मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-
चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश
’पौगंडावस्थेतील प्रेमभावना’ हा अनुभव सार्वत्रिक असला, तरी त्याला आपल्या मराठी कलाविश्वात फारसे स्थान दिले गेलेले आढळत नाही. या विषयाला पहिल्यांदा न्याय दिला, तो मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ या कादंबरीने. याच कादंबरीवर पुढे या नावाचा सिनेमाही आला.
रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाचा हा चौथा सिनेमा. या आधी नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक या चित्रपटांतून त्याने आपले मेरीट सिद्ध केलेले असल्यामुळे ’टाईमपास’ सिनेमाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची काही प्रमाणात पूर्ती ’टाईमपास’ करतो.
ही कथा आहे दगडू शांताराम परब (प्रथमेश) आणि प्राजक्ता मनोहर लेले (केतकी) यांची. दगडू हा एक उडाणटप्पू , दहावीत वारंवार नापास होणारा आणि दिवसभर त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करणारा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात, आणि कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवू पाहत असतात. दगडू पुन्हा नापास झाल्याने ते चिडून त्याला मारहाण करतात, आणि दगडू नाईलाजाने पेपर टाकण्याचे काम करायला सुरूवात करतो.
दगडूचे मित्रमंडळ- बालभारती, कोंबडा आणि मलेरिया अशी टोपणनावे असणारे टोळके पास होऊन कॉलेजात जाते. ते दगडूला फूस लावून प्राजक्ता नामक वर्गातल्या गुणी, सालस, हुशार मुलीला ’टाईमपास’ म्हणून पटवायची फूस लावतात. दगडू तसे करायचे ठरवतो.
दगडू आणि प्राजक्ता यांची ही ’टाईमपास’ म्हणून सुरू झालेली प्रेमकथा पुढे काय वळणे घेते, ते पडद्यावर पाहणेच योग्य ठरावे.
दगडूची प्राजक्तापर्यंत पोहोचण्याची धडपड, त्याला आलेल्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे विनोद, सुश्राव्य गाणी आणि मजेदार संवाद- यामुळे चित्रपट मध्यंतरापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो. कथानक आपल्याला अपेक्षित असलेल्या वळणांनीच पुढे जात राहते, मात्र पुर्वार्धातल्या वेगाने नाही, तर काहीसे रेंगाळत. चांगले संकलन करून चित्रपटाची लांबी कमी केली असती, तर त्याचा एकंदर ’इफेक्ट’ वाढला असता असे वाटते.
सिनेमात दगडू आणि प्राजक्ता या भूमिका प्रथमेश आणि केतकीच्या अनुक्रमे ’बालक-पालक’ आणि ’शाळा’ या चित्रपटातल्या भूमिकांचेच extension आहे, असे मला वाटले. या दोन्ही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे, आणि आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: मध्यमवर्गीय घरातली सज्जन, पापभीरू आईवडिलांना घाबरणारी मुलगी केतकी माटेगावकरने सुरेख रंगवली आहे. या अभिनेत्रीकडून भविष्यात भरपूर अपेक्षा आहेत ! प्राजक्ताच्या पालकांच्या भूमिकेत वैभव मांगले आणि मेघना एरण्डे यांनी चांगले काम केले आहे. विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते. प्राजक्ताला गायन शिकवणारी स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ यांचे उपकथानक हे तसे अनावश्यक असले, तरी त्यामुळे एकंदर चित्रपटाच्या ’फ्लो’ मध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
चित्रपटाचे कथानक कोणत्या काळात घडते, ते स्पष्टपणे सांगीतलेले नसले, तरी जागोजागी काही क्लू दिलेले आहेत. दगडू आणि कंपनीने प्राकक्ताच्या वडिलांना ’शाकाल’ म्हणणे, एका दृष्यात ’दयावान’ सिनेमाची जाहिरात इ. वरून हे ऐंशीच्या दशकातले कथानक आहे, हे सहज लक्षात येते.
चित्रपटातली संगीताची बाजू भक्कम आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत. विशेषत: ’मला वेड लागले... प्रेमाचे’, काहीसे भडकरित्या चित्रित केलेले आगरी गाणे- ’ही प्पोरी साजुक तुपातली’ आणि ’फुलपाखरू’ ही गाणी चांगली आहेत.
एकंदर चित्रपट सर्व आघाड्यांवर समाधानकारक असला, तरी खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. एकदा पहायला हरकत नाही, पाहिला नाही तरी फारसे बिघडत नाही, असा.
माझ्याकडून (पाचपैकी) तीन स्टार्स.
समाजात घडणारी गोष्ट वाईट आहे
समाजात घडणारी गोष्ट वाईट आहे म्हणून दाखवायची नाही??
काहीतरी लॉजिक चुकतेय असे नाही वाटत??
म्हणजे एखाद्या सिनेमात खून, बलात्कार, भ्रष्टाचार, गुंडागर्दी, जातपात, उच्चनीचता, गँगवार, काळाबाजार.... किंवा गेला बाजार धूम्रपान वा मद्यपानही दाखवायचे नाही का?
अरे अश्याने रामायण आणि महाभारत मालिकेवरही बंदी येईल. फार तर फार एखादा हम आपके है कौन सारखा सिनेमा या आपल्या सेन्सॉरच्या कात्रीतून सुटेल.
तर मूळ मुद्दा हा आहे की समाजात घडणारे जे दाखवले जातेय त्यातील चुकीच्या अंगाचे समर्थन वा उदात्तीकरण केले जातेय का? या सिनेमात ते तसे केले आहे का? माझे वैयक्तिक मत -- नाही !
पाहिला मी टाईमपास परवा.
पाहिला मी टाईमपास परवा. चांगला वाटला! शेवटी तो सिनेमा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे! हिंदी मध्ये तद्दन गल्लाभरू illogical सिनेमे बघताना आपण काही विचार करतो का? डोकं बाजूला ठेवून २-३ तास मनोरंजनासाठी पहावे असे सिनेमे असतात हे! तसाच बघायचा आणि सोडून द्यायचा!आणि माझ्या मते तरी ह्यात कोणत्याही वाईट गोष्टीचं उद्दातीकरण केलं नाहीये!साधी टीनेज प्रेमाची गोष्ट! ती ही बऱ्यापैकी रियलीस्टिक! त्याचा कशाला किस पाडायचा? आणि जर असे हलकेफुलके, सिरीयसली न घेण्याचे सिनेमे आवडत नसतील तर पाहू नयेत!
व्यक्तिश: मला हा सिनेमा बीपीपेक्षा जास्त आवडला!
काही लोकांचे ब्रिगेडी विचार
काही लोकांचे ब्रिगेडी विचार वाचून त्यांच्या बौद्धीक कुवतीची कीव येते. त्यांच्या बाल्'सुलभ' विचारांचा प्रतिवादही करण्याची ईच्च्छा होत नाही. म्हणूनच कुणाचे नाव न घेता एक सामान्य निरिक्षण नोंदवतो आहे. मोठे व्हा रे...मोठे व्हा....
खरेच मोठे व्हा. ईथे काहि
खरेच मोठे व्हा. ईथे काहि मंडळि फक्त एकमेकांना टोमणवायला येतात. कुठलेच धागे यांच्या "शहाणपणा" तुन वाचलेले नाहित. आणि खरेच प्रतिवाद करायचि ईच्छाहि होत नाहि. काहि ठराविक नावे आणि त्यांचि तिच तिच भांडणे. Grow up!
बाकि सिनेमा छान वाटला. मनोरंजन आणि काहि प्रमाणात रिअलिस्टिकहि.
अभिषेक, >> तर मूळ मुद्दा हा
अभिषेक,
>> तर मूळ मुद्दा हा आहे की समाजात घडणारे जे दाखवले जातेय त्यातील चुकीच्या अंगाचे समर्थन वा उदात्तीकरण
>> केले जातेय का? या सिनेमात ते तसे केले आहे का? माझे वैयक्तिक मत -- नाही !
पटेश.
मात्र उदात्तीकरणाबद्दल मतवैविध्य असू शकतं.
आ.न.,
-गा.पै.
मुद्दा हा आहे कि जर लहान वयात
मुद्दा हा आहे कि जर लहान वयात मुल प्रेम-बीम-लफड करत बसली, तर अभ्यास, करियर आणि नोकरी कधी करणार? म्हातारपणी??????
गा पै, नक्कीच याबाबत
गा पै,
नक्कीच याबाबत मतवैविध्य असू शकते, म्हणून तर माझे वैयक्तिक मत असे लिहिलेय.
एकंदरीत मध्यांतरानंतरचा चित्रपटाचा बाज त्याचा क्लायमॅक्स अन तो पाहताना त्या दगडू बद्दल किंचित वाईट वाटतानाच त्या मुलीच्या बापाचेही काही चुकले नाही असे वाटणे, अरेरे चित्रपटात त्यांचे जमलेले दाखवायला हवे होते असे न वाटणे, त्या केतकीच्या दिदिने दगडूला विचारलेला प्रश्न की ती तुला का आवडते, याचे दगडूला न देता आलेले उत्तर, दगडूच्या बापानेही त्याला उगाचच सपोर्ट न करणे, दगडूने कुठलाही गैर मार्गाचा अवलंब न करता मी आता शिकून मोठा होईन असे दिलेले आश्वासक उत्तर.. खरे तर याला चित्रपटातून जाणारा चांगला संदेशही बोलता येईल, कारण कित्येक सडाफटींग आशिक वा रोडसाइड रोमिओ अश्यावेळी हिंसक अन विकृत मार्ग अवलंबवतात, जसे त्या मुलीचा पाठलाग करणे, रस्त्यात अडवने, ब्लॅकमेल करणे वा इजा पोहोचवणे वगैरे.. जे दगडूने त्यात केले नाही. तर अश्या मेंटेलिटीच्या मुलांनी हा चित्रपट पाहिला तर त्यातून ते चांगला बोधही घेतील असा सकारात्मक विचार का नाही आपण करत..
मधुरा +१०००
मधुरा +१०००
अभिषेक, तुमचं हेही पटलं! पण
अभिषेक,
तुमचं हेही पटलं! पण सगळेजण तुमच्यासारखा सकारात्मक विचार करत नाहीत. लोकं नेमकं नको ते उचलतात!
बाकी कितीही मतभेद असोत, जगाला अभिषेकसारख्यांची गरज आहे, हे मात्र नक्की.
आ.न.,
-गा.पै.
>>तुमचं हेही पटलं! पण सगळेजण
>>तुमचं हेही पटलं! पण सगळेजण तुमच्यासारखा सकारात्मक विचार करत नाहीत. लोकं नेमकं नको ते उचलतात! +१०१
माझ्या आजीचे एक वाक्य अजुन आठवते "चांगल्याला शाळा लागते, वाईटाला नाही"
ती आता असती तर तिला कळाले असते की शाळेत सुद्धा आता फार काही चांगले राहिलेले नाही.
माझ्या मित्रांच्या आग्रहाखातर मी "सत्या", "पेज थ्री" सारखे चित्रपट पाहिले, पण का पाहिले असे वाटू लागले.
त्यांचे म्हणणे होते की समाजात किती वाईट आहे ते दाखवले म्हणजे लोक तसे करणार नाहीत.
पण हा विचारच अतिशय चुकीचा आणि फालतू आहे. कारण अनेक लोक नेमके नको तेच उचलतात
आणि माफ करा पण ते "ब्रिगेडी" वगैरे विशेषणे येथे अगदीच गैरलागू आहेत.
आमच्या काकाचे काय जाते, दाखवायचे ते दाखवा, करायचे ते करा.
वि.सू. : ही सर्व मते अगदी जनरल आहेत, टाईमपास बद्दल नाहीयेत.
टिपी बराच बरा
टिपी बराच बरा वाटला.
(दुनियादारीचं जे माकड केलं होत झीवाल्यानी तेव्हापासुन तर अपेक्षाच नव्हती.)
बर्याच ठिकाणी रवी जाधव टच दिसतोय.
डायलॉग्स परफेक्ट आहेत बर्याच ठिकाणी.
वैभव मांगलेच कॅरेक्टर उगाचच कशात काही नसताना दगडुची थट्टा वै करेलस फारसं पटलं नाही.
मध्यंतरानंतर जरासा रेंगळलाय.
मुद्दा हा आहे कि जर लहान वयात
मुद्दा हा आहे कि जर लहान वयात मुल प्रेम-बीम-लफड करत बसली, तर अभ्यास, करियर आणि नोकरी कधी करणार? म्हातारपणी??????>>>>>>>>>>>>> त्या त्या वयात त्या त्या गोष्टी बरोबर होतात....त्याची काळजी कशाला??? प्रत्येकाच्या लाईफ मधे ही फेज येते आणि निघुन जाते....शहाणे असतात ते सर्व सांभाळुन नीट पुढे जातात....नसतात ते तिथेच राहतात....
कोणाला हे करु नको, वाईट आहे, संस्कार, नीतीमुल्य या गोष्टी कितीही शिकवुन सांगितल्या तरी कोणी ते करत नाही अस होतच नाही....
मुव्ही आहे तो.....बघा आणि सोडुन द्या....नाही आवडला तर नाही....आवडला तर आवडला.....पैसे घालवतो ना आपण बघायला?? मग एन्जॉय करायचं जे दिसेल ते......तो बघुन आल्याच्या महिन्याभर नंतर पण किस का पाडा त्या गोष्टींचा??????????
त्या पेक्षा अभ्यास आणि कामं करा.......
(सर्व जण लिहितात हिरिहिरीने म्हणुन मी पण लिवला...... )
(सर्व जण लिहितात हिरिहिरीने
(सर्व जण लिहितात हिरिहिरीने म्हणुन मी पण लिवला...... डोळा मारा ) >> थोडे माझ्याकडून पण...
टाईमपास सिनेमा न आवडलेल्या/पटलेल्या किती जणांनी 'मी सिंधुताई सपकाळ' सिनेमा थेटर मधे जाऊन बघितला आहे?
मी पाहिला....सिंधुताई
मी पाहिला....सिंधुताई सपकाळ.......थेटरात....मला तर आवडला तो.....पण टिपी मी घरी पाहिला फुकटात.....
तेजस्पर्शाने दूर होई
तेजस्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षास असे आधार
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार
मना घडवी संस्कार
मना उद्धरी संस्कार मना भूषवी संस्कार
मना तेजवी संस्कार मना आकारी संस्कार
मना आधार संस्कार मना घडावी संस्कार
मना नीती दे संस्कार मना शांती दे संस्कार
मना बुद्धी दे संस्कार मना सिद्धी दे संस्कार
मना शक्ती दे संस्कार मना घडावी संस्कार
मनाचे ऐश्वर्या संस्कार मनाचे सौन्दर्य संस्कार
मना आदर्श संस्कार मना सदभाव संस्कार
मना विवेक संस्कार मना घडवी संस्कार
>> थोडे माझ्याकडून
>> थोडे माझ्याकडून पण...
टाईमपास सिनेमा न आवडलेल्या/पटलेल्या किती जणांनी 'मी सिंधुताई सपकाळ' सिनेमा थेटर मधे जाऊन बघितला आहे?
मी बघितला आहे, पण दुकानातून अधिकृत सीडी विकत घेउन.
पण दोन गोष्टींचा लावलेला संबंध समजला नाही. तो नसता बघितला तर ह्या सिनेमावर नकारात्मक टिप्पणी करण्याचा अधिकार नसता हे अजब तर्कशास्त्र आहे.
अश्या सिनेमांनी लहानपणीच
अश्या सिनेमांनी लहानपणीच मनावर बिंबवल जातंय कि जीवनात अभ्यास, चरित्र, विवेक, करियर, घरच्या मोठ्यांचा आदर हे महत्वाचं नाही, तर प्रेम करण (गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड असण) महत्वाच आहे आणि असच वागायचं असत. आणि हे संपूर्ण समाजाला घातक आहे.>> यावर लिहिलेली प्रतिक्रिया होती. समाज प्रबोधन करणारे सगळे मुव्ही बघून आपण तसे वागतो का किंवा तसेच मुव्ही बघतो का?
दोन तास एन्जॉय करण्यासाठी मुव्ही बघायचा आवडला तर ठीक नाहीतर सोडून द्यायचा. समाजाला घातक असणार्या खूप गोष्टी घर बसल्या सगळ्या चॅनल्स वरच बघायला मिळतात.
असे चित्रपट बघायला इझिली
असे चित्रपट बघायला इझिली एव्ह्लेबल आहेत (म्हणजे असे बनवले जातात) म्हणूनच ते लोक पाहतात न....आणि मग बिघडतात. वाईट बघायला लोकांना आवडत..दुसऱ्याच भांडण पाहायला आवडत पण चांगला संवाद पाहायला आवडत नाही पण जर वाईट गोष्टीचा पर्यायच नसेल तर लोक का बिघडतील? नका न बनवू असे सिनेमे....
नका न बनवू असे
नका न बनवू असे सिनेमे....>>>>>>>>>>>. असे म्हणजे कसे...मला वाटते मग कुठलाच मुव्ही बघायला नको.....मधुरा तुझा राग नक्की कशावर आहे.....टाईम पास मुव्ही मधे इतकं डोक्यात जाण्यासारख काय आहे कळत नाही...... अगदी सिनेमे बनवु नका या कनक्लुजन पर्यंत येण्याइतपत... आणि तो मुव्ही असतो ..पहायचा अन सोडुन द्यायचा...सदासर्वकाळ त्याचा विचार करुन लाईफ हेल का बनवायच?? आपण इथे काथ्याकुट करतो बावळटासारख आणि मुव्हीज बनवणारे आपल्यासारख्या लोकांच्या जिवावर जबराट पैसा कमव्तात.... आणि असे सिनेमे बनतच राहणार..तो व्यवसाय आहे लोकांचा..असे सिनेमे न बघायची सुरवात तुझ्या पासुनच होउदे...
२००
२००
उदय......तुला वेड लागले
उदय......तुला वेड लागले अंकांचे......
>>नका न बनवू असे सिनेमे
>>नका न बनवू असे सिनेमे +१०१
अनेक लोकांना हे असले बोललेले समजणार पण नाही एवढी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे दृकश्राव्य माध्यमांच्या बाबतीत.
बघा आणि सोडून द्या हे माबोवर लिहिणार्या सुज्ञ लोकांच्याबाबत होत असेल, समाजात मोठ्या प्रमाणावर चित्रपटांना / टि.व्हि. ला पाहून अनुकरण करणारे लोक जास्त आहेत. येथे जे लिहिले जात आहे ते केवळ माबोकरांपुरते मर्यादित नाही हे लक्षात घ्या.
एक सांगा चित्रपट हे माध्यम
एक सांगा चित्रपट हे माध्यम संस्कारासाठी आहे कि मनोरंजनासाठी ??
समाज प्रबोधन करणारे सगळे
समाज प्रबोधन करणारे सगळे मुव्ही बघून आपण तसे वागतो का किंवा तसेच मुव्ही बघतो का?
>>>>
पॉईंट आहे !
मुळात पोस्टर ट्रेलर प्रोमोज बघूनही एखाद्याला समजत असेल की टाईमपास हा नक्की कश्यावर आधारीत सिनेमा आहे तर तसे विचार न पटणार्यांनी मुळात तो सिनेमा बघायला वेळ आणि पैसा खर्च करावाच का? बस्स इथे येऊन त्यावर भाष्य करता यावे यासाठी हि किंमत मोजली जाते का?
एक सांगा चित्रपट हे माध्यम
एक सांगा चित्रपट हे माध्यम संस्कारासाठी आहे कि मनोरंजनासाठी ??
>>>>>>>>>......
माझ्यामते दोहोंचे माध्यम आहे.
पैकी संस्कारक्षम चित्रपटात मनोरंजन असावे किंवा नसावे हे दिग्दर्शक निर्मात्यांनी ठरवावे.
मात्र मनोरंजनात्मक चित्रपटातून चुकीचे संस्कार होऊ नयेत याची काळजी मात्र घ्यायला हवी. सेन्सॉर बोर्ड असलेच काही काम करते बहुधा जे त्यांचे करून झालेय.
आणि इथे सध्या मायबोली सभासदांचे सेन्सॉर बोर्ड या चित्रपटाला क्लीनचिट द्यावी की नाही हे ठरवतेय.
मात्र मनोरंजनात्मक
मात्र मनोरंजनात्मक चित्रपटातून चुकीचे संस्कार होऊ नयेत याची काळजी मात्र घ्यायला हवी.>>> एकदम बरोबर.
अभिषेक, काही अंशी तुमच म्हणण
अभिषेक, काही अंशी तुमच म्हणण पटतयं, पण
मात्र मनोरंजनात्मक चित्रपटातून चुकीचे संस्कार होऊ नयेत याची काळजी मात्र घ्यायला हवी.>>> प्रॅक्टीकली हे किती शक्य आहे ?? शेवटी निर्मात्याने काही संस्कारकेंद्र नाही उघडले तो नफाच पाहणार ना
प्रॅक्टीकली हे किती शक्य आहे
प्रॅक्टीकली हे किती शक्य आहे ?? शेवटी निर्मात्याने काही संस्कारकेंद्र नाही उघडले तो नफाच पाहणार ना>>>>>>>>>>>>>>>. मी ही वर तेच लिहिलेय ना.....
नफा बघताना इतरांच्या भावना
नफा बघताना इतरांच्या भावना दुखावू नयेत इतकंच.
>>मात्र मनोरंजनात्मक
>>मात्र मनोरंजनात्मक चित्रपटातून चुकीचे संस्कार होऊ नयेत याची काळजी मात्र घ्यायला हवी.
अगदी उभे राहून टाळ्या !!!
>>प्रॅक्टीकली हे किती शक्य आहे ?? शेवटी निर्मात्याने काही संस्कारकेंद्र नाही उघडले तो नफाच पाहणार
पुर्वी काय निर्माते नव्हते, त्यांना काही नफा तोटा नव्हता, तरीही दर्जेदार चित्रपट बनत होते ना.
आवारा, श्री ४२० सारख्या चित्रपटात देखील नायक गुंड झालेला दाखवला होता त्या काळात पण त्यामधे गुंडगिरीचे उथळ प्रदर्शन आणि प्रचार कमी होता, आणि हे कसे चांगले नाही यावर जास्त भर होता.
हेच सत्या, इ. सारख्या चित्रपटात असे आहे का ?
जिस देश मे गंगा बहती है सारखे चित्रपट ज्यामधे जबरदस्त सामाजिक आशय आणि संदेश होता तो काढताना काय राजकपूरने नफ्याचा फार विचार केला असेल काय ?
(कृपया राजकपूर आणि त्याच्या हिरोईनी याचे उदाहरण देऊन विषयाला कलाटणी देण्याचा वृथा प्रयत्न करू नये)
तुम्ही नफा म्हणा तोटा म्हणा काहीही म्हणा, पण कोणतेही दृकश्राव्य माध्यम समाजमनावर फार मोठा परिणाम करणारे असतेच असते आणि केवळ त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त वाढते. आर्थिक गणिताच्या गोंडस नावाखाली जबाबदारीपासुन पळ काढू नये.
याचा अर्थ सर्व चित्रपट संत मालिकेतले असावेत असाही नाही. प्रेमकहाण्या, हाणामार्या, इ. पुर्वी पण होत्याच चित्रपटात. पण त्यालाही संयत स्वरूपात सांकेतिक स्वरूपात दाखवत होते.
गेल्या अनेक काळापासुन सेक्स, व्हायोलन्स, आणि भावनिक अतिरेकीपणा दाखवणे खुप म्हणजे खुपच वाढले आहे.
एकंदरीतच पाश्चात्त्य संस्कृतीचे ८० च्या दशकानंतर जसे आक्रमण जास्तच वाढले तसे चित्रपटातली सभ्यता झपाट्याने कमी होत गेली.
समाज असा आहे तर चित्रपट असे येणारच असे जे म्हणतात ते तर अगदीच भयानक लॉजिक आहे.
मुळात समाजात वाईट गोष्टी खुप आल्या आहेत म्हणुन त्या अजुन दाखवायच्या ???
टि.व्हि वरील मालिका हा तर एक फारच मोठा विषय आहे.
वर जे म्हणतात की जर आवडत नाही तर पाहू नका. पण मुळात असे अनेक लोक आहेत की एकतर असा कंट्रोल करू शकत नाहीत आणि अनुकरणाच्या नादात भलते सलते काही करू शकतात. केवळ स्वतःचेच नाही तर आजुबाजुच्या लोकांचे आयुष्य पण धोक्यात आणू शकतात.
Pages