मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, मामा, तो धडा येस्स 'राणी' !!!

अजून एक धडा होता, बहुतेक सहावीला. त्यात एका कुटुंबातील मुलाला दृष्टीदोष असल्याचं निदान होतं. शस्त्रक्रिया करण्याइतकी परिस्थिती नसते. नवराबायकोंचं रात्री उशीरा चाललेलं बोलणं मुलं (बहिणभाऊ) ऐकतात. त्यांना समजते की, डोळे बरे करायचे असतील तर मोठ्या शहरातल्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडून शस्त्रक्रिया नावाचे काहीतरी करायला लागते. मग हे दोघेच बहिणभाऊ प्लॅन बनवतात आणि एके दिवशी पहाटे शहराच्या शोधात प्रवासाला निघतात. शोधत शोधत दवाखान्यापर्यंत पोचतात. सगळी हकीकत ऐकून डॉक्टरांना कौतुक वाटतं आणि ते भावाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करतात आणि मग त्यांच्या आईवडलांना कळवतात.

धड्याचे नाव आठवत नाही, पण खूप आवडायचा. चित्रेही भारी होती त्या धड्यात.

कविता किंवा दुसरे काही इथे लिहिताना (म्हणजे स्वतः लिहिताना नाही, दुसर्‍याची इथे टाकताना ! वापरताना म्हणायला हवं खरेतर. )
अनेकदा असा विचार मनात येतो की अशी काहीतरी ऑनलाईन रिपॉझिटरी वगैरे असायला हवी तिथे आपल्याला ती कविता प्रताधिकार मुक्त आहे की नाही हे कवितेचे / लेखनाचे नाव / त्यातल्या काही ओळी टाकल्यावर लगेच समजू शकेल.

हैबत गैबत, माझ्या मामाची रंगीत गाडी ,दिपका मांडिले तुला सोनियाचे ताट, या बाई या - बघा बघा कशी माझी बसली बया , इर्जिक, निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, कितीतरी दिवसात नाही डुंबलो नदीत, वाघ पाळलेल्या डॉ. पूर्णपत्रेंचा एक धडा, अत्र्यांचा (त्यांनी बांधलेल्या बंगल्यावरचा ) एक धडा असं अजून काही काही आठवतंय. पिवळे ताम्बूस ऊन कोवळे पसरे चौफेर - ओढा नेइ सोने वाटे वाहूनिया दूर, पांगार्करांचा एक धडा होता. मोती कुत्रा असा काहीतरी एक धडाही होता बहुतेक. आणि हिंदीत गाव का मेला, सब्ज परी , हर ग्राम हर नगर के - हर द्वार हर डगर पर, कोशिश करने वालोंकी हार नही होती, सो रहा है लाल मेरा. संस्कृत मधे थालीपीठावरच एक `स्थालपिष्टाष्टकम' आठवतय.

गजानन यांचे हा धागा सुरु केल्याबद्द्ल आभार. भुतकाळातील त्या आनंदमयी दिवसांच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या. ह्या धाग्या मध्ये उल्लेख झालेले बहुतेक धडे आणि कविता आमच्या अभ्यासक्र्मात होत्या. माझी दहावी १९९३ ची. मराठी भाषेची ओळ्ख व समृधतेचा परिचय ह्या सर्व धड्यांनीच तर करुन दिला. प्रतिथयश लेखक/लेखिका, कवि/कवयत्री यांची आपली पहिली भेट ह्या धड्यांमुळेच घडली़.
जी. ए. कुलकर्णींचा भेट हा धडा विशेष स्मरणात आहे कारण शाळेच्या लायब्ररीत जाऊन ते पुस्तक मिळते का हा प्रयत्न करुन पाहिले होते पण नाही मिळाले.....

दुसरीच्या इतिहासाच्या पुस्तकाचं नाव गोष्टीरूप इतिहास असं होतं. त्यातल्या सगळ्या गोष्टी आमच्या तोंडपाठ होत्या. कारण आमच्या गुरुजींनी प्रत्येकाला एक एक गोष्ट वाटून देऊन, पाठ करून घेतली होती आणि सगळ्यांसमोर ती गोष्ट सांगायला लावायचे. त्यामुळे आपल्याला जी सांगायची आहे त्यानिमित्ताने ती पाठ करून, आणि इतर गोष्टी ऐकून ऐकून, असे सगळे पुस्तकच सगळ्यांचे पाठ झाले होते. Happy
भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, बळी राजा, गर्वाचे घर खाली (भीमाची आणि हनुमानाची शेपूट उचलण्याची गोष्ट), बकासुराचा वध इत्यादी गोष्टी होत्या.

तिसरीला थोरांची ओळख ( नव्या अभ्यासक्रमात थोरांच्या ओळखीऐवजी 'माणसाची गोष्ट' म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीचाइतिझास आला. ) आणि चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास. पाचवी पासून मग मोहेंज्दडो संस्कृती आणि पेशव्यांचा इतिहास सुरू झाला. Happy

इतके प्रतिसाद पण एकही धडा आठवत नव्हता म्हटले मी शिकले की नाही हेच विसरलेय पण रावी मुळे जरा आठवतेय, रावी धन्स.
मंडळी ७५ ते ८५ सालचे लिहा (मी दहा वर्षात दहावी झाले, आहे की नाही कमाल!)
गजानन मनापासून धन्यवाद.

अन्जू....

"इग्लू" ची आठवण काढल्याबद्दल थॅन्क्स....मला तर आता या क्षणी इग्लूची ती आकृती आणि आजूबाजूला उभे असलेले अनेकविध जाडजूड (थंडीपासून बचाव करण्यासाठी) लोकरीचे कपडे घातलेले ते भटकंती प्रिय लोकही आठवले....कुत्र्यांच्या खास गाडीसह......पोटावर पडून घसरत इग्लूत जाण्याचा तो प्रकार.

मला वाटते कॅप्टन स्कॉट आणि अमुंडसेन ही दक्षिण ध्रुव पादाक्रांत करणारी जोडी आणि त्यांचे अथक प्रयत्न याविषयी मराठीच्या पुस्तकात धडे होते.

लाल चिखल मधे शेवटच वाक्य....'' आणि नंतर कितीतरी वेळ तो त्या चिखलात नाचत होता" अरेरे

दमडी ( ५ वी ) >>> तीला भाकरी बरोबर शेव खायला हवी होती...

गोकुळ > अर्धा तोळा साखर आणि शेरभर केशर आणतो

शितु > हुप्प्याने हात फोडला

बेगड > प्रकाश बर्‍याच काळाने आपल्या घरी गावी येतो पण बसमधून उतरल्या क्षणापासून त्याच्या तुसड्या वागण्याला सुरुवात होते. घरातली प्रत्येक गोष्ट त्याला ठसठशीतपणे ओंगळ दिसू लागते. त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न याने करावे असे आई-वडलांचे मत असते पण त्याला अचानक मामाची मुलगी (सीता?) गावंढळ वाटू लागते.

धुणं > साट्यालोट्याचे लग्न.. मनाने प्रेमळ पण आपल्या मुलीला सासुरवास होतोय हे ऐकुन रागाने सुनेला म्हणजे मुलीच्या नणंदेला थोबाडीत मारणारी सासु

अनिश्का हे सगळे धडे मला पण होते... कोणता कधी होता ते नाही आठवत पण होते हे नक्की.

अजुन एक धडा होता कन्याकुमारीवर त्या लेखकाने कन्याकुमारीच, तिथल्या समुद्राच, सुर्योदय आणि सुर्यास्ताच वर्णन इतक मस्त केलय की बाकी भारत किंवा भारताबाहेर फिरले नाही तरी चालेल पण कन्याकुमारीला जायचच असा निश्चय केलाय मी. आता तो कधी पूर्ण होतोय काय माहीत?

मस्त मजा आली सर्व जुन्या आठवणींना उजाळा द्यायला. ३ री तली एक कविता आठवत्ये -
जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे
झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे

कवि शंकर यांची असावी बहुदा!

आणि बुद्ध हसला' ने अगदी भारावून गेल्याचे चांगलेच आठवते >>>>>>>>. चला एकतरी आठवणीतला धडा सापडला

लाल चिखल मधे शेवटच वाक्य....'' आणि नंतर कितीतरी वेळ तो त्या चिखलात नाचत होता" >>>>> टोमॅटो चा धडा.. खुप हृदयस्पर्षी होता......

माझी मेमरी परत येत आहे :)...

अजून एक धडा होता, बहुतेक सहावीला. त्यात एका कुटुंबातील मुलाला दृष्टीदोष असल्याचं निदान होतं. शस्त्रक्रिया करण्याइतकी परिस्थिती नसते. नवराबायकोंचं रात्री उशीरा चाललेलं बोलणं मुलं (बहिणभाऊ) ऐकतात. त्यांना समजते की, डोळे बरे करायचे असतील तर मोठ्या शहरातल्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडून शस्त्रक्रिया नावाचे काहीतरी करायला लागते. मग हे दोघेच बहिणभाऊ प्लॅन बनवतात आणि एके दिवशी पहाटे शहराच्या शोधात प्रवासाला निघतात. शोधत शोधत दवाखान्यापर्यंत पोचतात. सगळी हकीकत ऐकून डॉक्टरांना कौतुक वाटतं आणि ते भावाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करतात आणि मग त्यांच्या आईवडलांना कळवतात. >>>>>>>>

हा आम्हाला देखील होता...... कधी होता आठवत नाही Sad

जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे
झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे

<<< रायगड! मलाही आता हीच कविता आठवली. माझी आवडती, अजूनही कधी कधी मी ही कविता गुणगुणत असतो. त्या कवितेत पावसाळ्यातल्या खळखळणार्‍या झर्‍यांचे मस्त चित्र होते.

तिसरीत तिसरी कविता होती ही. Proud पहिला धडा जम्माडी जम्मत (चिमणीचा आणि एका छोट्या मुलीचा) , दुसरा बहुदा तो तीन भावांचा - ज्यात आणि त्यांचे वडिल त्यांना काही पैसे आणि एक एक खोली देतात आणि सांगतात की संध्याकाळपर्यंत तुमच्या मताप्रमाणे चांगल्या गोष्टीने ही खोली भरून काढायची. पहिला सगळ्या पैशाची मिठाई आणून खातो त्यामुळे त्याची खोली अंधाराशिवाय दुसर्‍या कशाने भरून निघत नाही. Proud दुसरा भाऊ रस्त्याने जात असताना त्याला डोक्यावर गवताचे भारे घेऊन जाणार्‍या बायका दिसतात. मग तो त्यांच्याकडून ते सगळे गवत घेतो आणि गवतानेच खोली भरून काढतो. आणि तिसरा असतो तो मात्र खोली झाडून लोटून स्वच्छ करतो, आणि देवापुढे अगरबत्ती वगैरे लावून प्रसन्नतेने खोली भरून काढतो.

दुसरी एक कविता तिसरीलाच होती. ती म्हणजे 'झुला'

झुले बाई झुला माझा
उंच उंच झोके घेता
भिडे आभाळाला

अश्या ओळी होत्या.

या कवितेच्या शेवटी 'झुल्यावरच्या मुलीचे चित्र रेखाटा' असा एक प्रश्न होता. तर आमच्या वर्गात एक चित्रकार होता. त्याच्याकडून सगळ्यांनी त्या पुस्तकात दिले होते तसे लांब लांब वेण्या सोडलेल्या आणि झोके घेत असलेल्या मुलीचे चित्र प्रश्नाचे उत्तर म्हणून रेखाटून घेतले होते. Proud
( चित्रासाठी सगळ्या मुलीही त्याला मस्का मारत होत्या हे बघून आम्हाला कसेसेच झाले होते. :हाहा:)

अजून एक धडा होता, बहुतेक सहावीला. त्यात एका कुटुंबातील मुलाला दृष्टीदोष असल्याचं निदान होतं. शस्त्रक्रिया करण्याइतकी परिस्थिती नसते. नवराबायकोंचं रात्री उशीरा चाललेलं बोलणं मुलं (बहिणभाऊ) ऐकतात. त्यांना समजते की, डोळे बरे करायचे असतील तर मोठ्या शहरातल्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडून शस्त्रक्रिया नावाचे काहीतरी करायला लागते. मग हे दोघेच बहिणभाऊ प्लॅन बनवतात आणि एके दिवशी पहाटे शहराच्या शोधात प्रवासाला निघतात. शोधत शोधत दवाखान्यापर्यंत पोचतात. सगळी हकीकत ऐकून डॉक्टरांना कौतुक वाटतं आणि ते भावाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करतात आणि मग त्यांच्या आईवडलांना कळवतात. >>>>>>>> मलाही इयत्ता आठवत नाही पण हा धडा आठवतो.

दुसरी एक कविता तिसरीलाच होती. ती म्हणजे 'झुला'>>>हो. छान कविता होती ती.

अजून एका कवितेची एकच ओळ आठवते...धीट बाई धिटुकली ..भीत नाही पिटुकली Happy

पैशाची मिठाई आणून खातो>>> हा धडा होता अम्हाला. आठवला पण तो मिठाइ खात नाही. त्याने खोली कशानेतरी भरुन ठेवलेली असते. त्याचे चित्र आठव्ले.

अजुन एक कविता आठवली. आज ये पाहुणा साजिरा गोजिरा... बहुतेक बाबा अमटेंची होती. त्यातला पहिला प्रश्न होता. कवितेत पाहुणा कोणाला म्हटले आहे. आणि उत्तर होतं.. रोपट्याला Happy आणि एका पालखिचे चित्र होते त्यात रोपटे होते.

आणि एक बखर होती. त्यात एक वाक्य होते. आप मेला जग बुडाले आबरु जाते अन वाच्तो कोण? असे काहिसे...
अजुन एक बखर होती कि तीच होती आठवत नाही. त्यात वाक्य होते ' जसे भडबुंजे लाह्या भाजतात' त्यात युधाचे वर्णन होते.

'आणि बुद्ध हसला' आणि 'स्मशानातील सोनं' हे दोन धडे एक सिलॅबस सोडून परत रिपीट केलेले दिसतात Wink

तो भाऊसाहेबांच्या बखरीतला उतारा होता - जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात होतो तैसा येक धडाका जाहला... (दुसरंही वाक्य त्याच वेच्यातील होतं)

स्मशानातलं सोनं धडा आम्हाला नव्हता, पण मी वाचलेला आहे.

रावीने लिहिलेले बहुतेक सगळे धडे, कविता आठवताहेत.

अजून एक धडा होता, बहुतेक सहावीला. त्यात एका कुटुंबातील मुलाला दृष्टीदोष असल्याचं निदान होतं. शस्त्रक्रिया करण्याइतकी परिस्थिती नसते. नवराबायकोंचं रात्री उशीरा चाललेलं बोलणं मुलं (बहिणभाऊ) ऐकतात. त्यांना समजते की, डोळे बरे करायचे असतील तर मोठ्या शहरातल्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडून शस्त्रक्रिया नावाचे काहीतरी करायला लागते. मग हे दोघेच बहिणभाऊ प्लॅन बनवतात आणि एके दिवशी पहाटे शहराच्या शोधात प्रवासाला निघतात. शोधत शोधत दवाखान्यापर्यंत पोचतात. सगळी हकीकत ऐकून डॉक्टरांना कौतुक वाटतं आणि ते भावाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करतात आणि मग त्यांच्या आईवडलांना कळवतात. >>>>>>>> बहिणीची माया नाव होतं धड्याचं... ह.ना. आपटेंची कथा होती - सहावीला होती. गोदू (बहिण-गोदावरी) आणि गोंदू (भाऊ-गोविंदा) दोघं कसली आदर्श पोरं असतात.. त्यातले डॉक्टर एकदम आवडायचे मला.. त्यात ते डोक्यावर काळी टोपी वगैरे घालणारे असतात... शिवाय गोदूने चक्क परकर-पोलकं घातलेलं असतं... एवढं सगळं असूनही इतकं सगळं चांगलं चांगलं होतं, यावर माझा तेव्हाही विश्वास नव्हता. Happy

आम्ही बंगाली शिकलो, नावाचा रमाबाई रानडेंचा लेख आठवतो का? मला त्यांचं ते टुमदार घर आणि बंगाली शिकतानाच्या सगळ्याच गोष्टी खूप आवडल्या होत्या...त्या रानडेंना 'स्वतः' म्हणायच्या ते तर एकदम हटके वाटलेलं... आता मला बंगाली शिकताना नेहेमी आठवतो तो धडा.

त्या शिंप्याच्या धड्याचं नाव 'आबा' होतं- पुन्हा इयत्ता सहावी. त्याची ती शेवटची संदूकीखालची तिजोरी माझ्याकडे पण असावी, अशी फार इच्छा होती, पण त्याच्याइतका कामसूपणा आपल्यात नाहीये, हे तेव्हाही कळत होतं. Wink

सहावीला मोटार पहावी घेऊन - चिं. वि. जोशी : मस्त होता. या विनोदी धड्याच्या मध्येच एका मराठी बाईचे चित्र होतं... ते चित्रं भारी होतं... आठवतं का कुणाला? मुळात गद्य पुस्तकात अशीच एकदम टॅण्जेण्ट वाटणारी सुंदर चित्रं आणि पाठीमागे त्याची माहिती टाकायची संकल्पना मला आजही आवडते.

त्याच वर्षी खेळखंडोबा (शंकर पाटील) आणि उभा जन्म लोकसेवेला वाहीन (टिळक-आगरकरांचं नाटक) होते.

आवडतो मज अफाट सागर, झोपडीच्या झापाम्होरं, निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झुबे लालसर ल्यावे कानी, पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन - ह्या माझ्या आवडत्या कविता होत्या.

सहावी झाली... आता वेळ मिळेल तशा बाकी यत्तांविषयी लिहीन. Happy

हटातटाने पटा रंगवुनी जटा धरिशी का शिरी
मठाची उठाठेव का करी
हा अनंत फंदींचा फटका जिभेला अगदी चुरचुरित वाटायचा. तेव्हा पाठ होता.

dhaaraa | 13 April, 2014 - 02:32 नवीन.... मानुषी... सेम पिंच... Happy

हे सगळ वाचुन आता झोपल्यावर ' अरेच्या आज मराठीचा पेपर आहे अभ्यासच झाला नाही' किंवा 'गणिताचा अभ्यास करुन गेलोय आणी समाजशास्त्राचा पेपर आहे' अशी स्वप्नं पडली नाहीत म्हणजे मिळवली Wink

धारा, मोटार पहावी घेऊन मस्त होता. त्यात ती मोटार बंद होता होत नाही मग ते चालू मोटारीतूनच देवळाला प्रदक्षिणा घालू लागतात, असाही प्रसंग होता ना? आम्ही बंगाली शिकलो आणि त्यातले 'स्वतः' ही आठवले. सातवीला होता का तो धडा?

आणखी एक धडा होता सहावीला(?). त्यात एक वाक्य होतं - तुम्ही तुमचे दुर्गुण जगापासून जेवढे लपवायचा प्रयत्न कराल तेवढे जग ते उघडे पाडील आणि तुमचे दुर्गुण जेवढे प्रामाणिकपणे जगापुढे आणाल तेवढे जग त्याच्यावर पांघरूण घालील. बहुतेक विनोबांचा होता.

जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात होतो तैसा येक धडाका जाहला <<< वरदा, भारीच आहे वाक्य. कशासंबंधी होतं हे? Happy

मानुषीताई, तो फटका आम्हालाही होता Happy

शिवाय एक सिंहान्योक्ती आठवतेय

मेघांच्या गर्जनेने खवळुनि वरती सिंह पाहे स्वभावे
काकां, त्वा भीति सारी त्यजुनि मांसखंडासी खावे
जो गजांच्या खर-तर-नखरी फोडूनि मस्तकाते
धाला रक्ता पिउनि नच मृत पशूच्या इच्छितो तो कणांते

बरेच जण option ल ताकायचे हा धडा पण मला जाम आवदायचा. एक्तर त्यच्यावर सविस्तर उत्तरे लिहा मध्ये प्रश्न आल की खूऊप लिहीत यायच आनी आजच्या काळातही खूप पटनरी अशी मत आहेत. निवडनूका तोन्डवर आहेत. खूप मोठ्या लोकान्चा नाव घेउन राज्कारण होतय. तेव्हा तर खूऊप्च आठवतय.

धड्याच नाव "महापुरूषन्चा पराभव" लेखक अठवात नाहित.

Pages