!
नोटा म्हणुनच पतलेलं
नोटा म्हणुनच पतलेलं नाही.
असो!
यूज्लेस आहे.
कारण १००% निगेटिव्ह मतदान कधीच शक्य नाही.
निव्वळ शुद्ध फसवेगिरी आहे ही
केदार समजा कुणीही नाही २५७२३२
केदार
समजा
कुणीही नाही २५७२३२ मतं
काँग्रेस ५२३०७ मतं
आणि भाजपा ५२३०७ मतं
>>>
असे घडल्यास नवे उमेदवार उभे राहणार की तेच परत तीच मते आजमावणार?
म्हणजे ती ५७२३२ मतं वाया
म्हणजे ती ५७२३२ मतं वाया गेली.<<<
केदार, तरीसुद्धा, जर ती मते 'बाद मतांमध्ये' गणली जाणार असली तर हेच समजणार नाही ना की कितीजणांना कोणीच नको होते? ते समजणे तर महत्वाचे आहे ना? शेवटी तेही एक मत आहे.
म्हणजे नोटा बहुमतात असेल तरच
म्हणजे नोटा बहुमतात असेल तरच फेरनिवडणुका आणि नसेल तर जो कोण पक्ष असेल तो जिंकला असे का?
असे असेल तर मग खरंच ही फसवेगिरीच झाली की.
Pages