जलरंग गटग ठाणे : २३-फेब्रु-२०१४

Submitted by गजानन on 23 February, 2014 - 10:15

अजय यांनी मायबोलीवर ऑनलाईन जलरंग कार्यशाळेची संकल्पना मांडली आणि जलरंगांत रुची असणार्‍या अनेक मायबोलीकरांनी ती उचलून धरली. लगेचच अगदी पूर्वतयारी काय असावी आणि ती कशी करावी इथून सुरुवात झालेल्या आणि जलरंगांचे मूलभूत तंत्र सोप्या शब्दांत सोदाहरण उलगडून दाखवणार्‍या या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला.

यातल्या रेखाटन, बेसिक वॉशेस, हे ट्राय करताना आमच्यासारख्या नवशिक्या उत्साहितांना ते एकट्याने करण्यापेक्षा गृपमध्ये केल्यास एकमेकांची स्केच करण्याची, रंग बनवण्याची, वॉशेस करण्याची पद्धत जवळून बघता येईल आणि त्यातून शिकायला मिळेल असे वाटू लागले.

प्रथम इंद्राने मुलुंड बाफवर जलरंग 'क्लासा'चे सुतोवाच केले आणि ते 'नेटा'ने उचलून धरले. मग या गटगचे ठरू लागले आणि शेवटी मुलुंड बाफवरच्या मंडळींनी जलरंग गटग करायचेच यावर शिक्कामोर्तब झाले!

.
.
.
नीलूने आमचे म्होरकेपण मोठ्या मनाने स्वीकारले.
(नाहीतर या ओढाळ वासरांनी कोणते रंग उधळले असते कोणास ठाऊक! Lol )

गटगची तारीख तेवीस ठरली. ललिताचा मुलगा आदित्य हाही भारी चित्रं चितारतो. म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याला आग्रह करून बोलावले. दुसर्‍या दिवशी प्रॅक्टीकल्स परिक्षा असूनही तो यायला तयार झाला. अश्विनीच्या घरी गटग करायचे ठरले. आणि त्यानुसार आज आम्ही म्हणजे मी, इंद्रा, ललिता, आदित्य, माधव, पूर्वा, अश्विनी आणि नीलू जमलो आणि धमाल आली. सोबत माझी मुलगी आरोही आणि इंद्राचा मुलगा श्रीशैल ही मिनी वासरंही होती. Wink

खूप मजा आली. एकमेकांची स्केचेस, वॉशेस बघताना, त्यावर आपली मत, शंका यांची देवाणघेवाण करताना खूप धमाल आली.

या गटगत आम्ही रंगवलेली ही चित्रे -
(पुन्हा एकदा, नीलू आणि आदित्य सोडल्यास आम्ही सगळेच बालवाडीतले उत्साही कलाकार आहोत. त्यामुळे चित्रेही तशीच आहेत. Happy )

पूर्वा:
आदित्यः (अपूर्ण)
अश्विनी:
नीलू: (अपूर्ण)
इंद्रा: (अपूर्ण)
गजानन:

आणि लास्ट बट नॉट लीस्ट..... Wink
(Oil pastels)

श्रीशैलः (हे जीवदानी देवीचे मंदिर आहे बरं! )
आरोही :

अश्विनी, बिग थँक्यू टू यू! आमच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेपासून थेट अगदी रंगासाठी पाण्याची जिथल्या तिथे व्यवस्था केलीस म्हणून. (हो, माहीत आहे, तू काय म्हणणार आहेस ते.)

अजयची ही कार्यशाळा फॉलो करणार्‍यांमध्ये जसे आधीपासून जलरंगात काम करणारे अनुभवी लोक आहेत तसेच माझ्यासारखे अनेकजण कसलाच अनुभव नसलेले पण जलरंगातील चित्रांचे चाहते असलेलेही आहेत. जलरंगातल्या जादूचे तंत्र आणि मंत्र, इतके सुंदर चित्र आकाराला येतानाच्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या प्रक्रिया जाणून घेण्याची संधी या कार्यशाळेमुळे मिळतेय. एवढ्या मोठ्या रेंजमधल्या लोकांच्या शंकांचे निरसन आणि तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार्‍या अजयचे मानावे तेव्हढे धन्यवाद कमीच. या कार्यशाळेने मायबोलीवर उत्साहाचे वातावरण निर्माण केले यात वादच नाही.

अजय, आम्हाला यात किती प्रगती साधता येईल हे माहीत नाही, पण तुमच्या या उपक्रमामुळे आमची जलरंगातल्या चित्रांचा आस्वाद घेण्याची नजर नक्कीच परिपक्व होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मजा आली. सगळे तन्मयतेने आपापले डेस्क्स, पेपर, रंग ह्यावर लक्ष केंद्रित करुन रंगकाम करत होते. हॉलभर रंगकामाचं साहित्य पसरलेलं होतं. अगदी मस्त वातावरण निर्मिती झाली होती. शाळेत असतानाही एवढं सिन्सियरली केलं नसेल.

आदित्य आणि नीलू तर सहीच (दिसतंच आहे वरच्या चित्रांवरुन). माधवची लेक पुर्वाही छानच काढते. आदित्य आणि पुर्वाची परिक्षा तोंडावर आली असूनही त्यांनी ह्यासाठी वेळ दिला म्हणजे किती चित्रकलेचं प्रेम आहे बघा! Happy आणि त्यांच्या आई/बाबांनी त्यांना प्रोत्साहन दिलं हे देखिल क्रेडिटेबल आहेच.

बच्चे कंपनीही अज्जिबात कंटाळली नाही. आमच्यापेक्षाही सिन्सियरली चित्र काढत होती. आमचाच गोंगाट चालू होता आणि मुलांचा आवाजच नाही.

सह्ही! Happy सगळ्यांचीच चित्रं मस्त आहेत, नीलू आणि आदित्य ह्यांच्या चित्रांना २ मार्क्स अधिक Happy फारच सुरेख जमली आहेत.

बच्चे मंडळी, कीपिटप!

अजय, मी तर कितीतरी वर्षांनी पुन्हा हातात रंग घेतलेत ह्या तुम्ही सुरु केलेल्या कार्यशाळेच्या निमित्ताने. हाताला लागलेल्या रंगांचा आनंद पुन्हा अनुभवायला देण्याचं श्रेय तुम्हाला आणि अल्पनाला Happy

भारीच एकदम.

आदित्य आणि पुर्वा तुम्हा दोघांचही खास कौतूक.

अजय, आम्हाला यात किती प्रगती साधता येईल हे माहीत नाही, पण तुमच्या या उपक्रमामुळे आमची जलरंगातल्या चित्रांचा आस्वाद घेण्याची नजर नक्कीच परिपक्व होईल.>>> हजारो मोदक

किती मस्त कल्पना!! मायबोली वेगवेगळी गटगं करण्यात प्रसिद्ध होणार आता. सायकल गटग, जलरंग गटगं! Happy

सगळ्यांचीच चित्रं सुंदर आली आहेत! नीलू व आदित्य यांना पहिला नंबर विभागून.. Happy

सगळ्यांचीच चित्रं सुंदर आली आहेत! नीलू व आदित्य यांना पहिला नंबर विभागून..>>>बस्के +१

मस्त झालयं गटग. नक्कीच मजा आली असणार.

सुरेख चित्रं आहेत. जलरंग गटग ची कल्पना पण अफलातून. सगळ्यांचा उत्साह जबरी आहे.
मला पूर्वा चं चित्र पण खूप आवडलं आदित्य आणि नीलू बरोबर.

पहिला स्क्रीन-शॉट भारी! Lol
(ते माझ्या नावाच्या आधी Hg काय आहे? :खोखो:)

काल खूप मजा आली. मी आणि माधव प्रेक्षक होतो. मला जलरंगकाम जमत नाही, पण रंगपेट्या, ट्यूबा, ब्रश, पाणी, कागद, अर्धवट चित्रं, रंगलेली फडकी, पेन्सिल, खोडरबरं - हा पसारा फार आवडतो. चित्र काढणार्‍या, रंगवणार्‍या लोकांशेजारी बसून हळूहळू आपलं रूप धारण करत जाणारं चित्र पहायला खूप आवडतं. म्हणून केवळ मी काल गेले होते.
आशूच्या रंगाच्या ट्यूबांचा बॉक्स, पूर्वाचा रंगीत पेन्सिलींचा बॉक्स, इंद्रानं आणलेले ब्रश, बच्चा-पार्टीचे रंगीत खडू हे सगळं हातात घेऊन निरखताना मला खूप मजा आली.

शिवाय, महत्त्वाचं म्हणजे, या गटगच्या निमित्ताने तब्बल ५ वर्षांनी आदित्यनं ब्रश हातात घेतला. घरी आल्यावर रात्री दीड-दोन तास बसून नेटानं चित्र पूर्ण केलं.

Copy of 20140223_215600.jpg

लले, जबरदस्त आलंय आदित्यचं चित्र Happy तुझा नवरा आणि लेक असे दोघेही चित्रकार असल्यावर तुला लागण होणं स्वाभाविक आहे. एक दिवस तूही हात चालवशील ह्या सामानावर Happy

काल खूप खूप धमाल आली. शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना जसा उत्साह असायचा तसा सगळ्यांचा उत्साह होता. नवे कोरे साहीत्य त्या वातावरणात भरच टाकत होते. सरस्वती पूजनाने नविन अभ्यास सुरू करण्याची प्रथा आहे. पण काल मात्र अन्नपूर्णेच्या पूजनाने गटग सुरू झाले. खरं तर अन्नपूर्णा अश्विनीच्या रुपात अवतरली होती असे म्हणणे जास्त बरोबर ठरेल. अन्नपूर्णायै नमो नमः ||

'कागद ' हा या माध्यमाचा कळीचा मुद्दा आहे हे काल चांगलेच लक्षात आले. 'हँडमेड पेपर' मी पण आणला होता आणि अश्विअनीने पण. पण आम्ही आणलेल्या कागदावर रंग बसायलाच तयार नव्हता त्यामुळे पूर्वा थोडी खट्टू झाली होती. मग अश्विनीकडचा कागद घेऊन तिने काम सुरू केले. अजय, जलरंगासाठी , ३०० GSM+, कोल्ड प्रेस्ड यातले एकही विशेषण दुकानदारांच्या डोक्यात प्रकाश पाडत नाहीये. त्यांना समजतील असे आणखी काही शब्द असतील तर सांग. ठाणे, मुंबई. पुणे इथे ठरावीक दुकाने तरी आहेत. पण इतर भागात रहाणार्‍या लोकांची जरा अडचण होणार आहे म्हणून विचारतोय.

मग सगळ्यांनी कामाला सुरुवात केली - अगदी पिल्लांसकट. मी आणि ललीने पण सुपर्विजनचे काम केले Wink आमच्या देखरेखीशिवाय इतकी उत्तम चित्र-निर्मिती शक्य तरी होती का? Proud

प्रत्येक कलाकाराची कामाची पद्धत किती वेगवेगळी असते याचा मस्त अनुभव घेता आला मला. पूर्वा, नीलू आणि गजा या तिघांची चित्रे आकार घेतांना बघत होतो मी. पूर्वा आणि गजा नक्की काय काढताहेत याचा अंदाज सुरुवातीपासून येत होता. पण निलूच्या कागदावर मात्र अनेक रंग अगम्य आकारात उमटत होते. यातून चित्र कसे बनणार? हे म्या पामराला जराही कळत नव्हते. पण मग तिने काही तरी जादू केली आणि मग सुंदर चित्र दिसू लागले.

श्रीशैल आणि आरोही प्रचंड गोड आहेत. वर गजाने जे चित्र टाकले आहे ते एका बिल्डींगचे आहे. श्रीशैलने मस्त रंगीबिरंगी रंगवले होते. बिल्डींगच्यावर जो आयत दिसतोय तो नावाचा बोर्ड आहे. नाव काय द्यायचे हा प्रश्न निघेपर्यंत तरी अनुत्तरीतच होता. त्याच्या आधी त्याने एक मस्त चित्र काढले होते. त्यात एक मोठे झाड, मैदानात क्रिकेट खेळणारी मुले, मागे डोंगर त्यावर जिवदानीचे देऊळ, मध्ये एक गुंफा असे सगळे काढले होते. इंद्रा, ते चित्र पण टाक ना इथे.

'बाबा आपल्याकडे लक्षच देत नाहीये' म्हणून आरोही थोडीशी कंटाळली होती. प मग जेंव्हा वरची रांगोळी रंगवून झाली आणि त्यावर बाबा very good म्हणाला तेंव्हा मुलीचा चेहरा कसला खुलला होता! एकदम कोडॅक क्षण होता तो.

मग आदित्य आणि त्याचा बाबाची चित्र बघीतली. आदित्य खूप प्रयोगशील आहे. त्याने अनेक वेगवेगळे प्रकार हाताळले आहेत रंगकामाचे. त्याच्या बाबाने काढलेली पोर्ट्रेट्स तर अफलातूनच आहेत.

गटगची सांगता पण अन्नपूर्णेच्या प्रसादानेच झाली. किती उत्साह आहे अश्विनीकडे! एवढी सगळ्यांची उस्तवार केली पण तिच्या कपाळावर एक आठी नव्हती. __/\__

अजय, तुझ्यामुळे आम्हाला खूप आनंद घेता येतोय. गजाने म्हटल्या प्रमाणे चित्र नाही काढता आली तरी या कलेचा आस्वाद घ्यायला शिकतोय आम्ही. त्याकरता तुझे खूप आभार.

हो, ते सांगायचं राहिलंच... ललिताचे मिस्टर अजय यांची पेन्सिल स्केचेस आणि बॉल-पॉईंट पेनानं केलेली स्केचेच बघणं ही मेजवानी होती! विशेषतः बॉल-पॉईंटची स्केचेच केवळ अफाट! एक न् एक स्केच तोंडात बोट घालायला लावणारे. या गटगचा तो एक फायदा झाला.

'बाबा आपल्याकडे लक्षच देत नाहीये' म्हणून आरोही थोडीशी कंटाळली होती. <<< माधव, माझ्या चित्रावर डाव्या कडेला गुलाबी ऑईल पेस्टलची खोडता न येणारी एक रेघ हळूच ओढून तिने माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. Biggrin त्या दोघांना शिताफीने गुंतवून ठेवण्यासाठी तुम्हाला धन्यवाद.

वा, वा, वा, वा ..... सर्वांचेच अभिनंदन
आणि सविस्तर वृत्तांतासाठी - माधव यांना अनेक धन्स ....
खूपच क्रिएटिव्हीटी, उत्साह आहे बुवा सगळ्यांकडेच ....... फार फार मस्त वाटले हे वाचून .....
अन्नपूर्णा देवींना विनम्र वंदन ..... Happy

गजा Lol

गजाच्या चित्रात डावीकडे दिव्याच्या खांबाजवळ अजूनही ती रेष दिसते आहे. तिचं मी 'खांबात अडकलेला पतंगाचा मांजा' असं नामकरण केलेलं आहे. Happy

Pages