आजकाल लहान - लहान पोरांच्या प्रेम भावनेवर (तसेच इतर भावनेवर) मोठाले चित्रपट निघत आहेत... त्यातही त्याचे वातावरण ग्रामिण आहे तेव्हा शहरातले रितायर्ड म्हातारे अशा चित्रपटाचा खुपच आंनद घेत आहेत.... आज - काल चांगलं - वाईट असं काहीच राहलं नाही... कारण बाजार महत्वाचा.... पैसा मिळविणं महत्वाचं.... आपलं मत लोकांना पटवुन सांगता आलं की त्यातुन बरचं काही मिळविता येतं.... हे नविन कौशल्या बाजारात येत आहे.
.... कसं वातावरण होतं गावातल्या शाळेत विस-पंचविस वर्षापुर्वी.
आठव्या वर्गातली गंमत.
गावातल्या शाळेत इंग्रजी भाषेची नेहमीच बोंब असते... तशी त्याही शाळेत होती. आठव्या वर्गात शिकणार्या मुला-मुलीला सहसा शब्दाचे स्पेलिंग येत नव्हते...तसेच त्याचे मराठीतले अर्थ हि माहिती नव्हते... तेव्हा या वर्गातली एक मुलगी त्याच वर्गातल्या मुलाला शाळेची सुट्टी झाल्यानंतर वर्गातुन बाहेर निघतांना " I LOVE YOU समिर " म्हणाली .... त्या मुलाला तिचं बोलणं ऐकु आलं पण अर्थ कळाला नाही.... जवळच्या एका मुलाने ते बोलणं ऐकलं .... कारण तो त्याच्या सोबतच होता... समिर त्याला म्हणला " काय म्हणत होती ती?" तो त्यावर हसत म्हणाला... मला काय माहित.
दुसर्या दिवशी ती मुलगी वर्गात आल्या-आल्या परत त्याच्या जवळ जावुन हसत " I LOVE YOU " म्हणाली... त्यावर समिर चांगलाच वैतागला, पण ती पोरगी त्याच्या पेक्षा चांगलीचं दणकट होती, म्हणुन तिला तो काही बोलला नाही.... पण तिचं असं जवळ येऊन बोलणं त्याला आवडलं नाही.
एकदाचे शिक्षक वर्गात आले, काही बागचा-पुढचा विचार न करता समिर शिक्षकांना म्हणाला..." हि चिंगी दोन दिवसापासुन मला सारखं I LOVE YOU ... I LOVE YOU ... म्हणुन राहली... आता तिला तुम्हीच समजावुन सांगा!"
त्यावर ते शिक्षक बोलले... मला यातलं काहिच कळत नाही...कारण ते इंग्रजीत आहे... तेव्हा त्या विषयाचे शिक्षक आले की तु त्यांना विचार..." हे ऐकुन चिंगी हसली... समिर हिरमुसला.... सारा वर्ग हसायला लागला.
दुपारची सुट्टी झाली... मुलं घरी जेवायला निघली ... तेव्हा वर्गात कोणी नाही हे पाहुन चिंगीने संधी साधली आणी परत त्याला I LOVE YOU म्हणाली.
आता समिरचा राग अनावर झाला... त्याने चिंगीच्या भावना समजवुन न घेता ... सरळ शिक्षकांच्या खोलीत गेला, तिथे इंग्रजीचे शिक्षकही आराम करत होते.... गुरुजी ती चिंगी मला सारखं I LOVE YOU म्हणुन शिव्या देऊन राहली... हे ऐकुन इतर शिक्षकही हसयला लागले.
इंग्रजीचे शिक्षक म्हणाले ... जा, चिंगीला बोलावुन आण!
थोड्याच वेळात चिंगी तिथं हजर झाली.... शिक्षक तिला बोलले.." चिंगे I LOVE YOU म्हणुन तु या सम्याला का शिव्या देऊन राहली?"
"मी त्याला कुठं शिव्या देऊन राहली .... मी तर त्याला माझं त्याच्यावर प्रेम ....."
प्रेम शब्द ऐकल्या बरोबर शिक्षकाने चिंगीच्या कानाखाली लगावली... आणि सम्यालाही एक ठेऊन दिली.
...
....तेव्हा I LOVE YOU म्हणजे खुपच कठीण शब्द आहे असं सम्याला वाट्लं, नंतर ती दोघही गाल चोळीत घरच्या दिशेने जेवायला निघली.
.......
असेल असेल असेहि असु शकते..
असेल असेल असेहि असु शकते..
बिचारा सम्या, नंतर त्याला
बिचारा सम्या, नंतर त्याला एखाद्याबद्दल राग आला असेल तर त्याला I LOVE YOU बोलून मोकळा होत असेल
![donald-duck-022007-3.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5620/donald-duck-022007-3.gif)
नया है
नया है वो.....................:खोखो:
ह्याला परवानगी घेतलीत
ह्याला परवानगी घेतलीत काय?
-गा.पै.
पण जुन्या शाळेतलं म्हणजे काय?
पण जुन्या शाळेतलं म्हणजे काय? शाळा जुनी आहे का प्रकरण जुनं आहे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खरच अस घडल असेल अस वाटत नाही
खरच अस घडल असेल अस वाटत नाही !![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
विस-पंचविस वर्षापुर्वी अस
विस-पंचविस वर्षापुर्वी अस वातावरण असु शकतं... छान लिहिलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महेश .... आपल्या देशात काहीही
महेश .... आपल्या देशात काहीही घडु शकतं.... थोडं आजुबा़जूला लक्ष द्या.
>>थोडं आजुबा़जूला लक्ष
>>थोडं आजुबा़जूला लक्ष द्या.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कोणाकडे ??
शिक्षकांनी सम्याला का मारले?
शिक्षकांनी सम्याला का मारले? ईंग्लिश येत नाही म्हणून? चिंगीचे प्रेम समजून घेतले नाही म्हणून? एकावर एक फ्री म्हणून? कि स्त्री-पुरुष समानता अबाधित राहावी म्हणून?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
इंग्रजीच्या शिक्षकाला I love
इंग्रजीच्या शिक्षकाला I love you चा अर्थ माहीती नाही. जरा अशक्य वाटते. अगदी २५ वर्षांपुर्वीही.
.... देशमुख. शिक्षकाला I
.... देशमुख. शिक्षकाला I LOVE YOU चा मराठीत अर्थ माहित होता... पण त्याच्या उच्चार इतर शिक्षकांसमोर नको होता.
.... अभिषेक, आधिच सांगितले
.... अभिषेक, आधिच सांगितले आहे कि गावातल्या शाळांमधे english चा आजही प्रश्न आहे... त्या काळात तर विचारुच नका...... स्त्री-पुरुष समानता आजही ग्रामिण भागातला विषय नाही.
स्त्री-पुरुष समानता आजही
स्त्री-पुरुष समानता आजही ग्रामिण भागातला विषय नाही. >>>
खरय !