मराठी भाषेचं भवितव्य काय?
कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.
कधी कधी वाटतं, असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच नाही ना उरणार?
किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार?
सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय. पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का?
दुर्दैवाने सध्याचं चित्र तितकंसं आश्वासक वाटत नाही.
अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसताहेत.
मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना पहिली. वाटलं, त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा व्हायला हवी. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. पण मला वाटतं थोडा विचार मराठीचासुद्धा करायला हवा आपण. तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर.
कदाचित सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतले जात आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल?
मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. (म्हणजे आता अजिबात होत नाही असं नाही). डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या कथा वाचताना मेडिकल थ्रिलर वाचत असल्याचा भास होतो. मी रॉबिन कुक वाचला नाहीय, पण तो एवढा प्रसिद्ध झाला म्हणजे तोसुद्धा अशाच धाटणीचं लिहित असणार
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात मागे मी काही आयांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येताना पाहिलं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या या मुलांसाठी त्या मराठी पुस्तकं घेऊन जात होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना मराठी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवतात असं ऐकलं. ऐकून काहीसं बरं वाटलं.
ग्रंथ संग्रहालयातल्या कर्मचारी वर्गाकडून कळलं की इंग्रजी माध्यमात मराठी पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलं आहे, त्यामुळे आजकाल मराठी ग्रंथ संग्रहालयात सभासद म्हणून लहान मुलांची संख्या काहीशी वाढली आहे.
मला वाटतं हा एक चांगला मुद्दा आहे. सर्वांनी आपापल्या मुलांना (ज्यांना सध्या नसतील त्यांच्या भविष्यकालीन मुलांना) मराठी वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मराठीची काळजी राजकारण्यांवर टाकून उपयोग नाही.
तेव्हा माझी माबोकरांना कळकळीची विनंती आहे की साऱ्यांनी मराठी संवर्धनासाठी काही ठोस आणि प्रत्येकाला आचरणात आणता येण्यासारखे काही उपाय सुचवावेत.
धन्यवाद मंडळी..
>>पॉवर पॉइंट म्हणजे
>>पॉवर पॉइंट म्हणजे शक्तीबिंदू <<
च्यायला लगो, तुमचा आयडी पैलवानांनी हॅक केला काय?
ते शक्तिबिंदूप्रदर्शन असे आहे
ते शक्तिबिंदूप्रदर्शन असे आहे
एनीवे.
हे घ्या:
लाभले आम्हास भाग्य!
मराठीचं काही खरं नाही. भयंकर
मराठीचं काही खरं नाही. भयंकर अवस्था आहे. भाषा बुडणार. धर्म बुडणार. मग जगबुडी होणार...
भयानक आहे सगळं.
महाराष्ट्रातील शाळांत फक्त ५
महाराष्ट्रातील शाळांत फक्त ५ टक्के शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत . तुमच्या आसपासपेक्षाही उर्वरीत महाराष्ट्र फार मोठा आहे ही फक्त पुण्यामुम्बईच्या बाहेर न गेलेल्या लोकांची ओरड आहे आणि महाराष्ट्रातील सर्व सरकारमान्य शाळांत मराठी विषय कम्पल्सरी आहे . आणि सर्वसरकारी नोकर्यात मराठीचे ज्ञान अनिवार्य आहे.
राज्य सरकारचा सर्वकारभार शुद्ध मराठीतून चालतो. राज्यसरकारच्या कर्मचार्याना इंग्रजीतून 'नोट पुट अप' करता येत नाही. !
झक्की, झकास हं! हूडा, ते खर
झक्की, झकास हं!
हूडा, ते खर रे, पण ८०% उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पैका मिळविण्याची २०% ठिकाणे जिथे आहे त त्या पुणेमुम्बैत इन्ग्रजीचाच बोलबाला आहे, व आर्थिक व्यवस्था देशी इन्ग्रजान्चे हाती एकवटली आहे त्याचे काय?
तुमच्या सरकारी व्यवस्थेत ज्युनिअर लेवल वरुन पाठवली जाणारी "नोट(?) [काय हिरव्यापिवळ्या नोटा पाठविता की काय?] भले मराठित असेल, पण व्यवस्थेचे निर्णय घेणारे सचिव/आयुक्तादिक किती उच्चपदस्थ मराठी भाषक आहेत? युपिएस्सीएम्पीएस्सी द्वारे भरती होण्यामुळे किती मराठीतर उच्चपदस्थ राज्याच्या कारभार हाकतात हे जरा माहितीच्या अधिकारात किन्वा तुझ्या अनुभवाप्रमाणे सान्गु शकशील काय?
त्या सर्वाना मराठी भाषेची
त्या सर्वाना मराठी भाषेची परीक्षा साधारण दोन वर्षातच कोणताही चार्ज घेण्यापूर्वी द्यावी लागते. ती एम्पीएस सी घेते. इंग्रजीतून नोटींग लिहिणार्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे...
लिंबूटिंबू ज्या प्रकारची
लिंबूटिंबू ज्या प्रकारची मराठी लिहितात, ते वाचून मराठीच्या भवितव्याबद्दलच काय भूत, वर्तमानाबद्दलही वाईट वाटते.
मराठी साहित्याशी संबंधित एका कार्यक्रमात या विषयाच्या संबंधाने ऐकलेली तरुण मते : मराठी भाषेचे भवितव्य, मराठी साहित्याचे भवितव्य हे शहरी लोकांना(विशिष्ट शहरातल्या ? )पडलेले प्रश्न आहेत. शिक्षणाच्या प्रसाराने ग्रामीण महाराष्ट्र लिहिता वाचता होऊ लागला आहे. मराठी भाषेचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित आहे. खरे तर मराठी भाषेतून व्यक्त होणारे अनुभवविश्व अधिकाधिक विस्तारित होत असल्याने हे भवितव्य उज्ज्वलच आहे.
आता उगाच भलत्यासलत्या गोष्टींसाठी मराठी शब्द वापरता येत नाहीत, त्यामु़ळे मराठी भाषेत अमराठी शब्दांचा भरणा होतो, इ.इ. ही खंत असेल तर तिथे अट्टाहासाने मराठी शब्द वापरल्याने काय साध्य होणार आहे?
लिंबूटिंबू ज्या प्रकारची
लिंबूटिंबू ज्या प्रकारची मराठी लिहितात, ते वाचून मराठीच्या भवितव्याबद्दलच काय भूत, वर्तमानाबद्दलही वाईट वाटते.<<<
लोहपटअग्नीरथआवकजावकनिर्देशक !
लोहपटअग्नीरथआवकजावकनिर्देशक !
१००
१००
>>>>
>>>> लोहपटअग्नीरथआवकजावकनिर्देशक ! <<< हूडा, तू सुद्धा??? (ब्रुट्स यू टू च्या चालिवर....)
आगगाडी/अगिनगाडी, मालगाडी, लोहमार्ग , निशाणी इत्यादी शब्द तुला किन्वा तुझ्या सरकारी मराठीतील "नोटेत" (टीप्पण्णी) जात नसतीलच ना हूडा?
भरत, हे नक्की की ग्रामिण नागरिकच मराठी जमेल तितकी टिकवुन धरतील. या शहरी बाबू लोकान्चे काही खरे नाही.
बर, मी काय प्रकारची मराठी लिहीतो? विस्कटुन सान्ग बघू.
कायेना की मी सदाशिवपेठी ते मराठवाडी ते कोकणी ते बम्बयैया ते खानदेशी ते नागपुरी अशी सर्व ठिकाणच्या मराठी बोलीभाषेचे संस्कार मजवर करुन घेतलेले असल्बोली, अन त्यातुन मूळ पिन्ड सावरकरी/कोल्हटकरी अर्धे/पूर्ण पानभर वाक्याचा असल्याने तुम्हाला वाचणे, समजणे अंमळ जरा कठीण जात असेल, पण प्रयत्न करा. इन्ग्रजीपेक्षा ही सोप्पी आहे.
१. मराठीत अनुस्वाराच्या जागी
१. मराठीत अनुस्वाराच्या जागी शक्यतो (अर्थभेद दाखवण्यासाठी क्रमप्राप्त नसल्यास) पर-सवर्ण वापरू नये असा संकेत, स्वीकारलेला नियम आहे. तो तुम्ही पाळत नाही.
२ पर-सवर्ण चुकीचा वापरता. पिन्ड नव्हे पिण्ड. (हे फक्त एक उदाहरण)
राज्यसरकारच्या कर्मचार्याना
राज्यसरकारच्या कर्मचार्याना इंग्रजीतून 'नोट पुट अप' करता येत नाही. ! >> सरकारी कर्मचार्यांनी "नोट पुट अप" ला फारच गांभिर्याने घेतले आहे.
नोट पुट अप करायला भाषा काय कामाची? तिकडे सरकारी ऑफिस मध्ये क्रमवारीनुसार "रंग" लागतात.
परमसावरकरकोल्हटकरवादीभक्तशिरो
परमसावरकरकोल्हटकरवादीभक्तशिरोमणी लिंबुजी ,आधी आपले सदस्यनाम limbutimbu, हे धर्मबुडव्या आंग्ललिपीतून मराठी देवनागरीत करा पाहू.... बघा जमतेय का..धन्यवाद.
>>>> सरकारी कर्मचार्यांनी
>>>> सरकारी कर्मचार्यांनी "नोट पुट अप" ला फारच गांभिर्याने घेतले आहे. <<<<<
भरत, "पिन्ड"च बरोबर आहे. बाकि अनुस्वाराबद्दल म्हणाल तर कीबोर्ड बदडताना शिफ्ट दाबून एम शोधत दाबायचा कण्टाळा येतो/अवघड जाते इतकेच.
ग्रेट्या, माझे सदस्य नाम, माबोवर जेव्हा मराठीची सुविधा नव्हती तेव्हापासूनचे आहे. जर मी ते देवनागरीमध्ये ("मराठी देवनागरी" असे काही अस्तित्वात नाही) केले तर "तत्सम" अनेक ड्युप्लिकेट आयड्ञा साकार होतात असा अनुभव आहे म्हणून सक्तिने रोमन लिपित ठेवले आहे.
सावरकरी पिण्डाला कण्टाळा शोभत
सावरकरी पिण्डाला कण्टाळा शोभत नाही
(No subject)
मयेकर, लिंबुच्या अनुस्वाराचा
मयेकर, लिंबुच्या अनुस्वाराचा इतिहास वेगळा आहे. त्याच्याशी भाषा आणि व्याकरणाचा काही संबंध नाही. आणि शिवाय त्याच्या प्राचीन समग्र स्वगत-वाड्मयावरून नजर फिरवली तर खुद्द मराठी भाषाच वैतागली असेल हे कळेल. लिंबु हलके घे.
आँ ...?? आम्ही तर पेशंटची
आँ ...?? आम्ही तर पेशंटची सगळी माहिती, निदान, उपचार सगळे सरकारी दवाखान्यात इंग्रजीतच लिवतो.
तुझ्या रक्तातील रक्तबिबिका, श्वेतबिंबिका, मूत्रशर्करा वगैरे वगैरे बडबडत बसलो तर पेशंटचे बीपी आणखी वाढेल.
बाकी, लिंब्या, देवघरात बूट आणणे यावर फार तावातावाने ( म्हणजे शब्दशः तावभर ) लिहिलेस रे! पण तुम्ही हिंदु जे तुमचा देव वापरायचा ते देवघरात ठेवता.. तुमचा देव पादुका वापरायचा, म्हणून तुम्हाला पादुका पूज्य... जर तुमचा देव वुडलँडचे शूज वापरत असता, तर तुम्ही ते पूजले असते.... तुमचा देव / अवतार सिगरेट ओढतो, दारु पितो, तर त्याच्या समोर तुम्ही सिग्रेट / दारुचा ग्लासही ठेवता ना रे? मग बूटचा उल्लेख तुला इतका का खुपावा ???
.....
.....
शिवाय त्याच्या प्राचीन समग्र
शिवाय त्याच्या प्राचीन समग्र स्वगत-वाड्मयावरून नजर फिरवली तर खुद्द मराठी भाषाच वैतागली असेल हे कळेल<<<
>>>> जर तुमचा देव वुडलँडचे
>>>> जर तुमचा देव वुडलँडचे शूज वापरत असता, तर तुम्ही ते पूजले असते. <<<<
लगो, जरतर मधे मला इन्टरेस्ट नै, अन बुटाचा झणका चान्गलाय बसलाय असे दिसते. किती ते पाणीदार पानचट वाढवत बसलाय?
आजही पुजेला बसलात, तर किन्वा अनेक कर्मठ मन्दिरान्मधुन नुस्ते बुटच नव्हे तर अन्गावरील चामड्याची यच्चयावत गोष्ट उतरवुन ठेवायला लावतात, अगदी घड्याळाचा पट्टा/कमरपट्टा वगैरे. कारण एकच, वापरलेले चामडे गोवंशाचे असेल तर ते आजही देवासमोर निषिद्ध मानले जाते. (हां, तुम्ही व्याघ्रचर्म/मृगाजिन वगैरे लेऊन आलात तर मात्र चालू शकेल बर्का, कदाचित फक्त ते वापरण्यामागिल कायदेशीर जबाबदारी तुमची तुम्हाला साम्भाळावी लागेल, क्काय? )
>>>>>> शिवाय त्याच्या
>>>>>> शिवाय त्याच्या प्राचीन समग्र स्वगत-वाड्मयावरून नजर फिरवली तर खुद्द मराठी भाषाच वैतागली असेल हे कळेल <<<<<<
असेलही, पण वैतागली तरी "स्वतःहून इन्ग्रजीच्या वळचणीला जायचा मूर्खपणा माझी मराठीभाषा माझ्यावर वैतागली तरी करणार नाही याची खात्री आहे. अडचण आहे ती वर तिन प्रकार जे लिहीले त्यातिल दुसर्या प्रकारच्या लोकान्चे, जे स्वतःच मराठीला उचलुन इन्ग्रजीच्या दावणीला बान्धत आहे, जिथुन कालान्तराने आपोआप मराठीची रवानगी कसायाकडे होते आहे.
अन अशाप्रकारे मातृभाषा त्यागुन परकीय भाषेच्या आहारी जाऊन वैचारिकदृष्ट्या राष्ट्रान्तरीत झालेल्या पण इथेच रहात असलेले व्यक्ति/समुह धर्मान्तरितापेक्षाही घातक ठरू शकतात असे माझे मत.
अडचण आहे ती वर तिन प्रकार जे
अडचण आहे ती वर तिन प्रकार जे लिहीले त्यातिल दुसर्या प्रकारच्या लोकान्चे,
लिंब्या, भाषा शिकताना सर्वजण चुकत चुकतच शिकतात.. शिवाय जी भाषा आपली बोली भाषा नाही, तिच्यात बोलायला शिकताना त्रास सर्वानाच होतो. तू तुझी मातृभाषा बोलायला शिकलास तेंव्हा तुझ्या जिभेवर पहिल्याच दिवशी साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा क्लास उघडला होता काय रे?
कारण एकच, वापरलेले चामडे
कारण एकच, वापरलेले चामडे गोवंशाचे असेल तर ते आजही देवासमोर निषिद्ध मानले जाते. (हां, तुम्ही व्याघ्रचर्म/मृगाजिन वगैरे लेऊन आलात तर मात्र चालू शकेल बर्का,
अहो बृहस्पती !!!! जे मी लिहिले तेच तू दुसर्या शब्दात लिहिलेस.... तुमचे देव बसायला/ पांघरायला वाघाचे / हरणाचे कातडे वापरायचे म्हणून तुमच्या दृष्टीने ते तेवढे शुद्ध / सात्विक ! नाहीतर चामडे हे काय आणि ते काय ..सगळे चामडेच की!
गुटगुटीत अनुमोदन
गुटगुटीत अनुमोदन
>>>>> नाहीतर चामडे हे काय आणि
>>>>> नाहीतर चामडे हे काय आणि ते काय ..सगळे चामडेच की! <<<< अरेव्वा, आमच्या देवान्च्या नावाच्या नुस्त्या उद्धारानेदेखिल तुम्ही "ब्रह्मं सत्यं जगन्मित्थ्या" या सत्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलात की!
>>>>>>>>
अडचण आहे ती वर तिन प्रकार जे लिहीले त्यातिल दुसर्या प्रकारच्या लोकान्चे,
लिंब्या, भाषा शिकताना सर्वजण चुकत चुकतच शिकतात.. शिवाय जी भाषा आपली बोली भाषा नाही, तिच्यात बोलायला शिकताना त्रास सर्वानाच होतो. तू तुझी मातृभाषा बोलायला शिकलास तेंव्हा तुझ्या जिभेवर पहिल्याच दिवशी साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा क्लास उघडला होता काय रे?<<<<<<<<<<<<<
बर, मी प्रकार दुसरा म्हणला तो पुढे पुन्हा देत आहे. त्याच्याशी तुमच्या वरल्या पोस्टचा संदर्भच लागत नाही.
या उलट,
प्रकार दोन
१) माझी भाची: इन्ग्रजी फाडफाड (?) बोलते, मराठी बोबडे-तोडके मोडके बोलते, शिक्षण अजुन होतय, तेव्हा पैशे कमवायच्या मजबुरीचा संबंध नाही.
२) आजुबाजुचे अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनी: फाडफाड इन्ग्रजी बोलतात, आपापसात बोलताना सहसा हिन्दी वापरतात, अन त्यान्ना आम्ही बोलत असलेले मराठी वेगात बोलले तर काडीचेही समजत नाही, सावकाश बोलले तरी कठीण शब्दान्चेबाअतित अगम्य चेहरा करतात.
यातिल कुणीही बाहेरील देश जाऊदेच, महाराष्ट्र/पुणे सोडून बाहेरील राज्यातही पैशे कमवायला जाण्याची सूतराम शक्यता नाही. अन तरीही केवळ इन्ग्रजी माध्यमामुळे यान्नी यांचीच मातृभाषा मराठी यान्चेच महाराश्ट्र नामक मरहठ्ठी राज्यात गमावलेली आहे, त्यान्चे पुढल्या पिढीत मराठी नामशेष होईल
बोल्ड मराठी उच्चारायची कशी ?
बोल्ड मराठी उच्चारायची कशी ?
ओठ मोठे करायचे
ओठ मोठे करायचे
प्रभात. सु यासाठी नाही कारण
प्रभात.
सु यासाठी नाही कारण भवितव्य अंधारात आहे. कालपर्यंत नैराश्य आलं होतं. भाषा बुडणार असल्याने आपण सामूहीक अतामहत्या करूयात का असा धागा कढायचा विचार होता. भाषा बुडणे नशिई येण्यापेक्षा ते बरंच. नेमकी कशी आत्महत्या करावी, कमीत कमी त्रास कशाने होईल यावर आपल्याला चर्चा करता आली असती.
पण आज इथं आशावादी सूर दिसू लागला आहे. लिंबू ओवाळून टाका.
Pages