Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कशासंबंधी होतं हे? स्मित>>>>
कशासंबंधी होतं हे? स्मित>>>> बहुतेक युद्धात तोफेच्या धडाक्याचे वर्णन होते. <<< निपा, अच्छा.
धड्याच नाव "महापुरूषन्चा पराभव" लेखक अठवात नाहित. << जनार्दन वाघमारे ना लेखक?
५ वीला फिटे अंधाराचे जाळे
५ वीला फिटे अंधाराचे जाळे कविता मस्त होती ना??
चि. वि. जोशींचा स्वयंपाकीण
चि. वि. जोशींचा स्वयंपाकीण काकू नावाचा धडा होता बहुतेक सहावीला. त्यावेळी त्या धड्याने खूप हसवलं.
पण आता माझ्या स्वयंपाकाच्या बाई मात्र तशाच वागतात तेव्हा.............................
स्वयंपाकिण काकुमधील त्या
स्वयंपाकिण काकुमधील त्या काकुंना तपकिर ओढायची सवय असते व त्यानंतर त्यांना शिंक येऊन सर्व तयार जेवणावर त्याचा प्रसार होतो त्यासाठी चि.विं. नी 'उदकसिंचन' हा शब्द योजला आहे.
एवढ्या सगळ्यात तो च च्या
एवढ्या सगळ्यात तो च च्या भाषेचा धडा राहिलाच कि ,
चपल्यालाआ चताआ चव्यान चरातघ चहायलार चयाचजा चहेआ ,
ते एक फॅड निघाल होत च च्या भाषेच ( साधारण ३ री ते ५ वी दरम्यान असावा)
घर नाव त्या धड्याचं बहुदा
घर नाव त्या धड्याचं बहुदा
जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की
जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात होतो तैसा येक धडाका जाहला >>>> हा धडा दहावीला पहिला होता, मराठीच्या पुस्तकांत, ... बखर का काहीस नांव होतं धड्याचं आणि मग त्या अनुषंगाने बखर वाड्मय ह्या साहित्यप्रकाराचा अभ्यास होता.
बाबल्या चितेतून पळाला - हा
बाबल्या चितेतून पळाला - हा कुमारभारतीचा धडा अकरावी का बारावी ते आठवत नाही.
एकेकाळी असं वाटलं होत की कधी अनुक्रमणिका सुद्धा विसरणार नाही आणि आता वरची चर्चा वाचून दुसर्याच कोण्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या आठवणी वाचतोय इतकं अलिप्त वाटतयं
बाबल्या चितेतून पळाला - ती
बाबल्या चितेतून पळाला - ती वसंत सबनीसांची गोष्ट आहे. केवळ कहर आहे. एकदम हहपुवा.
बाफ मस्त आहे. आता वरची चर्चा
बाफ मस्त आहे.
आता वरची चर्चा वाचून दुसर्याच कोण्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या आठवणी वाचतोय इतकं अलिप्त वाटतयं ........ खरंच!
हो, घर असच नाव असेल, त्या
हो, घर असच नाव असेल,
त्या शाळेतल्या आठवणी अगदी मनात कोरुन गेलेल्या असतात, सर्व कवितांना एकच टीपीकल चाल लावून गात बसायचे,संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळी दरवाज्यातून डोकावून डोकावून घंटा वाजवणा-या शिपायाकडे बघायचे,
कबड्डीच्या मैदानात ठरवूनच एकेकाला आपटायचे,आणि शाळेला दांड्या मारुन विहीरीवर पोहायला जायचे.....
साला.... गेले ते दिवस,राहिल्या त्या आठवणी ....................
"धुन" धडा आठवतो का कुनाला?
"धुन" धडा आठवतो का कुनाला? १९९८ ला मि दहावी झालो.तेव्हा नववीत होता बहुतेक.नक्कि नाहि आठ्वत. पन त्यातलि वाक्य आठवतात.
सासु ला जेव्हा कळत कि तिच्या लेकिला सासरी त्रास आहे तेव्हा ति तिच्या सुने ला त्रास देन्याचा प्रयत्न करते पन मुळात प्रेमळ असल्या मुळे तिला ते जमत नाही.
(सासुच्या कष्टाळु आणी प्रेमळ स्वभावाच सुन वर्णन करते)
"आत्या बाय रानात गेल्यात,कवाधरन झाल पत्याच नाहि त्यान्चा. आसच असत बघा आम्च्या आत्या बाइच .जाउ नका म्हनल तर ऐकाय्च्या नाहित आनि गेल्यावर वापस जलदी काय यायच्या नाहित.आल्यावर तरी घडीभर बसतील तर नाव नाहि."
(स्वताच्या लग्नाच ति सान्गते कि तिच लग्न साट्यालोट्याच आहे.म्ह्ने तिचि नणन्द तिच्या भावाचि बायको आहे.)
"साटया लोट्याच लगीन आहे आम्च.इथुन पाह्य्ला गेल तर मि तिचि नणन्द आनि तिथुन ति माझि नणन्द.
लेक आडात धकलुन द्यावी.पर साट्यालोट्यावर देवु नये म्हनतात."
(सासुच्या लेकी ची माहिती घेवुन येनारया आनी सरळ पने न सान्गनार्या एका बाइ बद्द्ल सुन सान्गते)
"हि गया बी लै बाजिन्दी आहे कोन्चि गोष्ट कधी सरळ सान्गाय्चि नाहि.अगोदर लोकन्चा जीव टान्गनीला लावल आनि मग कापसात न सरकी काढ्ल्या सारखि एक एक गोष्ट सान्गत बसल."
(हि गया तिच्या सासुला सान्गते कि तिच्या मुलिला सासरि तिच्या सासुने म्हन्जे सुनेच्या आईने मारल)
" रखमाला मारल म्हन तिच्या सासुने .चोळी हरवलि म्हने नदीवर."
(त्यावर सासु म्हणते)
"म्ह्जे धुन देवुन धाडल होत का माझ्या लेकीला?इथ मि हिला बाहेर च उन पाहु देत नाहि."
(गया गेल्यावर सासु रड रड रडते आनि अचानक काहितरि आठ्वल्या सारख उठ्ते आनि तीच्या सुनेला कानाखालि मारते. आनि म्हण्ते)
"ए व्ह्यमाले!बसलि का राज्याच्या रानि वानि आकडा टाकुन्?ते धुन काय तुझी माय येनार आहे का धुवायला?"
(बिचारी सुन रणरणत्या उन्हात कपडे घेवुन नदीवर धुवायला जायला निघते तर तिचि सासु परत तिला परत विचारते!)
"कुठ निघालिस?"
(सुन)
"धुन धुवायला"
(सासु)
"फिर् माग !बिमार फिमार पड्लिस तर तुझी माय येनार आहे का निस्तराय्ला?"
(सुन)
म्या काय बोलनार ?म्या माग फिरले!
ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ
ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है' ही चाल लावायचं नाही का ?>> गे माय भू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणीन आरतीला, हे सूर्य चंद्र तारे'
आणि माझ्या बहीणीचा वर्ग यावर किंवा मेहेंदी लगा के रखना वर "आई कुणा म्हणू मी, आईस हाक मारी" ही श्यामची आई वालं करूण रसातलं गाणं म्हणायचे
अनिष्काने सांगितलेले सगळे धडे मलाही होते.
खूप खूप नॉस्टॅलजिक व्हायला झालंय...
मला पहीले धडे (जाम बोअर असायचे) अज्जिबात आवडत नसत. आणि ते फटका (अनंत फंदी), अखंड (म. ज्योतिबा फुले) हे ही कंटाळा यायचा तेव्हा...
औंधाचा राजा, स्मशानातील सोनं, लाल चिखल या कथांनी तर गारूड केलेलं.
सुंदर, धुणं, रेडियोची गोष्ट वै. पण छान.
इंग्रजीतील ब्युटी अँड द बिस्ट, डेविड गोलिएथ, वुडन ब्रिज हॉटेल तर आत्ता आत्तापर्यंत जपून ठेवलेले गाईडमधील भाषांतर
वा अजून काय काय आठवल. खवरदार
वा अजून काय काय आठवल.
खवरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या , ह्यानंतर पॉझ आणि मग उडविन राइ राइ एवढ्या. अस म्हणायचे सगळे. चिंध्या गोळा करत करत घोडेस्वार चाल्लाय अस चित्र यायच डोळ्यासमोर
दुसरे ऑल्टैम्फेव्हरीट धडे
दुसरे ऑल्टैम्फेव्हरीट धडे म्हणजे:
सोन्याची जांभळे
तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे
कोणाला ही अन्गाई पुर्ण आठवते
कोणाला ही अन्गाई पुर्ण आठवते का :
"झोपडीच्या झापाम्होरं कसं चांदण टिप्पूर, वाऱ्यासंगे हेलावतो उभ्या चिंचेचा मोहोर"
"धुन" धडा आठवतो का कुनाला?
"धुन" धडा आठवतो का कुनाला? >>
हो आठवतो ना..आमच्यावेळी पण होता.....मी नववीत असताना २००४ ला होता बहुतेक...
सभोवार काळ रान गेल दुधात
सभोवार काळ रान गेल दुधात भिजून
रानवेलींची लेकर त्यास चाट्ती निजून (नॉट शुअर)
उघड्या ह्या गव्हाणीशी बैल करीती रवंथ
करी रानाची राखण मोत्या जागत (शब्द आठवत नाहीये)
खूप आवड्ती कविता !विस्मरणात गेलेली
त्या कवितेत शेवटी खालील ओळी
त्या कवितेत शेवटी खालील ओळी होत्या. त्या म्हणताना नेहमी हसू यायचं -
बाळा दमून भागून
तुझं वडिल झोपलं
नको करू किरकिर
झोप उगीच मोडेल
ती एका वासराची कविता आठवते का
ती एका वासराची कविता आठवते का कोणाला.. ? पाचवी की सहावीत होती.. ते वासरू कानात वारं शिरल्यासारखं रानात भटकत रहातं आणि मग त्याला संध्याकाळी आपल्या आईची आठवण होते..
त्यातलं एक कडवं असं काहितरी होतं..
पडता अंधारू, लागले हंबरू ,
माय तू लेकरू, शोधू पाहे..
अजून एक गाय वासराची गोष्ट चौथीत होती.. वात्सल्य.. त्यात गाईचं नाव चंद्री.. कारण तिच्या कपाळावर चंद्राकार टीळा असतो आणि वासराचं हरणी..कारण ते वासरू हरणासारखं दिसतं...
चंद्री गाय कशी होती ? काळीबाळी, लांब शेपटीची, ठुसकीशी होती.. असा एक प्रश्न यायचा..
'झाडाची माया' नावाचा पण एक धडा होता. त्यात एक भाऊ दुसर्याला झाड तोडू देत नाही म्हणून ते झाड त्याला कशी मदत करत त्याबद्दल...
सोन्याची जांभळे आठवतो.. नागू भगत फेम
दहावीला.. एका कुठल्यातरी
दहावीला.. एका कुठल्यातरी कवितेमधली.. 'चंद्र बुडो आला... रात पाण्यात दडली.. उन्हपिवळ्या फुलांत सकाळ सांडली' ही ओळ संस्प ला यायची!
आमच्या शाळेत दहावीला बाहेरचे शिक्षक खास सेशन्स घ्यायला यायचे. त्यातल्या एकांनी 'सांडणं कसं सुंदर असतं पहा बरं मुलांनो !!' असं म्हणत पूर्ण दोन तास ते एकच संस्प शिकवलं होतं !!!
स्वरुप पहा धडा आठवतोय का?
स्वरुप पहा धडा आठवतोय का?
पराग, ती कविता - ओढाळ
पराग, ती कविता -
ओढाळ वासरू
रानी आलं फिरू,
कळपाचा घेरू
सोडूनिया
मोकाट मोकाट
पिसाट पिसाट
दिसेल ती वाट
धावू पाहे
हो, वात्सल्य पण आठवला. त्यात वासरू हरवते, असे काहीतरी होते ना?
झाडाची माया धड्यातल्या भावांची नावं शिणतू आणि लिणतू अशी काहीतरी होती.
गोनीदा यांचा एक धडा होता.
गोनीदा यांचा एक धडा होता. अंबू पहिल्यांदा लग्न होऊन कोकणात येते तेव्हा तिला पाटाचे पाणी, सगळीकडे हिरवंगार हे रूप खूप भावतं, ती वयाने लहान असते. 'पडघवली' ह्या पुस्तकातलाच भाग होता तो.
हो, ती हरणी हरवते आणि मग
हो, ती हरणी हरवते आणि मग चंद्री गाय कशी हंबरायला लागते.. आणि मग कोणाला तरी रानात हरणी सापडते आणि मग तिला पहिल्यावर गाय तिला प्रेमाने खूप वेळ चाटत रहाते आणि तिच्या डोळ्यात कसे वात्सल्यपूर्ण भाव असतात असं वर्णन होतं.
स्वरूप पहा विनोबा भाव्यांचा ना ?
@अन्जू : ती कविता बहुतेक शंकर
@अन्जू :
ती कविता बहुतेक शंकर रामाणी यांची 'पाऊस' हि होती.
त्यातला उटंगार हा शब्द मला फार आवडायचा.
विनोबांच्या स्व-रूप पहा
विनोबांच्या स्व-रूप पहा धड्यात एक उदा. होते - पृथ्वीप्रदक्षिणा करावयास निघाल्यावर उन्हाने पाय पोळ्तात म्हणून अख्ख्या पृथ्वीला चामडे पांघरण्याची युक्ती आपल्या सुचते, पण स्वतःच्याच पायात जोडे घालाण्याचा साधा उपाय सुचत नाही.
झाडाची माया - नाव आठवत्ये
झाडाची माया - नाव आठवत्ये फक्त. कितवीत होता हा धडा?
>> जैसे भडभुंजे लाह्या भाजतात
>> जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात होतो तैसा येक धडाका जाहला
यातच 'आप मेला, जग बुडालें! आबरू जाते आणि वाचतो कोण?' हेही होतं का? पानिपतातलं आहे ना हे?
>> 'सांडणं कसं सुंदर असतं पहा बरं मुलांनो !!
हो हो रा_का, शंकर रामाणी
हो हो रा_का, शंकर रामाणी यांचीच, धन्यवाद, चुकुन निकुंब लिहिलं.
Pages