घरट्यात माझीया .... (भाग २) (http://www.maayboli.com/node/48076 - भाग १)
पक्ष्याने घरटं बांधणं हे जरी खूप कॉमन असलं तरी जेव्हा ते प्रत्यक्ष घरटं बांधत असतात; त्या गोष्टीचं निरिक्षण करणं हे फारच आनंददायी असतं. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिंजिराने आमच्या अंगणात घरटं बांधण्याचं ठरवलं. दोघांची मिळून जागा शोधायची धावपळ सुरु झाली तसा आम्हाला त्याचा सुगावा लागला. अगदी अभ्यास करून, मग अगदी सर्वात सुरक्षित जागा त्यांनी ठरवली. आमचा जाईचा वेल छाटला आहे आणि शेजार्यांच्या ग्रीलमधे त्याचे वाळके अवशेष म्हणजे कडक झालेल्या फांद्या अडकून त्या तशाच राहिल्या आहेत. त्या वाळलेल्या फांदीच्या अगदी टोकाला त्यांनी घरटं बांधायला सुरुवात केली. ह्यांचं घरटं म्हणजे जणू कचर्याचा लोंबता बटवाच! >>>>
हे सारं वर्णन भाग १ मधे तुम्ही वाचलेले असेलच ....
त्यात शेवटी त्या ३ पिल्लांना त्यांच्या आई-बाबांनी नीट वाढवून या जगात सोडले .... असा गोड शेवटही वाचला असेल...
लेकिन कहानीमें एक और ट्विस्ट आ गया ....
काही दिवसातच अजून एका शिंजीराच्या जोडीने हे घरटे हेरले आणि पुन्हा थोडी डागडुजी सुरु झाली - शशांकला विचारले तर म्हणाला कधी कधी तेच तेच घरटे पुन्हा पुन्हा वापरले जाते निसर्गात...
मग आम्ही सगळे पुन्हा पहात होतो त्या जोडीची धडपड - घरटे नीट करायची -अंडी घालून ती उबवायची...
हे सगळे चालू असताना आमच्या लक्षात आले की ते घरटे शेजारच्यांच्या पत्र्याच्या शेडजवळ असल्याने आमच्या मनीमाऊला त्या घरट्याविषयी जरा जास्तच प्रेम वाटू लागलंय व ती त्या पत्र्यावरुन त्या घरट्याच्या जवळ जायचा प्रयत्न करु लागली. आता आम्ही चौघेही मनीवर लक्ष ठेऊन तिला तेथून हाकलायला लागलो.
दोन एक दिवसापूर्वी धाकटी कन्या आणि शशांक रात्री डायनिंग टेबलावर जेवण घेत असताना कन्यकेला खिडकीच्या बाहेर काहीतरी आवाज येत असल्यासारखे वाटले - त्या शिंजीराच्या घरट्याला काही धोका उत्पन्न झाला की काय म्हणून तिने त्या बाजूचा दिवा लावला तो काय !!!! आमची मनी त्या घरट्याच्या अगदी जवळपास पोचली होती - कन्यकेने जोरात ओरडा सुरु केल्याबरोबर शशांक, मी, मोठी कन्यका सगळे बाहेर धावलो - मनी पळून गेली होती - पण घरटे ज्या काडीला टांगले होते ती काडी मोडली होती ....
सगळ्यात पहिल्यांदा त्या पिल्लांचे काय झाले असेल म्हणून शशांकने व दोन्ही कन्यकांनी आसपास कसून शोध घेतला - तर पिल्लांचा पत्ता नव्हता. शेवटी शशांक व मोठीने नीट प्रकाशात ते घरटे न्याहाळले तर शशांकला आतमधे थोडीशी हालचाल जाणवली - एकदम उत्तेजित होऊन तो म्हणाला - जा गं एखादी नाडी नाहीतर सुतळी आण - घरट्यात पिल्लू दिसते आहे - शेजारच्या झाडाला हे घरटे टांगूयात परत...
पण त्या पिल्लाच्या आई-बाबांना कसं कळेल हे - मी विचारु लागले
अगं - सकाळी त्या पिल्लांना शोधयला ती नक्की येतीलच.. आपण प्रयत्न तर करु.. - शशांक.
मग दोघी मुली आणि शशांक यांनी कॉपरपॉडच्या एका फांदीला ते घरटे कसेतरी टांगले एकदाचे आणि आम्ही सगळे वाट पाहू लागलो -सकाळ केव्हा होतीये ती ....
सकाळी कधी नव्हे ते मुलीही लौकर उठल्या आणि शशांकने सगळ्यांनाच ती चांगली बातमी सांगितली की पिल्लाचे आई-बाबा घरट्याकडे चकरा मारत आहेत - पिल्लू नक्कीच जिवंत आहे ...
आता त्या घरट्याची जागा माझ्या किचनच्या खिडकी समोरच येत होती - किचनमधले काम करता करता ते घरटे - त्याला भेट देणारे ते शिंजीर आई-बाबा मला अगदी नीट दिसत होते ....
सगळे आवरुन मी बँकेत गेले तर दुपारी ४ वा. मोठ्या कन्यकेचा फोन ... आई.. ते घरटे रात्री जिथे बांधले तिथून खाली घसरले होते का गं ???
अगं नाही - मी कितीतरी वेळ त्या शिंजीर आई-बाबांच्या चकरा बघत होते .. - मी
अगं आता ते घरटे शेजारच्यांच्या ग्रिलच्या अगदी जवळ गेल्यासारखे वाटते आहे - मनी केव्हाही त्यावर झडप घालू शकेल .. - कन्या.
तू तिथेच थांबून काही करता येतं का बघ - मी बाबांना फोन लावते - मी.
दीड - दोन तास मोठी तिथेच थांबून होती आणि ६ च्या सुमारास शशांक आल्यावर तिने सांगितले की ज्या फांदीला घरटे बांधले होते ती फांदी मोडली आहे आणि घरटे ग्रिलच्या अगदी जवळ गेले आहे.
परत शशांक आणि तिने ते घरटे तेथून काढले आणि आता शेजारच्याच बेलाच्या झाडाला परत टांगले. दुसर्यांदा घरटे हलवावे लागले होते ..
पुन्हा दुसर्या दिवशी सकाळी सगळे त्या शिंजीर आई-बाबांच्या प्रतिक्षेत - सुदैवाने पिल्लूही जिवंत होते आणि आई-बाबाही त्याला भरवण्यासाठी येत होते.
आज सकाळीच शशांकने त्या किचनच्या खिडकीच्या आडून -अगदी लपून -छपून त्यांचे हे फोटोही काढलेत ...
मस्त.
मस्त.
शांकली... किती गोड .......
शांकली... किती गोड ....... धास्तावत पुढे वाचत राहिले... शेवट गोड झालेला वाचून जीव भांड्यात पडला...
वॉव... पक्षीही रीसेल अपार्टमेंट घेतात तर.. अनोखी माहिती..
फोटो तर सुप्पर्ब आहेत.. तुम्ही त्या पिल्लाचे रक्षण करत असता ते सुरक्षितच राहणार...
सुंदर! मी ही शेवटपर्यंत
सुंदर! मी ही शेवटपर्यंत धास्तावतच वाचले.
वा मस्तच. वाचत असतांना मनात
वा मस्तच. वाचत असतांना मनात धाकधुक चालूच होती आता काय पुढे वाचायला लागणार पण शेवट गोड झाला हे वाचून जीव भांड्यात पडला. तुमच्या सर्व familyला hats off, त्यामुळेच शेवट गोड झाला.
मस्त वाटलं वाचून.
मस्त वाटलं वाचून.
ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल!
ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल! (खरी ही सुरवात आहे)
म्हण्जे माणसाचा हस्त स्पर्श झालेल्या घरट्यात पक्षी रहातात तर!
भारी
भारी
शांकली मस्तच ग. फोटोही
शांकली मस्तच ग. फोटोही सुंदर.
आमच्याकडे आता बुलबुल नेहमी प्रमाणेच झुंबरावर घर बांधण्याच्या तयारीत आहे.
सही.. फोटोपण मस्त
सही.. फोटोपण मस्त
बरं झालं बाई! तुझ्या लेकींना
बरं झालं बाई!
तुझ्या लेकींना मोठी शाबासकी! फोटो मस्तच..
(No subject)
मस्त.फोटोपण मस्त
मस्त.फोटोपण मस्त
वा मस्तच. .......
वा मस्तच. .......
शांकली कित्ती उत्कंठा वर्धक
शांकली कित्ती उत्कंठा वर्धक लिहिलय्स. >>>धास्तावत पुढे वाचत राहिले... शेवट गोड झालेला वाचून जीव भांड्यात पडला..<<< +१००
शशांक फोटोही मस्तच.
सा-या कुटुंबाच्या प्रयत्नांना यश आलं , ब्राव्हो
शांकली, हाही लेख सुरेख लिहिला
शांकली, हाही लेख सुरेख लिहिला आहे.
मानुषीताई, +१.
म्हण्जे माणसाचा हस्त स्पर्श
म्हण्जे माणसाचा हस्त स्पर्श झालेल्या घरट्यात पक्षी रहातात तर! >> मी वाचलं होतं की पक्षी रहात नाही अशा घरट्यात म्हणून. पण अंजू आणि शशांकसारखे निसर्गप्रेमी त्या पक्ष्यांना नक्कीच आपलेसे वाटत असतील, त्यांच्यापासून आपल्याला धोका नाही हे त्यांना आपोआपच कळत असेल.
शांकली फारच सुंदर
व्वा! शाब्बास श.शां.आणि कन्या
व्वा! शाब्बास श.शां.आणि कन्या !लेख छानच!
अंजू आणि शशांकसारखे निसर्गप्रेमी त्या पक्ष्यांना नक्कीच आपलेसे वाटत असतील, त्यांच्यापासून आपल्याला धोका नाही हे त्यांना आपोआपच कळत असेल. >>>>>>>>.+ १००
किती सुंदर ! अगदी खरं
किती सुंदर !
अगदी खरं सांगायचं तर दोरीने ते घरटे परत बांधायचे शशांकलाच सुचू शकेल.. मी नुसताच हळहळत बसलो असतो.
मी नुसताच हळहळत बसलो असतो. >>
मी नुसताच हळहळत बसलो असतो. >> + १००
मस्त.
मस्त.
मस्त...
मस्त...