ABA ची मूळ तत्वं फार सोपी आहेत. सोपी म्हणजे वाचायला. आचरणात आणायला मात्र अवघड.
परंतू ऑटीझम पेरेंट्स हे चॅलेंज स्विकारतात, व ABA पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतात. ABA therapists त्यासाठी मदतीला असतातच. मुलाच्या प्रत्येक सेशनमध्ये Parent Compliance Training पालकांना देणे हा महत्वाचा भाग असतो.
मुलाच्या थेरपीज चालू होण्यास बराच वेळ लागत होता, त्यामुळे मी वाचनाला सुरवात केली होती. जितके आपण देऊ शकू तितके बरे या विचाराने. परंतू मला नुसतं वाचून काही समजेना. सेल्फ हेल्प पुस्तकात कशी टीपिकल वाक्य असतात तसा सगळा मामला.
- मुलांच्या चांगल्या वागणुकीला किंवा एखाद्या कृतीबद्दल कौतुक करा,
- त्यांचे inappropriate behaviorsकडे दुर्लक्ष करा.
सगळीकडे ही दोन वाक्यं आहेतच. पण आचरणात आणायला इतकी कठिण असतील असं खरोखर वाटले नव्हते. कौतुक करणे सोप्पे आहे असे वाटले होते परंतू नाही. आपण मुलांकडून नकळत परंतू सतत इतक्या अपेक्षा ठेवत असतो की त्यांनी दाखवलेली अगदी छोटी प्रगतीची पावले आपल्या झापड लावलेल्या डोळ्यांना दिसत नाहीत. मी मुलाला ’आई’ म्हणायला शिकवत असेन, तर मी त्याच्याकडून पूर्ण ’आई’ याच शब्दाची अपेक्षा करत राहते. तो बिचारा काकुळतीला येऊन अं..ह्म्म.. असे हुंकार भरत असेल तरी त्याकडे माझे लक्षच नाही. परंतू ABA च्या प्रमाणे हे सगळे त्याचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. बेबी स्टेप्स आहेत. त्याचे कौतुक केलेच पाहीजे. Positive Reinforcement हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. खरं सांगायचे तर आपले बालपण किती वेगळे होते? आईबाबांनी कौतुक केले नाही असे नाही, परंतू अवाजवी कौतुक केल्यास मुलं डोक्यावर बसतात ही एक भिती त्यांनाच काय आम्हाला देखील आत्ता आत्ता आत्ता पर्यंत होतीच. परंतू छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक केल्यावर मुलाच्या डोळ्यातले चांदणे बघणे यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही. आणि डोक्यावर का बसेल जर आम्ही त्याच्याशी सतत संवाद साधत राहीलो तर? त्यामुळे आम्ही प्रत्येक छोटी गोष्ट सेलिब्रेट करतो! एकाच सांगण्यामध्ये जर मुलाने ऐकले तर आमच्याकडे ’बिग पार्टी’ असते. म्हणजे काय? तर जोरात आरोळी देऊन मुलाला हग करणे. किंवा त्याला घेऊन हवेत गिरकी मारणे. थोडा लो टोन हवा असेल तर हाय फाईव्ह. किंवा एखाद्या कुकीचा तुकडा. पण ॲप्रिशिएट करणे महत्वाचे.
तसेच चांगली वागणूक न केल्यास दुर्लक्ष. हे तर भारतीय पालकांसाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. सर्वात प्रथम आवाज वाढणार, रागाचा पारा चढणार, भारतात असू तर दोन चार फटके लगावणार, इकडे टाईम आउट देणार. बर्याचदा हे सर्व करून देखील मुलं परत तीच चूक करत राहातात हे ही लक्षात येते. त्यामुळे रागाचा, पेशन्स लूझ करण्याचा काही फायदा होत नाही आहे हे दिसत असूनही त्या विचित्र चक्रात आपण जात राहतो.
मग त्या इनअप्रॉप्रिएट बिहेविअरकडे दुर्लक्ष करणे? नाही ते कसे जमेल?! ते जमण्यासाठी आम्हाला इतकी मेहनत करावी लागली आहे. दुर्लक्ष करायचे म्हणजे काय? समजा तुमचा मुलगा लेगो ब्लॉक्स जोरजोरात पायाने लाथाडत असेल तर एरवी आपण त्याच्याकडे जाऊन त्याला थांबवू. किंवा "अरे असं नको करूस!" "कितीदा सांगितलं असं नाही करायचे?" "किती पसारा करतोस सारखा?" किंवा कदाचित दुर्लक्ष करायचा आटोकाट प्रयत्न करत आहोत परंतू तोंडाने आपण उसासे टाकत आहोत, डोळे फिरवत आहोत.. हे सगळे सिग्नल्स आहेत की तुमचं मुलांकडे लक्ष आहे जे तुमची मुलं सहज समजून घेतात.
कधीकधी त्यांच्या अशा वागण्यामागे कारण असते, ते अटेन्शन मिळावण्याचे. परंतू आपण जर मुलं अशी वागत असताना अटेन्शन दिले, तर We only are setting the path. तू असं वागलास तर मी हातचं सोडून तुझ्याकडे येईन, भले रागो भरायला का होईना. मुलांना तेच हवे असते. त्यामुळे मुलं अशी वागत असतील तर मुद्दाम दुर्लक्ष करणे. मान फिरवणे. पेरिफेरल नजरेतून ती सेफ आहेत ना इतकं बघता येतंच. जेव्हा मुलांना लक्षात येते की खेळणी फेकून दिली तरी आई धावत येत नाही, म्हणजे ही स्ट्रॅटेजी काही कामाची नाही. त्याचे तसे वागणे कमी होईल.. मात्र तुमचा पाल्य अनसेफ वागत असेल उदा: डोकं भिंतीवर आपटत असेल तर ट्रिकी परिस्थिती होते. तुम्हाला लक्ष तर द्यायचे नाही आहे, परंतू मुलाकडे लक्ष तर ठेवायचे आहे. अशा वेळेस तुमचे तोंड पूर्ण दुसर्या दिशेला वळवून परंतू त्याच्या जवळ जाऊन तुम्ही त्याला हाताने फिजिकली ब्लॉक करू शकता. Inappropriate behavior नंतर जेव्हा मूल शांत होईल जरासे, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाऊन न्युट्रल आवाजात विचारू शकता "What do you want?" हाच तो क्षण तेव्हा जास्त शक्यता आहे की मूल (बोलू शकत असेल तर) तुम्हाला शांतपणे त्याला हवंनको ते सांगेल. It works! almost every time!
तुम्ही विचाराल, तुमचा मुलगा बोलत नाही. मग तो कसे काय काही सांगेल? त्यासाठी आमच्याकडे जादूची कांडी आहे. Picture Exchange Communication System. (PECS) आमच्या मुलाला जरूरीच्या असतात अशा प्रत्येक गोष्टीचा, वस्तूचा, पदार्थाचा आम्ही १इंच बाय १इंच फोटो काढून, लॅमिनेट करून त्याला मागे वेल्क्रो लावून एका फाईलमध्ये ठेवतो. जेणेकरून आम्ही जेव्हा मुलाला विचारू "What do you want?" त्यावेळेस मुलगा त्या बाइंडरपाशी जाऊन हवे ते चित्र आम्हाला आणून देतो! आहे का नाही जादू? PECS आमच्या घरात आल्यापासून आमच्या घरातील frustration level अगदी खाली गेली आहे. कारण संवाद साधणे खरोखर सोपे बनत गेले आहे.
Whatever works!
http://marathi.journeywithautism.com/
सुंदर लेख.
सुंदर लेख.
सुंदर लेख. विचार करायला
सुंदर लेख. विचार करायला लावणारा.
हा लेख खर तर सगळ्याच पालकांना
हा लेख खर तर सगळ्याच पालकांना पण खूप उपयोगाचा आहे.
हाही लेख छान आहे. ही लिंक
हाही लेख छान आहे.
ही लिंक जरूर वाचा तुम्ही. ऑटिस्टिक मुलगा डिस्ने फिल्म्स आणि कॅरेक्टर्स मधून स्वतःला एक्स्प्रेस करतो ते वडिलांनी लिहीले आहे. काल तुमचा लेख पहिले वाचला मग हा लगेचच वाचनात आला. ह्यांचे पुस्तकही आहे.
तुमच्या पिल्लूला आवडेल कदाचित. इथे असतात तर त्याच्यासाठी खेळ्णी घेउन नक्की आले असते.
प्रोत्साहनाबद्दल अगदी अगदी. डोळ्यातले चांदणे शब्दप्रयोग खूप आवडला.
http://www.nytimes.com/2014/03/09/magazine/reaching-my-autistic-son-thro...
दुसरे काल डॉग्ज विथ जॉब्ज मध्ये एक ट्रेन्ड कुत्रे आहे जे रीडिंग मोटिव्हेटर असे काम करते ते दाखविले.
त्याची ट्रेनर त्याला शाळेत नेते व तो मुलांच्या शेजारी बसून त्यांच्याकडून पुस्तके वाचून घेतो. मुलाचे लक्ष जाते आहे असे दिसल्यास त्याला नज करून पुस्तकावर आणतो. एका अॅस्परगर सिंड्रोम वाल्या मुलाला गोष्ट वाचताना दाखवले ते फार इन्स्पायरिंग होते. ह्यांना मुलांनी काहीही केले तरी शांत बसायचे हात लावून घ्यायचे
ट्रेनिन्ग दिलेले असते त्यामुळे ते मुलांना इजा करत नाहीत.
आहा... परंतू छोट्या छोट्या
आहा... परंतू छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक केल्यावर मुलाच्या डोळ्यातले चांदणे बघणे यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही.
तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी स्वमग्नता नसलेल्या मुलांच्या पालकांनाही फार महत्वाच्या आहेत.
सुरेख लेख... आवर्जून वाचावं असं लिहिता आहात... मराठीत लिहिता आहात. भारतातल्या वर्तमान पत्रांमधून हे यावं. अनेक पालकांना ह्याचा फायदा होणारय.
दाद | 9 March, 2014 -
दाद | 9 March, 2014 - 19:34नवीन
सुरेख लेख... आवर्जून वाचावं असं लिहिता आहात... मराठीत लिहिता आहात. भारतातल्या वर्तमान पत्रांमधून हे यावं. अनेक पालकांना ह्याचा फायदा होणारय
>>>
+१०००
मी यावर npr वर एक प्रोग्राम ऐकला होता.
पालकत्व म्हणजे एक लीडरशीप असते.
मुलांची कुवत वाढविणे आणि त्यांचा आत्मविश्वास बळविणे याचा सुवर्णमध्य साधायचा असतो, आणि प्रत्येक मुलासाठी हा बिंदु वेगळा असतो याचे भान ठेवुन!
तुमचे त्रिवार अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा!
उत्तम लेख. दादला अनुमोदन.
उत्तम लेख.
दादला अनुमोदन.
खरोखरीच सगळ्या पालकांसाठी
खरोखरीच सगळ्या पालकांसाठी मार्गदर्शक आहे हा लेख. दाद आणि निलिमा, तुम्हालाही अनुमोदन.
सगळ्यांनाच +१
सगळ्यांनाच +१
खरोखरीच सगळ्या पालकांसाठी
खरोखरीच सगळ्या पालकांसाठी मार्गदर्शक आहे हा लेख=+१
पुन्हा एकदा खुप मस्त आणि मी
पुन्हा एकदा खुप मस्त आणि मी निशब्द
सर्वांचे आभार! पेट थेरपी,
सर्वांचे आभार!
पेट थेरपी, काय सुंदर लिंक दिली आहेत तुम्ही. मी सगळा लेख नाही वाचला. प्रिंट करून हळूहळू वाचला पाहीजे. पण डोळ्यात पाणी आले माझ्या. विशेषतः हे वाक्य वाचून.
Families stop watching those early videos, their child waving to the camera. Too painful. That child’s gone.
मी माझ्या मुलाचे जुने फोटो लपवून ठेवले आहेत. व्हिडीओज पाहणे खरोखर पेनफुल प्रकार आहे, ज्यात माझा मुलगा कॅमेर्याकडे बघतोय, बोलायचा प्रयत्न करतोय. That child’s gone.
पण तुम्ही दिलेला लेख आशादायी आहे. कसं का होईना कम्युनिकेशन करता येऊ शकते हे महत्वाचे. त्यासाठी सर्व अॅव्हेन्यूजना भेट दिली पाहीजे. कुठला रस्ता तुमच्या मुलासाठी योग्य राहील हे तपासले पाहीजे. मी ही माझ्या मुलासाठी ड्रॉईंग व म्युझिकचा क्लास शोधणार आहे. मला खात्री आहे माझ्या मुलाला यात गती आहे. माझा विश्वास आहे, ही मुलं या जगात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठीच आली आहेत. चॅनलिंग बरोबर करता आले पाहीजे पालकांना.
कुत्र्यांबद्दल. मी वाचले आहे लॅब्राडोर सारखी कुत्री घरात असणे फार एन्रिचिंग एक्स्पिरिअंस असतो या मुलांसाठी. तसेच मी हॉर्सरायडींग बद्दलही ऐकले आहे. कसे जमते बघायला हवे..
कुत्र्यांवरून आठवले. एबीए बद्दल युट्युबवर शोध घेत असताना, एका व्हिडीओवर ज्यात रिइन्फोर्समेंट म्हणून ती बिहेविअर इंटरवेन्शनिस्ट मुलाला कुकीचा छोटा तुकडा देत होती, तिथे एक कमेंट वाचली. "गुड थेरपी.... फॉर डॉग्ज." खूप अपमानास्पद वाटले होते तेव्हा. मला अचानक माझा मुलगा व सीवर्ल्डमधले प्राणी यात काही फरक दिसेना. पण अशीच सिस्टीम वर्क होते त्याला काय करणार.
क्या बात है ! हा लेख तर एकूण
क्या बात है ! हा लेख तर एकूण एका पालकांना उपायोगाचा आहे, यातील शब्दन शब्द पटलाय, लक्षात राहील आणि आचरणात आणला जाईल.
भरपूर विचार करायला लावणारा
भरपूर विचार करायला लावणारा छोटासा लेख! मूर्ती लहान पण कीर्ती महान.
-गा.पै.
खूप छान माहिती दिलीत . खरेच
खूप छान माहिती दिलीत . खरेच प्रयत्नांचे कौतुक करणे खूप महत्वाचे आहे माझ्या मते हे सगळ्यांच्याच म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत apply होते . त्यातूनच अजून प्रगती करण्याचा उत्साह वाढतो तुम्ही फक्त तुमच्या मुलासाबंधित लिहित असला तरी प्रत्येक लेखातून सगळ्यांसाठीच काहीतरी शिकण्यासारखे आहे.
धन्यवाद!
मी वय वर्षे ४ ते १३
मी वय वर्षे ४ ते १३ पर्यन्तच्या सर्वसामान्य मुलांबरोबर (शालाबाह्य) शिक्षक म्हणून काम केले आहे आणि करत आहे. आता तर बाप बनलो आहे. शिक्षक म्हणून "त्यामुळे मुलं अशी वागत असतील तर मुद्दाम दुर्लक्ष करणे", "छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करणे" हे तर नेहमीच करत असे (आहे). पण पालक म्हणून तसे वागणे मला खूपच अवघड जात होते (आहे). शिक्षक म्हणून मत्र मी ते सहज करत असे (करतो). मग जाणवले की माझा "ग" पालक म्हणून कार्य करताना काम करतो; शिक्षक म्हणून काम करताना नाही.
पण एकदा पडलेली प्रथा मोडणे अवघड असते. माझ्या मुलीला कळले होते की जरा आक्रस्ताळेपणा केला की मी लक्ष देतो. मग एकदा मुद्दमहून दुर्लक्ष केले तर तिने आ़क्रस्ताळेपणाचा कहरच केला. असे खूप वेळा झाल्यानंतर आता तिला कळले की तो आक्रस्ताळेपणा (नेहमी) काम करत नाही.
असो, "मुलाच्या डोळ्यातले चांदणे बघणे" हा फारच उत्तम शब्दप्रयोग आवडला. अधिक लिहीत रहा आम्ही वाचूच.
शुभेच्छा.
मायबोलीवर "स्वमग्नता आधार
मायबोलीवर "स्वमग्नता आधार ग्रूप" सुरु केला आहे आणि या विषयावरचे सगळे धागे (या धाग्यासकट) तिथे हलवले आहेत.
http://www.maayboli.com/node/48077
अॅडमिन, धन्यवाद. ही गृपची
अॅडमिन, धन्यवाद. ही गृपची लिंक फेसबुकवर शेअर करण्याची सोय उपलब्ध होईल का? सगळे लेख एकत्र शेअर करता येतील.
स्वमग्नता.... अनुभवाचे बोल
स्वमग्नता....
अनुभवाचे बोल शब्दबद्ध करण्याची ही शैली भाषेवरील तुमची श्रीमंती तर दाखवितेच शिवाय विस्तृत प्रमाणावर लिहिल्यामुळे विषयही सखोलपणे समजण्यास मदत होते.
ऑटिझमग्रस्त मुलांविषयी लिहिताना तुम्ही ज्या काही सूचना केल्या आहेत त्या संदर्भात अनुभवाची एक बाब लिहितो.
माझ्या एका भाचीचा मुलगा याच गटातील आहे. त्याची देखभाल आईवडील ज्या प्रकारे करतात त्याचे वर्णन आपण केलेल्या विविध लेखातील मजकुराशी जुळते. पण एक विशेष म्हणजे हा मुलगा संगीतप्रेमी आहे. बोलत नाही, मात्र मोबाईल कॉर्डद्वारे त्यातील गाणी ऐकत असतो. त्यातही खास म्हणजे मुलाला "सुमन कल्याणपूर" यांची गाणी आवडतात....परवाच मी आणि माझी आणखीन एक संगीतप्रेमी आणि गाण्याची शास्त्रोक्त तालीम घेतलेली भाची त्यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळी तो गाणी ऐकतच होता...सुमनचे कुठले गाणे हे पाहिल्यावर या भाचीने त्याच्यासाठी त्याच्यासमोर तेच गाणे म्हटले. ते त्याने तन्मयतेने ऐकले....गाणे संपल्यावर अगदी आनंदाने मुलाने आपल्या मावशीला मिठी मारली.... तो प्रसंग त्याचे आईवडील आणि मी आनंदाने पाहात होतो....तिथून निघताना इतर कुणाशी नाही, पण या गाणे म्हटलेल्या भाचीसोबत त्याने हस्तांदोलनही केले.
फार भावुक प्रसंग होता तो.....संगीत लाभदायी ठरते ते अशाप्रसंगीही.
खूप छान माहिती मामा ...
खूप छान माहिती
मामा ... मस्तच
अॅडमिन, धन्यवाद.
खूपच उपयुक्त माहिती
खूपच उपयुक्त माहिती ...
"मुलाच्या डोळ्यातले चांदणे बघणे" हा फारच उत्तम शब्दप्रयोग आवडला. अधिक लिहीत रहा आम्ही वाचूच. >>>+१००..
मी माझ्या मुलाचे जुने फोटो
मी माझ्या मुलाचे जुने फोटो लपवून ठेवले आहेत. व्हिडीओज पाहणे खरोखर पेनफुल प्रकार आहे, ज्यात माझा मुलगा कॅमेर्याकडे बघतोय, बोलायचा प्रयत्न करतोय. अरेरे That child’s gone. >>> हे जरा कळाले नाही मला. म्हणजे स्वमग्नतेची लक्षणे आधी नव्हती आणि नंतर डेवलप झाली असे होते का ? जन्मतःच मूल स्वमग्न असते किंवा नसते असा माझा समज होता. ( तुम्हाला ठीक वाटले तरच सांगा. )
वेबमास्तर, धन्यवाद!
वेबमास्तर, धन्यवाद!
मैत्रेयी, ऑटीझमचे ते क्लासिक लक्षण आहे. रिग्रेशन. ही मुलं बर्याचदा दीडेक वर्षापर्यंत नॉर्मली वाढत असतात. (ऑटीझम जन्मापासून असला नसला तरी रिग्रेशन, किंवा ऑटीझमची लक्षणे ही १.५-२ वर्षानंतरंच लक्षात येतात. हेच तर वाईट आहे या डीसऑर्डरचे. बाळ जन्माला आले की तुम्ही ते सगळं छान, व्यवस्थित, गोड आहे म्हणून खुष होता. नंतर १.५ वर्षं मजेत जातात. आणि मग आपत्ती कोसळते. )
माझा मुलगा तरी नुसता बोलायचा प्रयत्न करायचा. २-३ शब्द ओझरते बोलला असेल नसेल आणि त्याचे बोलणे थांबले. काही मुलांच्या बाबतीत तर अगदी घडाघडाअ बोलणारी मुलं अबोल झाली आहेत. (माय हार्ट गोज आउट फॉर दोज पेरेंट्स. )
सुसुकू, तुमचा अनुभव आवडला. कन्सिस्टंसी हा फार मोठा चांगला गुण आहे.
अशोक, हो. माझ्याही मुलाला गाणी इतकी आवडतात. त्याला ताला सुराचा ज्ञान आहे असं आपली मी म्हणत असते.
उत्तम लेख! मुलाच्या डोळ्यातील
उत्तम लेख!
मुलाच्या डोळ्यातील चांदणे >> हे फार आवडले.