कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीथ ब्लाऊज पीस प्रकारचे ब्लाऊज लहान व्हायला लागले तर नंतर शिवताना कोणत्या प्रकारचे शिवावेत. कितीतरी सुंदर सुंदर साडया पडून आहेत.

अरे हा धागा आला पण का?

मामी, फॅशनच्या दुसर्^या एका धाग्यावर वेमांना हा धागा काढायला सांगण्यात आला होता Wink

ओके मागे लिहिलं होतं तेच पुन्हा लिहितेय..यंदाचा कलर ऑफ द इयर पाहिलात का? मस्त रंग आहे. ऑर्किड पिंक.
त्यानिमित्ताने कपड्याचा ढिगारा काढल्यावर हा काही टॉप्स, टी- शर्ट आणि चक्क एक जेगिन्स या रंगात घेतली आहे हे लक्षात आलं Happy आता हे कपडे घालताना कलर ऑफ द इयरची आठवण होणार. बाकीच्या फॅशनसॅव्ही मंडळींनी जरा त्यांच्या कडच्या कलर ऑफ द इयर अ‍ॅक्सेसरीजवर प्रकाश टाकावा Happy

वीथ ब्लाऊज पीस प्रकारचे - म्हणजे ब्लाउजचे काठ हाच प्रश्न असेल तर नवीन प्लेन ब्लाउजपीस घेवून जुने काठ त्याला लावून घेणे.

वेका हे ऑर्किड पिंक प्रेम माझं घरी ओरडा खाण्याइतपत वाढलय गं.........:) पिंक जेगिन ऑसम दिसते हा...वर लाईट ग्रीन, व्हाईट , लेमन , लाईट ऑरेंज कलर चे टॉप्स , कुर्ते मस्त दिसतात...... गळ्यात अ‍ॅक्सेसरीज.....बीड्स, दगड वै......

लेहंगा सारी हा प्रकार कसा आहे? (म्हणजे नाडीवाले काहीतरी, पण निर्‍या इ. लूक साडीसारखाच दिसणारा.)
कोणाकडे आहे का? अनुभव कसा आहे? (वाईट फिटींग/खर्‍या साडीसारखे न दिसणे इ.)
खर्‍या साड्या घरी भरपूर आहेत आणि वापरल्या पण जातात पण काहीतरी वेगळे म्हणून हा प्रकार डोक्यात आहे.

अनिश्का मी नवीन काही घेतलं नाही पण हा रंग मस्तच आहे त्यामुळे सध्यातरी आधीचं कले़क्शन Happy सध्या इक्डे कहर थंडी असल्यानं फक्त कानातले ही एकच अ‍ॅक्सेसरी पुरतेय Wink नंतर बघुया थोडं वेदर ठीक झाल्यावर...

लेहेंगा सारी जर भरवशाच्या प्रॉपर डिझायनर कडुन घेतली तर ठिक नाहीतर भरपुर चीप प्रकारही मिळतात.....हे फालतु प्रकार ५००० पर्यंत असतात.....चांगली साडी जी निट बसते बॉडी वर ती महाग असते ६००० पसुन पुढे....

धन्यवाद,
मी स्नॅप्डील वर बरेच दिवस बघुन जवळ जवळ घेता घेता रद्द केली आहे.
तुळशीबाग्/पिंपरी मार्केट मधे कोणत्या दुकानामधे मिळेल?

मला पुण्यामधे फिश कट घागरा चोली कुठे चांगला मिळेल ???
बजेट - ८-१० हजार. ह्यापेक्षा कमी रेंज मधे असेन तर आनंदच Happy

पुण्यात खास designer saris आणि अगदी filmy style घागरा चोली साठी रविवार पेठेत सोमेश्वर मंदिरा जवळचे ' महारानी सारीज 'the best !!
इथे फ़क्त आणि फ़क्त jardozi, lace, mirror work, kota अशा designer saris आणि घागरा चोलीच मिळतात .
मी खूप survey केला पुण्यात आणि शेवटी काही पंजाबी - मारवाडी मुलींनी या दुकानाचे नाव सांगितले .
बाहेरून दुकान अगदी छोटेसे दिसते पण आत गेल्यावर designer saris, ghagra chlis चा अक्षर्श : समुद्र आहे .
अख्खा लक्ष्मी रोड , camp, कला निकेतन आणि हैदराबाद कुठेही इतकी variety नाही .
बर्‍याच मोठ्या दुकानात तोच supply करतो म्हणे साड्या त्यामुळे किमतीही इतर दुकानांपेक्ष कमी आहेत .
तरी अर्थात designer saris नेहेमीच इतर साड्यांपेक्षा costly असतात Happy
इथे कधीही प्रचंड गर्दी असते , दुकान तसे लहान असल्याने सकाळी साडे दहालाच जाउन बसले तरच पटकन जागा मिळते .
आणि दुकानाचा address ही तसा एकटी गेलीस तर सापडणार नाही म्हणून रिक्षाने जावे , त्यांनाच सोमेश्वर मंदिर वगैरे ठिकाणे माहित असतात .
आणि designer saris वर costume jewelry साठी याच दुकाना समोरचे ' कृष्णा ' नावाचे दुकान सही आहे

बाय दिपान्जली.

अन्कु मेसेज वाचला की डिलीट करेन, नहीतर मन्जुडी आणी चिनुक्स धावत येतील, चोप पस्ते ( कॉपी पेस्ट ) का केले विचारायला.

अन्कु मेसेज वाचला की डिलीट करेन>>दीपान्जलीने ही पोस्ट कुठे लिहिली आहे?

नहीतर मन्जुडी आणी चिनुक्स धावत येतील, चोप पस्ते ( कॉपी पेस्ट ) का केले विचारायला.>> चुकतंय का काही त्यांचं? ज्यांचं लेखन आहे त्यांचाच श्रेय द्या असं सांगणारे व्हिलन असतात का?

शोभा स्पेशल दुकाने आता नाही लक्षात माझ्या.:अरेरे: पण खरच एकदा चक्कर टाकुन बघ, ड्रेसपीस घेतलास तर एका दिवसात शिवुन पण देतील. नाही आवडले तर विन्डो शॉपिन्ग केल्याचे समाधान मान.:फिदी:

पौर्णिमा मी ते लाईटली लिहीले आहे. अ‍ॅन्ड आय होप ते तुम्ही समजाल. वरची जुन्या माबोवरची लिन्क बघा, त्यात दिपान्जलीने पूर्ण माहिती दिलीय आणी खाली मी तिचेच नावे दिले आहे, माझे स्वतःचे नाही. आधी पूर्ण वाचण्याची तसदी घ्या आणी मग बोला. मी माहितीच्या उद्देशाने लिहीले, मन्जुडी आणी चिनुक्स शी भान्डण्याच्या उद्देशाने नव्हे, ते दोघे माझे जन्मजात काय कुठल्याही प्रकारचे वैरी नाहीत, प्लीज नोट.

शोभा, तुला जवळ असं एक मस्त दुकान आहे...

पौड रोडच्या दुर्गाच्या अजुन थोडं पुढे उजवीकडेच दीपक कापड दुकान म्हणुन...

आधी पूर्ण वाचण्याची तसदी घ्या आणी मग बोला. >> Lol मीही तेच विचारलं की दीपान्जलीची पोस्ट कुठे आहे? मी वाचूनच लिहिलं होतं Wink

मी माहितीच्या उद्देशाने लिहीले,>> बरोबर.

पुढची कमेन्ट खरंच गरजेची नव्हती. होती का? वैरापर्यंत कशाला जायचं? Uhoh

आणी तसे लिहीताना स्माईली टाकायची राहिली, कदाचीत इथेच माझे चुकले असेल नाही का?>> करेक्ट Happy

हस्तकला मधेही बघं की! मस्त कलेक्शन आहे कॉटनचं Happy
पौड रोडच्या दुर्गाच्या अजुन थोडं पुढे उजवीकडेच दीपक कापड दुकान म्हणुन...>>> +११

पौड रोडच्या दुर्गाच्या अजुन थोडं पुढे उजवीकडेच दीपक कापड दुकान म्हणुन...>>>>>....धन्यवाद! चिमे, हर्षे, हे मी विसरलेच होते.पण तिथे रेडीमेड ड्रेस मिळतील का? Happy

Pages