शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://marathi.yahoo.com/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E...

लौकिक आणि प्रेम यांची पाखर घालणार्‍या आणि सन्मानाने जगण्यासाठी उन्नतीचे मार्ग खुले करणार्‍या मातीविषयी आणि तिथल्या माणसांप्रती संवेदना आणि सहवेदना प्रकट करताना येथील ‘ए टू झेड ग्रुप’ने आज कोट्यवधी रुपये किमतीची मदतसामग्री दुष्काळग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिली. याच ग्रुपने तीन वर्षांपूर्वी र्मसिडीज गाड्यांची सर्वात मोठी खरेदी करून जगाचे लक्ष औरंगाबादकडे वेधले होते.
सेवा, उद्योग, व्यापार, व्यवसाय आदी क्षेत्रांत कार्यरत शहरातील ४५ समाजधुरिणांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन दुष्काळग्रस्तांना थेट मदत म्हणून पाण्याचे चार नवे टँकर, १0 जनरेटर सेट, ५ हजार लिटर क्षमतेच्या ७00 पाण्याच्या टाक्या, जल प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी जेसीबी, पोकलेन आदी कोट्यवधी रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाच्या हाती दिली. प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सद्गदित होऊन शहरवासीयांची ही मदत स्वीकारली.
१९७२ पेक्षाही तीव्र दुष्काळाचा सामना यंदा मराठवाड्याला करावा लागत आहे. या परिस्थितीला तोंड देण्याचे काम प्रशासन जोमाने करीत असतानाच आज शहरात वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत ४५ व्यक्तींनी एकत्रित येऊन दुष्काळग्रस्तांना व प्रशासनालाही मोठा आधार दिला. आपले सामाजिक भान जागृत ठेवताना समाजऋणातून उतराई होत या व्यक्तींनी मराठवाड्याच्या दातृत्वाचे मोठे दर्शनही घडविले. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीला धावून जाताना आपल्याच बांधवांना सहकार्य करण्यातील कृतार्थ भाव या सर्वांंच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्नही ते आवर्जून करीत होते. आपण जे काही केले ते अत्यल्प असून, अजून खूप काही करण्याची गरज आहे. या मदतीसाठी आपणास कोणतीही प्रसिद्धी नको, अशी विनयशील विनंती अनेकांनी माध्यमांच्या प्रतिनिधीकडे केली. प्रसिद्धीपेक्षा सर्वांंनी एकत्रित येऊन या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहावे, मदतीचा हात आखडता घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीत मदतीच्या यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय रविवारीही सुरूच असते. आजही ही कार्यालये सुरू होती. विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी व सीईओ कार्यालयात खास बसून होते.
सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातील हे मान्यवर कार्यालयात पोहोचले. विभागीय आयुक्तांशी १५ मिनिटांच्या चर्चेनंतर ते कार्यालयातून बाहेर पडले, तेव्हा माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील अनेकांनी प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला.
असे घडले ऐतिहासिक मदतकार्य ...
दुष्काळात होरपळणार्‍या आपल्या बांधवांसाठी शासन तर सर्वतोपरी प्रयत्न करीतच आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपणही काही तरी हातभार लावायला हवा, असा विचार ‘ए टू झेड’ ग्रुपने केला. ग्रुपचे काही सदस्य या विचाराच्या अनुषंगाने १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांना भेटले. आम्ही ग्रुपच्या वतीने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी हवी ती आर्थिक मदत करण्यास तयार आहोत, असे त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कानावर ही गोष्ट घातली. रोख रकमेऐवजी वस्तूंच्या स्वरूपात मदत घ्यावी, असे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी ठरविले. जिल्हाधिकार्‍यांनी ही बाब ग्रुपच्या सदस्यांना सांगितली. सदस्यांनी वस्तूंच्या स्वरूपात कशाकशाची गरज आहे ते सांगा, असे
म्हणत वस्तू स्वरूपात मदत देण्याची तयारी दर्शविली. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची कमतरता भासत आहे. त्यामुळे एक तर टँकर गरजेचे होते. तसेच पाणी उतरविण्यास आणि साठविण्यास पाण्याच्या टाक्या गरजेच्या होत्या. त्याबरोबरच लोडशेडिंगमुळे टँकर भरण्यास अडचणी येत असल्याने जनरेटरची गरज होती. तसेच जिल्ह्यातील तलावांची सिंचनक्षमता वाढविण्यासाठी, तलावातील गाळ काढण्यासाठी जेसीबी, पोकलेनचीही गरज भासत आहे, या गोष्टी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ‘ए टू झेड’ ग्रुपच्या निदर्शनास आणून दिल्या. तेव्हा या ग्रुपने प्रशासनाला चार नवे टँकर खरेदी करून देण्याची, तसेच जिल्ह्यासाठी पाच हजार लिटरच्या ७00 प्लास्टिक टाक्या व १0 जनरेटर खरेदी करून देण्याची; शिवाय दीड ते दोन महिने १0 जेसीबी किंवा पोकलेन देण्याची तयारी दर्शविली अन् आज या ग्रुपने अधिकृतरीत्या ही मदत जाहीर केली. अशा पद्धतीने हे ऐतिहासिक मदतकार्य घडल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले.

उदयन यानी दिलेला हा वृत्तांत सर्वार्थाने अनुकरणीय तर आहेच शिवाय या वृत्ताचे कात्रण जर मा.जिल्हाधिकारी विक्रमकुमार यानी राज्यातील सार्‍या जिल्हाधिकारी कचेर्‍यांना पाठविणेही गरजेचे आहे, ज्यामुळे दुष्काळाचे चटके सहन करीत असलेल्या जिल्ह्यातील प्रशासन यंत्रणा "औरंगाबाद पॅटर्न" आपल्याकडेही राबविता येईल का ? असा विचार नक्कीच करू शकेल.

"ए टू झेड ग्रुप" ने रोख रकमेऐवजी वस्तु स्वरुपात मदत द्यावी असे सुचविल्यावर त्या संदर्भात पटदिशी निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही केली त्याबद्दलही त्या ग्रुपचे सारे सदस्य अभिनंदनास पात्र आहेत.

अशोक पाटील

एटूझेड ग्रूपचे वरील वर्तमान वाचले,
माफ करा (सॉरी टू से) ही बातमी दिसायला कितीही चांगली असली तरी तसे म्हणवत नाही.
कारण एक तर हे सगळे उपाय सरकारने केलेच पाहिजेत असे आहेत.
बक्कळ पैसे (कराच्या रूपात, तसेच खाण्याच्या रूपात) मिळतात सरकारला,
आणि तरीही जनतेनेच सरकारला मदत करायची वेळ यावी ? Angry

अवकाशविज्ञानामध्ये भारताची प्रगती

अवकाशावरील सत्तेसाठीची स्पर्धा जगभर सुरू असताना भारत त्यामध्ये अजिबातच मागे नाही , हे आपण सप्रमाण सिद्ध केले आहे . त्यामध्ये पीएसएलव्हीचा वाटा फार मोठा आहे . त्याविषयी ...

ही बातमी मटामधे आली होती
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18770876.cms
श्रीहरीकोटा येथून २५ फेब्रुवारीला ' पोलर सॅटेलाइट लाँच वेहिकल ' ने ( पीएसएलव्ही ) भारत आणि फ्रान्स यांची उपकरणे असलेला ' सरल ' आणि अन्य सहा उपग्रहांसह आकाशात झेप घेतली , तेव्हा भारताच्या अवकाशयुगातील आणखी एक अभिमानास्पद अध्याय लिहिला गेला . याचे कारण या यशस्वी मोहिमेद्वारे आकाशात यशस्वीपणे उपग्रह स्थापित करण्यामध्ये भारताने लागोपाठ २२व्यांदा यश मिळविले . इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं हे यश कौतुकास्पद आहे . एक काळ असा होता की आपल्याला आपले उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी परदेशांची मदत घ्यायला लागायची . आता आपण परदेशांचे उपग्रह अवकाशात पाठवू लागलो आहोत . याहीवेळी सरलमध्ये फ्रान्सची दोन उपकरणे आहेत आणि एक आपण तयार केलेले उपकरण आहे . या तीनही उपकरणांचा मिळून एक उपग्रह इस्रोच्या बेंगळुरूमधील उपग्रह केंद्रात तयार करण्यात आला . सरल हा संशोधनासाठी अत्यंत अपयुक्त ठरणार आहे . समुद्रातील प्रवाह आणि समुद्राच्या पृष्ठभागाची उंची यांचा अभ्यास या उपग्रहाच्या मदतीनं करण्यात येणार आहे . पर्यावरणाचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्याची फार मोठी मदत होणार आहे . वातावरणामध्ये काय आणि कसे बदल होत आहेत , याबाबतही अधिक माहिती मिळणं शक्य होणार आहे . वातावरणातील बदलांमुळे हिमसाठे वितळत आहेत . अनेक ठिकाणी सागरी किनाऱ्यांची धूप होत आहे . त्यांचा अधिक सखोल अभ्यास करणं आता आपल्याला शक्य होणार आहे . याशिवाय सागरी जीवांचे स्थलांतर आणि जैविक विविधता याबाबतच्या आपल्या माहितीतही भर पडणार आहे . ' सरल ' पुढची पाच वर्षं कार्यरत राहणार आहे , हे लक्षात घेतले तर त्याच्याकडून आपल्याला माहितीचा किती साठा मिळू शकेल , याची कल्पना करता येते .

' सरल ' शिवाय कॅनडाचे दोन उपग्रहसुद्धा आपण अवकाशात पाठविले आहेत . त्यातील ' सफायर ' (SAPPHIRE) आणि निओसॅट (NEOSSAT) हे अवकाशातील ' कचऱ्या ' ची ( जुने , आता कार्यरत नसलेले उपग्रह , रॉकेटकडून अवकाशात टाकल्या जाणाऱ्या वस्तू इत्यादी .) आणि पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या इतर उपग्रहांची माहिती देईल ; निओसॅट हा उपग्रह अशनी , उपग्रह आणि अवकाशातील कचरा यांचा वेध घेईल . याशिवाय ऑस्ट्रियाचे दोन उपग्रह , डेन्मार्कमधील आलबोर्ग युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक उपग्रह आणि इंग्लंडचा एक उपग्रहसुद्धा आपण सोडले आहेत . एकाच वेळी सात उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडण्याचा आणि त्यांना इप्सित स्थळी स्थापित करण्याचा पराक्रम आपण केला आहे . अववकाशविज्ञानामध्ये भारताने किती प्रगती केली आहे , त्याचाच हा पुरावा आहे आणि तो अभिमानास्पद आहे .

हे सारे तपशिलाने एवढ्याचसाठी सांगितले की पीएसएलव्हीमुळे भारत किती सामर्थ्यवान झाला आहे , हे लक्षात यावे . आपण आपला उपग्रह पीएसएलव्हीच्या मदतीने अवकाशात पाठविण्याचा पहिला प्रयत्न केला , तो दि . २० सप्टेंबर १९९३ या दिवशी . परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला . अवकाशात झेप घेतल्यापासून ७००व्या सेकंदाला उपग्रह अवकाशात घेऊन जाणारे ' वाहन ' बंगालच्या उपसागरात कोसळले . मात्र या अपयशानं खचून न जाता पुढच्याच वर्षी , म्हणजे १५ ऑक्टोबर १९९४ रोजी आपण ८०४ किलो वजनाचा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे पाठवला आणि तो अपेक्षित कक्षेत स्थापितही केला . या यशामुळे लोअर्थ ऑर्बिटमध्ये यशस्वीपणे उपग्रह सोडणारा भारत जगातला सहावा देश झाला . त्यानंतर गेल्या २० वर्षांमध्ये आपण एकंदर ५५ उपग्रह अवकाशात सोडण्यात आणि विविध कक्षांमध्ये स्थापित करण्यात यश मिळविले आहे . या ५५ उपग्रहांमध्ये २६ भारताचे तर २९ परदेशांचे उपग्रह आहेत . २०१० सालामध्ये तर एकाचवेळी १० उपग्रह सोडण्याचा पराक्रम आपण केला आहे . २६ एप्रिल २०१२ या दिवशी तर आपण १८५० किलो वजनाचा उपग्रह अवकाशात सोडण्यात यश मिळविले . २००८ सालामध्ये चांद्रयानसुद्धा पीएसएलव्हीच्याच मदतीने सोडण्यात आले . चंद्राच्या अभ्यासासाठी आखलेली भारताची ती पहिलीच चांद्रमोहीम .

ज्यामुळे आपण हे यश मिळविले आहे , त्या पीएसएलव्ही यानाचा आराखडा केरळमधील थिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई सेंटरमध्ये तयार करण्यात आला आणि त्याच केंद्रात ते विकसितही करण्यात आले . पीएसएलव्हीच्या विविध भागांची उभारणी थिरुवनंतपुरम आणि सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये करण्यात आली . पीएसएलव्हीच्या पहिल्या भागामध्ये घनरूप इंधन असते . रॉकेटला जोरदार धक्का देऊन उचलण्याचे काम पहिल्या टप्प्यात होते . त्यासाठी १३८ टन इंधन (Hydroxylterminated polybutadine-HTPB) वापरण्यात येते . दुसऱ्या भागामध्ये रॉकेटला आणखी एक मोठा धक्का देऊन अधिक उंच नेण्यासाठी ४० टन द्रवरूप इंधन असतं . रॉकेटला अजून एक जोरदार धक्का देऊन उंचावर नेण्यासाठी या तिसऱ्या भागात सात टन घनरूप इंधन असतं . अंतिम टप्पा महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी चौथ्या भागामध्ये द्रवरूप इंधनच वापरलेलं असतं . थोडक्यात , पीएसएलव्ही चार टप्प्यांमध्ये काम करते . आतापर्यंत आपण या अवकाशवाहनाचा ११वेळा वापर केला . त्यापैकी नऊवेळा यश मिळाले . एक मोहीम अंशतः यशस्वी झाली ; तर एका मोहिमध्ये आपल्याला साफ अपयश आले .

' पीएसएलव्ही - सीए ' मध्ये पीएसएलव्हीपेक्षा वेगळी रचना असते . हे अवकाशवाहन एकावेळी ११०० किला वजन अवकाशात घेऊन जाऊ शकते . आतापर्यंत आपण या अवकाशवाहनाचा नऊवेळा उपयोग केला आणि त्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झालो .

' पीएसएल्व्ही - एक्सएल ' ही पीएसएलव्हीची अधिक सुधारित आवृत्ती आहे . हे अवकाशवाहन अधिक शक्तिशाली आहे . दि . २९ डिसेंबर २००५ या दिवशी या अवकाशवाहनाची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली आणि चांद्रयान - १ सोडण्यासाठी याचाच वापर करण्यात आला . या सुधारित आणि शक्तिशाली अवकाशवाहनाचा आतापर्यंत आपण तीनवेळा यशस्वी वापर केला आहे . आता आपण मंगळाच्या मोहिमेचा विचार करत आहोत . अवकाशावर सत्ता कोणाची अशी स्पर्धा जगामध्ये सुरू असताना आपण त्यामध्ये अजिबातच मागे नाही , हे आपण सप्रमाण सिद्ध केले आहे . त्यामध्ये पीएसएलव्हीचा वाटा फार मोठा आहे .

महेश,
बर्‍याच गोष्टी सरकारने करायच्या असतात पण ते (सरकार) देखील आपलेच आहे, आपणच निवडून दिलेले... लाल बहादूर शास्त्रींच्या आवाहना नुसार एक वेळचे अन्न त्यागणार्‍या भारतीय नागरीकांचेच वंशज आहोत आपण. आज लाबशांसारखे नेते नसतील तरीही देशासाठी समाजासाठी काही करण्याची वेळ आली तर आपण मागे पडत नाही हे सकारात्मकतेचेच निदर्शक नाही का?

तसेच ‘ए टू झेड ग्रुप’ च्या बाबतीत या ग्रुपने तीन वर्षांपूर्वी र्मसिडीज गाड्यांची सर्वात मोठी खरेदी करून जगाचे लक्ष औरंगाबादकडे वेधले होते याचा संदर्भ आहे. 'आहे रे' वर्गातील लोकांनी 'नाही रे' वर्गातील लोकांसाठी दाखवलेली सद्भावना आहे ह्या पाठीमागे, जी नक्कीच सकारात्मकता दर्शवते.

हर्पेन यांच्या वरील मताशी सहमत.

महेश....

हे जरूर मान्य की दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने मदत आणि उपाययोजना करणे सरकारचे आद्यकर्तव्य होय, आणि बिलिव्ह मी...सरकार ते कार्य करीत असतेच [मी सरकारी यंत्रणेला फार जवळून ओळखत असलो तरी सरकारी खाते आपण जे कार्य करीत आहे, त्याबाबत कोणत्याही माध्यमाकडे जात नाही, सरकारी नियमानुसार असे कोणत्याच खात्याला थेट माध्यमाशी संपर्क साधता येत नाही. ते काम मंत्रालयातील प्रसिद्धी खात्याकडे असते.... ते खातेही तसे सुस्तच असल्याने सर्वसामान्य जनतेपुढे जितक्या प्रकर्षाने सरकारकडून होत असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणे गरजेचे असते तितके ते होत नाही हा इतिहास आहे. असो...तो विषय वेगळा आहे.]

त्यामुळे एन.जी.ओ. तसेच हर्पेन म्हणतात तसे 'आहे रे' घटकांकडून 'नाही रे' साठी मदतीचा हात पुढे होत असेल तर त्याचे स्वागत करणे इष्टच.

वीसएक वर्षापूर्वी {१९९३} मध्ये किल्लारी आणि सास्तूर इथे झालेला प्रलयंकारी असा भूकंप आठवतो तुम्हाला ? सार्‍या देशात त्याची नोंद झाली होती. भूकंपानंतर तिथे पुनर्वसनाचे जे कार्य सुरू झाले त्यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने मी आणि माझ्या पाच मित्रांनी {सरेन्डर लीव्ह काढून} तब्बल एक महिना त्या भागात मुक्काम केला होता, यथाशक्ती तेथील कामात योगदानही दिले.

कॉलनीज् उभ्या करणे ही जबाबदारी जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्याची होती हे खरे. पण तसे मानून आम्ही काहीच मदत करायची नाही असा जर पवित्रा घेतला तर स्वतःला 'सुजाण नागरिक' म्हणवून घेणे जडच गेले असते आम्हाला. आम्ही केलेल्या {आमच्यासारखे शेकडो स्वयंसेवक आले होते सार्‍या राज्यातून} मदतीमुळे एखाद्या तरी पिडीत घरी हास्य फुलले असेल तर तीच आमची मिळकत. अशावेळी सरकारने काही केले वा ना केले तर आपल्या "अडलेल्यास मदत करण्यास तत्पर" या वृत्तीत फरक पडू नये इतकेच.

अशोक पाटील

हर्पेन आणि अशोकजी,
खुलाशाबद्दल धन्यवाद, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमधे अशी मदत करणे अगदी मान्य आहे (युद्ध, भुकंप ज्याची तुम्ही उदाहरणे दिलेली आहेत). पण असे नसताना एवढी मोठी मदत करणे आणि ती सुद्धा NGO प्रमाणे "नाही रे" वर्गाला करण्याऐवजी डायरेक्ट सरकारला करणे विचित्र वाटले म्हणुन वैषम्य + राग
मंत्री, अधिकारी, इ. लोक जे मोठ्या प्रमाणावर पैसा खातात (स्विस बँकेत काळा पैसा आहे, इ. म्हणले जाते)
ते बंद / कमी झाले तर तो पैसा विधायक कामांसाठी वापरला जाऊ शकणार नाही का ?
(मधेच वेगळी चर्चा केल्याबद्दल क्षमस्व)

mahiladin.jpg

स्त्रियांच्या सन्मानासाठी शाहरुखने केली सूचना

वृत्तसंस्था । पाचगणी

महिलांना समाजामध्ये योग्य सन्मान मिळावा, अशी मागणी सर्वत्र होत असताना बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानही महिलांना सन्मान मिळावा अशी मागणी करण्यात मागे नाही. 'चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये (टायटल्स) सर्वांत पहिल्यांदा अभिनेत्रीचे नाव पडद्यावर झळ‌कवूनच आपण महिलांचा आदर करायला हवा,' अशी मागणी शाहरुखने केली आहे.

पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना शाहरुखने आपले मत मांडले. शाहरुख म्हणाला, 'मी सर्व निर्माता-दिग्दर्शकांना विनंती करू इच्छितो, की त्यांनी चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये सर्वांत पहिल्यांदा अभिनेत्रीचे नाव जाहीर व्हावे. 'चेन्नई एक्स्प्रेस' या आगामी चित्रपटात सर्वांत पहिल्यांदा अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव पडद्यावर दाखविले जाणार आहे. हा छोटा बदल केल्यामुळे फार काही साधणार नाही. मात्र, आपली मानसिकता बदलण्यात हातभार लागेल.

अरेरे बातमी बेंगलोर एव्हिएशनच्या वेबसाईटवर आहे, आणि खुद्द बेंगलोर विमानतळाचे नाव नाही. Sad

>>For some strange reason, Bangalore's Bengaluru International Airport does not feature in the ACI list. Bangalore Aviation has been unable to obtain a clear answer as to why, but we are on the job.

घनदाट जंगलातला ‘फिरता दवाखाना’

दवाखान्याची बिकट वाट
फेब्रुवारी २0१२पासून गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात फिरत्या दवाखान्याची सुरुवात.
दरमहा सरासरी ७५0 रुग्णांची तपासणी आणि उपचार.
वर्षभरात सुमारे १0 हजार रुग्णांवर उपचार.
वर्षभरात ४३ दुर्गम आदिवासी गावांना सुमारे ४५0 वेळा भेट.
फिरत्या दवाखान्यात दोन नर्स, एक फार्मासिस्ट, एक लॅब टेक्निशिअन आणि दोन सहायकांचा समावेश.

एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असताना सहज म्हणून तो मेळघाटला गेला. तिथलं दारिद्रय़ पाहिलं, कुपोषण अनुभवलं, साध्या साध्या कारणांनी मरणाच्या दारात पोहोचलेली माणसं पाहिली आणि त्याचवेळी त्यानं ठरवलं, आपली खरी गरज इथेच आहे.
आज तो डॉक्टर झालाय आणि गडचिरोलीतल्या अति दुर्गम भागात ऊन-पाऊस, वादळ-वार्‍यांत आपला फिरता दवाखाना घेऊन अखंड भटकतोय. जिथे आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या आणि ‘सरकार’ नावाची गोष्ट पोचलेली नव्हती, अशा ४३ आदिवासी
गाव-पाड्यांपर्यंत त्यानं धडक मारली आहे.
डॉ. वैभव आगवणे. मुळचा नाशिकचा. पुण्यात एमबीबीएस करत असताना पहिल्याच वर्षी तो ‘मेळघाट मित्र’ या सेवाभावी संस्थेच्या संपर्कात आला. ‘मेळघाट मित्र’तर्फे दरवर्षी पावसाळ्यात मेळघाटात ‘धडक मोहीम’ राबवली जाते. त्यानं संयोजकांना सुचवलं, ‘मेळघाटात नुसत्या कार्यकर्त्यांपेक्षा वैद्यकीय ज्ञान असलेल्या कार्यकर्त्यांची अधिक गरज आहे.’ त्याच्या आग्रहामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची खास वेगळी अशी ‘धडक मोहीम’ मेळघाटात सुरू झाली. एमबीबीएस होईपर्यंत जवळजवळ दरवर्षी वैभवनं या मोहिमेत भाग घेतला. तिथे त्यानं पाहिलं निसर्गाचं रौद्र रुप. रक्त उकळवणारा उन्हाळा, हाडं गोठवणारा हिवाळा, संपूर्ण जगापासून आदिवासींना तोडून टाकणारा प्रलयी पावसाळा आणि कुपोषणानं मरणारी लहान लहान मुलं.
एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षाला असताना डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या ‘निर्माण’ या तरुणांसाठीच्या उपक्रमातून त्याला कळलं, ‘सामाजिक प्रश्नांनी नुसतं अस्वस्थ आणि भावनिक होण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची. सामाजिक सहभागाची नुसती इच्छा पुरेशी नाही, त्याची वेळ, काळ आणि स्थळही महत्त्वाचं.’
वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना ग्रामीण, आदिवासी भागात एक वर्ष ‘वैद्यकीय अधिकारी’ म्हणून काम करावं लागतं. अनेक विद्यार्थी अशा ठिकाणी काम करण्यापेक्षा पैसे भरून ‘सरकारी बॉण्ड’मधून ‘मुक्ती’ मिळवतात. वैभवनं मात्र मेळघाटातच वर्षभर काम केलं.
त्यानंतर तो सरळ दाखल झाला ते डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेमध्ये. ‘सर्च’ आणि सरकारच्या सहकार्यानं तो आता गडचिरोलीतल्या आदिवासी भागात फिरता दवाखाना चालवतो आहे.
- ज्या गावात साधं प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रही नाही अशा गावांमध्ये सेवा द्यायची; तीही फुकट, हा प्राथमिक निकष. त्यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी एक खास मिनी बस तयार करण्यात आली. त्यात औषधांचा साठा, अत्यावश्यक सामुग्री आणि विविध तपासण्यांसाठी आवश्यक असणार्‍या लॅबची सुविधा.
तत्पूर्वी वैभवनं गावोगावी ग्रामसभा घेतल्या. लोकांना आरोग्याचं महत्त्व पटवून दिलं, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आपल्याबद्दलचा विश्‍वासही त्यांच्या मनात जागा केला.
त्यानंतर गेल्या वर्षापासून सुरू झाला त्याचा फिरता दवाखाना. दररोज दोन गावांना भेट द्यायची. तिथले रुग्ण तपासायचे. रुग्ण तपासणीची वेळही गावकर्‍यांच्या सोयीची. पेरणीच्या कालावधीत तर थेट रात्री आठ ते दहा! गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील ४३ गावं आणि तीन आश्रमशाळांत महिन्यांतून एकदा न चुकता रुग्णतपासणी केली जाते. त्याला आता साथ मिळाली आहे त्याच्यासारख्याच ध्येयवादी ठाण्याच्या डॉ. सुजय काकरमठची. पावसाळ्यात रस्ते बंद पडतात, तेव्हा सारं सामान हातात, खांद्यावर घेऊन ते आणि त्यांची टीम गावोगावी फिरते.
वैभव म्हणतो, ‘हे तर माझं कर्तव्यच आहे. आपण जे काही समाजाकडून घेतलं ते कुठल्या ना कुठल्या रुपात समाजाला परत केलं पाहिजे हे अगदी साधं आणि प्राथमिक तत्त्व आहे. त्यासाठी प्रत्येकानं माझ्यासारखं आदिवासी भागातच गेलं पाहिजे असं नाही, पण आपला वाटा आपण दिलाच पाहिजे.’

ही बातमी लोकमत मधील आहे
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...

दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अहमदनगर!
पोपटराव पवार यांनी त्यांचे गाव (हिवरे बाजार) याची कायापालट केली.
याहू कडून घेतली गेलेली दखल

http://in.news.yahoo.com/village-of-60-millionaires--111616557.html

"नातं फक्त रक्ताचं असतं, संकटाच्या काळातच या नात्यांची सत्त्वपरीक्षा होते, असं सांगितलं जातं.
पण रक्ताच्या पलिकडेही धर्माची बंधने झुगारून एक नातं प्रत्येकाला टिकवता येतं, ते म्हणजे माणुसकीचं. असंच माणुसकीचे नाते जपणारा एक देवमाणूस नागपुरात आहे. ते म्हणजे जीवन ज्योती ब्लड बॅँकेचे संचालक डॉ. रवि वानखेडे...."

एका दोस्तीची दिलचस्प दास्तां...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18968923.cms

१ लाख ९२ हजार प्रकरणे एका दिवसात निकाली

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

राज्यातील ३२ जिल्ह्यांत या महिन्याच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या महालोक अदालतीमध्ये एकाच दिवशी तब्बल १ लाख ९२ हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. नागपुरात महालोकअदलातीत ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी ९४ टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली.

६ फेब्रुवारी २०११ रोजी पहिली महालोकअदालत आयोजित करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात महालोकअदलातीमध्ये तब्बल ९ लाख ८७ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली. आतापर्यंत झालेल्या पाच महालोकअदालतींमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण १.७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मिळाली. 'यंदा आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतीत नागपुरातून एकूण २८ हजार प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यातील २६,५०४ म्हणजेच ९४ टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली. टक्केवारीच्या दृष्टीकोनातून नागपूर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी ४ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतीत एकूण ८४,६२६ प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्यात आली होती. हा विक्रमी आकडा ठरला होता. यामुळे प्रलंबित प्रकरणांचा बोझा कमी करण्यास बरीच मदत होत आहे. मात्र, अद्यापही राज्यभरात २८ लाख ८७ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत', अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दि

In a country where lakhs of blind people spend their lifetime waiting for an eye donor, what happened at All India Institute of Medical Sciences on Thursday is nothing short of a miracle.

AIIMS, which restarted its eye bank recently, received 22 eyes within 24 hours and transplanted all of them successfully. The recipients included 18 patients admitted at the hospital and four others who had registered themselves and gone back home.

"Giving vision to 22 people in a single day is unbelievable. It has been possible only because so many people came forward or accepted our request to donate the organs of their deceased kin," said Dr R V Azad, chief of the RP Eye Center at AIIMS.

He said normally the eye bank gets one or two donors daily. "On Thursday, we received 10 eyes through voluntary offers made by the families of donors from Delhi and NCR. The other 12 eyes were received through the Hospital Cornea Retrieval Programme at AIIMS and DDU. The donor age ranged from 23 to 78 years," he added.

अधिक माहितीसाठी - http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Bumper-eye-harvest-in-1-day-benefits-22-at-AIIMS/articleshow/19053058.cms

फेबुवर एका मित्राने शेअर केलेली एक विशेष बातमी:-

ज्ञानप्रबोधिनी निगडी इयत्ता दहावीत शिकणार्‍या विराज गपचूप याने पाण्याचा पुनर्वापर, पाणीबचत यावर थक्क करणारे काम केले आहे. मध्यंतरी त्याने तयार केलेल्या सेमी ऑटोमॅटिक वॉटर पम्प कन्ट्रोलरचे यंत्र अनेकांना आवडले, त्याचे कौतुकही झाले. अनेक कंपन्यांमध्ये विराजने याबाबतचे प्रेझेंटेशन केले. काही कंपन्यांनी ते खरेदीही केले आहे. दोन वर्षापूर्वी लहान वयात कमीत कमी दिवसात अधिकाधिक रकमेची देणगी गोळा केल्याबद्दल निगडीच्या ज्ञान प्रबोधिनी शाळेतील विराज गपचूप याचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया रेकॉर्डमध्ये नाव नोंदले गेले आहे. जमा झालेली दीड लाख रुपयांची रक्कम त्याने शाळेच्या सभागृहाच्या कामासाठी दिली. तसेच त्याच्या पाणी बचतीच्या प्रकल्पाची आणि त्यावर आधारित केलेल्या डॉक्युमेंट्रीचीही 'लिम्का'ने नोंद घेतली आहे.

विराजची पाणी बचतीची पद्धत पाहण्यासाठी Youtube लिंक... पहा आणि शेअर करा
1. http://www.youtube.com/watch?v=7_vslxrJXw0
2. http://www.youtube.com/watch?v=v-inWCJdUZg

विराजला इथे संपर्क करू शकता:
Email: viraj.gapchoop@gmail.com
Mobile: 8275204506
http://www.facebook.com/viraj.gapchoopSee more

They sang and danced, laughed and shed tears. They threw flowers at each other and played with gulal. The widows of Vrindavan celebrated Holi with a riot of colours on Sunday, defying tradition that bids them to stay away from festivities of all kind.

अधिक माहितीसाठी http://timesofindia.indiatimes.com/india/Holi-of-hope-for-Vrindavan-widows/articleshow/19179781.cms

काझिरंगामधील गेड्यांच्या संख्येत वाढ

काझिरंगा- अवैध शिकारीची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतरही काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यातील गेड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत आढळून आले आहे.

एक शिंग असलेल्या भारतीय गेड्यांची संख्या 39 ने वाढली आहे. काझिरंगात गेल्या वेळी करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत 2290 गेंडे असल्याचे आढळून आले होते. सध्या या अभयारण्यात पूर्ण वाढ झालेले 645 नर गेंडे आणि 684 मादा गेंडे यांच्यासह लहान पिल्ले आढळून आले आहेत.

काझिरंगातील वन्यप्राण्यांच्या गणनेला 24 मार्चपासून सुरवात करण्यात आली होती. सुमारे 250 वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 50 हत्तींच्या मदतीने गणना पार पाडली. भुरापहार, बागोरी, कोहोरा, अगराटोली आणि उत्तरपारा या पाच भागांमध्ये गणना करण्यात आली. प्रत्येक दोन वर्षांनी वन्यप्राण्यांची गणना केली जाते.

अरे वा! सर्वच बातम्या वाचून आनंदच झाला.

पण या दुष्काळात विशेषतः मस्त बातम्या संदिप आहेर आणि मित यांच्या....

केनियाच्या फुलशेतीला कष्टांचा मराठमोळा सुगंध : धुळ्यातील डॉ. सतीश पाटील यांची किमया

म. टा. मधली ही बातमी वाचता येईल ह्या दुव्यावर

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19270834.cms

धुळ्यातील दराणे या छोट्याशा गावातील डॉ. सतीश पाटील या मराठी तरुणाने सातासमुद्रापार आपल्या संशोधनाचा झेंडा रोवला आहे. हायटेक फुलशेतीत कीटकनाशकांच्या वापरासाठी पूर्व आफ्रिकेतील केनिया आणि दुबईतील शेतीसाठी पाटील सल्लागार म्हणून काम करीत आहेत.

केवळ ध्येयासक्तीद्वारे एक मराठी तरुण कशी प्रगती करू शकतो याचे उदाहरणही डॉ. सतीश यांनी घालून दिले आहे. त्यांचे लहानपण अगदी हलाखीत गेले. कुटुंबावरील आर्थिक संकटामुळे दहावीनंतरचे शिक्षण बंद होईल , की काय अशी परिस्थिती होती. परंतु त्यांची शिक्षणाची आस पाहून आई-वडिलांनी घरातील भांडी विकून ग्रॅज्युएटपर्यंत शिकविले. घरच्यांनी कोणत्या परिस्थितीत आपले शिक्षण केले याची पुरेपूर जाण असलेल्या सतीशचा संशोधनाकडे ओढा होता. ग्रॅज्युएशननंतर मुलाने आपल्या जागेवर शिपायाची नोकरी करावी अशी वडिलांची माफक अपेक्षा होती. परंतु , सतीशला संशोधनाच्या ओढीने सोडले नाही.

पुणे विद्यापीठात त्याने ' बायोपेस्टिसाइड ' मध्ये पी.एचडी केली आणि त्यानंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याने अजय बायोटेक , सुदर्शन केमिकल्स , मिटकॉन व विद्या प्रतिष्ठानमध्ये काम केले. परंतु त्याच्यातील स्वतंत्र संशोधक त्याला गप्प बसू देत नव्हता. जैविक व सेंद्रिय निविष्ठांमधील (सेंद्रिय शेतीसाठी लागणारी उत्पादने) कामाच्या अनुभवावर सतीश यांनी स्वत:ची ' ग्रीन व्हीजन ' ही शेतीतील संशोधन आणि उपाययोजना करणारी कंपनी काढली. देशभरात शेतीवर आलेल्या वेगवेगळ्या कीटकनाशकांची माहिती घेऊन स्वतः त्यावर उपाययोजना केल्या. महाराष्ट्र सरकारनेही सतीश यांना कृषी सल्लागार म्हणून काम करण्याची संधी दिली. आता केनियात सेंद्रीय शेतीचेही प्रयोग ते करीत आहेत. वाळवंटी प्रदेशात शेती फुलविण्यासाठी डॉ. सतीश दुबईत ' अल वादी अग्री ' चा कृषिसल्लागार झाला आहे.

मिनिटभरात कीड संपविणाऱ्या कीटकनाशकाची निर्मिती

पुष्पशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या केनियातील हायटेक शेतीला महागड्या कीटकनाशकांच्या अतिवापराचा विळखा पडला होता. डॉ. सतीश यांनी संशोधनाद्वारे कीटनाशकांचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांनी घटविले. लाल कोळी हा कीटक पिकांना घातक असतो. त्याचा बंदोबस्त करण्यास महागडी औषधे वापरली जातात. सतीश यांनी ' एम-एम्पॅक्ट ' हे केवळ ५५ सेकंदात ही कीड मारणारे कीटकनाशक तयार केले. सूत्रकृमींना आकर्षित करून मारणारे नेमॅगॉनचे तंत्रज्ञानही डॉक्टरांचेच.

आजच्या इंडियन एक्स्प्रेसमधून
डिफरंटली एबल्ड मुलांसाठीच्या सरस्वती विद्यामंदिर आणि ट्युलिप या दोन शाळा बंद होणार. शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यामुळे या शाळेतल्या मुलांना सर्वसामान्य शाळांतून प्रवेश मिळत असल्याने या शाळा बंद करण्यात येत आहेत.

'जीआरई'मध्ये मुंबईची अश्विनी नेने प्रथम

उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामवंत शिक्षण संस्थांमधील प्रवेशाचे तिकीट समजल्या जाणाऱ्या 'ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन' (जीआरई) या परीक्षेत अंधेरीच्या सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजीत शिकणारी अश्विनी नेने हिने प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. 'एज्युकेशन टेस्टिंग सव्‍‌र्हिसेस'ने (ईटीसी) नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. २२ वर्षांच्या अश्विनीने या परीक्षेत ३४० पैकी ३४० अशी १०० टक्के गुणांची कमाई करीत पहिला क्रमांक पटकावला आहे. जागतिक स्तरावर १०० टक्के गुणांची कमाई करणाऱ्या काही थोडय़ा विद्यार्थ्यांमध्ये अश्विनीचा समावेश आहे. जगभरातून लाखो विद्यार्थी जीआरई देत असतात. अमेरिका आणि इतर निवडक देशांमधील नामवंत शिक्षण संस्था आपल्या अभ्यासक्रमांसाठी जीआरईचे गुण प्रमाण मानतात. या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या व्हर्बल रिझनिंग, क्वान्टिटेटिव्ह रिझनिंग, विश्लेषणात्मक लेखन आणि क्रिटिकल थिंकिंग यांचा कस लागतो. ही परीक्षा कोणत्याही विशिष्ट अभ्यासक्रमावर आधारित नसते. त्यामुळे त्यात आपली योग्यता स्पष्ट करणे विद्यार्थ्यांकरिता आव्हान असते. अश्विनीला या परीक्षेकरिता केआयसी या कोचिंग संस्थेकडून मार्गदर्शन लाभले.

http://www.loksatta.com/mumbai-news/ashwini-nene-came-first-in-gre-91483/

२३व्या वर्षी सीए, सीएस आणि कॉस्ट अकाऊंटंटही!

वित्तीय क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या दिल्लीतील २३ वर्षीय युवतीने पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाऊंटंट (सीए), कंपनी सेक्रेटरी (सीएस) आणि कॉस्ट अकाऊंटंट या तीनही परीक्षा उत्तीर्ण होत नवे शिखर गाठले. पल्लवी सचदेव असे तिचे नाव असून वित्तीय क्षेत्रातील तीनही महत्त्वाच्या परीक्षा उत्तीर्ण होणारी ती देशातील सर्वात लहान मुलगी ठरण्याची शक्यता आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षा चंदा कोच्छर यांना आपला आदर्श मानणारी पल्लवी दिल्ली विद्यापीठातील पदवीधर आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या 'बाक्र्लेज्' या वित्त संस्थेत तिला नोकरीही मिळाली आहे. एकदा एखादा विषय समजला की तो फारसा अवघड राहत नाही, असे पल्लवीने तीन परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण होणे अवघड गेले नाही का, या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. भविष्यातील योजना काय आहे असे विचारले असता, पुढील महिन्यात आपले स्वप्न असलेल्या 'बाक्र्लेज्' या इंग्लंडच्या वित्त संस्थेत रुजू होण्यासाठी आतुर असल्याचे ती म्हणाली.
समाजातून आजही मिळणारी दुय्यम वागणूक, विकृत नजरा, लैंगिक अत्याचार, कुटुंबात होणारी अवहेलना अशा अनेक अडचणी वर्षांनुवर्षे सहन करत आलेली स्त्री आज पुरुषाच्या तोडीस तोड काम करत आहेच; पण ध्येयासक्ती आणि मेहनत यांच्या जोरावर तिने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. दिल्लीची पल्लवी सचदेव आणि मुंबईची अश्विनी नेने या अशाच दोन 'यशस्वीनी'..
http://www.loksatta.com/desh-videsh-news/pallavi-sachdev-become-ca-cs-an...

भरत - खरोखरच चांगली बातमी. तोत्तोचान मधे वर्णन केल्याप्रमाणे, सर्वसाधारण व डिफरंटली एबल्ड (देवाच्या लाडक्या) मुलांमधले बालपणीचे निखळ मैत्रीबंध (जे आपल्या मनात दीर्घकाळ रहातात) आता आपल्याकडे अधिक जास्त प्रमाणावर होतील अशी आशा आहे. ज्याचा खूप चांगला उपयोग आणि सकारात्मक परिणाम सर्वच मुलांच्या आयुष्यावर व पर्यायाने समाजावर होईल असे वाटते.

Pages