मराठी भाषेचं भवितव्य काय?
कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.
कधी कधी वाटतं, असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच नाही ना उरणार?
किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार?
सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय. पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का?
दुर्दैवाने सध्याचं चित्र तितकंसं आश्वासक वाटत नाही.
अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसताहेत.
मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना पहिली. वाटलं, त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा व्हायला हवी. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. पण मला वाटतं थोडा विचार मराठीचासुद्धा करायला हवा आपण. तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर.
कदाचित सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतले जात आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल?
मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. (म्हणजे आता अजिबात होत नाही असं नाही). डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या कथा वाचताना मेडिकल थ्रिलर वाचत असल्याचा भास होतो. मी रॉबिन कुक वाचला नाहीय, पण तो एवढा प्रसिद्ध झाला म्हणजे तोसुद्धा अशाच धाटणीचं लिहित असणार
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात मागे मी काही आयांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येताना पाहिलं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या या मुलांसाठी त्या मराठी पुस्तकं घेऊन जात होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना मराठी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवतात असं ऐकलं. ऐकून काहीसं बरं वाटलं.
ग्रंथ संग्रहालयातल्या कर्मचारी वर्गाकडून कळलं की इंग्रजी माध्यमात मराठी पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलं आहे, त्यामुळे आजकाल मराठी ग्रंथ संग्रहालयात सभासद म्हणून लहान मुलांची संख्या काहीशी वाढली आहे.
मला वाटतं हा एक चांगला मुद्दा आहे. सर्वांनी आपापल्या मुलांना (ज्यांना सध्या नसतील त्यांच्या भविष्यकालीन मुलांना) मराठी वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मराठीची काळजी राजकारण्यांवर टाकून उपयोग नाही.
तेव्हा माझी माबोकरांना कळकळीची विनंती आहे की साऱ्यांनी मराठी संवर्धनासाठी काही ठोस आणि प्रत्येकाला आचरणात आणता येण्यासारखे काही उपाय सुचवावेत.
धन्यवाद मंडळी..
>>>>> 'शेयर केले', 'एंजॉय
>>>>> 'शेयर केले', 'एंजॉय केले' असे शब्द वापरणे टाळा बरे मायबोलीकरांनो. स्मित <<<<< अनुमोदन
खूप पूर्वी झक्की अन बर्याचदा मी देखिल , आम्ही आपले येडपटासारखे "रोमन मधुन लिहू नका, देवनागरीमधे लिहा" असा धोषा लावायचो. हल्ली त्याची गरज पडत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण आता झक्कीसाहेबांनी हे मनावर घ्यायला हवे की दिसला इंग्रजी शब्द की द्या एक मराठी शब्दाचा पर्याय, अन (शाब्दिक) छडीच्या धाकावर करवुन घ्या.
भरतराव, तुमची वरील पोस्ट तद्दन राजकारणी थाटाची वाटते. अन भयगंडाचे बोलाल, तर लहान मुलाला देखिल बागुलबुवाची भिती दाखविणे आम्ही कुणीच थांबवित नाही तर मोठ्या माणसांना अमुक तमुक करा तर तुमचे भले होईल हे सांगताना (भले होण्याय्चा विरुद्धार्थी शब्द कोणता?) तुमचे नुकसान कसे/कुठे/कुणाकडून होणारे हे सांगितले तर त्यास भिती दाखविणे असे कसे म्हणता येईल? असो.
पुणेरी लिंब्या , तो स्वारगेट
पुणेरी लिंब्या ,
तो स्वारगेट हा कॉकटेल शब्द आधी बदल बाबा. स्वार हा मराठी शब्द आणि गेट हा इंग्रजी शब्द....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>> तो स्वारगेट हा धेडगुजरी
>>>>> तो स्वारगेट हा धेडगुजरी शब्द आधी बदल बाबा. स्वार हा मराठी शब्द आणि गेट हा इंग्रजी शब्द.... <<<
अहो बदलायला कशाला हवाय? काढूनच टाकायला हवाय तो शब्द.
त्या ऐवजी पद्मावती (गेलाबाजार "लक्ष्मिनारायण" ही चालेल) वापरला तर चालू शकेल अजुन कुणाला आठवत असतील तर सान्गा या लगोला.
लगो, धेगु हा शब्द अशा अर्थाने
लगो, धेगु हा शब्द अशा अर्थाने वापरता येणार नाही, अॅट्रॉसिटी अॅक्ट की कायसेसे असते त्या अंतर्गत.
अशा रोखाची बातमी वाचल्याचे स्मरते आहे. पहा बुवा (सॉरी बाई) विचार करून.
मी तो शब्द अनवधानाने वापरला.
मी तो शब्द अनवधानाने वापरला. माफी असावी.
तो शब्द बदलला आहे.
स्वारद्वार हा पर्यायी शब्द
स्वारद्वार हा पर्यायी शब्द सूचवतो.
झक्कीसाहेबांनी हे मनावर
झक्कीसाहेबांनी हे मनावर घ्यायला हवे की दिसला इंग्रजी शब्द की द्या एक मराठी शब्दाचा पर्याय,
अहो असे दुसर्या कुणावर काम सोपवायचे तर निदान ज्यांनी मराठीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे, अश्या तरुण रक्ताच्या लोकांना सांगा.
मी आपला म्हातारा आहे, आजकाल च्या मराठीपेक्षा माझ्या बोलण्यात इंग्रजीचे शब्द कमी येतात, पण माझा भाषेचा अभ्यास नाही. उलट शाळेत काय शिकलो, व्याकरण, इ. आता काही आठवत नाही. आणि आजकाल त्याची गरजहि नाही पडत. र्हस्व, दीर्घ, कसेहि लिहीले तरी चालतं. (आता हा त वरचा अनुस्वार तरी आ़जकालच्या नियमांप्रमाणे बरोबर आहे की चूक ते मला माहितहि नाही!)
आहेत असे इथे अनेक लोक ज्यांनी मराठी भाषेचा बराच अभ्यास केला आहे. पण ते कोण हे मी सांगणे म्हणजे ठार बहिर्या माणसाने कुणा गायकाचा आवाज चांगला हे सांगण्यासारखे होईल.
बस करो झक्की, अब रुलाओगे
बस करो झक्की,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अब रुलाओगे क्या?
...
रच्याकने, ते टेडवर ट्रान्सलेट करायला जाणार होते ते झक्की तुम्हीच का?
हो हो जातो ना! एकदा मराठी
हो हो जातो ना!
एकदा मराठी टिकणार का नाही हे नक्की ठरले इथे म्हणजे मला पण ठरवता येईल की माझी तिथे काही खरेच गरज आहे का? मायबोलीवर जसे कुणीहि येऊन कशाबद्दलहि काहीहि लिहीतात तसे तिथे जाऊन कशाचेहि भाषांतर कसेहि करायचे असे करू नये असे मला वाटते. शिवाय त्यांनी पैसे दिले व मी घेतले तर ती मराठीची सेवा होत नाही असे इथले लोक म्हणतील. त्यात नैतिक दृष्ट्या कमीपणा येतो.
बरं नाही घेतले पैसे तर इतर लोक म्हणतील, मराठी माणसाला व्यवहार कळत नाही, हाती आलेला पैसा घालवला, बावळट!!
म्हणजे इथले लोक काय म्हणतात इकडे लक्ष द्यायचे तर स्वस्थ बसून रहावे, निदान आपल्याला तरी आराम!
ग्रेटथिंकर, स्वारद्व्रार हा
ग्रेटथिंकर,
स्वारद्व्रार हा शब्द योग्य आहे.
पण पेशव्यांचा इतिहास पाहिला तर स्वैरद्वार हा शब्द अधिक योग्य ठरेल.
खुद्द मराठीच्या
खुद्द मराठीच्या प्राध्यापकानेच हा लेख लिहीला असल्याने त्यात थोडेसे तरी तथ्य असावेचः
मराठी भाषा दिवस आणि भाषाभ्रम
- डॉ. प्रकाश परब
सौजन्यः लोकसत्ता.कॉम
http://www.loksatta.com/vishesh-news/marathi-language-day-and-language-i...
>>>> त्यात थोडेसे तरी तथ्य
>>>> त्यात थोडेसे तरी तथ्य असावेचः <<<<< LOL
नै, मी लिहिल तर त्यात तोळामासाही तथ्य नाही असे वाटते ते जौद्यात. पण पूर्ण तथ्य कुणी लेख लिहीला की असेल असे वाटते माबोकरांना?
असो. त्या लेखात नमनालाच अचुक मर्मभेद (भाण्डाफोड नव्हे, हल्ली ना फोडातोडीच्याच बाबी शब्दप्रयोगात देखिल उतरल्यात) केलाय, तेवढा पुढे उद्धृत करतोय. बाकी लेख लिन्क वर जाऊन वाचावा.
>>>> इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे. अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे.' अर्थात, हे आपण बोलून दाखवत नाही. कारण तसे करणे औचित्याला धरून नाही. किंवा पोपट मेला हे सांगण्याचे धर्य आपणापाशी नाही. त्यापेक्षा एखादा दिवस मराठीच्या (न करायच्या) विकासासाठी एकमेकांना शुभेच्छा देणे हे आपल्या उत्सवप्रियतेला व दांभिकपणाला शोभणारे आहे. <<<<
दुर्दैवाने इतके रोखठोक वास्तव आत्मावलोक करण्या ऐवजी काही जण नेहेमीप्रमाणेच "भद्रजनांकडे" याही गोष्टीचा दोषारोप ठेवूत बहुजनांकडून टाळ्या पिटवुन घेणारी वाक्ये उच्चारण्यातच समाधान मानताहेत. हे सर्वाधिक दुर्दैव आहे.
ही चर्चा कुठे आणि माबोवरील
ही चर्चा कुठे आणि माबोवरील आपली चर्चा कुठे ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे असे अभ्यासू लोक बहुसंख्येने माबोवर का येत नसावेत असा विचार केला आणि आपोआपच उत्तरे पण मिळाली.
http://www.mr.upakram.org/node/1509
लिंबूदा - अवश्य वाचा पुर्ण चर्चा
अरे वा! ओसाड गांवात पोहोचलात
अरे वा!
ओसाड गांवात पोहोचलात की तुम्ही महेस!
ती चर्चा इथल्या चर्चेतल्या एका प्रतिसादास बाहेर काढून केलेली आहे. अतीशय सुंदर चर्चा तिथे आहेत, मी ते संपूर्ण संस्थळ वाचून काढले आहे.
असो.
थोडा अधिक विचार केलात तर ओसाड गांव नांव का पडले तेही लक्षात येईल.
वाह फारच उद्बोधक चर्चा !
वाह फारच उद्बोधक चर्चा !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
होय. तिथल्या काही चर्चांत
होय.
तिथल्या काही चर्चांत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभलेले आहे. कारण संस्थळ वाचनमात्र व्हायच्या थोडा आधीच मी तिथला सदस्य झालो होतो.
>>तिथल्या काही चर्चांत सहभागी
>>तिथल्या काही चर्चांत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभलेले आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ह्म्म मग काय झाले त्या चर्चांचे पुढे ?
फारच उद्बोधक धागे आणि चर्चा,
फारच उद्बोधक धागे आणि चर्चा, महेश, इब्लिस…
महेश, ओसाड गांव. इब्लिस अशी
महेश,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओसाड गांव.
इब्लिस अशी आयडी तिथे फक्त मंदार कात्रे यांच्या धाग्यांसाठी आहे. इतरत्र, तिथे माझी आयडी वेगळी आहे
बोबो, हाऽय!
बोबो,![103.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35881/103.gif)
हाऽय!
हाऽय! .. हाऽय!
हाऽय! .. हाऽय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< limbutimbu | 27 February,
<< limbutimbu | 27 February, 2014 - 07:54
त्या लेखात नमनालाच अचुक मर्मभेद (भाण्डाफोड नव्हे, हल्ली ना फोडातोडीच्याच बाबी शब्दप्रयोगात देखिल उतरल्यात) केलाय, तेवढा पुढे उद्धृत करतोय. बाकी लेख लिन्क वर जाऊन वाचावा.
>>>> इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे. अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे.' अर्थात, हे आपण बोलून दाखवत नाही. कारण तसे करणे औचित्याला धरून नाही. किंवा पोपट मेला हे सांगण्याचे धर्य आपणापाशी नाही. त्यापेक्षा एखादा दिवस मराठीच्या (न करायच्या) विकासासाठी एकमेकांना शुभेच्छा देणे हे आपल्या उत्सवप्रियतेला व दांभिकपणाला शोभणारे आहे. <<<<
>>
लिम्बु टिंबू - पटण्यासारखा मुद्दा…
योग - लेख चांगला आहे.
मराठी माणसाच्या मुद्द्यांवर
मराठी माणसाच्या मुद्द्यांवर स्थापन करण्यात आलेल्या शिवसेनेची ज्या राज्यात आणि महापालिकेत सत्ता आहे तिथे मराठी भाषेत शालेय शिक्षण झालं म्हणून नोकरी नाकारण्यात आलीये.मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये एकूण २५२ शिक्षकांची निवड करण्यात आली होती, मात्र आता मराठीत शिक्षण झाल्याचं कारण देत १०२ शिक्षकांना नियुक्ती नाकारण्यात आल्याचा आरोप केला जातोय. केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं नसल्याने तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही, असं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोप त्यांनी केलाय. विशेष म्हणजे या डावलण्यात आलेल्या 102 शिक्षकांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झालं आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-rejects-job-bec...
Pages