मराठी भाषेचं भवितव्य काय?
कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.
कधी कधी वाटतं, असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच नाही ना उरणार?
किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार?
सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय. पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का?
दुर्दैवाने सध्याचं चित्र तितकंसं आश्वासक वाटत नाही.
अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसताहेत.
मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना पहिली. वाटलं, त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा व्हायला हवी. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. पण मला वाटतं थोडा विचार मराठीचासुद्धा करायला हवा आपण. तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर.
कदाचित सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतले जात आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल?
मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. (म्हणजे आता अजिबात होत नाही असं नाही). डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या कथा वाचताना मेडिकल थ्रिलर वाचत असल्याचा भास होतो. मी रॉबिन कुक वाचला नाहीय, पण तो एवढा प्रसिद्ध झाला म्हणजे तोसुद्धा अशाच धाटणीचं लिहित असणार
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात मागे मी काही आयांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येताना पाहिलं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या या मुलांसाठी त्या मराठी पुस्तकं घेऊन जात होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना मराठी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवतात असं ऐकलं. ऐकून काहीसं बरं वाटलं.
ग्रंथ संग्रहालयातल्या कर्मचारी वर्गाकडून कळलं की इंग्रजी माध्यमात मराठी पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलं आहे, त्यामुळे आजकाल मराठी ग्रंथ संग्रहालयात सभासद म्हणून लहान मुलांची संख्या काहीशी वाढली आहे.
मला वाटतं हा एक चांगला मुद्दा आहे. सर्वांनी आपापल्या मुलांना (ज्यांना सध्या नसतील त्यांच्या भविष्यकालीन मुलांना) मराठी वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मराठीची काळजी राजकारण्यांवर टाकून उपयोग नाही.
तेव्हा माझी माबोकरांना कळकळीची विनंती आहे की साऱ्यांनी मराठी संवर्धनासाठी काही ठोस आणि प्रत्येकाला आचरणात आणता येण्यासारखे काही उपाय सुचवावेत.
धन्यवाद मंडळी..
धन्यवाद इब्लिस
धन्यवाद इब्लिस
इब्लुसा लाँग ट्याप ऑन दन्ड
इब्लुसा लाँग ट्याप ऑन दन्ड हे नवीनच हां. अन्यथा ब्याकवर जाऊन न्युमरल मधला पूर्णविराम पहावा लागत असे.
* धागाविषय सोडून अवांतर
* धागाविषय सोडून अवांतर प्रतिसाद. *
हूडा,
ही घ्या अजून थोडी माहिती.
फर्स्ट रो मधील (QWERTY...) अक्षरांवर लाँग टॅपने कॅपिटल, मराठी व इंग्रजी आकड्याचा चॉईस मिळतो. इतर सर्व अक्षरांवर कॅपिटल व स्मॉल चा.
टॅप करून वरच्या दिशेने बोट घासल्यास कॅपिटल अक्षर येते, खालच्या दिशेने नेल्यास पहिल्या ओळीत आकडे येतात. अशा अनेक सोयी अँड्रॉईड कीबोर्डांत आहेत. थोडे खेळून पाहिलेत तर सापडतात.
धण्यवादच....
धण्यवादच....
सद्गुरु दादामहाराज कोंडके
सद्गुरु दादामहाराज कोंडके यांच्या एका कृती त 'एक आलो हुडकाया भलतंच घावलं ' अशी एक ऋचा आहे. तसं झाल इब्लुसराव ::फिदी:
इब्लिस, आंतरभारती अजुन आहे ते
इब्लिस, आंतरभारती अजुन आहे ते माहिती आहे, पण त्यांचे फार काही प्रभावी कार्य चालू आहे असे वाटत नाही. कदाचित असेलही पण ऐकण्यात, वाचनात आलेले नाही.
मी अजुन काही काळाने पुण्यात जाऊन स्थिर झालो की बरेच काही करायचे ठरवत आहे, त्यामधे हा पण एक विषय आहे.
जिज्ञासा, फार चांगला लेख.
जिज्ञासा, फार चांगला लेख.
जिज्ञासा, मस्त पोस्ट. सगळेच
जिज्ञासा, मस्त पोस्ट.
सगळेच मुद्दे पटले असं नाही, पण तुमचा अभ्यास आणि कळकळ पोचली.
प्रतिवाद करायचा तर :
१. प्रश्न अस्तित्त्वात आहे का?
आपलं उत्तर ज्यावर आधारित आहे तो नमुना (सॅम्पल) पुरेसा मोठा आणि पुरेसा प्रातिनिधिक आहे का? मोठी शहरं सोडली तर बहुतांश महाराष्ट्रात मराठीच दैनंदिन आणि कार्यालयीन/कागदोपत्री व्यवहाराचंही साधन आहे असा काही प्रतिसादांत उल्लेख आला आहे. महानगरांत अनेक भाषा आणि संस्कृतींचा समन्वय अपेक्षितच असतो.
२. रशियातील बोलीभाषेचं उदाहरण हृद्य आहे. पण मला तिचा निराळा अन्वय लागतो. भाषेमुळे विचार/राहणी/वर्तन प्रभावित होतात हे अगदी मान्य. (मला पटकन 'मोअर जेन्टील' बोलायला शिकण्यासाठी धडपडणारी एलाइझा डूलिटल आठवली.) पण त्याचा व्यत्यासही तितकाच खरा नाही का? उदा. महानगरातील राहणीसाठी आवश्यक असणारे सगळे शब्द किंवा अभिव्यक्ती जर एखाद्या भाषेत नसतीलच तर ती भाषा त्या राहणीसाठी 'रिलेव्हन्ट' (सुसंगत?) नाहीच आहे. मी स्वतः दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकले. पण मी शास्त्रविषय मराठीतून शिकले असं म्हणताना माझी जीभ चाचरते. काहीतरी संस्कृतसदृश रसायन होतं ते. जीवशास्त्र समजण्याआधी ते शब्द समजण्यासाठी धडपडावं लागत असे. मग ज्ञानाच्या आदानप्रदानाचं साधन हा उद्देश किती सफल झाला?
भूतकाळ समोर आहे आणि भविष्य मागे असं वाटण्यासारखी परिस्थितीच जर बदलत्या जीवनमानात शिल्लक राहिलेली नसेल तर तसं म्हणणारी भाषा टिकावी हा अट्टहास का?
३. आपण काय करू शकतो.
टेड ट्रान्स्लेशनबद्दल वाचून त्यात रस निर्माण झाला आहे. ते किंवा तत्सम काम नक्की करायला आवडेल.
बाकी शुद्ध मराठीत बोलणं, लिहिणं, मुलालाही त्याची गोडी लावणं हे काही आपुलकी आणि काही सवय म्हणून आपोआप होतंच. भाषेचा उद्धार वगैरे करण्याच्या हेतूने नाही. त्याला हौशीने 'पुरणपोळी खाऊन बघ' म्हणते तसंच 'अरे याला ना, मराठीत एक मजेशीर म्हण आहे बरं का, तिचा अर्थ असा-असा आहे' हे सांगितलं जातंच. पण म्हणून 'हल्ली मुलांना पुरणपोळी नको, पिझ्झे हवेत!' म्हणून मला ढसाढसा रडू वगैरे येत नाही, येणार नाही.
हया न्हाणी घरातील अजून काही
हया न्हाणी घरातील अजून काही नागवे
http://www.telegraph.co.uk/news/worldnews/europe/france/7540588/French-g...
बोबडे बोल, विक्रमसिंह, चनस,
बोबडे बोल, विक्रमसिंह, चनस, शिल्पा_के, महेश, झक्की, स्वाती_आंबोळे, सर्वांचे आभार!
महेश, माझ्या डोक्यात अगदी रेल्वेचच उदाहरण आलं होतं अतिरेकाचं उदाहरण म्हणून पण मलाच तो लांबलचक शब्द आठवेना! पण आगगाडी सारखा शब्द असताना उगीच कशाला दुसरे शब्द वापरायचे?
इब्लिस, आंतरभारतीच्या दुव्याबद्दल आभार! ह्याबद्दल माहिती नव्हतं.
स्वाती_आंबोळे, तुमचे प्रतिवाद योग्यच आहेत. २५ मुलांचा नमुना प्रातिनिधिक आहे असं नाही पण शितावरून भाताची परीक्षा करतात ना तसं त्याकडे पाहावं एवढंच म्हणणं आहे. अजून पद्धतशीरपणे संशोधन करून वस्तुस्थिती अधिक नेमकी समजेल हे खरंच.
रशियातील बोलीभाषेचं उदाहरण मराठीला पूर्णपणे लागू पडत नाही. ती भाषा नष्ट होण्याचे मुख्य कारण काळाशी सुसंगती नसणे असे नसून त्या भाषिकांची झपाट्याने कमी होणारी संख्या असे आहे जी मराठीची परिस्थिती नाही. ते उदाहरण भाषा आणि विचारांचा कसा संबंध असतो हे स्पष्ट व्हावे म्हणून होतं. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. भाषेतील शब्दांचा संदर्भ संपला तर ते आपोआप नष्ट होतात. आता जर जाते/खलबत्ता/चूल आदी गोष्टीच नाहीश्या झाल्या तर ते शब्द वापरात राहणार नाहीत. पण जर एखादया भाषेत नव्या नव्या गोष्टींसाठी नवीन शब्द बनत राहिले तर त्या भाषेला मरण नाही कारण ती भाषा प्रवाही आहे. मराठीत ह्या अशा प्रयत्नांची गरज आहे (आणि ती गरज कोणत्याही भाषेला कायम असते. कारण बदलत्या काळाप्रमाणे जसे आचार विचार बदलतात तशी भाषा देखील बदलली पाहिजे.वर फ्रेंच भाषेचे उदाहरण आहे).
TED open translation project ही खरोखर भन्नाट कल्पना आहे. मला स्वतःला अनुवादाचे काम करताना फार मजा आली. ज्यांना ह्यात रस असेल अश्या सर्वांसाठी त्याचा दुवा: http://www.ted.com/OpenTranslationProject
ह्या मराठीच्या प्रश्नाकडे आपण एका मोठ्या प्रश्नाचा एक भाग म्हणून पाहिलं पाहिजे. आणि तो मोठा प्रश्न हा झपाट्याने होणाऱ्या जागतिकीकरणामुळे निर्माण झाला आहे. The world is becoming flat. पूर्वी असलेली सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक विविधता जाऊन एकसारखेपणा येतो आहे. आणि ह्या रेट्यात आपण सगळेच सापडलो आहोत. होतंय ते चांगलं की वाईट हे कळायच्या आत ह्या गोष्टी येऊन आदळत आहेत. ही फक्त भारताची स्थिती आहे असं नाही. पण इथे आपण थोडा संकुचित विचार करू आणि गोष्टी भारतीय/मराठी लोकांपुरत्या मर्यादित ठेवू.
माझं असं ठाम मत आहे की ह्या "मराठी वाचवा" अभियानाचा सूर नेहमी चुकीचा लावला जातो! आत्यंतिक न्यूनगंड किंवा भयगंड ह्या चुकीच्या पायावरहे अभियान उभं केलंय आणि त्याला अभिमानाचे नाव दिले आहे! कधीही पहा कशाविरुद्ध तरी लढल्यासारखा बचावात्मक पवित्रा घेतला जातो: मग कधी ते लुंगीवाले असतात किंवा भय्ये! त्याची गरज नाहीए. कारण त्याने प्रश्न सुटत नाहीत अजून वाढतात. आणि मग ज्या सुज्ञ/सामान्य व्यक्तींना ह्यातील फोलपणा कळतो त्या व्यक्ती ह्या सर्वांपासून दूर राहतात. आपण मराठीतून बोललो, बॉम्बेला मुंबई म्हणालो तर शिवसेनावाले किंवा मनसेवाले ठरू की काय असं वाटून आपण अतिसहीष्णू बनतो.
ह्या दोन्ही टोकांच्या मधला एक योग्य मार्ग आहे. जो बिंबवण्याची गरज आहे. मला माहिती नाही की हे कोण नेता करेल. कारण ह्या मार्गाने कोणाचीच पोळी भाजली जाणार नाही. हा योग्य सूर समाजाच्या पातळीवर जेव्हा सापडेल तेव्हा सापडेल पण आपण सर्व वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर हा सूर साधू शकतो. जशी मी माझ्या मुलांना माझी ऐहिक संपत्ती सोपवेन, योग्य संस्कार देईन तशीच माझी मराठी भाषेची शब्दसंपदादेखील पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. कारण माझी मातृभाषा हा माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहे. एक ओळख आहे जी माझ्या मुलांपर्यंत पोहोचावी म्हणून मी प्रयत्न करेन. बस हा दृष्टीकोन ठेवला तरी बरेच काही साध्य होईल नाही का?
(मराठीच्या अस्तित्वाच्या)
(मराठीच्या अस्तित्वाच्या) प्रश्नाचे मूळ आपल्या झापडबंद जातिव्यवस्थेत आहे. तसेच ते कारागिरांच्या भाषेचा आपल्या भाषेच्या मूळ 'कॉर्पस'मध्ये समावेश न करण्याच्या आपल्या भद्रजनांच्या प्राचीन काळापासूनच्या वृत्तीत आहे. कारागिरीचा संबंध तंत्रज्ञानाशी आहे.. अभिजनांच्या सोवळ्या भाषेत विज्ञान-तंत्रज्ञानाची भूमी रुजण्यापेक्षा पूजा-अर्चा किंवा फार तर वेद-उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके यांचे पठण अशा गोष्टी प्रतिष्ठित राहिल्या..
-- मराठीचं सोवळेपण संपवलं पाहिजे ! (रंगनाथ पठारे.)
(माझ्या माहितीप्रमाणे पठारे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद सरकारकडे नुकताच अहवाल पाठवला आहे.)
एक सूचना: जो शब्द इंग्रजीत
एक सूचना: जो शब्द इंग्रजीत लिहायचा आहे तो देवनागरीत न लिहिता English मधेच लिहा. वाचायला आणि कळायला सोपे जाते.
पिझ्झा - Pizza
कॅपिटल - Capital
चॉईस - choice
सॅम्पल - sample
या पानावरचे काही शब्द....
हा Problem नव्या Browser मधे Typing करताना होतो हे मान्य आहे. पण भाषेविषयी लिहिताना शेजारी Notepad उघडून त्यावर हे शब्द Type करून इथे चिकटवा... नाहीतर Everybody should make sure that Marathi is progressing हेच खरे हे सिध्द होईल..
बाकी चालू द्या.....
(मराठीच्या अस्तित्वाच्या)
(मराठीच्या अस्तित्वाच्या) प्रश्नाचे मूळ आपल्या झापडबंद जातिव्यवस्थेत आहे. तसेच ते कारागिरांच्या भाषेचा आपल्या भाषेच्या मूळ 'कॉर्पस'मध्ये समावेश न करण्याच्या आपल्या भद्रजनांच्या प्राचीन काळापासूनच्या वृत्तीत आहे. कारागिरीचा संबंध तंत्रज्ञानाशी आहे.. अभिजनांच्या सोवळ्या भाषेत विज्ञान-तंत्रज्ञानाची भूमी रुजण्यापेक्षा पूजा-अर्चा किंवा फार तर वेद-उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके यांचे पठण अशा गोष्टी प्रतिष्ठित राहिल्या..
विषय मराठीचा, तर मग हे आचरट विधान कशासाठी??? कारण अभिजनांची सोवळी भाषा, जिच्यात पूजा- अर्चा, वेद उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके इत्यादी जे काय फार फार तर आहे ते सर्व संस्कृतमधेच आहे. तिथे मराठीच्या अस्तित्वाचा अन झापडबंद(?) जातिव्यवस्थ्वेत वगैरे संबंध लावायचे कारणच काय? कोणत्या कारागिरीची (बाराबलुत्यातल्या म्हणतोय मी - कारण वर जातिव्यवस्थेचा उल्लेख केलाय) भाषा मराठीमधे "स्विकारली" गेली नाहीये? अशी कोणती उदाहरणे आहेत? अन ती "भद्रजनांनी" स्विकारली नाहीत हे शेन्डानाबुडखा विधान कशापाई? अर्थात हे प्रश्न विचारुन उपयोगी नाही... कारण जिथे तिथे (मी नाही बर्का) हीच लोक "ब्राह्मण्य" किन्वा" बामणं" किम्वा "ब्राम्हण" किन्वा "भद्रजन" असे उच्चवर्णियांचे उल्लेख करुन समाजात घडणार्या यच्चयावत घटनान्ना त्यान्नाच जबाबदार धरु पहातात व तशीच हल्लीची राजकीय गरज आहे तर या प्रश्नान्ची उत्तरे या अल्पसंख्यिय उच्चवर्णियांना "सरळपणे:" मिळणे कठीण आहे. अहो फार कशाला? खैरलांजीचा नृशंस प्रकार घडला तर तो देखिल "उच्चवर्णीयांमुळेच" घडला असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष म्हणाय्चे/प्रसुत करायचे प्रयत्न झाले तिथे मराठी भाषेची हो काय कथा?
दाखले द्यायचे संस्कृतचे, अन रडायचे मराठी करता, अन शिव्याशाप घालुन घ्यायचे भद्रजनांकरता की खच्चून टाळ्या पडतात अडाणी सामान्यलोकांकडून!.
>>>>> अगदी आंग्लसंपर्कानंतर
>>>>> अगदी आंग्लसंपर्कानंतर सुद्धा इंग्रजीच्या खिडकीचा वापर करून नवे ज्ञान-विज्ञान आपल्या भाषेत आणण्याऐवजी त्यासाठी त्या भाषेत शिरणे आणि आपल्या स्वतःच्या भाषेचे सोवळेपण टिकवणे अशीच आपल्या अभिजनांची चाल राहिली. विविध कारागिरीची कामे करणारे बहुजन या ज्ञान-विज्ञानापासून बव्हंशी वंचितच राहिले. <<<<<<
अन त्याच लेखातील हे एक अत्यन्त निसरडे घसरडे विधान.
त्यातिल अर्धाभाग "भद्रजनांवर दोषारोप" करण्यात घालवलेला, व कारणमिमांसा काय? तर म्हणे अभिजनांची चाल की इन्ग्रजी/अन्य परक्या भाषेतील तंत्रविषयक कारागिरीचे "ज्ञान(?)" मराठीत आणले नाही व बहुजनांना "वंचित" ठेवले.
आता या पुढे हसावे की रडावे? एक उदाहरण घेऊ, कोणता ग्यारेजवाला आजही "इन्ग्रजी"मधे कारागिरी शिकून मग तुमच्या दुचाक्या/चारचाक्या दुरुस्त करतो? योग्य निदान करुन त्यातले पार्ट्स्/भाग बदलतो? कोणत्या कारखान्यातील कामगार/कारागिर "इन्ग्रजीतून" शिजुन मगच ते ते मशिन चालवु शकतो? कोणता न्हावी वा सुतार वा लोहार आजही त्यान्ची त्यान्ची कामे "इन्ग्रजी " शिकुन मगच करु शकतात किन्वा इन्ग्रजी न शिकल्याने अशांची कोणती कामे अडली आहेत? उगा काहीही ठोकायचे म्हणून ठोकून द्यायचे याला काय अर्थ आहे?
पूर्वग्रहदुषित नजरेने एकदा बघायचे ठरले की मग बाकी काही बोलायची गरज उरत नाही याचे चपखल उदाहरण म्हणजे हा आक्षेप आहे.
पण हरकत नाही, या पठारे साहेबांनी बा सरकारला सान्गुन मराठीचे प्रमाणीकरणाचे / व्याकरणाचे वगैरे खूळ रद्द करवुन घ्यावे व ज्याला जसे वाटेल ती बोली मराठी म्हणून खपविण्यास वटहुकूम काढून घ्यावा.
{ आयला तिकडे पुपुवगैरेवर चुक / की चूक बरोबर त्यावर वाद झडतात, बहुधा तिथले व्याकरण तज्ञ देखिल या पठारेन्नी सान्गितलेले ते तथाकथित "भद्रजनच" असावेत ज्यान्च्यामुळे बहुजन कारागिर "वंचित" वगैरे राहिले .... ]
अरेच्च्या, या पठारेसाहेबांना विठ्ठलपंत कुलकर्ण्यान्चे ज्ञानदेव नामक सुपुत्राकडे तर बोट करायचे नाही ना? कारण भद्रजनांपैकी मराठीतील बरेचसे लिखाण यांनीच केले आहे असे स्मरते. तसे असेल तर मात्र पठारेसाहेबांच्या आक्षेपाकडे जरा गांभिर्याने बघावे लागेल बरका, कारण आख्ख्या ज्ञानेश्वरीमधे ज्ञानदेवांनी "उपजिविकेच्या साधनांवर्/कारागिरीवर" काहीच प्रकाश टाकला नाहीये, नै का ? पण ते झाले आठशे वर्षांपूर्वीचे. बाकि गेल्या शतकातले भद्रजन मराठी कादंबर्या तरी नैतर टीकाखोर शतपत्रे वगैरे लिहीण्यात गुंतले होते. काय त्याचा समाजाला उपयोग? नै का?
मराठीचे प्रमाणिकरण
मराठीचे प्रमाणिकरण करण्याऐवजी' संस्कृतकरण' करण्याचे भरपूर प्रयत्न झालेले आहेत. संस्कृतप्रचूर मराठी हीच प्रमाण मराठी असे डांगोरे पिटले गेले,गोरगरीब अडाण्यांच्या भाषेला हलकी समजून वाद घातले गेले ,दिड शतक यावादातच घालवले आणि आता मराठी वाचवा, मराठी वाचवा असा एकच गलका करतायत, कारण मराठी बरोबरच बहुजन इंग्रजी शिकले तर आपल्या पूढे निघून जातील ही सुप्त भिती यापाठी आहे ..स्वार्थाषिवाय कुणी गलका करत नाही...
( एका कारागृहनिवासीमहाजनाने संस्कृतकरणाचे प्रयत्नही करुन बघितले ,परंतु त्यांचा दिनांक चूकला व त्यांची कोर्टाची 'तारीख' पडत गेली...)
आज तारीख कोणती...कीती मस्त वाक्य! वा!
"स्वार्थाशिवाय कुणी गलका करत नाही"या वाक्याचे पेटंट घेतलेले आहे व ते माझ्या नावावर आहे.(हूकमावरुन) ग्रेथिं
अरे, इथे मराठीला पाठिंबा
अरे, इथे मराठीला पाठिंबा देणार्यांनी/ तिच्या भवितव्याची चिंता करणार्यांनी तरी प्रतिसाद लिहिताना शुद्धलेखनाचे नियम पाळा रे!! डोळ्याला खुपतात त्या र्हस्वदीर्घानुस्वाराच्या चुका आणि चुकीचे शब्द. (मराठीच्या एखाद्या बोलीभाषेत लिहायचं असेल तर त्यात लिहा, पण सर्वसाधारण प्रमाण मराठीत लिहित आहात तर किमान चुका होतील याची काळजी घ्या)
एक कळवळून केलेली विनंती!
>>>> स्वार्थाशिवाय कुणी गलका
>>>> स्वार्थाशिवाय कुणी गलका करत नाही" <<<<
बर झाल तुमच्या मुखानेच पेटन्टेड कबुली दिलीत.
"गलका (खरतर गदारोळ)" बहुसन्ख्येने असलेले बहुजन करु शकतील की आत्यन्तिक अल्पसन्ख्य भद्रजन करू शकतील या प्रश्नाचे सरळ सरळ तार्किक उत्तर तुम्ही देणार नाहीतच, पण हा सूर्य व हा जयद्रथ असेही करायची गरज नसल्याने व भद्रजनांविरुद्ध स्वार्थापोटी हरेक प्रश्नात कोण कसा किती किती गदारोळ करतय ते हल्ली हल्ली "झोपलेल्या/सद्वर्तनाच्या गुन्गीतील भद्रजनांनाही" हळू हळू समजू लागल्याने माझ्यापुरता विषय इथेच थांबवतो.
>>>>> पण सर्वसाधारण प्रमाण
>>>>> पण सर्वसाधारण प्रमाण मराठीत लिहित आहात तर किमान चुका होतील याची काळजी घ्या <<<<
वरदातै, तुमची "भद्र" सूचना कळली, कळकळ पोहोचली. (दुर्दैवाने (किन्वा सुदैवाने) माझे बालपणी सहा शाळा त्या देखिल पुणे सोडून ४, त्यामुळे व्याकरण सोडून बोलीभाषांतील बाकी सर्व हेलांची/शब्दांची साथसंगत सरमिसळ माझे बोलण्यात/लिहीण्यात असते व आता ती बदलणे अवघड आहे)
पण जिथवर मी "लिहीत" असतो ते खरे तर लिहीत नसून न दिसणार्या श्रोत्यांपुढे "भाषण देत" असतो, व "मनातल्या मनात" (ही माझी एकेकाळची याहूवरची आयडी बर्का) ज्या पद्द्धतीने शब्दांचे/अक्षरांचे स्वरांचा चढौतार होतो त्याप्रमाणे टाईप करत जातो. जसे एखाद्या कविला र्हस्व दीर्घाचे स्वातंत्र्य असते तसे ते मला का असू नये?
असो.
आधीच्या पोस्टीतील आशय तर कळला ना?
"भद्र - अभद्र" कृपया याचे
"भद्र - अभद्र" कृपया याचे अर्थासहित स्पष्टीकरण कुणी करू शकेल काय?
लिंबूटिंबू, तुम्ही लिहिता ते
लिंबूटिंबू, तुम्ही लिहिता ते इतरांनी वाचण्यासाठी एवढे लक्षात घ्याल का?
तुम्हाला वाट्टेल तसे लिहायचे स्वातंत्र्य आहेच हो. पण इतरांना ते वाचण्या- न वाचण्याचे, गांभीर्याने घेण्या- न घेण्याचे आणि त्यावरून मराठी भाषेसंबंधी तुमच्या कळकळीबद्दल मतनिश्चितीचेही स्वातंत्र्य आहेच.
भदरं अन अभदरं मधला फरक काहीच
भदरं अन अभदरं मधला फरक काहीच नाही. भदरं लिहायचा प्रयत्न करताना लिंबाजीराव लिवतात ते अभदरं.
जिज्ञासा, टीईडी च्या
जिज्ञासा, टीईडी च्या दुव्याबद्दल धन्यवाद.
तिथे जरी पैसे न घेता, स्वेच्छेने काम करता येते, तरी कुठे पैसे घेऊन मराठीत भाषांतर करायचे तरी ती मराठीची सेवा होऊ शकेल का? की फक्त स्वेच्छेनेच करायला पाहिजे.
मी अर्थातच शक्यतो लगेच टी ई डी त नाव नोंदवणार आहे, मला मराठीचे प्रेम आहे म्हणून,
जिज्ञासा मायबोलीवर मायबोली
जिज्ञासा
मायबोलीवर मायबोली बद्दल मी वाचलेले सर्वोत्कृष्ट लेखन.>>>> अगदी बरोबर. खूप छान जिज्ञासा. परत परत वाचावे आणि मनात साठवावे इतके सहज सुंदर लिहिले आहे.
ग्रेथि, सावरकरांच्या ज्ञान
ग्रेथि, सावरकरांच्या ज्ञान आणि प्रतिभेला काही फरक पडत नाही तुम्ही जे अतिशय क्षुद्र विधान केले आहे त्यमुळे.
उगाच वाद चालू होईल असे करू नका.
महेश | 23 February, 2014 -
महेश | 23 February, 2014 - 05:12
इब्लिस, आंतरभारती अजुन आहे ते माहिती आहे, पण त्यांचे फार काही प्रभावी कार्य चालू आहे असे वाटत नाही. कदाचित असेलही पण ऐकण्यात, वाचनात आलेले नाही.
मी अजुन काही काळाने पुण्यात जाऊन स्थिर झालो की बरेच काही करायचे ठरवत आहे, त्यामधे हा पण एक विषय आहे. >>>>>>
महेश, तुमी पुण्यास गेल्यावर (मराठी संवर्धनाच्या दृष्टीने) जे करायचं ठरवलं आहे, त्या विषयी माहित करून घ्यायला आवडेल. हवं तर एखादा नवा धागा सुरु करा तुमच्या मनातल्या योजनांसंदर्भात ..
'शेयर केले', 'एंजॉय केले' असे
'शेयर केले', 'एंजॉय केले' असे शब्द वापरणे टाळा बरे मायबोलीकरांनो.
बोबो, आंतरजालावर लिखाण, अनेक
बोबो, आंतरजालावर लिखाण, अनेक प्रकारचे अनुवाद, चरित्र लेखन, इ. उपक्रम व्यक्तिगत पातळीवर आणि संस्था पातळीवर काय करता येईल हे नंतर ठरवावे लागेल.
जगावर (बुद्धीने) राज्य करा
जगावर (बुद्धीने) राज्य करा आधी. मग आपोआप तुमच्या भाषेला भविष्य सापडेल.
एरव्ही इंग्रजाने जगावर राज्य केले नसते तर शेक्स्पिअर ला काळ्या कुत्र्याने विचारले नसते!!
>>जगावर (बुद्धीने) राज्य करा
>>जगावर (बुद्धीने) राज्य करा आधी
हे अगदी खरे आहे, टोकियोमधे जिथे भारतीय वंशाचे लोक जास्त राहतात, त्या भागातल्या मॉलसदृश दुकानांमधे भारतीय वस्तुंचा विभाग सुरू करण्यात आला असुन हिंदी मधे पाट्या तसेच हिंदीत बोलणारे विक्रेते असे सुरू झाले आहे.
<माझं असं ठाम मत आहे की ह्या
<माझं असं ठाम मत आहे की ह्या "मराठी वाचवा" अभियानाचा सूर नेहमी चुकीचा लावला जातो! आत्यंतिक न्यूनगंड किंवा भयगंड ह्या चुकीच्या पायावरहे अभियान उभं केलंय आणि त्याला अभिमानाचे नाव दिले आहे! कधीही पहा कशाविरुद्ध तरी लढल्यासारखा बचावात्मक पवित्रा घेतला जातो: मग कधी ते लुंगीवाले असतात किंवा भय्ये! त्याची गरज नाहीए. कारण त्याने प्रश्न सुटत नाहीत अजून वाढतात. आणि मग ज्या सुज्ञ/सामान्य व्यक्तींना ह्यातील फोलपणा कळतो त्या व्यक्ती ह्या सर्वांपासून दूर राहतात. आपण मराठीतून बोललो, बॉम्बेला मुंबई म्हणालो तर शिवसेनावाले किंवा मनसेवाले ठरू की काय असं वाटून आपण अतिसहीष्णू बनतो.>
अगदी नेमके निरीक्षण आणि विश्लेषण. असल्या तथाकथित लढ्यांनी मराठीचे नुकसानच केले आहे. संत-समाजसुधारकांच्या महाराष्ट्राची ओळख भलतीच काही झाली आहे. अमराठी लोकांवर मराठीची सक्ती करण्यापेक्षा ती मराठी भाषकांवरच(!) केली तर बरेच काही साध्य होईल.
Mumbai, which was known as Bimbay during xxxx असे वाक्य इंग्रजी वृत्तपत्रांत प्रकाशित होणार्या अनेक लेखांत वाचून हा त्या अनावश्यक आक्रमकतेचा आक्षेप घेता येणार नाही असा निषेध आहे असे वाटत राहते.
Pages