सायकल राईड - २
पहिल्या राईड नंतर अनेक जणांनी विचारणा केली की दुसरी राईड कधी? तर घेऊन येत आहोत. दुसरी राईड. हा पेपर थोडा(साच) अवघड आहे. एक छोट्टासा घाट मध्ये आहे. :)
ता २३ फेब.
दिवस रविवार
वेळ : सकाळी साडेसहा (परत :) )
ठिकाण : थोडे अवघड पण तरीही जमेल असेच.
चांदणी चौक ( चौकाकडे जाणार्या रस्त्यावर पण बायपास वरच थांबायचे.)
राईड १ - चांदणी चौक ते पिरंगुट. ( चौक ते पिंरगुट १२ किमी)
राईड २ - पिरंगुट ते आनंदगाव (ज्यांना समोर जायचे त्यांच्यासाठी) पुढे ८ ते ९ एक किमी.
एकुण अंतर (चांदणी चौकापासून ) २१-२२ किमी वन वे.
जी लोकं कोथरूड / सिंहगड रोड वर राहतात त्यांना टोटल ५० किमी होईल. (घर टू घर) पण निदान पिरंगुट तरी गाठता येईल. चौक ते पिरंगुट १२ किमी आहे. म्हणजे घर टू घर कदाचित मॅक्स ३५ पर्यंत होईल.
https://www.google.com/maps/dir/Chandani+Chowk,+Bhusari+Colony,+Bavdhan,+Pune,+Maharashtra,+India/Pirangut,+Maharashtra,+India/18.4595721,73.6314708/@18.4844249,73.627728,12z/data=!4m15!4m14!1m5!1m1!1s0x3bc2be45a9bc2ecf:0x9a674987afed2d85!2m2!1d73.7794093!2d18.506527!1m5!1m1!1s0x3bc2bd1bdecd4c57:0x6f5e3d0d8388ed13!2m2!1d73.680485!2d18.511439!1m0!3e0
ह्या रस्त्यावरच आपला एक मायबोलीकर मार्च मध्ये ट्रायलथॉन करणार आहे. तेंव्हा हा रस्त्याची त्याला सवय व्हावी म्हणून हा रस्ता घेतला आहे. जर अवघड वाटत असेल तर मागच्या वेळे सारखे ऑपश्न द्या. आणि नाव नोंदवा म्हणजे राईड करायची की नाही हे ठरवता येईल.
सई,. नवीन सायकल बद्दल
सई,. नवीन सायकल बद्दल अभिनंदन...
माझे अजून सायकल शोधणेच चालू आहे...
दोन बघून आलोय.. एक फायरफॉक्स आणि दुसरी मॉन्टेरा.. कुठली घ्यावी त्या संभ्रमात आहे..
तुमची ही राईड मस्तच झाली की..
हिम्स - गो फॉर
हिम्स - गो फॉर मॉँटेरा....पश्चाताप होणार नाही याची गॅरेंटी...
सई - कुठली सायकल घेतलीस फायनली...
आशु... ज्या दुकानात माँटेरा
आशु... ज्या दुकानात माँटेरा होती त्यानी फायरफॉक्स चांगली नाही हे सांगितले आणि ज्या दुकानात फायरफॉक्स होती त्यानी माँटेरा चांगली नाही असे सांगितले..
ज्या दुकानात माँटेरा होती
ज्या दुकानात माँटेरा होती त्यानी फायरफॉक्स चांगली नाही हे सांगितले आणि ज्या दुकानात फायरफॉक्स होती त्यानी माँटेरा चांगली नाही असे सांगितले.. >>
दोन्ही चांगल्या आहेत. एकमेकांना विचारू नये.
पग्याने माँटेराच घेतली आहे.
कोणतीही घे पण लाईटवेट घे आणि माऊंटेन घेऊ नको. आता होऊ दे खर्च !
सई, नविन सायकलसाठी अभिनंदन!
तु ३रीच घे सरळ
तु ३रीच घे सरळ
हाहाहहाहा, जबरदस्त....माझी
हाहाहहाहा, जबरदस्त....माझी दोन्ही दुकाने नाहीत...त्यामुळे विश्वास ठेव...फायरफॉक्स पेक्षा मॉंटेरा जास्त चांगला ब्रँड आहे....
आणि बजेट जास्त असेल थोडेसे तर गो फॉर श्विन स्पोर्टेरा, किंवा स्कॉट एक्स ७०
तुझे बजेट तर सांग आधी...मग
तुझे बजेट तर सांग आधी...मग आपण बघू त्यात कुठली बसवता येईल ते...
आशु, मला आता नविन सायकल
आशु, मला आता नविन सायकल घ्यायल लागणार आहे. ह्या राईडमध्ये माझ्या सायकलने माझा दम काढला..
आत्ता कुठली आहे तुमच्याकडे?
आत्ता कुठली आहे तुमच्याकडे?
माझ्या बजेट मध्ये हार्क्युलसच
माझ्या बजेट मध्ये हार्क्युलसच बसते.. पण ती योग्य साईज मध्ये नाही.. त्यामुळे बजेट वाढवून माँटेरा किंवा फायरफॉक्स असे पर्याय आहेत...
त्यातूनही एकाने अजून आठवड्या भरात नवीन सायकल्स येतील असे सांगितले आहे.. .म्हणुन थांबायचे का असाही विचार करतो आहे..
सध्या हरक्युलस रोडिओ आहे आणि
सध्या हरक्युलस रोडिओ आहे आणि ती वजनाला जड आहे. मला जरा वेगवान सायकल पाहिजे..
सई, नवी मैत्रिण आल्याबद्दल
सई, नवी मैत्रिण आल्याबद्दल अभिनंदन. हेल्मेटसाठी डबल अभिनंदन
६ वी Pune Bicycle
६ वी Pune Bicycle Championship at Sinhagad
https://www.facebook.com/notes/pune-bicycle-championship/pbch-6-9th-marc...
दुदैवाने ही ९ मार्चला आहे आणि त्या दिवशी माझे फ्लाईट आहे. बाकींनी भाग घ्यावा. हर्पेन, पिंगू आणि आशू सिरियसली विचार करा. पिंगू तू जर दुसरी बाईक घेतलीस तर नक्की ट्राय कर.
दोन घाट चढतो तिथे एक सिंहगड चढायचा.
हिम्स - नविन सायकल्स भारतीय
हिम्स - नविन सायकल्स भारतीय बनावटीच्या असतील तरच थांबण्यात अर्थ आहे. कारण इंपोर्टेडवर वाढीव ड्युटी लावण्यात आली आहे मागच्या बजेटमध्ये...त्यामुळे त्या अशाही महागच पडणार आहेत.
केदार - हो, माझ्या डोक्यात आहे...पण सराव पाहीजे रोजच्या रोज...मी सिंहगड चढलोय एकदा...शेवटच्या दोन-तीन वळणांवर अक्षरश मेटाकुटीला येतो....
पिंगू, मस्त वृत्तांत! >> तोच
पिंगू,
मस्त वृत्तांत!
>> तोच घाट उतरताना मात्र ५० च्या स्पीडने फक्त अडीच मिनिटांमध्ये ४ किमी पार केले..
अडीच मिनिटांत चार किमी म्हणजे ताशी ९६ किमी होतात. घाट दोन किमीचा होता का?
आ.न.,
-गा.पै.
गामा, मी काही गणित केले नाही.
गामा, मी काही गणित केले नाही. पण केदारने वेळ मोजली होती, ती अडीच मिनिटे होती आणि घाटरस्ता एकूण ४ किमी होता एवढे मात्र नक्की..
केदार, ती ३०० हजाराची सायकल
केदार, ती ३०० हजाराची सायकल वापरतोस की अजुन नवीन घेतलीये?.सायकलचा फोटो द्या.
कुतुहल - महाग म्हणजे किती महाग असतात सायकली?
सुनिधी - मी प्रत्यक्ष
सुनिधी - मी प्रत्यक्ष पाहिलेली सर्वात महाग सायकल ट्रिनिटी आहे...किंमत फक्त दहा लाख रु.
ती अडीच मिनिटे होती >>> अरे
ती अडीच मिनिटे होती >>> अरे नाही पिंगू अडिच किमी पिरंगुटचा घाट असे मी म्हणालो आणि ऑलमोस्ट ५ किमी मुठा घाट आहे. ऐकण्यात गफलत झाली असेल. पण आपण तो घाट खूप फास्ट उतरलो त्याच्या किमी स्क्रिन शॉट टाकला आहे.
आणि मी जे पावनेपाच मोजले आहेत ते आपण त्या शॉर्टकट पासून मुख्य रस्त्याला लागून जिथे पाणी घेतले त्या जागेपासून. खरेतर तिथेच चढ सुरू झाला आणि मी हर्पेनला म्हणालो, की अरे आपण दरवेळी पायथ्यालाच थांबून मोमेंटंम घालवतो. आणि वर मी जिथे मोजले (जिथे त्यांनी आपले फोटो काढले) तो पर्यंत पावने पाच किमी झाले. घाटाची पाठी अजून थोडी पुढे होती, मे बी अर्धा किमी पुढे. पण तो पूर्ण चढच होता.
ती ३०० हजाराची सायकल >> अगं ३०ची. हो तीच वापरत आहे.
कार्बन फायबर ७ लाख, १० लाख अश्याही पुण्यात आहेत. पण पुण्यातले रस्ते कार्बन फायबर वापरायच्या लायकीचे नाहीत. तिथे अॅल्युमिनियम बॉडीच बरी.
३०० हजाराची सायकल... हाहाहा
३०० हजाराची सायकल...
हाहाहा केदार मग मी पहिल्याच राईडला तुझी सायकल ढापली असती. :प
सर्वांना थँक्यु.. सिंडरेला,
सर्वांना थँक्यु.. सिंडरेला, अगदी, नवी मैत्रिण
आशू, मी हीरो के४० घेतली. शॉर्टलिस्ट केलेल्या मॉडेल्सबद्दल मागच्या आठवड्यात तुला संपर्क करायचा प्रयत्न करत होते, पण नाही झाला. तू बिझी होतास बहुदा.
अरे व्वा मस्त्च , सगळ्या
अरे व्वा
मस्त्च , सगळ्या सहभागींचे अन केदारचे अभिनंदन.
उत्साही मायबोलिकरांकडून मायबोलीच्या शिरपेचात या सायकल गटग चा नविनच प्रकारचा तुरा लागला आहे.
अन "पुणे तिथे काय उणे" याचीही खात्री अशा उपक्रमानेच पटते.
(मला कधी येता येणार?
)
वा जबरी झालेली दिसते आहे ही
वा जबरी झालेली दिसते आहे ही राईड.. अभिनंदन सहभागींचे..
सई. आली का नवीन सायकल.. गूड
उत्साही मायबोलिकरांकडून
उत्साही मायबोलिकरांकडून मायबोलीच्या शिरपेचात या सायकल गटग चा नविनच प्रकारचा तुरा लागला आहे.>>> अगदी खरे आणि त्याकरता केदारचे खरोखरच कौतुक आहे. तो नसता तर ही सायकलसफर इतकी मस्त झालीच नसती.
मला चांदणी चौकात पोचायला उशीर झाला होता, तरी न चिडचिड करता, न कंटाळता तितक्याच उत्साहाने सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे हा एक खूपच उच्च प्रकारचा गुण आहे. जो केदार मधे आहे.
सायकल चालवण्यासंदर्भात त्याने सांगीतलेल्या अनेक युक्त्या-प्रयुक्त्या किती उपयुक्त आहेत ह्याचा प्रत्यय त्याची अंमल बजावणी करून पाहताना सगळ्यांनाच आला.
ट्रायथलॉनच्या वेळी आता मी 'नोन डेव्हील'ला सामोरे जाणार असल्यामुळे माझा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढलाय.
केदार, हे सर्व तुझ्यामुळे झाले. पण यापुढे आपल्याला अशा सफरी एकत्र करायच्या आहेत आणि फारच औपचारिक वाटेल म्हणून तुझे आभार मानत नाही.
ह्या शनिवारी सिंहगड सायकलवर
ह्या शनिवारी सिंहगड सायकलवर चढायला कोणी तयार आहे का? (अजून प्रस्ताव विचाराधिन आहे
) असेल तर मग राईड ३ काढू. 
केदार, हे सर्व तुझ्यामुळे झाले. >> अरे काहीही काय भाऊ? तुम्ही लोकं सायकल चालवता, मी फक्त हे बाफ काढतो झालं.
शनिवार - ट्रायथलॉन पुर्व आणि
शनिवार - ट्रायथलॉन पुर्व आणि त्यामुळे आरामाचा दिवस. त्यामुळे क्षमस्व
केदार, ह्याला विनम्रपणा
केदार, ह्याला विनम्रपणा म्हणतात..
नुसत्या बाफपुरतं ते मर्यादित नाही, रोडवरही तू खुप मदत करतोस.
हर्पेनशी अगदी सहमत. मागच्या वेळीसुद्धा केदार खुप धीर देत होता आणि पुन्हा पुन्हा वळून येऊन मागे राहिलेल्यांना प्रोत्साहन देत होता.. त्याचं बोलणंपण एकदम अघळपघळ आहे.. प्रेशर येत नाही त्यामुळे. मी तर म्हणुनच जाऊन आले.
केदार, परवादिवशी तू जर सुरुवातीपासून असतास तर मला गेअर्सचं गणित सोपं गेलं असतं आणि अजून थोडी पुढेपर्यंत येऊ शकले असते. हर्पेनचंही हेच म्हणणं पडलं.
जम्बो, इथे कुणाच्या तरी विपुत
जम्बो, इथे कुणाच्या तरी विपुत तुमचा संपर्क क्र. देऊन ठेवा.. दोन्ही वेळेस काही ना काही कारणाने तुम्हाला संपर्क कसा करायचा प्रश्न पडला होता..
केदार आपण सर्वांनी दोन
केदार आपण सर्वांनी दोन राईडच्यामध्ये भरपूर विश्रांती घ्यावी अशी मी आपल्याला मित्रत्वाची विनंती करतो...
8000ते10000 मध्ये गेअरची चांगली सायकल पुण्यात मिळेल का?कंपनी कोणती? किती गेअर असतात तिला/अथवा असावेत..
थिंकर हो दोन राईड मध्ये दोन
थिंकर हो दोन राईड मध्ये दोन आठवड्यांची विश्रांती आहे. महिन्यातून दोन राईड असेच ठरवले आहे. . इनफॅक्ट मी राईड मध्येही लोकांना परत फिरायला सांगतो. शेवटी तब्येत महत्वाची. देअर इज ऑलवेज नेक्स्ट राईड.
पुढच्या शनवारची राईड केवळ एक दोघेच येऊ शकतात हे माहिती आहे कारण प्रत्येक जण आतातरी सिंहगड चढू नाही शकणार. आणि राहिले माझ्याबाबत तर मी आठवड्याऊन पाच दिवस सायकल चालवतो. ते सुद्धा रोजचे ३० किमी मिनिमम, कधी कधी ४० म्हणून मला स्वतःला त्रास होत नाही.
हे असे स्वतःचे तुणतुणे वाजवावे वाटत नाही पण तुमचा मुद्दा रास्त आहे म्हणून लिहिले.
Pages