निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच एक नवीन वेल पाहिला.. लिंबाच्या झाडावर आधार घेउन उभा होता..त्याची फळे खूपच वेगळी होती आणि फुल थोडेसे छोट्या कृष्णकमळासारखे होते..
फोटो मोबाईल वरुन काढल्याने इतका क्लियर नाहिये..

photo0309.jpg

बहुतेक हा वेल मी पाहिला आहे, आमच्या बाजुच्या फ्लाट स्कीम मधे आहे... एक बंगाली कुटूंब आहे त्यांनी
लावला आहे..... ते लोकं ह्याचा जुस पण पीतात... नाव नाही माहिती... इथे तज्ञ सांगतीलच...

Kalach sadhna ne ha photo share kela hota mobilevar tichyaithla. Ti gavthi krushnkamal mhanali. Phul sunder aahe.

शुभ संध्याकाळ.
ही काही अमेरिकेत पाहिलेली फुले:
माहिती असल्यास नावे सांगा. मग अपडेट करीन.

Allium 'Globemaster' Ornamental Onion:

Hydrangea:

मृनिश, ती कृष्णकमळंच आहेत. पॅशन फ्लॉवर्स म्हणून गूगलवर बघितलंत तर अजून खूप फोटोज बघता येतील.

वर्षाने टाकलेली २ नं ची फुलं आपल्या सदाफुलीच्या जातीतलीच आहेत. आणि ३ नं ची हायड्रॅन्जिया आहेत. पण १ आणि ४ नं ची मात्र नाही ओळखता येत. फोटो फार सुंदर आलेत.

आणि वर्षा, येऊरला बघितलेल्या पानाला चांदड्याचं किंवा चांदव्याचं पान म्हणतात. बोटॅनिकल नाव मात्र बघायला लागेल. ते नंतर सांगते. Happy

वर्षा अग, तुझं नाव लिहायच्या ऐवजी चुकुन वरती जागूचे लिहीले, तुझे फोटो बघुन डोळ्याचं पारणं फिटलं.

जागुची आधीची पोस्ट आहेना, पटकन तिनेच फोटो टाकलेत असं वाटलं.

मृनिश, फुले पॅसिफ्लोरा कूळातली असली तरी पाने वेगळी आहेत. तशी फुले असलेला वेल आपल्याकडे कोकणात दिसतो पण पाने त्रिशूळासारखी असतात.
वर्षाच्या फोटोतली फुले मी ऑकलंडच्या गार्डनमधे बघितली होती. तिथे नावे होती.. फुले माझ्या डोक्यात राहिली, नावे नाहीत. Sad

ती पाने मला आपल्याकडच्या कुंकवाच्या झाडासारखी वाटताहेत. बिक्सा अनोटा असे काहीतरी नाव आहे. याच्या बियांच्या आवरणापासून सुरक्षित खाद्यरंग मिळतो.

सुप्रभात!!!

वर्षाने टाकलेली २ नं ची फुलं आपल्या सदाफुलीच्या जातीतलीच आहेत. >>>>> आपल्याकडील सदाफुली एक-एकटी येते, ईथे मात्र गुच्छ आहे.

१ नं ची फुले मला फायरबॉल सारखी वाटली. ???????

धन्यवाद सर्वांना. हा धागा मी नेहमी वाचायचे फक्त फोटो देण्याचा कंटाळा करायचे. आणखी आहेत बरेच फोटो ठिकठिकाणचे.
अंजू अगं इट्स ओके. Happy
कळलेली नावं वर अपडेट केली आहेत. धन्यवाद शांकली. हो ती फोटो क्र. २ मधली फुल सदाफुलीसारखी दिसत आहेत खरी.

वर्षा - तुम्ही टाकलेल्या फोटोतील पहिल्या प्रकाराचे फुल बहुधा हे असावे - (२७ मार्चची पोस्ट - "शुभ संध्याकाळ. ही काही अमेरिकेत पाहिलेली फुले: माहिती असल्यास नावे सांगा. मग अपडेट करीन." - या ओळीच्या लगेच खालचे फुल)
Allium 'Globemaster' - Ornamental Onion कृपया गुगलून पहा ...

अरे वा.. Allium 'Globemaster' Ornamental Onion ला शोभेचे कांदे लागतात काय खाली??

अरे वा त्या वेलाचे नाव गाव सगळे लगेचच कळले पण..मस्तच..सगळ्याना धन्यवाद

दिनेशदा बरोबर आहे..पाने त्रिशुळासारखी आहेत याची आणि फुले पण कृष्णकमळापे़क्षा लहान आहेत..
फळे पण एकदम केसाळ आहेत..
पॅसिफ्लोरा चा एकदम चुलत भाउ आहे वाटते.. Happy

वा १८वा भाग, अभिनंदन निगकरांच

आता बहुधा रेग्युलर येइन इथे

माझ्याकडे एका कुंडीत अशी लाल फळं येणारं रोप आलय. छोटी मिरी एवढी फळं आहेत.
कसली आहेत ती
RF.jpgRF1.jpg

माझ्याकडे एका कुंडीत अशी लाल फळं येणारं रोप आलय. छोटी मिरी एवढी फळं आहेत.
कसली आहेत ती >>>>> जो_एस - ते हे रोप आहे -
कॉमन नाव - Blood Berry, Pigeon Berry, coral berry, Baby Pepper, rouge plant
शास्त्रीय नाव : Rivina humilis Family: Phytolaccaceae (Pokeweed family)

( http://www.maayboli.com/node/46765 या धाग्यावर मी याचे फोटो टाकले आहेत - आमच्या बागेतही हे रोप आहे... Happy )

जो_एस / सुधीर - हा मका कुठे लावलाय - कुंडीत का जमिनित ? ते लाल तुरे मस्त दिस्ताहेत .... Happy

Pages