माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"
खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.
मनावर मळभ आणणार्या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"
http://vishesh.maayboli.com/node/1120
चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.
काल वर काढला धागा.
काल वर काढला धागा.
आधीच्या पोस्टी पाहिल्या नव्हत्या.
धनुडी आणि आशु यांचे अभिनंदन.
धनुडी, आशु अभिनंदन.
धनुडी, आशु अभिनंदन.
धन्यवाद मंडळी. भ्रमा हाक
धन्यवाद मंडळी. भ्रमा हाक मारायचीस ना . माझं लक्ष नसतं, कुठे बघितलंस?
धन्यवाद बिल्डींग पुर्ण
धन्यवाद बिल्डींग पुर्ण झाल्यावर अपडेट करेन.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
पुढील लिंक वाचा
https://www.loksatta.com/maharashtra/marathi-get-classical-language-stat...
या निमित्ताने पुढील महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करतो....
मोल्सवर्थ ब्रिटिश अधिकारी याने शब्दकोशावर खूप काम केले..
स्थानिकांकडून मराठी शब्द मिळवले; त्यांची चिकित्सा केली आणि ६०००० शब्दांचा कोश केला. हे करत असताना तो आजारी पडला आणि मायदेशी गेला; पुढे त्यांचा सहायक मेजर कँडी याने शब्दकोश तर पुर्ण केला पण मराठीत विराम चिन्ह आणली. तोवर आपण मोडी भाषेत लिहिताना फक्त दंड देत असू.
शैलजा पाईक यांना 80000 डॉलर्स
शैलजा पाईक यांना 80000 डॉलर्स ची मॅकआर्थर फेलोशिप
https://www.loksatta.com/explained/who-is-shailaja-paik-who-received-mac...
अभिनंदन, Great achievement
Pages