Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2014 - 23:42
चैत्राची चाहूल
चैत्राची पालवी
तांबूस कोवळी
तप्त निखार्यात
शीतल साऊली
पळस पांगारा
फुलला भरारा
पावला भरुन
मनाचा गाभारा
शुभ्र रातराणी
मोगरा साजणी
खुळावले मन
सुगंध गगनी
रंग उधळण
मुक्त पखरण
पक्षीगण कंठी
चैतन्याचे गान
नील-लाल-पीत
पताका भरात
उभारल्या गुढ्या
हिरवी कनात
सृष्टीचे सृजन
फुटे पान पान
सोहळा देखणा
भरारले मन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चैत्राचं वर्णन चांगलं
चैत्राचं वर्णन चांगलं केलंय.
शेवटचे कडवे सर्वात विशेष.
क्या बात है!!! मस्तच!!
क्या बात है!!!
मस्तच!!
खुपच छान लिहिले आहे .
खुपच छान लिहिले आहे .
खूप सुंदर.
खूप सुंदर.
(No subject)
वा, आवडली निसर्ग कविता अगदी
वा, आवडली निसर्ग कविता
अगदी जसंच्या तसं पण तरीही सोपं, सुटं वर्णन..
छान आहे कविता
छान आहे कविता
चैत्र कवितेत चित्रित झालेला
चैत्र कवितेत चित्रित झालेला दिसला
वाह कनातीचं कडवं जास्त आवडलं
वाह
कनातीचं कडवं जास्त आवडलं मला ते इंद्रधनुष्याचं वर्णन वाटलं
अप्रतिम !!
अप्रतिम !!
छानच ...
छानच ...:)
खूप छान! आवडली!
खूप छान!
आवडली!
मस्त .. सोपं सुट्सुटीत तरीही
मस्त .. सोपं सुट्सुटीत तरीही पिक्चरस्क वर्णन!
छान !
छान !
खुपच छान...
खुपच छान...