५) Are you out of your sense? Yes! It's Sensory Integration Disorder

Submitted by Mother Warrior on 11 February, 2014 - 21:24

याआधीचे लेख :
Autism.. स्वमग्नता..
ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?
Autism - लक्षणे व Evaluation
Autism - निदानानंतर..

आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, मानवाला पंचेंद्रीये असतात. स्पर्श, स्वाद, गंध, आवाज व दृश्य.( sight, smell, taste, touch, sound).
पण मी तुम्हाला सांगितले कि ती माहिती चुकीची आहे तर?

हो, आपल्याला वर नमूद केलेल्या पाच इंद्रियांच्याखेरीज अजून दोन लपलेले(हिडन) सेन्सेस असतात.

  1.  Vestibular - our sense of balance that is regulated by the inner ear. म्हणजे असं बघा, आपण बसमध्ये बसलो आहोत, बस डावीकडे वळाली तर आपण उजवीकडे कळतो कि नाही? (इनर्शिआमुळे) पण आपल्याला कशानेतरी कळते कि आपण जास्त उजवीकडे झुकलो आहोत. व आपण सरसावून नीट बसतो. हे कसे कळते? जेव्हा आपण एका बाजूस जास्त झुकतो (समजा दोरीवरून balance साधत चालत असताना) तेव्हा आपल्या त्या बाजूच्या कानातील फ्लुइड वाढते. व मेंदू त्याप्रमाणे सुचना देऊन शरीराची पोझिशन सुधारतो. या vestibular sense मुळेच आपल्याला आजूबाजूचे भान येते. आपण शरीराचा balance करत आहोत कि नाही, आपल्या शरीराच्या हालचाली या सर्व आपल्याला या  सेन्समुळे ज्ञात असतात. 
  2. Proprioceptive - या सेन्समुळे आपल्याला आपले हात, पाय अशासारखे अवयव कुठे आहेत हे समजते. आपल्या शरीरातील स्नायू, ligaments, joints हे आपल्या शरीराला ती माहिती पुरवत असतात. 



Autism spectrum वर असलेल्या मुलांचे वरील सातपैकी काही सेन्सेस हे नॉर्मल माणसाप्रमाणे काम करत नाहीत. त्यामुळे ही मुले कधी कान झाकताना दिसतात, तर कधी डोळ्यापुढे हाताने विचित्र हातवारे करतात, तर कधी दाणकन अंग टाकून देतात. हे असं का होते? माझ्या मुलाचे विचाराल तर तो आवाज व दृश्य याबाबतीत हायपरसेन्सेटिव्ह आहे. म्हणजे तो कधी कान झाकतो , कधी जाळीच्या खुर्चीतून बघायला त्याला आवडते. स्पर्श किंवा tactile sense बद्दल बोलायचे तर तो hyposensetive आहे. त्याला सोफ्यावर अंग फेकून द्यायला खूप आवडते. आवडते म्हणजे दिवसातून एकदा दोनदा तो असे करतो का? तर नाही. तो उठल्यापासून झोपेपर्यंत अगणित वेळा असे करत असतो. तसेच मार लागलेला कळत नाही. हे ही या सेन्स बद्दल असलेल्या कमी प्रतिसादामुळे होते. मेंदूपर्यंत हि सुचना जातच नाही.

स्वाद - खाणे. ही एक लढाई असते. कारण एरवी मुलांना खाण्याची चव आवडली तर तो पदार्थ मुलं खातात. पण स्पेक्ट्रमवर असलेल्या, Sensory Integration Disorder असलेल्या मुलांसाठी अजून एक factor विचारात घ्यावा लागतो. टेक्श्चर. पदार्थाचे टेक्श्चर कसे आहे यावर बर्याच गोष्टी ठरतात. त्यामुळेच ही मुलं अतिशय  Picky Eater असतात. त्यांना खायला घालणे ही त्यांच्या आयांसाठी अगदी जिकिरीची गोष्ट असते. तोंड उघडायाचेच नाही ही पहिली पायरी. उघडले तरीही जिभेला पदार्थाचा स्पर्श होताच सगळे बाहेर काढून टाकणे. मग त्यापुढे अजिबातच तोंड न उघडणे. vicious circle. जरी पदार्थ, त्याचे टेक्श्चर आवडले तरी तो पटापटा चावून सर्व ताट साफ करेल तर तसे नाही. तो पदार्थ गालात धरून बसणे. तुम्ही म्हणाल सगळीच मुले अशी करतात. तर नाही. तुम्ही माझ्या घरी या व बघा जेवणाच्या वेळेसची माझी कसरत. हे सारखे नव्हे. या सगळ्या सेन्सरी गोष्टींमुळे माझ्या मुलाला क्रंची, क्रिस्पी पदार्थ खूप आवडतात. लहान मुलांचे staple food मऊ गुरगुट्या भात अजिबात खात नाही माझा मुलगा. 

फक्त खाण्याबद्दलच नव्हे, आपल्याला कल्पना करता येणार नाही इतके या मुलांचे आयुष्य अवघड असते या sensory integration disorder मुळे. प्रखर प्रकाशात , गोंगाटाच्या ठिकाणी प्रचंड unsettling, uncomfortable वाटते या मुलांना. 

एक एक गोष्ट हळूहळू explore करत असल्याने व मुळातच सेन्सेस व्यवस्थित काम करत नसल्याने सतत जीभेशी खेळणे, तोंड वेडेवाकडे करणे, एखाद्याच गोष्टीला नको तितके attach  होणे, सततची पळापळ, चेहर्यासमोर हाताने काहीतरी अदृश्य हातवारे करणे, डोळ्याच्या कडेने बघणे, गोल गिरक्या घेणे, अतिशय अडगळीच्या जागेत कमी जागेत खुपसून बसणे, धोक्याची कल्पना नसणे,  दुसर्या व्यक्तीस बिग हग देताना अतिशय घट्ट कवटाळणे अशासारखे प्रकार घडत असतात. 

Autism झालेल्या मुलांच्या आयुष्यात Sensory Integration Disorder ने अगदी ठाण मांडलेलेच असते म्हणा ना..  

-स्वमग्नता एकलकोंडेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे सगळे लेख वाचतेय. वाचत रहाणार.
ज्ञानात खूप भर पडतेय.>>>+++++१११
तुम्हाला, अंजू ताईंना आणि तुमच्या सारख्या (झगडणार्‍या, मुलांना समजून घेणार्‍या) समस्त आई-वडीलांना सलाम.

स्वमग्नता, सगळेच लेख अधाशासारखे वाचतेय. 'अनुभूती' ह्याचा किती म्हणजे किती वेगळा अर्थ लागतोय ते शब्दांत सांगता येत नाहीये... असं उलटं-पालटं होऊन गेलय.
अजून काय म्हणू... अशा खाशा पिल्लांना तुमच्यासारखेच... खाशा मासाहेब आणि खासे बाबाबहाद्दुर मिळोत.... हीच प्रार्थना.

_/\_

अशाच एका मुलीची गोष्ट 'जॉर्जी 'वाचनात आली होती ( खरी गोष्ट ) . हि मुलगी अमेरिकेत असून तिने फ्रांस मध्ये tratment घेतली .
आता तिच्यावर उपचार होऊन ती व्यवस्थित आहे. मायबोलीकर 'पशुपती ' ह्यांनी ती अनुवादित केली होती तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही त्यांना संपर्कातून मेल करू शकता .

अतिशय माहितीपूर्ण लेखमालिका! खूप माहिती मिळत्ये.

१-२ मैत्रिणींच्या मुलांना हा टेक्शरचा प्रॉब्लेम होता, त्यांना ऑटिझम नसताना! असंच तु म्ही म्हणता तसं फक्त क्रंची पदार्थ खायचे ते. They have grown out of it for the most part now.

@Anvita :अशाच एका मुलीची गोष्ट 'जॉर्जी 'वाचनात आली होती ( खरी गोष्ट ) . हि मुलगी अमेरिकेत असून तिने फ्रांस मध्ये tratment घेतली .
आता तिच्यावर उपचार होऊन ती व्यवस्थित आहे. मायबोलीकर 'पशुपती ' ह्यांनी ती अनुवादित केली होती तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही त्यांना संपर्कातून मेल करू शकता .>>>>कृपया या गोष्टीचा दुवा द्याल द्याल काय ?

सर्वांचे आभार.

रायगड, तुम्ही म्हणता ते खरे आहे. ऑटीझम नसताना फक्त सेन्सरी प्रोसेसिंग्/इंटीग्रेशन डिसॉर्डर असू शकते.
खरेतर सर्वांनाच कमीजास्त प्रमाणात सेन्सरी प्रोफाईल असतेच. पण त्यामुळे त्या व्यक्तीचे दैनंदिन आयुष्य डिस्टर्ब होत असेलव नीट एकाग्र मन होत नसेल तर मग त्याला डीसॉर्डरचे लेबल लागते.

अन्विता, मला देखील लिंक द्याल का? त्यांना कुठे शोधावे?

पशुपती ह्यांनी ती गोष्ट कोठेही माझ्यामते प्रसिद्ध केली नाहीये . त्यांच्याकडील हस्त लिखित मी वाचले आहे .

खूप सुंदर, उत्तम. जणू मी माझ्या मुलाबद्दल वाचतेय. फक्त त्याला hug द्यायला आवडत नाही, क्रंची आणि क्रिस्पी पदार्थ- करेक्ट. कधी कधी तो मऊभात आणि खिचडी खातो पण बरोबर ताक आणि लसणीचे तिखट आवडते, पण हे क्वचित, त्याला व्यवस्थित पोषणमुल्ये पोटात जाण्यासाठी रोजचीच लढाई असते.
राग आला तर माझे केस ओढणे, गळयात जोरात बोटे खुपसणे हे चालूच असते पण शक्यतो मलाच त्रास देतो, बाबाला क्वचित आणि बाकी कोणाला नाही देत तसा त्रास.

अ‍ॅडिशनल दोन सेन्सेसची माहिती अगदीच नवीन. म्हणजे ओळखीचे असूनही लक्षातच न आलेले. प्रत्येक लेखागणिक पालकांची क्षणोक्षणी किती परिक्षा होत असेल ते आता तीव्रतेने समजायला लागलंय.

तुम्हाला, अंजू ताईंना आणि तुमच्या सारख्या (झगडणार्‍या, मुलांना समजून घेणार्‍या) समस्त आई-वडीलांना सलाम. >>> + १००

खूप छान माहिती कळली ह्या लेखातून.
तुम्ही खरंच हे लेख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करा. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचायला हवी. counselling ची गरज पालकांइतकीच आपल्या सर्वांना आहे. इतरांच्या नजरांना, प्रश्नांना एक्स्प्लनेशन देताना वॉरियर पालकांची शक्ती आणि संयम पणाला लागू शकतो. आजूबाजूच्यांचे थोडे सहकार्य मिळाले तरी पालकांसाठी ही लढाई काही टक्के सोपी होईल.

तुमचे आतापर्यंतचे सर्व लेख वाचले. खूप सोप्या प्रकारे (अवघड) माहिती सांगत आहात व स्वतःच्या अनुभवांची जोड घालून माझ्यासारख्या वाचकांना एका वेगळ्या विश्वाचे दर्शन देत आहात. ऑटिस्टिक किंवा स्वमग्न मुलांबरोबर किंवा व्यक्तींबरोबर ह्या अगोदर वावरले आहे, त्यांच्याशी - त्यांच्या पालकांशी बोलले आहे, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. परंतु तुम्ही ज्या तपशीलाने इथे माहिती देत आहात तसे वाचन अद्याप होऊ शकले नव्हते.
तुम्ही खरोखरी हे सर्व लेख वर्तमानपत्रांत द्यायचे जरूर बघा.
तुमच्या वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा!

अवघड विषय किती साध्या सोप्या भाषेत समजवून दिला आहे!

प्रायमरी केअरगिवर असणार्‍या आई किंवा वडलांच्या पेशन्सबद्दल, मेहेनतीबद्दल काहीही लिहिण्याला शब्द नाहीत.

तुमचे सगळे लेख खूपच माहितीपूर्ण आहेत.खूप नवीन माहिती कळतेय.

तुम्हाला, अंजू ताईंना आणि तुमच्या सारख्या (झगडणार्‍या, मुलांना समजून घेणार्‍या) समस्त आई-वडीलांना सलाम. >>> + १००

तुम्ही खरोखरी हे सर्व लेख वर्तमानपत्रांत द्यायचे जरूर बघा.
तुमच्या वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा!>>>> +१०००००००००००००००००

thanks सर्वांना.
मी एक महत्वाचा मुद्दा लिहायला विसरले, या सेन्सरी केओसमुले आपल्याला ज्या गोष्टी सहज कळतात त्या या मुलांना कळत नाहीत. उदा: वेल्वेटचे कापड नुसते पाहूनच आपल्याला कळते त्याचा स्पर्श किती मऊ असेल ते. किंवा झाडाचे खोड अथवा sandpaper किती खरखरीत असेल हे. हे या मुलांना शिकवावं लागते. .

त्याच्या सेन्सरी नीड्स पुर्या करणे हा त्याच्या ऑक्युपेशनल थेरपीस्टपुढे आव्हान असते. ती व आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या activities शोधात असतो.. उदा: प्लेडो(घरगुती मळलेली कणिक दिली तरी चालते) मध्ये खेळणे. एका बॉक्स मध्ये भरपूर बीन्स ओतून त्यात त्याला खेळायला बसवणे, वाळू - sand box मध्ये छोटी खेळणी लपवून ती त्याला शोधायला लावणे. शेव्हिंग क्रीमचा फोम करून त्यातून चित्रे काढायला लावणे (तो तोंडात जात नाही ना अर्थातच बघणे) , थोड्याश्या जड खेळण्यांची बॉक्स दोरी लावून त्याला ओढत न्यायला सांगणे, wheelbarrow walking - म्हणजे आपण त्याचे पाय धरायचे व मुलाने हातावर चालायचे, भल्या मोठ्या बॉल पूल मध्ये मुलाला हालचाल करायला लावायचे, अतिशय इलेस्तिक अशा स्ट्रेची प्रकारच्या कापडाच्या अरुंद टनेल मधून त्याला रांगायला सांगणे, मऊसर ब्रशने अंग हलके घासून काढणे ( याने proprioceptive सेन्सला फायदा होतो)

अशा सारख्या कैक activities आम्ही त्याच्या कडून करून घेणे अपेक्षित असते. जितके जास्त कराल तितके मुलाचा आपल्या स्वत:च्या शरीराचा, अवयवांचा अवेअरनेस वाढतो.

अशाच एका मुलीची गोष्ट 'जॉर्जी 'वाचनात आली होती ( खरी गोष्ट ) . हि मुलगी अमेरिकेत असून तिने फ्रांस मध्ये tratment घेतली .>>>>>
जॉर्जी ची स्टोरी या पुस्तकात वाचता येईल. "Sound of a miracle" ले. Annabel Stehli (१९९३) परंतु त्या गोष्टीविषयीची ही प्रतिक्रिया देखील वाचण्यासारखी आहे.
http://www.bellaonline.com/articles/art34538.asp

____/\_____

तुमच्या प्रत्येक लेखातुन तसेच तुमच्या व अन्जु ह्यांच्या प्रत्येक प्रतिसादातुन खुप शिकायला मिळत आहे, असंख्य बारकावे माहिती होत आहेत.
तुमच्या वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा! >> अनुमोदन

sureshshinde , मी गोष्ट वाचली होती पण कोणत्या काळातली आहे हे माहित नव्हते . कदाचित आता त्यांना त्याचा उपयोग होणार नसेल . तुम्ही dr आहात तुम्हाला जास्त कळेल . मला आपले वाटले कि स्वमग्नता ह्यांना काही मदत झाली तर म्हणून लिहिले . बाकी मला स्वत: ला autism ह्या विषयातील काहीच माहिती नाही .

आपले सर्व लेख वाचले. प्रखर मानवी अनुभवांचे इतके उत्कट आणि प्रत्ययदायी संहिता-लेखन मी प्रथमच वाचत आहे असे मला जाणवले. त्याखातर आपले मनःपूर्वक अभिनंदन! स्वतःचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याच्या, तसेच प्राप्त परिस्थितीत मुलाकरता, स्वतःकरता, तसेच समाजाकरता निरंतर आनंदनिर्मितीची साधने शोधत राहण्याच्या आपल्या ह्या प्रयासास माझ्या हार्दिक शुभेच्छा!

( प्रतिसाद आवरून घेतलेला आहे. )

बापरे.
नरेंद्र गोळे, स्पष्ट सांगते, राग मानून घेऊ नका.

माझे सर्वात महत्वाचे व एकमेव उद्दीष्ट आहे ऑटीझमबद्दल माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे. मी जर हे असे शब्द वापरून लेख लिहायला गेले तर निम्मी लोकं निम्म्या लेखात गळतील. शिवाय मला मुलाच्या जबाबदारीमुळे खरोखर इतका वेळ नाही माझ्यापाशी, हे असे शब्द शोधत बसण्यास. तुम्ही आयते शोधून दिलेत तरी मी वापरायची शक्यता कमी कारण मला माझे लेख सोपे , सामान्य जनतेला समजेल असे लिहायचे आहेत, कारण आधीच हा विषय क्लिष्ट आहे.

माफ करा, मी इतकी स्पष्ट बोलत नाही कधी. पण मला पर्याय नाही. मी नाही अशी लिहू शकत.

(तुमच्या माहितीसाठी पिडीयाशुअर हा ब्रँड आहे. ब्रँडनेमचे मराठीकरण करणे चुकीचे आहे. )

>>माझे सर्वात महत्वाचे व एकमेव उद्दीष्ट आहे ऑटीझमबद्दल माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे. मी जर हे असे शब्द वापरून लेख लिहायला गेले तर निम्मी लोकं निम्म्या लेखात गळतील. शिवाय मला मुलाच्या जबाबदारीमुळे खरोखर इतका वेळ नाही माझ्यापाशी, हे असे शब्द शोधत बसण्यास. तुम्ही आयते शोधून दिलेत तरी मी वापरायची शक्यता कमी कारण मला माझे लेख सोपे , सामान्य जनतेला समजेल असे लिहायचे आहेत, कारण आधीच हा विषय क्लिष्ट आहे.
>>

अगदी बरोबर आहे, कृपया तसं काही करू नका. मला तरी तसे लेख वाचवणार नाहीत.
(मागे स्वतः नरेंद्र गोळे यांनी बहुतेक कॅन्सरवर लेख लिहिले होते. पण त्यातल्या भाषेमुळे त्याला म्हणावा तसा लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना स्पष्ट विनंती करूनही त्यांनी ऐकलं नाही.)

अगदी बरोबर आहे, कृपया तसं काही करू नका. मला तरी तसे लेख वाचवणार नाहीत.
>>
+१
हे आहे हे असचं राहू द्यात प्लिज!
हे असच आहे म्हणूनच समजतय आणि म्हणूनच आणखी वाचलं जातंय!

Back to top