जाहिराती - मला प्रेमात पाडणाऱ्या !!

Submitted by मी मी on 12 February, 2014 - 13:28

काही जाहिराती मनाच्या किती जवळच्या वाटतात. काहींची गाणी आपलीशी वाटतात. काहीतल्या थीम तर काही केरेक्टर..काही काही जाहिराती पाहतांना तर हमखास आपल्या काही जवळच्या माणसांची आठवण येते. काही जाहिरातीतले वातावरण जुने दिवस आठवण करवून देतात काही स्वप्नील भविष्यात घेऊन जातात….

SBI Life च्या त्या जुन्या गाण्यावर आधारित जाहिरात मला नेहेमीच attract करायची

'हम जब होंगे साठ साल के …या गाण्याच्या चालीवर स्पेशली जेव्हा तो म्हणतो ….

लंबी सी एक गाडी मे फिर तुमको लेकर जाऊंगा
तुम अंदर से देखना बाहर और मै आईस्क्रीम खाउंगा

यावर अगदी मुरडत ती विचारते 'अच्छा , दांत होंगे क्या तुम्हारे ??

त्यावर तो "इन दांतो का क्या है मै सोने के दांत लगाउंगा
और फिर तुमको देख देख के बार बार मुस्काउंगा


आहा कसलं गोड अन रोमांटिक ना …

http://www.youtube.com/watch?v=HL6D-4dRbaw

हल्ली हल्लीच येतेय ती आणखी एक जाहिरात. सुपरटेक ची … कधी ऐकलेत का ह्याचे पूर्ण शब्द

तुम मेरी दुनिया सजाती हो
घर को घर बनाती हो

कभी हमको सिखाती हो
कभी खुद भूल जाती हो
घर को घर बनाती हो

कभी नखरे उठाती हो
कभी हौसला बढाती हो
तुम हर पल को स्पेशल बनाती हो
घर को घर बनाती हो …

आहा , एखादीला अश्या शब्दात कौतुक आणि एप्रिसिएशन मिळणार असेल तर ती जीव ओवाळून टाकणार नाही तरंच नवल.

http://www.youtube.com/watch?v=jvVargZXlMo

काही दिवसांआधी येणारी कोका कोला ची जाहिरात 'हां हां मै क्रेझी हुं' सुद्धा मस्त होती
त्याची catch line 'क्या आप दुनिया को खुश करने के लिये क्रेझी है' सार्थक करण्यासाठी त्यांनी त्यात टाकलेले ते खोडकर अन मस्तीचे प्रसंग.

" किसी को स्माइल देना, किसी को खुश कर जाना
अगर ये सब क्रेझी है तो हां हां मै क्रेझी हुं"

http://www.youtube.com/watch?v=jyEWtpYtpv4

आणि सर्फ एक्सलं च्या जाहिरातींबद्दल काय बोलायचे एकच Catch Line 'कुछ अच्छा करने के लिये अगर दाग लगते है … तो दाग अच्छे है ….' आणि त्यासाठी दाखवलेले ते चिमुकले त्यांची मस्ती आणि धमाल, cooool मॉम्स आणि सर्फ एक्सलं बास्स …

आत्ता आत्ता लागतेय ती सर्फ एक्सलं ची जाहिरात पाहिलीये काय तुम्ही … ?? त्यातल्या प्रत्येक मुलाला आणि त्या शब्दांना ऐकून मला माझा एक एक दोस्त आठवतो आता हेच बघा ना ….

"ये मेरा दोस्त है, वांटेड मोस्ट है
चाबी वाला टॉय है फनी फनी बॉय है

बड़ा मजेदार यारों का यार … "

येतेय का कुणाची आठवण ??

आणि हे आणखी एक …

' ये मेरा दोस्त है, सब का होस्ट है
हेल्प को रेडी है सबका बड्डी है

बड़ा मजेदार यारो का यार "

हे तीसरे ऐका... कुणीतरी आठवणार नक्कीच

ये मेरा दोस्त रॉकेट ऑलमोस्ट
नॉटी नॉटी खुश कहीं जाये घुस
बड़ा मजेदार यारों का यार....

http://www.youtube.com/watch?v=UCmxnp4ia7A

कसली धमाल असते नाही कुठले शब्द मनात शिरतात कुठल्या भावना जीवाला भावतात काहीच सांगता येत नाही निदान मला तरी होतं असं
काहीतरी पाहून कुणीतरी आठवत राहतं. काहीतरी ऐकून असं छान छान वाटत राहतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/2738>>> मयी हा बघ तो धागा, या धाग्यावर आवडात्या आणि नावडत्या दोन्ही जाहिरातींविषयी चर्चा आहे.>>>
याने काही फरक पडत नाही हो. तसे तर 'चित्रपट कसा वाटला' असा ही एक धागा आहेच पण आम्ही बै 'चार ओळींचा' नवा धागा काढणारच. Proud

शोधा म्हणजे सापडेल>>> एकदम बरोबर. पण त्रास कोण घेतो?

त्या धाग्यात अन या धाग्यात फरक आहे तिथे आवडीच्या अन नावडीच्या जाहिरातीबद्दल चर्चा झालीये इथे मी नुसत्याच आवडत्या अन त्यातही त्यातल्या शब्दांबद्दल बोलतेय त्यातल्या त्यात मी वर लिहिलंय ते सगळ मला लिहायचं होतं त्या नुसत्याच दोन-चार ओळी नाहीत

धागा कुठलाही असू दे कुणी काहीही लिहू दे आपण उडी घेऊन काहीतरी खोचक बोलायचंच हो कि नाही फकीर ?

'tanishk'chi 'mai apako daddy bulaaun?' vali advt. jamach avadali ani tyavar kalachya lokarangamadhe Dr. Sanjay okanchahi lekha alay. 'janat manat' madhye.

लोक 'लेन' ची शिस्त का पाळत नाहीत किंवा भारतात ट्रॅफिकचे प्रॉब्लेम का आहेत हे या धाग्यावरून(सर्वसामान्य मानसिकता) समजते. Proud

Pages