अजय यांनी मायबोलीवर ऑनलाईन जलरंग कार्यशाळेची संकल्पना मांडली आणि जलरंगांत रुची असणार्या अनेक मायबोलीकरांनी ती उचलून धरली. लगेचच अगदी पूर्वतयारी काय असावी आणि ती कशी करावी इथून सुरुवात झालेल्या आणि जलरंगांचे मूलभूत तंत्र सोप्या शब्दांत सोदाहरण उलगडून दाखवणार्या या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला.
यातल्या रेखाटन, बेसिक वॉशेस, हे ट्राय करताना आमच्यासारख्या नवशिक्या उत्साहितांना ते एकट्याने करण्यापेक्षा गृपमध्ये केल्यास एकमेकांची स्केच करण्याची, रंग बनवण्याची, वॉशेस करण्याची पद्धत जवळून बघता येईल आणि त्यातून शिकायला मिळेल असे वाटू लागले.
प्रथम इंद्राने मुलुंड बाफवर जलरंग 'क्लासा'चे सुतोवाच केले आणि ते 'नेटा'ने उचलून धरले. मग या गटगचे ठरू लागले आणि शेवटी मुलुंड बाफवरच्या मंडळींनी जलरंग गटग करायचेच यावर शिक्कामोर्तब झाले!
.
.
.
नीलूने आमचे म्होरकेपण मोठ्या मनाने स्वीकारले.
(नाहीतर या ओढाळ वासरांनी कोणते रंग उधळले असते कोणास ठाऊक! )
गटगची तारीख तेवीस ठरली. ललिताचा मुलगा आदित्य हाही भारी चित्रं चितारतो. म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याला आग्रह करून बोलावले. दुसर्या दिवशी प्रॅक्टीकल्स परिक्षा असूनही तो यायला तयार झाला. अश्विनीच्या घरी गटग करायचे ठरले. आणि त्यानुसार आज आम्ही म्हणजे मी, इंद्रा, ललिता, आदित्य, माधव, पूर्वा, अश्विनी आणि नीलू जमलो आणि धमाल आली. सोबत माझी मुलगी आरोही आणि इंद्राचा मुलगा श्रीशैल ही मिनी वासरंही होती.
खूप मजा आली. एकमेकांची स्केचेस, वॉशेस बघताना, त्यावर आपली मत, शंका यांची देवाणघेवाण करताना खूप धमाल आली.
या गटगत आम्ही रंगवलेली ही चित्रे -
(पुन्हा एकदा, नीलू आणि आदित्य सोडल्यास आम्ही सगळेच बालवाडीतले उत्साही कलाकार आहोत. त्यामुळे चित्रेही तशीच आहेत. )
पूर्वा:
आदित्यः (अपूर्ण)
अश्विनी:
नीलू: (अपूर्ण)
इंद्रा: (अपूर्ण)
गजानन:
आणि लास्ट बट नॉट लीस्ट.....
(Oil pastels)
श्रीशैलः (हे जीवदानी देवीचे मंदिर आहे बरं! )
आरोही :
अश्विनी, बिग थँक्यू टू यू! आमच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेपासून थेट अगदी रंगासाठी पाण्याची जिथल्या तिथे व्यवस्था केलीस म्हणून. (हो, माहीत आहे, तू काय म्हणणार आहेस ते.)
अजयची ही कार्यशाळा फॉलो करणार्यांमध्ये जसे आधीपासून जलरंगात काम करणारे अनुभवी लोक आहेत तसेच माझ्यासारखे अनेकजण कसलाच अनुभव नसलेले पण जलरंगातील चित्रांचे चाहते असलेलेही आहेत. जलरंगातल्या जादूचे तंत्र आणि मंत्र, इतके सुंदर चित्र आकाराला येतानाच्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या प्रक्रिया जाणून घेण्याची संधी या कार्यशाळेमुळे मिळतेय. एवढ्या मोठ्या रेंजमधल्या लोकांच्या शंकांचे निरसन आणि तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार्या अजयचे मानावे तेव्हढे धन्यवाद कमीच. या कार्यशाळेने मायबोलीवर उत्साहाचे वातावरण निर्माण केले यात वादच नाही.
अजय, आम्हाला यात किती प्रगती साधता येईल हे माहीत नाही, पण तुमच्या या उपक्रमामुळे आमची जलरंगातल्या चित्रांचा आस्वाद घेण्याची नजर नक्कीच परिपक्व होईल.
अजय, जलरंगासाठी , ३०० GSM+,
अजय, जलरंगासाठी , ३०० GSM+, कोल्ड प्रेस्ड यातले एकही विशेषण दुकानदारांच्या डोक्यात प्रकाश पाडत नाहीये. त्यांना समजतील असे आणखी काही शब्द असतील तर सांग.>> भारतीय पेपर रफ आणि मॅट प्रकारात विकला जातो. काही जण त्याल खादी पेपर असेही म्हणतात. लोकल स्टेशनरीच्या दुकानात हा पेपर मिळणे कठिण आहे कारण फारशी डीमाण्ड नसेल.
BTW लातुर भागातील कुणी आहे का , त्या भागात हँड्मेड कागदाचे कारखाने आहेत असे एकुन आहे
खरेतर श्रीशैल आणि आरोहीसाठी
खरेतर श्रीशैल आणि आरोहीसाठी अनुक्रमे छोटा भीम आणि डोनाल्ड डक या त्यांच्या आवडीच्या कॅरॅक्टर्सची स्केचेच मी करून नेली होती. पण अश्विनीने त्यांच्यासाठी आणलेल्या नव्या करकरीत चित्रपुस्तक, चित्रकलेची वही आणि ऑईल पेस्टल्सनी ते दोघेही एवढे हरखून आणि गुंगून गेले की त्यांनी या स्केचेकडे फारसे पाहिलेही नाही.
एकदम कडक गटगची कल्पनाच मला
एकदम कडक
गटगची कल्पनाच मला फार आवडली
माधव, तुम्ही जो कागद आणला
माधव, तुम्ही जो कागद आणला होता तो फार रफ आणि त्याच्यावर अधून मधून काळे पार्टीकल्स प्रेस झालेले दिसत होते. शिवाय एकाच बाजूने तो (अति) खरखरीत होता. मला फळांच्या टोपलीत जो पुठ्ठा असतो त्याची आठवण झाली होती. (पण काल बोललो नाही. :फिदी:)
त्यामुळे जलरंगाच्या हँडमेड पेपरच्या नावाखाली दुकानदाराने तुम्हाला काहीतरी दुसराच पेपर खपवून कटवले असण्याची मला दाट शंका येतेय.
भन्नाट गटग! (खर तर माझ्यामते
भन्नाट गटग! (खर तर माझ्यामते पुणेकरांना सांस्कृतिक धक्का आहे हा! )
( "अजय" नावाची माणसे अस्तातच भारी, नै? )
गजानन, अरे, पांढरा हँडमेड
गजानन,
अरे, पांढरा हँडमेड पेपर एक तर मिळत नव्हता. मोठ्या मुष्किलीने दुकानात असलाच तर त्यावर कसला तरी पॅटर्न असायचाच. एका दुकानात मला तो कागद मिळाला. रफ आणि जाड हे दोन्ही स्पेक्स पूर्ण करत होता म्हणून घेतला. कितपत जाड आणि रफ हवा याची काहीच कल्पना नव्हती. शेवटी 'जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे' हेच खरे (चला, गटगमुळे म.भा.दिनाकरता एक म्हण मिळाली ) आता थोडी कल्पना आलीये.
मला आदित्यनी काढलेले चित्र वर
मला आदित्यनी काढलेले चित्र वर दिसले, [बाकी सगळे चौकोन दिस्ताहेत] कस्ले मस्त आलय? सही......
limbutimbu - तुला p_ajay_p
limbutimbu - तुला p_ajay_p आठवत असेलच
अजयला वरळीच्या प्रदर्शनात
अजयला वरळीच्या प्रदर्शनात भेटलो तेव्हा कार्यशाळे बद्दल विचारणा केली होती. ती त्याने मनावर घेतल्याने सगळ्या हौशी कलाकारांच्या उत्साहाला उधाण आले. गजा, अश्विनी वेळोवेळी आपला गृहपाठ कार्य शाळेत तपासून घेऊ लागले.
तेव्हा मनात विचार आला की, या सगळ्यांना एकत्र बांधून त्यांच्या कार्य शैलीचा आभ्यास करावा. तसा तो विचार मुलुंड बाफ वर बोलुन दाखवला आणि त्याला सगळ्यांनी दुजोरा दिला, त्यामुळेच हे जलरंग गटाग उत्साहात पार पडले.
या गटगच्या निमित्ताने आदित्यला जुनी लय सापडली, तर नीलुच्या सदाबहार कलाकारीचा जवळुन अनुभव घेता आला. पुर्वा, अश्विनी आणि गजाननचे १००% योगदान पाहुन मलाही हुरुप आलाय. आता वेळ मिळेल तसा गृहपाठ करत जाईन.
माधव आणि ललीच्या experts comments मुळे बच्चा कंपनीला धम्माल करता आली.
( "अजय" नावाची माणसे अस्तातच भारी, नै? ) >>> लिंब्याला अनुमोदन
सगळ्यांनी खूपच छान चित्र
सगळ्यांनी खूपच छान चित्र काढली आहेत.
मस्त!! मला चित्रकलेत शून्य
मस्त!!
मला चित्रकलेत शून्य गती आहे, पण लहान मुलांसाठी काही भेटवस्तू द्यायची असेल तर मी रंगकामाच्या गोष्टी देते. मुलांच्या वयानुसार नॉन-टोक्सिक ऑईल पेस्टल्स/ ट्यूबवाली रंगपेटी वगैरे. मुलं रंगकामात रंगून जातात असं त्यांचे आईबाबा म्हणाले की मस्त वाटतं.
Wow! Saheech gtg!
Wow! Saheech gtg!
>>"अजय" नावाची माणसे अस्तातच
>>"अजय" नावाची माणसे अस्तातच भारी, नै>>> अगदी अगदी
कालचा आफ्टरईफेक्ट जातच नाही. कागदावर काही आकारास येईल ते येईल... पण ते करण्यात.. त्या निर्मितीतला आनंद घेण्यात सगळे असे तल्लीन झालेले पाहूनच मस्त वाटलं.
ईंद्राने स्केच करण्यासाठी पेन्सिल हातात घेतली तेव्हा तो जाम म्हणजे जाम टेन्शन मध्ये होता. पण येत नाही येत नाही म्हणून चांगले स्केच काढले आणि वर रंगवताना तर चित्रात पूर्ण अगदी बूडून गेलेला.. हे बघून मला अश्या कार्यशाळा उत्तम स्ट्रेस बस्टर ठरु शकतात असं वाटून गेलं
आदित्यचे चित्र सुंदर आलय... ललितांच्या अहोंची पेन चित्रे तर भन्नाटच..
जलरंग गटगची कल्पना आवडली.
जलरंग गटगची कल्पना आवडली.
चित्रं खूप सुंदर रंगवलीत.
जीवदानी देवीचं बहुमजली देऊळ मस्तंच!
काय मस्त आयडिया! चित्रंही
काय मस्त आयडिया! चित्रंही सुंदर काढलेत. आता पुणेकर कधी प्लॅन करताहेत?
सुरेख! फार भारी वाटतंय ही
सुरेख! फार भारी वाटतंय ही कलाकारी पाहून. सगळ्यांनी चित्रकला चालू ठेवा असा आग्रह.
जलरंग कार्यशाळाही उत्तम चालू आहे. वाचनमात्र असते तिथे.
मस्त आहे हे गटग एकदम.. चित्र
मस्त आहे हे गटग एकदम..
चित्र छानच आली आहेत सगळ्यांची !
जलरंग गटगची कल्पनाच एकदम
जलरंग गटगची कल्पनाच एकदम भार्री आहे. पुढील टप्पा माबोकरांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन?
पाटील (?) >>>> p_ajay_p <<<<
पाटील (?) >>>> p_ajay_p <<<< आठवतो की , जवळपास बाराचौदा वर्षांपूर्वी याहु च्याटवर कान्द्याच्या जोडीने हा देखिल माझा मित्र होता.
नन्तर कुठे गायब झाला कायकी....
याहू मराठी रुम्स.... काय दिवस होते ते? धमाल असायची. तेव्हांचे खूप चांगले मित्र नंतर नेटच्या गर्दीत हरवले.
अनेतानेता हे त्यातलेच एक नाव.
पृथ्वी नावाची (बहुधा ड्युप्लिकेट) आयडी तेव्हा बराच गोंधळ घालायची.
शिवाजी (आयडी आठवत नाही) नावाच्या आयडीने लोणावळ्यात जीटीजी केले होते २००२ मधे ते आठवते.
नंतर माबोवर मुडी होती. ती पण कुठे हरवली कायकी.
जलरंग गटग...वॉव एकदम हटके
जलरंग गटग...वॉव एकदम हटके गटग!
मस्तच आहेत सगळ्यांची चित्रे! विशेषतः नीलू आणि आदित्यचे चित्र छानच आहे! आदित्यची दुसर्या दिवशी प्रॅक्टीकल्स परिक्षा असूनही त्याने गटगला येवुन इतके सुरेख चित्र काढले याचे खरेच मनापासुन कौतुक वाटले.
Pages