निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
या मक्यावरुन - उगीचच पु
या मक्यावरुन - उगीचच पु लंच्या नावावर खपवलेला एक इनोद -

पु ल जर चीन मधे गेले तर जेवणाच्या आधी "वदनी कवळ घेता" च्या ऐवजी "सर्वात्मका" ही प्रार्थना म्हणत म्हणे ...
शशांकजी मला नाही कळला विनोद.
शशांकजी मला नाही कळला विनोद. (तशी थोडी मठ्ठच आहे मी), विस्तृतपणे सांगाना.
"सर्वात्मका" = सर्वात "मका" -
"सर्वात्मका" = सर्वात "मका" - चीनमधे म्हणे सगळ्यात मका घालतात ना (विशेषतः ते सूप्स वगैरे असतात त्यात तर हमखास कॉर्न = "मका" असतोच ना) त्याला उद्देशून हे ....
(बाकी खरे खोटे - वर्षूदी सांगेलच आपल्याला ....
)
सर्वात्मका
सर्वात्मका
Thanx. खरंच माझ्या अजिबात
Thanx. खरंच माझ्या अजिबात डोक्यात आलं नाही.
छान आहे सर्वात मका...
छान आहे सर्वात मका...:-)
क्यूट दिस्तोय मका..
क्यूट दिस्तोय मका..
सर्वात्मका..........
शशांक... चीनी जेवणाबद्दल हे नॉट राईट
शुभ संध्याकाळ. हे कप अॅन्ड
शुभ संध्याकाळ.

हे कप अॅन्ड सॉसर टाइप फूल येऊरच्याच जंगलात बघितले होते. (कप बशीवर उलटा ठेवल्यासारखे दिसते म्हणून कप सॉसर असं त्या ट्रेलमध्ये ऐकलं).
Cup Saucer Plant, Cupped coral-berry tree - मराठी नाव :डाळफोडी
शास्त्रीय नाव : Breynia retusa कूळ : Phyllanthaceae (Amla family)
आणि ही रानहळद. बरोबर ना?

व्वा! सुंदर फ़ुले वर्षा!
व्वा! सुंदर फ़ुले वर्षा!
वा, वर्षुताई दोन्ही फोटो
वा, वर्षुताई दोन्ही फोटो मस्त.
शशांक जी सर्वात्मका......D
शशांक जी सर्वात्मका......D
:
वर्षा, कप बशी खुपच गोड....
जो_एस , अय्या कुंडीत मका?
जो_एस , अय्या कुंडीत मका? कीती गोड......
Cup Saucer Plant, Cupped
Cup Saucer Plant, Cupped coral-berry tree - मराठी नाव :डाळफोडी
शास्त्रीय नाव : Breynia retusa कूळ : Phyllanthaceae (Amla family)
धन्यवाद. वर अपडेट केले.
धन्यवाद. वर अपडेट केले.
रानहळदीला त्या पुष्पकोशातच
रानहळदीला त्या पुष्पकोशातच पिवळी फुले येतील.
सायलीने जो ह्यूमन फेसचा फोटो टाकलाय तशीच आपल्याकडे बाहुली आमरी असते. सातारा परीसरात मी बघितली होती.
सामी, आमचे मूळ गाव राजापूर.. धोपेश्वराची घाटी माहिती आहे ना ! मी लहानपणी गेलो होतो ते नंतर एकदम ३० वर्षांनी गेलो होतो. धोपेश्वराच्या पुजार्यांनी फार छान वागणूक दिली.. तो भाग मस्तच आहे. पावसाळ्यात तर छानच.
Cup Saucer Plant, Cupped
Cup Saucer Plant, Cupped coral-berry tree - मराठी नाव :डाळफोडी
शास्त्रीय नाव : Breynia retusa कूळ : Phyllanthaceae (Amla family)>>>> माझ्या ऑफिसमधे याला "पाहुणचार" म्हणतात.
कुंडीत मका लावताना फक्त कच्चे दाणे पेरुन चालेल का?
मागच्या जुन-जुलै मधे कुंडीत आले लावले होते. बाजारातून सालवाले आले आणले, त्याला माती मिश्रीत पाण्यात ठेवून मोड/मुळे आल्यावर कुंडीत लावले. चांगले रुजले, ८-९ सें.मी. उंचीची पाने आली. पण मागच्या आठवड्यात ती सर्व सुकली. एक वर्षाने आले बाहेर काढून बघायचे आहे. अजुन ३ महीने अवकाश आहे. तोपर्यंत मातीत असलेले आले (?) जगेल का? (मुळात मातीच्या आतील प्रगती माहीत नाही). आताच उकरून पहावे का? पाणी घातल्यावर पुन्हा हिरवळ येईल का?------ हा सगळा मल्हारचा प्रयोग आहे.
कुंडीतला मका कसला
कुंडीतला मका कसला मस्तय...वर्षा चे फोटो मस्त आहेत..
मधु, कुंडीतली माती अलगद
मधु, कुंडीतली माती अलगद हाताने उकरुन आले बाहेर काढता येईल. त्यातले डोळे असलेले भाग कापून परत
पेरायचे. बाकीचे आले वापरता येईल. अगदी अर्धा इंच असले तरी त्याची चव फारच छान असते.
मी ही लावलेय आले कुंडीत.
मी ही लावलेय आले कुंडीत. अजुन लहान आहे.
वर्षा कप अॅन्ड सॉसर मस्तच.
वर्षा कप अॅन्ड सॉसर मस्तच. दिनेश्दा राजापूर माहीत आहे, धोपेश्वराची घाटी बाबांना माहीत असेल.
कुंडीतला मका मस्तच.
हो मक्याचे वाळलेले दाणे लावले
हो मक्याचे वाळलेले दाणे लावले होते मी. वाण्याकडे मिळतात ते.
वर्षा भारी आहेत फुलं
वर्षा भारी आहेत फुलं
माझ्या कुंडीत आले, आले होते
माझ्या कुंडीत आले, आले होते पण मी वर्षभर नाही वाट बघितली, अधूनमधून काढायचे. आता मात्र अजिबात नाही आले, नवीन लावूनपण खूप महिने झाले.
Hi guys Trying to write in
Hi guys
Trying to write in marathi n looks like no device support
Well 2 quick things
1· We've planted peas a week back n bacche comp is fully thrilled· IF anyone is in U.S. n area where spring is colder go for peas
watane aale ki photos taaken·
2· I planted hydrangea last year n that's coming back now that spring is here
Warchi post Vaughan aathwal·
Side note I need to keep reading prior NG episodes you guys talk so much
अरे वा. आम्हालाही दाखव
अरे वा. आम्हालाही दाखव अमेरिकन मटार..
माझ्या आईनेही एकदा असेच कुंडीत आएल लावलेले आणि अधुनमधुन काढुन वापरायची.
मी आले लावलेले तेव्हा त्याला एकच फुटवा होता. आता जमिनीतुन अजुन एक फुटवा डोके वर काढतोय. म्हणजे आले आत पसरले असणार. अडचणीला उपयोगी पडेल, तेव्हाच काढुन पाहिन. हळदही पाहायला पाहिजे काढुन. तिची पाने सुकली.
जागु तुझ्या अळूने चांगलाच जीव धरलाय ग.
नमस्कार निगकर्स. एका मोठ्या
नमस्कार निगकर्स.

एका मोठ्या गॅपनंतर आज आलेय.
अगदी काळाने आलेय तरी, काल परवाच तर येऊन गप्पा मारलेल्या असे वाटतेय.
आता नेहेमीच येईन, नाही आले तर धोपटा मला
नाही आले तर धोपटा
नाही आले तर धोपटा मला>>>>>>>>>>>हे इथल्या कुणाला जमेल, असं मला नाही वाटतं.
दिनेश दा, अच्छा ..बाहुली आमरी
दिनेश दा, अच्छा ..बाहुली आमरी पण म्हणतात त्याला.....
मोना... वेलकम ब्याक....
शोभा ताई...:)
साधना सध्या नुसती वाचतेय.
साधना
सध्या नुसती वाचतेय.
साधना सेमच असतो मटार काही
साधना
सेमच असतो मटार काही कोवळ्या वरायटीज सालासकट खाता येतात हे एकच नवं आहे मला 
अमेरिकन हवं असेल तर हा घ्या चेरी फुलांचा यंदाचा बहर. कुठेही ड्राइव करायला मजा येते. पण आता पाऊस येणार आणि ही सगळी फुलं गळून जाणार पण मग सगळीकडे हिरवाई नांदणार. "असे हे ऋतुचक्र फिरे रे बाळा" का काय ते.
एंजॉय.

![]()
Pages