मायबोली सदस्यत्व घेण्याचं मुख्य कारण होतं, पाटील सरांची जलरंग कार्यशाळा! सदस्यत्व घेतल्यापासून सगळे लेख वाचून काढले. सगळीच चित्रं अप्रतीम आहेत. अजून पर्यंत कधी स्नोस्केप काढलं नव्हतं पण धीर करून पाटील सरांनी दाखवलेलंच स्नोस्केप काढलं.
बर्यापैकी जमलं आणि रूटीन मधून एस्केप मिळाला.. म्हणून स्नो-एस्केप
अजय यांनी मायबोलीवर ऑनलाईन जलरंग कार्यशाळेची संकल्पना मांडली आणि जलरंगांत रुची असणार्या अनेक मायबोलीकरांनी ती उचलून धरली. लगेचच अगदी पूर्वतयारी काय असावी आणि ती कशी करावी इथून सुरुवात झालेल्या आणि जलरंगांचे मूलभूत तंत्र सोप्या शब्दांत सोदाहरण उलगडून दाखवणार्या या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला.
यातल्या रेखाटन, बेसिक वॉशेस, हे ट्राय करताना आमच्यासारख्या नवशिक्या उत्साहितांना ते एकट्याने करण्यापेक्षा गृपमध्ये केल्यास एकमेकांची स्केच करण्याची, रंग बनवण्याची, वॉशेस करण्याची पद्धत जवळून बघता येईल आणि त्यातून शिकायला मिळेल असे वाटू लागले.