काही जाहिराती मनाच्या किती जवळच्या वाटतात. काहींची गाणी आपलीशी वाटतात. काहीतल्या थीम तर काही केरेक्टर..काही काही जाहिराती पाहतांना तर हमखास आपल्या काही जवळच्या माणसांची आठवण येते. काही जाहिरातीतले वातावरण जुने दिवस आठवण करवून देतात काही स्वप्नील भविष्यात घेऊन जातात….
SBI Life च्या त्या जुन्या गाण्यावर आधारित जाहिरात मला नेहेमीच attract करायची
'हम जब होंगे साठ साल के …या गाण्याच्या चालीवर स्पेशली जेव्हा तो म्हणतो ….
लंबी सी एक गाडी मे फिर तुमको लेकर जाऊंगा
तुम अंदर से देखना बाहर और मै आईस्क्रीम खाउंगा
यावर अगदी मुरडत ती विचारते 'अच्छा , दांत होंगे क्या तुम्हारे ??
त्यावर तो "इन दांतो का क्या है मै सोने के दांत लगाउंगा
और फिर तुमको देख देख के बार बार मुस्काउंगा
आहा कसलं गोड अन रोमांटिक ना …
http://www.youtube.com/watch?v=HL6D-4dRbaw
हल्ली हल्लीच येतेय ती आणखी एक जाहिरात. सुपरटेक ची … कधी ऐकलेत का ह्याचे पूर्ण शब्द
तुम मेरी दुनिया सजाती हो
घर को घर बनाती हो
कभी हमको सिखाती हो
कभी खुद भूल जाती हो
घर को घर बनाती हो
कभी नखरे उठाती हो
कभी हौसला बढाती हो
तुम हर पल को स्पेशल बनाती हो
घर को घर बनाती हो …
आहा , एखादीला अश्या शब्दात कौतुक आणि एप्रिसिएशन मिळणार असेल तर ती जीव ओवाळून टाकणार नाही तरंच नवल.
http://www.youtube.com/watch?v=jvVargZXlMo
काही दिवसांआधी येणारी कोका कोला ची जाहिरात 'हां हां मै क्रेझी हुं' सुद्धा मस्त होती
त्याची catch line 'क्या आप दुनिया को खुश करने के लिये क्रेझी है' सार्थक करण्यासाठी त्यांनी त्यात टाकलेले ते खोडकर अन मस्तीचे प्रसंग.
" किसी को स्माइल देना, किसी को खुश कर जाना
अगर ये सब क्रेझी है तो हां हां मै क्रेझी हुं"
http://www.youtube.com/watch?v=jyEWtpYtpv4
आणि सर्फ एक्सलं च्या जाहिरातींबद्दल काय बोलायचे एकच Catch Line 'कुछ अच्छा करने के लिये अगर दाग लगते है … तो दाग अच्छे है ….' आणि त्यासाठी दाखवलेले ते चिमुकले त्यांची मस्ती आणि धमाल, cooool मॉम्स आणि सर्फ एक्सलं बास्स …
आत्ता आत्ता लागतेय ती सर्फ एक्सलं ची जाहिरात पाहिलीये काय तुम्ही … ?? त्यातल्या प्रत्येक मुलाला आणि त्या शब्दांना ऐकून मला माझा एक एक दोस्त आठवतो आता हेच बघा ना ….
"ये मेरा दोस्त है, वांटेड मोस्ट है
चाबी वाला टॉय है फनी फनी बॉय है
बड़ा मजेदार यारों का यार … "
येतेय का कुणाची आठवण ??
आणि हे आणखी एक …
' ये मेरा दोस्त है, सब का होस्ट है
हेल्प को रेडी है सबका बड्डी है
बड़ा मजेदार यारो का यार "
हे तीसरे ऐका... कुणीतरी आठवणार नक्कीच
ये मेरा दोस्त रॉकेट ऑलमोस्ट
नॉटी नॉटी खुश कहीं जाये घुस
बड़ा मजेदार यारों का यार....
http://www.youtube.com/watch?v=UCmxnp4ia7A
कसली धमाल असते नाही कुठले शब्द मनात शिरतात कुठल्या भावना जीवाला भावतात काहीच सांगता येत नाही निदान मला तरी होतं असं
काहीतरी पाहून कुणीतरी आठवत राहतं. काहीतरी ऐकून असं छान छान वाटत राहतं.
नक्कीच अशा जाहिराती असतात
नक्कीच अशा जाहिराती असतात ज्या बघितल्यावर चेहेर्यावर स्माईल येतेच. मला नॅसकॅफेची जिंगल खूप आवडते. फ्रेश वाटते सकाळी ऐकली की.
जुनी हमारा बजाज जाहिरात पण मस्त होती.
माझी आवडती, त्यावेळची, "आय
माझी आवडती, त्यावेळची, "आय अॅम अ कॉम्प्लान बॉय..."
मस्तच आहेत या जाहिराती ...
मस्तच आहेत या जाहिराती ... नेसकॅफे माझी पण फेवरिट..
इथे उसगावात आल्यावर बंद झालयं अॅडस वगैरे .. इथल्या तर एकदम विचित्र असतात .. प्रोडक्टचा नि जाहिरातीतल्या गोष्टीचा संबंधच नसतो अस वाटतं मला तर..
ये जमी ये आसमाँ..... हमारा
ये जमी ये आसमाँ..... हमारा कल...हमारा आज...बुलन्द भारत की बुलन्द तस्वीर....हमारा बजाज....
ही अॅड मला लैच आवडते.
मला ती बदामवाली "तुमसे ही दिन
मला ती बदामवाली "तुमसे ही दिन होता है" सुद्धा खुप आवडते
आणि तो कॉम्प्लान चा बकुल
आणि तो कॉम्प्लान चा बकुल पांडे आठवतो का ??
तो घर सोडून गेलेला ' जलेबी' वाला छोटू
येस्स्स्स्स्स्स!
येस्स्स्स्स्स्स!
मला त्या Man will be man
मला त्या Man will be man वाल्या सगळ्याच जाहिराती स्मार्ट वाटतात … पहिल्या आहेत का ??
नसेल तर या आहेत http://www.youtube.com/watch?v=O4nTDi4lnCs नक्की बघा
मयी , इथे जाहिरातींचा एक धागा
मयी , इथे जाहिरातींचा एक धागा आहे.
त्यावर खुप क्युट क्युट जाहिराती आणि वाईट वाईट जाहिरातींबद्दल लिहिलय.
तू ही बघ!
लिंक देता येइल तर बघ ना रिया
लिंक देता येइल तर बघ ना रिया ..
तो घर सोडून गेलेला ' जलेबी'
तो घर सोडून गेलेला ' जलेबी' वाला छोटू>>>> तो जलेबीवाला छोटु तर माझा ऑलटाईम फेव्हरेट आहे...
मला आयसीआयसीआय च्या होम लोन
मला आयसीआयसीआय च्या होम लोन ची जाहीरात आवडायची.
यतिन कार्येकर ची... 'तिनका तिनका बचाया' असं काहीसं जिंगल होतं , अश्यात, भर पावसात रीक्षा टाळून तो बस ची वाट बघत उभा राहतो... खुपच ट्चिंग होती ती जाहीरात . लिन्क असेल तर द्या प्लीज.
शोधा म्हणजे सापडेल
शोधा म्हणजे सापडेल
Men will be Men चित्रपट
Men will be Men चित्रपट बघितला नाही.
आता बघावा लागेल.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2738>>> मयी हा बघ तो धागा, या धाग्यावर आवडात्या आणि नावडत्या दोन्ही जाहिरातींविषयी चर्चा आहे.
Men will be Men चित्रपट
Men will be Men चित्रपट बघितला नाही.>>>>>>विजय चित्रपट नाही हो जाहीरात आहे ती
(No subject)
घरासाठी काडी काडी जमवतात
घरासाठी काडी काडी जमवतात माणसं....
टुमदार स्वप्नांत रमतात माणसं....
छान छान घरांत रहातात माणसं.......
जेव्हा भेटतात, घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं.....!
मला फिर भेडिये ने मेमने से
मला
फिर भेडिये ने मेमने से कहाँ.. उहुहु मै तुम्हे खा जाऊंगा... ती जाहीरात जाम आवडायची लहानपणी.
मला धारा ऑईल ची जाहिरात
मला धारा ऑईल ची जाहिरात आवडायची. ते समोसे, डोसे बघुन तर तोंडाला पाणी सुटायचे. तसे आपल्यालाही मिळावे म्ह्णून लहानपणी धारा ऑईलच घे असा आईकडे हट्ट करायचे आणि कोणाला एक जाहिरात आठवतेय का? तेच
पूरबसे सूर्य उगा,
फेला उजियाला.
मस्त गाणे होते ते
स्नेहनिल, हो मस्तच गाण होत.
स्नेहनिल, हो मस्तच गाण होत. अशोक पत्कींच संगीत आहे त्याला....
ओह thanks मुग्धटली. त्या
ओह thanks मुग्धटली. त्या जाहिरातमधून दिलेला शिक्षणाचा संदेशही मस्त होता
राष्ट्रीय साक्षरता अभियानाची
राष्ट्रीय साक्षरता अभियानाची जाहिरात होती ती. खूप मस्त वाटायचं ऐकायला.
तुनळी दुवा : http://www.youtube.com/watch?v=Va_ml6k7_Fk
अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच जिंगल्स मस्त होत्या. धारा धारा शुद्ध धारा ऐकून आणि बघून तर तोंडाला पाणीच सुटायचं. ती टम्म फुगलेली पुरी आणि सामोसे अहाहा!
बादवे, दोन मात्रा द्यायच्या
बादवे, दोन मात्रा द्यायच्या असतील तर कोणती key वापरावी???
मिले सूर मेरा तुम्हारा. .
मिले सूर मेरा तुम्हारा. . एकदम क्लास!
एक नेरोलाक की एशियन पेंट ची
एक नेरोलाक की एशियन पेंट ची होती " काट काट बिन्धास्त काट"
फेविकॉलच्या जाहिरातीपण मस्त
फेविकॉलच्या जाहिरातीपण मस्त असायच्या....
अरे मला कोण सांगेल का? दोन
अरे मला कोण सांगेल का? दोन मात्रा द्यायच्या असतील तर कोणती key वापरावी???
स्नेहनिल a ani i वापरा.
स्नेहनिल a ani i वापरा.
छान लिहिलेय, असल्या हळूवार
छान लिहिलेय, असल्या हळूवार भावना उलगडणार्या जाहीरातीशी आपण रिलेट झालो तर खरेच बघायला मजा येते. आणि एकंदरीत जाहीरात प्रत्येक सेकंदाची किंमत मोजावी लागत असल्याने पॉलिश करून परफेक्ट बनवली असल्याने पुन्हा पुन्हा बघूनही फारसा वैताग येत नाही. माझ्या बर्याचश्या जाहीराती क्रिकेटच्या सामन्यादरम्यानच बघण्यात येतात, त्यामुळे एखाद्या मोठ्या क्रिकेट दौर्यादरम्यान दोनचार ओवरनंतर पुन्हा पुन्हा लागूनही पन्नास वेळा बघितली जाऊनही बोअर नाही होत..
अवांतर - ती हा हा मै क्रेझी हू माझ्याही आवडीची, पण मला ते आजवर आय अॅम ए क्रेझी गर्ल असे वाटायचे...
Pages