शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताच्या मंगळ मोहीमेचा एक महत्वाचा टप्पा यशस्वी.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5142522170561997021&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20131130&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=मंगळयान यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेबाहेर

आजच्या मटा मधली खालची बातमी वाचून काय काय वाटलं हे सांगणं अवघड आहे, पण बातमी नक्कीच शुभ वाटली...

भोसले, जगताप, जाधव, सांडेकर, दुपटे... या आडनावांच्या माणसांची भेट कराचीत होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण तसे घडले खरे. कराची प्रेस क्लबच्या निमंत्रणावरून पाकिस्तानभेटीवर गेलेल्या मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना या मराठी मंडळींना भेटण्याची संधी मिळाली. स्थानिक पत्रकारांकडून मिळवलेल्या फोन नंबरवर मराठीतून बोलल्यावर पलीकडून आनंदातिशयाने प्रतिसाद आला आणि ही मराठी मंडळी थेट भेटायलाच आली. त्यांच्याबरोबर संवाद साधताना 'आम्ही इथे अगदी मजेत आणि सुरक्षित आहोत. नोकरी व्यवसाय उत्तम चाललेत', अशीच भावना त्यांनी व्यक्त केली.

सध्या पाकिस्तानात तब्बल दोन हजार मराठी माणसे राहतात. त्यातील बहुसंख्य कराचीत आहेत. 'श्री महाराष्ट्र पंचायत कराची' या संस्थेशी ही सगळी मंडळी जोडलेली आहेत. परमेश जाधव या संस्थेचे अध्यक्ष. कराचीतल्या 'गझीबा बॉम्बे चाट अँड मसाला डोसा' या भारतीय पदार्थ मिळणाऱ्या मोठ्या रेस्तराँमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. फाळणीच्या आधीपासून अनेक वर्षे ही मंडळी तिथे आहेत. व्यापाऱ्यांसोबत मदतनीस, ड्रायव्हर, हमाल अशा कामांसाठी ही मराठी माणसे मुंबईहून कराचीला पोहचली असावीत. गेल्या शंभरेक वर्षांत त्यांनी महाराष्ट्राशी असलेले नाते कायम ठेवले आहे.

' आम्ही पाकिस्तानात सुखी आहोत. नोकरी व्यवसायातही भरभराट आहे. पण , आपल्या माणसांना मात्र भेटावेसे वाटते. कधी जेजुरी-तुळजापूरला जाऊन कुलदैवतेचे दर्शन घ्यायचे असते. हे जाणे-येणे सोपे व्हावे. दोन्ही देशांनी व्हिसा प्रक्रिया सोपी केली , तर हे शक्य होईल. तुम्ही आपल्या मराठी माणसांपर्यंत हा निरोप नक्की पोहचवा ', अशी कळकळीची विनंती पाकिस्तानातल्या मराठी माणसांनी मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना केली.

कराचीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या दिलीप भोसले यांची सासुरवाडी मुंबईतल्या मुलुंडची. त्यांची पत्नी आणि मुली सध्या मुंबईत आल्या आहेत. रवी जगताप यांचे मूळ गाव पुण्याजवळचे खडकी. तर देवानंद सांडेकरांचे वडील मुंबईहून कराचीत आले होते. सांडेकरांना एकदा तरी मुंबईला यायचे आहे. एकदा येण्याचा प्रयत्न केला पण व्हिसा मिळाला नाही , त्यानंतर ते राहूनच गेले. विशाल राजपूतची आई मधुमती खरात मराठी आहे. तर गणेश गायकवाडांचे वडील पापडाचा व्यापार करायला कराचीत आले होते. त्यांची पत्नी पाकिस्तानातच जन्मली वाढली , पण सासू मात्र मुंबईकर आहे. कराचीभर प्रसिद्ध असलेली टेलरिंग फर्म तुळशीराम दुपटे या मराठी माणसाची आहे!

या मुस्लिमबहुल देशात तुम्हाला त्रास नाही का होत , या प्रश्नावर सगळ्यांचे ठाम उत्तर ' नाही ' असे होते. अपवाद म्हणून बाबरी मशिद पाडली तेव्हा दंगली झाल्या. पण , त्यावेळीही या मंडळींना वाचवले ते त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांनी , असे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक बंध

नारळी पौर्णिमा , चैत्र पाडवा , दिवाळी , होळी हे सण ही मंडळी अगदी धुमधडाक्यात साजरे करतात. सार्वजनिक गणपती बसवतात. त्याचे विसर्जनही दणक्यात होते. पुरणपोळी आणि मोदकांसह आज महाराष्ट्रातही विस्मरणात गेलेले पुरणाचे कानवले आणि कडकणी हे पदार्थही त्यांच्या घरात होतात.

कोकण कनेक्शन

डॉन या पाकिस्तानातील आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या सिद्रा रोघे हिचेही कोकणाशी थेट नाते आहे. तिचे आजी-आजोबा मुरुडजवळच्या रेवदंड्याचे. फाळणीच्या वेळी चांगल्या नोकरीच्या शोधात ते कराचीला आले. पुन्हा कोकणात जाऊन लग्न केले. पाठोपाठ भाऊही कराचीत आला. पुढे भारत दाखवायला रोघे मुलांना घेऊन गेले होते , तेव्हा मात्र खूप संशयाने पाहिले गेले. त्यानंतर मात्र येणे झाले नाही. सिद्राला मात्र संधी मिळाली की , तिचे रूट्स शोधायला रेवदंड्याला यायचे आहे.

कसारा: पाड्यात मोफत वीज

'भारत पेट्रोलियम' च्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे राईचिवाडी उजळली!

कसारा रेल्वे स्टेशनपासून सात किमी अंतरावर असणाऱ्या वाशाळा ग्रामपंचायतीतील राईचिवाडी या आदिवासी पाड्यातील ३५ घरे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे शनिवारी उजळली! येथे राज्य सरकारने विजेची सुविधा पुरवली असली तरी दिवसांतील १२ तास लोडशेडिंगमुळे वीज नसते. शिवाय , दारिद्रयरेषेखालील या पाड्यातील ग्रामस्थांना ही वीज परवडत नसल्याने येथील निम्म्या घरात अंधारच असतो. आता सौरऊर्जा प्रकल्पातून संपूर्ण पाड्याला ' भारत पेट्रोलियम ' ने मोफत वीज पुरवली आहे.

दैनिक सकाळ मधल्याबातमीचा मथळा थोडा गंडलेला असला तरी बातमी आशादायक आहे.

माणिक सरकार सर्वांत गरीब मुख्यमंत्री
- - पीटीआय
बुधवार, 18 डिसेंबर 2013 - 01:30 AM IST

गुवाहाटी - राजकारण, राजकारणातून पैसा, भ्रष्टाचार आणि पुढे सत्ता असे चित्र सर्वत्र दिसत असले, तरी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार मात्र याला अपवाद आहे. देशातील सर्वांत गरीब मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव पुढे आले आहे. याबाबतचे वृत्त आपण वाचले असून, लोक माझ्या गरिबीबाबत बोलतात याचा आपणास आनंद वाटतो, असे सरकार यांनी म्हटले आहे.

नुकत्याच चार राज्यांत पार पडलेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात कोट्यवधीची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. देशातील प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा तर विचारच न केलेला बरा. गेल्या जानेवारी महिन्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यांनी धनपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या वेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे फक्त 1080 रुपये असल्याचे नमूद केले होते. गेल्या पंधरा वर्षांपासून ते त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या साधेपणाविषयी म्हणूनच राज्यातील जनतेला आदर आहे. आमचा मुख्यमंत्री गरीब आहे मात्र भ्रष्ट नाही, असे लोकच अभिमानाने बोलतात.

एकीकडे राजकारणात सर्वाधिक भ्रष्ट नेते दिसून येतात. पैसा हेच त्यांचे ध्येय असते असे असताना आपण इतका साधेपणा आणि स्वच्छ प्रतिमा कशी काय जपली यावर सरकार म्हणाले, ""मी गरीब आहे याचे श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जाते. पक्षाने माझ्यावर जे काही संस्कार केले आहेत. त्या संस्काराची शिदोरी घेऊनच माझी वाटचाल सुरू आहे.''

त्रिपुरात आपण इतके लोकप्रिय कसे झालात? यामागचे गुपित काय? यावर ते म्हणाले, ""लोकांपासून मी कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. मी असे कोणतेही आश्‍वासन देत नाही जे मला पूर्ण करता येत नाही. जे बोलतो ते करून दाखवितो. त्यामुळे राज्यातील जनतेचा माझ्यावर आणि पक्षावर विश्वास आहे.''

..असे आहेत सरकार
- माकचे पॉलिटबिरो
- 432 फुटांचे आईने बांधले घर
- इतर कोठेही संपत्ती नाही
- पत्नी निवृत्त सरकारी कर्मचारी
- मुख्यमंत्र्यांचा पगार दर महिन्याला पक्षाच्या तिजोरीत
- पक्ष देतो दर महिन्याला पाच हजार रुपये पगार

हर्पेन, जुन्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांपैकी असतील माणिक सरकार. दुर्दैवाने ही पिढीही संपुष्टात येऊ लागली आहे. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्यही सत्तेत असताना स्वत:च्या तीन खोल्यांच्या फ्लॅटमधे राहात. अजूनही तिथेच रहातात. त्यांची बायको, मुलगी यांनाही कुठली प्रिव्हिलेजेस नव्हती. त्यांच्या ध्येयधोरणांविषयी, विचारधारेविषयी दुमत असू शकतं पण अतिशय स्वच्छ माणूस.
आताच्या मुख्यमंत्रीण बाईंचा कुटुम्बकबिला मात्र व्यवस्थित भ्रष्टाचारात बरबटलेला आहे

मुंबई दिल्ली स्पे राजधानी २६ डिसेंबर पासून सुरू .
सात दिवसाचे रेझ ( फक्त ऑनलाईन )मिळते .तिकीट वाढीव तरीही फार लोकप्रिय झाली .

तिकीट फिक्स्ट नाही ,
डाइनमिक !आहे .
१जानेवारीची
2A रु4950 आणि
3A रु3500 ला
विकली गेली .

वेळ मुंबई चार वाजता दिल्ली सकाळी आठ .परत तीन आणि सकाळी सात .

मीत

तुम्ही डॉ जितेंद्र पाटील ह्यांची जी बातमी दिली आहे ती वाखाणण्याजोगी आहे परंतु हया डॉ जितेंद्र पाटीलांनी जर पैशांसाठी दवाखाना न उघडता लोकसेवे साठी उघडला असता तर खुप बरे झाले असते. मी ह्याच गावात राहतो आणि यांचा दवाखाना माझ्या घरापासुन थोडयाच अंतरावर आहे. इथे एम आय डी सी एरीया मोठ्या प्रमाणात पसरलेला असुन कामगार लेव्हलची माणसे बर्याच प्रमाणात राहतात. एखाद्या कंपनीतर्फे जर माणसाला अ‍ॅडमीट केले म्हणजे जर खर्च कंपनी भरणार असेल तरच डॉ जितेंद्र पाटीलांच्या "साईलीला हॉस्पीटल" मध्ये साधारण माणुस जाउ शकतो. बरं स्पेशल रुम च्या नावावर २०० चौ. फु. पेक्शा कमी रुम मध्ये ४ बेड , त्यांचे ४ नातेवाईक आणी नर्सेसची गर्दी असते. स्वछतेबद्द्ल विचारुच
नका . माझे एक नातेवाईक इथे अ‍ॅडमीट होते तेव्हा मी स्वतःच्या डोळ्याने पाहीलंय.
आमच्या शेजारचे एका थोडेसे जखमी झाले होते थोडंसं डोक्याला लागलं होतं २ दिवस अ‍ॅडमीट केलं होतं त्यांना २००००/- बील आलं होतं असं ते म्हणाले. बाकी आमच्या इथली गरीब लोकं ह्यांच्या हॉस्पीटल मध्ये जाउ शकत नाही. इथल्या पैसे उकळणार्या हॉस्पीट ल मधे ह्या हॉस्पीट लचं नाव पहीलं आहे.

ह्या डॉक्टरांचा पुर्ण वंजारी समाज इथेच राहतो व सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत परंतु ते पण ह्यांच्या बीलाबाबत हेच म्हणतात.

त्यांनी जर मोठया मनाने गरीबांनाही ही सेवा दिली तर मी स्वतः ही बातमी ह्या धाग्यावर देईन.

ह्या भागात खुप मोठा एम आय डी सी परीसर आहे, जवळ जवळ २००० - २५०० कारखाने आहेत, BARC , TAPS आहे पण चांगले हॉस्पीटल नाही फक्त कामचलाउ दवाखाने आहेत थोडी सीरीयस केस असली तर मुंबईला धाव घ्यावी लागते.

निरपराध्यांवरील आरोप न्यायालयाने अमान्य केले (इंग्रजी दुवा. मराठी दुवा सापडला नाही. क्षमस्व!) :
http://www.nizgoenkar.org/newsDetails.php?id=8207

न्यायालयांकडून असेच नि:पक्षपाती कार्य अपेक्षित आहे.

-गा.पै.

गुजरात दंगलीत होरपळलेल्या बळींची फसवणूक करणार्‍या तिस्ता सेटलवाड, जावेद आनंद, झाकिया जाफरी, तन्वीर जाफरी यांच्यावर पैसे हडपल्याप्रकरणी प्रथमदर्शी अहवाल (एफायार) दाखल. :
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/--FIR/articleshow/28502425...

वरील चारपैकी तीन जण सदैव गुजरातच्या दंगलींचा विषय काढून मोदींच्या विरोधात गरळ ओकीत असतात. मुखवट्यामागे प्रत्यक्षात काय धंदे चालतात ते आता स्पष्ट दिसतंय. गुजरातेतील मुसलमानांनी आपणहून पुढे येऊन २००२ च्या दंगलींचे सत्य जगासमोर उघड करणे हे सुचिह्न आहे.

-गा.पै.

सतत ३ वर्ष पोलिओची एकही केस नाही. अभिनंदन पल्स पोलिओ मोहिमेचे.
एखादी योजना कशी सातत्याने चालवावी याच्म एक उत्कृष्ट उदाहरण ! काश, अश्या सगळ्या योजना चालवल्या असत्या, तर ........
http://zeenews.india.com/news/health/health-news/india-records-no-polio-...

दो बूंद जिंदगीके --- भारताच्या पोलियो निर्मूलन मोहिमेची यशस्वी कहाणी
गेल्या तीन वर्षात एकही पोलियोचा रुग्ण आढळलेला नाही
मार्च 2014 मध्ये भारत पोलियोमुक्त देशांच्या यादीत येन्याच्य्या दृष्टीने प्रयत्न सुरु

www.business-standard.com/article/beyond-business/a-virus-conquered-1140...

एखादी योजना कशी सातत्याने चालवावी याच्म एक उत्कृष्ट उदाहरण ! काश, अश्या सगळ्या योजना चालवल्या असत्या, तर ..>> +१

सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली एका खास कार्यक्रमासाठी वाडिया हॉस्पिटलमध्ये आले होते. त्या संदर्भातील वृत्तांत्तानुसार लहान मुलांना असलेल्या हृदयाच्या विकारावर जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या उपचारासाठी महागड्या उपकरणांसाठी निधी जमा करण्यासाठी वाडिया रुग्णालयाने सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तर्फे 9 फेब्रुवारी रोजी सिद्धिविनायक मंदिर ते वाडिया रुग्णालय अशी लिटिल हार्ट मॅरेथॉन आयोजित केली आहे. या उपक्रमाच्या कार्यक्रमासाठी सचिन सपत्निक येथे आला होता. सचिनची पत्नी बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे डॉक्‍टरकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने वाडियामध्ये काही काळ काम केले होते. या उपक्रमासाठी सचिनला वाडिया रुग्णालयातून विचारणा केली तेव्हा त्याने क्षणार्धात होकार तर कळविलाच आणि सोबत दहा लाख रुपयांचा धनादेशही घेऊन आला. पत्नीच्या हस्तेच त्याने हा धनादेश दिला.

या वेळी सचिनने एक जुनी आठवण सांगितली. ""18-19 वर्षांपूर्वी अंजलीच्या एका मैत्रिणीच्या मुलीला हृदयाचा विकार झाला होता आपल्याकडे उपचारासाठी साहित्य नव्हती म्हणून तिने अमेरिकेत जाऊन उपचार केले. आता त्या मुलीची प्रकृती उत्तम आहे. असे उपचार आपल्या देशात व्हायला हवे, म्हणून वाडियाच्या या उपक्रमात आम्ही उभयतांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला.''

तेंडुलकर पतीपत्नीचे अभिनंदन.

भारतीय मुस्लिम जागृत होऊन प्रगतीस हातभार लावण्याबाबत गंभीर होऊ लागलेत.

>> Muslims do not want appeasement, they want betterment, empowerment through education,
>> and employment. Modi has done that in Gujarat

तसेच सूफी एम.के.चिश्ती यांनी मोदी मुस्लिमविरोधी नसून विरोधकांनी त्यांना तसे रंगवले आहे असेही म्हंटले आहे.

-गा.पै.

नेहमीच शेतकर्‍यांचे प्रश्न वाचुन मन निराश होत होतं, त्याला एक चांगल्या बातमीने उभारी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सहा महिने, सहा एकर आणि ३०० टन वांगी आणि ७२ लाख उत्पादन.
http://abpmajha.abplive.in/incoming/2014/02/03/article257672.ece/%E0%A4%...

फारएण्ड, हेच लिहायला आलो होतो. खरं तर हा व्हिडीओ खुप आधी बघितलाय. आता अजुन मॉडीफिकेशन केलय, पण लार्ज स्केलवर उपयोग होतोय की नाही हे अधिक महत्त्वाचं.

सकाळ मधली बातमी
लाभले भाग्य आम्हा, वाचतो मराठी
रविवार, 16 फेब्रुवारी 2014 - 01:45 AM IST
भारतातील सर्वांत समृद्ध भाषा म्हणून मराठीकडं पाहिलं जातं. म्हणूनच काही दिवसांनी येणारा 21 फेब्रुवारी हा दिवस "जागतिक मातृभाषा दिवस' आणि त्यानंतर येणारा 27 फेब्रुवारी हा "मराठी राजभाषा दिवस' म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. या कालावधीला "मराठी भाषा आठवडा' असंही आपल्याकडं म्हटलं जाते. या पार्श्‍वभूमीवर, आजचे तरुण खरोखरीच वाचताहेत... ते नेमकं काय वाचताहेत... त्यांना कोणकोणते लेखक माहिती आहेत... या आणि अशा अनेक प्रश्‍नांच्या आधारावर "सकाळ'च्या टीमने केलेले हे सर्वेक्षण. यातून काय सांगतो आहे वाचन संस्कृतीबाबत तरुणाईचा कल, चला पाहू... !

वाचनसंस्कृती लोप पावतेय... आजचे तरुण वाचतच नाहीत... अवांतर पुस्तकांसाठी ते ग्रंथालयाचा उंबरठा ओलांडत नाहीत... अशी नानातऱ्हेची टीका आजच्या तरुणांवर होते; पण या टीकेला उत्तर देणारा, जुन्या-जाणकार पिढीला आश्‍चर्यकारक, सुखद वाटेल असा निष्कर्ष "सकाळ'च्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. तो असा आहे... आजच्या तरुणाईला अवांतर वाचनाचे प्रचंड आकर्षण आहे. त्यांना पुलं, वपु, शिवाजी सावंत माहिती आहेत आणि भालचंद्र नेमाडे, मिलिंद बोकील, अच्युत गोडबोलेही. त्यांच्यावर "झाडाझडती', "कोसला', "बनगरवाडी'चेच गारूड आहे असे नव्हे; तर "हिंदू', "किमयागार', "एका दिशेचा शोध' अशा निरनिराळ्या पुस्तकांची त्यांनी पारायणं केली आहेत.

तरुणाईच्या वेळापत्रकावर एक नजर टाकली तर त्यांची प्रचंड धावपळ सुरू आहे, हे लक्षात येते. सकाळचा क्‍लास, नंतर महाविद्यालय, पुन्हा क्‍लास, काही वेळ कट्ट्यावर, वाढत्या रहदारीमुळे येण्यात-जाण्यात जाणारा वेळ, वेगवेगळ्या परीक्षांचे ओझे, त्यात "सोशल नेटवर्किंग'वर असलेले प्रेम... अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नवी पिढी अवांतर वाचनापासून दूर गेली आहे, असे म्हटले जायचे; पण अशी खंत बाळगणे चुकीचे ठरणार आहे. कारण तरुणाई अवांतर वाचनात रमलेली आहे, हे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आले. त्यासाठी शहरातील जवळपास पंचवीस महाविद्यालयांत जाऊन तेथे वेगवेगळ्या माध्यमांत शिकणाऱ्या पाचशे तरुणाईची मते आम्ही जाणून घेतली.

नव्या पिढीचे जितके जुन्या लेखकांवर, जुन्या पुस्तकांवर प्रेम आहे, तेवढेच नव्या लेखकांवर आणि नव्या पुस्तकांवरही आहे. म्हणूनच "आवडते लेखक कोण' या प्रश्‍नाला उत्तर देताना अनेकांनी पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत, व. पु. काळे, विश्‍वास पाटील यांची नावे सांगितली आहेत. तर काही मुलांवर एपीजे अब्दुल कलाम, जयंत नारळीकर, महेश एलकुंचवार, सुधा मूर्ती, चेतन भगत यांच्या शब्दांची तितकीच मोहिनी आहे, असे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या लेखकांबरोबरच काही विद्यार्थ्यांनी, "संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, विवेकानंद, महात्मा गांधी, अण्णा भाऊ साठे, वि. दा. सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, साने गुरुजी यांची पुस्तके आम्ही आवर्जून वाचतो; त्यामुळे नवे बळ मिळते, नवी ऊर्जा मिळते', असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांना हलक्‍या-फुलक्‍या कविता जितक्‍या आवडतात तेवढेच वैचारिक साहित्यही आवडते. ऐतिहासिक कथा-कादंबरी, आत्मचरित्र या साहित्य प्रकारांबरोबरच प्रवास वर्णन, अनुवादित साहित्य, रहस्यमय व विनोदी कथाही भावताना दिसत आहेत; पण आवडणाऱ्या साहित्यप्रकारात समीक्षा या साहित्य प्रकाराला एकानेही स्थान दिले नाही. त्याकडे मुलांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, पाचशेपैकी फक्त दहा मुलांनी आम्ही अवांतर वाचन करीत नाही, असे उत्तर दिले. ही मुले वेगवेगळ्या महाविद्यालयांतील आहेत आणि त्यांची कारणेही वेगवेगळी आहेत. पण अवांतर वाचन करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. ही आवड जोपासल्याने आयुष्य अधिक समृद्ध होते. आयुष्याचा खरा अर्थ कळत जातो, याची अनुभूती आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येते.

आवडणारे लेखक : पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, दुर्गा भागवत, प्र. के. अत्रे, गो. नि. दांडेकर, एपीजे अब्दुल कलाम, बाबासाहेब पुरंदरे, सुधा मूर्ती, शिव खेरा, जयंत नारळीकर, भालचंद्र नेमाडे, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. अनिल अवचट, आनंद यादव, नागनाथ कोत्तापल्ले, उत्तम कांबळे, चेतन भगत, विश्‍वास पाटील, प्रकाश आमटे, मिलिंद बोकील, अच्युत गोडबोले, श्‍याम मनोहर.

नाटककार : विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, गिरीश कार्नाड, रत्नाकर मतकरी.

कवी : कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, ग्रेस, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, नामदेव ढसाळ, अरुणा ढेरे.

आवडणारी पुस्तके (जुनी व अलीकडची)
- अग्निपंख, आमचा बाप अन्‌ आम्ही, आई समजून घेताना, गोष्टी माणसांच्या, प्रकाशवाटा, आकाशाशी जडले नाते, मुसाफिर, ताई मी कलेक्‍टर व्हयनू, प्रकाशवाटा.
- श्‍यामची आई, एका होता कार्व्हर, झाडाझडती, कोसला, बनगरवाडी, श्रीमानयोगी, राजा शिवछत्रपती, फकिरा, झोंबी, श्री पार्टनर, कऱ्हेचे पाणी, बटाट्याची चाळ, मृत्युंजय, छावा. पानिपत, राधेय.

आवडणारे साहित्य प्रकार
- कादंबरी
- आत्मचरित्र
- कविता
- प्रवासवर्णन
- अनुवादित साहित्य
- रहस्यमय व विनोदी कथा

आवर्जून वाचावीत अशी पुस्तके
- किमयागार
- एका दिशेचा शोध
- सुनीता विल्यम्स : एक अंतराळवीर
- द सिक्रेट
- हिंदू
- 1857 चा स्वातंत्र्य संग्राम.

सध्या वाचनात असलेली पुस्तके
- दुनियादारी
- शाळा
- कॉलेज गेट
- ग्रीकांजली
- इडली ऑर्किड आणि मी
- द फेमस फाइव्ह
- वन नाईट ऍट द कॉल सेंटर
- माझी जन्मठेप
- सत्याचे प्रयोग

इथे झाले सर्वेक्षण
फर्ग्युसन महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, नौरोसजी वाडिया महाविद्यालय, बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, मराठवाडा महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय (गणेशखिंड व शिवाजीनगर), भारती विद्यापीठ (कात्रज व पौड रस्ता), स. प. महाविद्यालय, एमआयटी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, यशवंतराव मोहिते महाविद्यालय, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, एस. एम. जोशी महाविद्यालय, पुणे विद्यार्थीगृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शाहू महाविद्यालय, पूना कॉलेज, सरस्वती मंदिर रात्र महाविद्यालय, आपटे कनिष्ठ महाविद्यालय, एच. व्ही. देसाई महाविद्यालय.

हे होते प्रश्‍न
1) तुम्हाला अवांतर वाचनाची आवड आहे का 2) तुमच्या आवडीची दोन मराठी पुस्तके कोणती 3) तुम्हाला आवडणारे लेखक कोण 4) आवडता साहित्यप्रकार कोणता 5) इतर मुलांनी काय वाचावे, असे तुम्हाला वाटते 6) मराठीशिवाय अन्य भाषांतील पुस्तके वाचता का? आवडते पुस्तक व लेखक कोण 7) सध्या वाचत असलेले पुस्तक कोणते.

सर्वाधिक आवडते लेखक
पु. ल. देशपांडे : 111 विद्यार्थी
शिवाजी सावंत : 55 विद्यार्थी
चेतन भगत : 30 विद्यार्थी
विश्‍वास पाटील : 27 विद्यार्थी
व. पु. काळे : 25 विद्यार्थी
एपीजे अब्दुल कलाम : 23 विद्यार्थी

टीम सकाळ :
सुशांत सांगवे, सुवर्णा चव्हाण, स्वप्नील जोगी, अक्षय गुरव, सानिका कुसूरकर, सचिन चव्हाण, अविनाश पोफळे, तुषार धोडमिसे.

ऑस्ट्रेलीय पत्रकार नेव्हिल मॅक्स्वेल याने १९६२ च्या चिनी युद्धाचा हेंडरसन ब्रूक्स अहवाल त्याच्या संकेतस्थळी खुला केला आहे (स्थळ www.nevillemaxwell.com उघडत नाही!) भारत सरकारने दाबून ठेवलेला अहवाल जनतेला वाचायला मिळणार तर!

बातमी (इंग्रजी दुवा) : http://timesofindia.indiatimes.com/india/Secret-report-on-India-China-wa...

-गा.पै.

Pages