टीनएज प्रेमाची गोष्ट : टाईमपास (टीपी)

Submitted by ज्ञानेश on 5 January, 2014 - 05:15

मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-

चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश

timepass-movie-dailogue.jpg

’पौगंडावस्थेतील प्रेमभावना’ हा अनुभव सार्वत्रिक असला, तरी त्याला आपल्या मराठी कलाविश्वात फारसे स्थान दिले गेलेले आढळत नाही. या विषयाला पहिल्यांदा न्याय दिला, तो मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ या कादंबरीने. याच कादंबरीवर पुढे या नावाचा सिनेमाही आला.
रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाचा हा चौथा सिनेमा. या आधी नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक या चित्रपटांतून त्याने आपले मेरीट सिद्ध केलेले असल्यामुळे ’टाईमपास’ सिनेमाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची काही प्रमाणात पूर्ती ’टाईमपास’ करतो.

ही कथा आहे दगडू शांताराम परब (प्रथमेश) आणि प्राजक्ता मनोहर लेले (केतकी) यांची. दगडू हा एक उडाणटप्पू , दहावीत वारंवार नापास होणारा आणि दिवसभर त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करणारा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात, आणि कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवू पाहत असतात. दगडू पुन्हा नापास झाल्याने ते चिडून त्याला मारहाण करतात, आणि दगडू नाईलाजाने पेपर टाकण्याचे काम करायला सुरूवात करतो.
दगडूचे मित्रमंडळ- बालभारती, कोंबडा आणि मलेरिया अशी टोपणनावे असणारे टोळके पास होऊन कॉलेजात जाते. ते दगडूला फूस लावून प्राजक्ता नामक वर्गातल्या गुणी, सालस, हुशार मुलीला ’टाईमपास’ म्हणून पटवायची फूस लावतात. दगडू तसे करायचे ठरवतो.
दगडू आणि प्राजक्ता यांची ही ’टाईमपास’ म्हणून सुरू झालेली प्रेमकथा पुढे काय वळणे घेते, ते पडद्यावर पाहणेच योग्य ठरावे.

दगडूची प्राजक्तापर्यंत पोहोचण्याची धडपड, त्याला आलेल्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे विनोद, सुश्राव्य गाणी आणि मजेदार संवाद- यामुळे चित्रपट मध्यंतरापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो. कथानक आपल्याला अपेक्षित असलेल्या वळणांनीच पुढे जात राहते, मात्र पुर्वार्धातल्या वेगाने नाही, तर काहीसे रेंगाळत. चांगले संकलन करून चित्रपटाची लांबी कमी केली असती, तर त्याचा एकंदर ’इफेक्ट’ वाढला असता असे वाटते.
सिनेमात दगडू आणि प्राजक्ता या भूमिका प्रथमेश आणि केतकीच्या अनुक्रमे ’बालक-पालक’ आणि ’शाळा’ या चित्रपटातल्या भूमिकांचेच extension आहे, असे मला वाटले. या दोन्ही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे, आणि आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: मध्यमवर्गीय घरातली सज्जन, पापभीरू आईवडिलांना घाबरणारी मुलगी केतकी माटेगावकरने सुरेख रंगवली आहे. या अभिनेत्रीकडून भविष्यात भरपूर अपेक्षा आहेत ! प्राजक्ताच्या पालकांच्या भूमिकेत वैभव मांगले आणि मेघना एरण्डे यांनी चांगले काम केले आहे. विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्‍हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते. प्राजक्ताला गायन शिकवणारी स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ यांचे उपकथानक हे तसे अनावश्यक असले, तरी त्यामुळे एकंदर चित्रपटाच्या ’फ्लो’ मध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
चित्रपटाचे कथानक कोणत्या काळात घडते, ते स्पष्टपणे सांगीतलेले नसले, तरी जागोजागी काही क्लू दिलेले आहेत. दगडू आणि कंपनीने प्राकक्ताच्या वडिलांना ’शाकाल’ म्हणणे, एका दृष्यात ’दयावान’ सिनेमाची जाहिरात इ. वरून हे ऐंशीच्या दशकातले कथानक आहे, हे सहज लक्षात येते.
चित्रपटातली संगीताची बाजू भक्कम आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत. विशेषत: ’मला वेड लागले... प्रेमाचे’, काहीसे भडकरित्या चित्रित केलेले आगरी गाणे- ’ही प्पोरी साजुक तुपातली’ आणि ’फुलपाखरू’ ही गाणी चांगली आहेत.

एकंदर चित्रपट सर्व आघाड्यांवर समाधानकारक असला, तरी खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. एकदा पहायला हरकत नाही, पाहिला नाही तरी फारसे बिघडत नाही, असा.

माझ्याकडून (पाचपैकी) तीन स्टार्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेशभूषा आणि इतरही काही बाबतीत चुका/ लूपहोल्स असली तरी मनोरंजन मूल्य चांगले आहे चित्रपटाचे. मला तरी पैसा वसूल वाटला.
गाणी मऽस्त आहेत एकदम Happy रोमँटिक, सॉफ्ट ट्यून्स आणि केतकीचा निरागस वावर ह्यामुळे खूप छान वातावरणनिर्मिती होते. तिचा आवाजही सुरेख लागलाय 'मला वेड लागले' गाण्यात.

जातीयवाद ? ब्राम्हणांची थट्टा ?? मला तरी अजिबात असं काही नाही वाटलं !
लाइट ह्युमर् आहे, पण कम्मॉन सरदार लोकांवर किंवा मारवाडी , ज्यु लोकांवर जोक्स असतात, पुणेरी पाट्यां वगैरे जोक्स ना हसतो तसेच लाइट जोक्स आहेत !
बाकी हे पण पटलं नाही कि प्राजु सारखी मुलगी दगडूच्या प्रेमात नाही पडाणार ..
उलट मी आजुबाजुला पाहिलेल्या उदाहरणात अश्शाच मुली अविचार करताना - अनप्रेडीक्टीबल वागताना पाहिल्यायेत ज्यांना घरून प्रचंड बंधनं आहेत !
बाळबोध - साधं रहाणीमान अगदी खाली मान टाइप प्राजु सारख्या मॅरेज/बहनजी मटेरिअल मुली घरात अशी कडक बंधनअसयामुळे अश्शाच वागताना पहियायेत मी बरेचदा !
सिनेमात प्राजुच्या काकानी महंटलय कि 'उकिरड्याच्या जवळच्या चाळीत रहाल्याने घरात घाण येणारच वगैरे..
पण ते एरीया वगैरेही काही फार व्हॅलिड नाही, मी बघितल्यायेत चांगल्या प्रभात रोड वगैरे सारख्या उच्चभ्रु एरीयातल्या बाळबोध ब्राम्हण घरातल्या मुलींना अगदी सेम असं वागताना ..
तसेही इन जनरलच जात पैसा संस्कार वगैरे काहीही असो , human relationships are mysterious and unpredictable ' कोणाला कोण कुठल्या वयात आव्डावे काहीही प्रेडीक्ट करु शकत नाही आपण .. उगीच नाही ' इश्क ने निकम्मा किया ' टाइप शेरोशायरी बनत :).
असो, मुव्ही ओके आहे एकदा पहयला !

अविकुमार, राहुल,

या टी.पी. चित्रपटात तुम्हाला ब्राम्हणांची टवाळी दिसलीच नाही???? विनोद करताय काय? चित्रपट पाहिलायत न नक्की???>>> मधुराजी, नाही दिसली मला टवाळी. विनोद तर मी नक्कीच करत नाहीये आणि वट्ट १५० रु. तिकीटाचे देऊन चित्रपटगॄहात पाहिला आहे हा चित्रपट मी (पुरावा म्ह्णुन तिकीट जपून ठेवावं लागेल असं आलंच नाही बघा मज पामराच्या ध्यानात!).

एक मात्र नक्की की कोणत्याही जाती-जमाती-पोटजातीबद्दल कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रुह्दूषित मत घेऊन नक्कीच नव्हतो गेलो. किंवा एखाद्या जातीबद्दल त्या कलाकॄतीने काय विचार मांडले आहेत असा समिक्षकी चष्मा तर नक्कीच घेऊन नव्हतो गेलो. कलाकॄतीचा निखळ आणि निर्भेळ आनंद घेण्यासाठी गेलो होतो आणि तोच घेऊन बाहेर पडलो.

तुम्चं म्हाईत न्हाई ब्वॉ. आणि खरं तर जाणून घ्यायची गरजही वाटत नाही. चित्रपटाचा धागा जातीवादात परावर्तित होऊ नये असं मात्र मनापासून वाटतंय.

अभिषेक +१.

आणि तसही होत असेल, तरी चालेल... लोकांनी बघितलं पाहिजे, हे महत्त्वाचं.
{इथे अनुदानाच्या पलिकडे जाउन नफा कमावणे, हा उद्देश असेल तर उत्तमच. किमान त्या जाळ्यातुन निघणे गरजेचे}. नाहीतर उत्तमोत्तम चित्रपट बघितल्याच जात नाही, कारण ते थिएटरमध्ये येतच नाही.

यावरुन अचानक 'बिनधास्त' या चित्रपटाची आठवण झाली. माझ्या माहीतीत चांगलं प्रमोशन झालेला पहिला मराठी चित्रपट असावा. Happy

सिमेनात तो सायकल तीन दिवस चावलवण्याचा सीन बघून मनोज कुमारचा सिनेमा आठवला. हे हल्ली अस कुणी करत नाही. हा प्रसंग मनोज कुणारच्या सिनेमातून ढापलेला वाटला आणि तो काळाशी सुसंगत नाही वाटला Happy

दगडूच्या प्रेमभावना दाखवताना तो अगदी कमी पडला. किंबहुना ते प्रेम परिपक्व नाही असे वाटले.

शेवटी प्राजक्ताचे आईवडील घर बदलतात तो प्रसंग मात्र खरा वाटला कारण असे जेंव्हा घडते तेंव्हा असेच टोकाचे निर्णय घ्यावे लागतात. तो प्रसंग जरा अजून हायलाईट करायचा असता. प्रेम करायचे वय हे वेगळे असते हे थोडे आणखी हायलाईट करायचे असते.

@अभिषेक, दीपांजली- +१.

मध्यंतरी एक बातमी वाचली की दगडू पेपर टाकतो आणि प्राजक्ताचा बाप त्यावरून त्याला 'पेपरटाक्या' वगैरे म्हणतो, म्हणून पेपर विक्रेता संघटनेच्या भावना दुखावल्या. इथे काहीजणांचा 'ब्राह्मणांची टवाळी' झाल्याचा आक्षेप आहे.
'आजा नच ले' च्या एका गाण्यात 'कहे मोची भी खुदको सुनार है' असे शब्द असल्याने चांभार संघटनेने आक्षेप घेतला, ते शब्द काढून टाकावे लागले. 'कमीने' सिनेमाच्या गाण्यात गुलजारने 'तेली का तेल' लिहिल्याने तेली समाजाच्या भावना दुखावल्या. ते शब्दही काढावे लागले. न्हावी समाजाचा आक्षेप आल्याने 'बिल्लू बार्बर' सिनेमाचे शीर्षक बदलून 'बिल्लू' केले गेले. 'ओ माय गॉड' ने तर अनेकांचे पित्त खवळले होते.
शिवाय हल्ली पडद्यावर एखादे पात्र धुम्रपान करत असेल, तर पडद्याचा तेवढा भाग ब्लर करावा लागतो आणि 'हे चुकीचे आहे बरंका' अशा अर्थाची ओळ खाली येते. (पडद्यावर मद्यपान, खून, बलात्कार दाखवतांना अशी काळजी घ्यायची नसते!)

इतकी वैविध्यपूर्ण सेन्सॉरशिप असलेल्या या सिनेमानिरक्षर देशात सिनेमा बनवणे हे उत्तरोत्तर कठीण होत जाणार आहे, हे नक्की. जागतिक दर्जाचा वगैरे सिनेमा बनेल असे स्वप्नही पाहू नये हे उत्तम !

इतकी वैविध्यपूर्ण सेन्सॉरशिप असलेल्या या सिनेमानिरक्षर देशात सिनेमा बनवणे हे उत्तरोत्तर कठीण होत जाणार आहे, हे नक्की. जागतिक दर्जाचा वगैरे सिनेमा बनेल असे स्वप्नही पाहू नये हे उत्तम !

>> +१

जातियवाद वगैरे मला आजिबात दिसला नाही.
माझ्या भावना वगैरे ही दुखावल्या नाहीत.
दुनियादारीशी तुलना का सुरू आहे ते कळालं नाही.
धन्यवाद!

इतकी वैविध्यपूर्ण सेन्सॉरशिप असलेल्या या सिनेमानिरक्षर देशात सिनेमा बनवणे हे उत्तरोत्तर कठीण होत जाणार आहे, हे नक्की. जागतिक दर्जाचा वगैरे सिनेमा बनेल असे स्वप्नही पाहू नये हे उत्तम !<<< सेन्सॉर बोर्डाचे जे नवीन प्रमुख आहेत त्यांची याबद्दल मते वाचल्यास आता त्संही सिनेमा बनवणं फार काठिण होणार आहे.

इतकी वैविध्यपूर्ण सेन्सॉरशिप असलेल्या या सिनेमानिरक्षर देशात सिनेमा बनवणे हे उत्तरोत्तर कठीण होत जाणार आहे, हे नक्की. जागतिक दर्जाचा वगैरे सिनेमा बनेल असे स्वप्नही पाहू नये हे उत्तम !

>> +१

दगडूच्या प्रेमभावना दाखवताना तो अगदी कमी पडला. किंबहुना ते प्रेम परिपक्व नाही असे वाटले.
>>

दगडूला प्रेम म्हणजे काय तेच माहित नसते. एक टाईमपास म्हणून मुलगी पटवणे सुरु होते आणि मग कथानक कसे वळण घेत जाते ते या सिनेमात दाखवले आहे.

प्रेम भावना व्यक्त कशी करायची एवढी समज नाहीय त्याच्याकडे. फक्त "आय लव यु" म्हणायचे, आणि "डेव" करुन म्हणवून घ्यायचे म्हणजे प्रेम झाले, होकार आला असेच त्याचे मित्र सांगतात.

दोघांनी बर्फाच्या गोळ्याच्या सीन मस्त केलाय.

मला तरी दगडू कुठे कमी पडलाय असे वाटत नाही. केतकीला मात्र बरीच मेहनत करावी लागणार अभिनयावर.

हल्लीच टीपी पहिला. . प्रथमेश परब ने टीपी पूर्ण खाऊन टाकलाय, फक्त बिच्याऱ्याची शारीरिक उंची त्याच्या करियरमध्ये येणार Sad

ब्राह्मणांची उगाच टवाळी करण्याची फॅशनच आहे.>>>> मला अजिबात जाणवली नाही. म्हणजे हा चित्रपट जर ब्राह्मण्याविरुद्ध असता तर स्पृहा केळकर ह्यातील केळकर हे आडनाव सुद्धा ब्राह्मणातच येतें मग त्या स्पृहा केळकर हिला सून म्हणून श्री लेल्यांचा विरोध का दाखवला आहे? श्री लेले प्राजक्ताला समजावताना सांगतात की आपल गायकाच घराण आहे मग गायन शिकवणाऱ्या स्पृहाला सून म्हणून विरोध का?

मुळात प्राजक्ता दगडुकडे का ओढली जाते? तिच्या गायन शिक्षिकेने तिला "ती जाणीव " झाल्याशिवाय तुझ गाण आतून येणार नाही हे सांगितल्यावरच . प्राजक्ता त्या आतल्या जाणीवेच्या शोधात राहते. तिला दगडुचा बिनधास्तपणा प्रचंड भावतो. ती आतापर्यंत स्वतःच्या भावना जाणीवपूर्वक लपवत असते , मग मनात इच्छा असूनही ती मैत्रिणीन्सोबत अपलम - चपलम च्या गाण्यावर नाचायचं नाकारते किंवा दहीहंडी उत्सवात तिच्या वडिलांच्या लक्षात न येण्याइतपत तीच थोडस नाचण . मुळात आपल्या मनातल्या इच्छा दाबणे हा पांढरपेशा समाजाचा स्थायीभाव , तो ह्या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केल्याच जाणवत. त्या उलट दगडु तिला कोळ्याच्या घरी हळदीच आमंत्रण स्वतःहून देऊन तिला नाचायला लावतो. तोच दगडु प्राजक्ताच्या घरातल्या साऱ्यांसमोर , आपला खर प्रेम होता तुझ्यावर , टाईमपास नव्हता तो हे सांगण्याच धाडस करू शकतो.

माझ्या मते, हा चित्रपट शुध्द मराठी बोलणारे विरुद्ध मिश्र मराठी (?) बोलणारे - सो कॉल्ड पांढरपेशा समाज विरुद्ध झोपडपट्टी - बैठ्या घरांमध्ये राहणारा कष्टकरी समाज ह्यांच्यातील जीवनपध्दतीतील फरकाबद्दल असलेला -- मल्टीप्लेक्स विरुद्ध सिंगल स्क्रिन असा --- प्राजक्ता विरुद्ध दगडु ह्यांच्यातल्या स्वभावातील असलेल्या फरकांबद्दलचा - असा जाणवला.

भटाची चाळ, उगाच अतिशुद्ध बोलणारा, चोरुन बाहेरचे खाणारा (भजी) ब्राह्मण वगैरे वगैरे हे सगळे घालायची काही आवश्यकता नव्हती. असो.

बाकीही न पटलेल्या गोष्टी मी लिहिल्याच आहेत. त्याही वाचायला हरकत नव्हती माझी Happy

<<<भटाची चाळ, उगाच अतिशुद्ध बोलणारा, चोरुन बाहेरचे खाणारा (भजी) ब्राह्मण वगैरे वगैरे हे सगळे घालायची काही आवश्यकता नव्हती>>>
काहीही काय .
<<भटाची चाळ, >>> आता ठाण्यात आम्ही ब्राह्मण सोसायटीमध्ये राहतो हे म्हणण सुद्धा तुम्ही चुकीच ठरवाल.

<<चोरुन बाहेरचे खाणारा (भजी) ब्राह्मण>>> आणि त्यांनी भजीच खाल्लेली दाखवलं आहे ना , माशाची तुकडी तर खाताना नाही ना दाखवलं? आणि कोणी सांगितलं ते चोरून बाहेरच खात होते , त्याने घरी स्पष्ट सांगितलेल आहे कि ऑफिसच्या कँटिंग मधून आणलेली भजी आहे, (फक्त तो हेच खोट बोलतो की रस्त्यावरच्या गाडीवरून भजी आणली आहे हे न सांगता ऑफिसच्या कँटिंग मधून आणलेली भजी आहे अस सांगतो. पांढरपेशी माणस फक्त बाहेरच्या जनांना च नाही तर घरातल्यानादेखील घाबरतात अस दाखवायचं असेल . )

<<उगाच अतिशुद्ध बोलणारा>>> कोणी सांगितलं की फक्त ब्राह्मणच अतिशुद्ध बोलतात?

मुळात चित्रपट आवडला की नाही एवढच महत्वाच , बाकीची चिरफाड हवीच कशाला?

भटाची चाळ, उगाच अतिशुद्ध बोलणारा, चोरुन बाहेरचे खाणारा (भजी) ब्राह्मण वगैरे वगैरे हे सगळे घालायची काही आवश्यकता नव्हती. असो. >>>>>>>>>>>>>>>>

पेपरवाला नको, तेली नको, ब्राह्मण नको, धोबी नको........... अरे मग चित्रपट काढायचा कसा????????????????

भटांचा वाद उगाचच करत आहेत काही लोकं इथे.....समजा लेल्याच्या ऐवजी कोणी गुजराथी दाखवला असता तर इथे इतका वाद झाला नसता.....तस बघायला गेलं तर दगडु चा बाप मालवणी दाखवलाय आणि तो रिक्शा चालवणारा , दारु पिणारा दाखवलाय म्हणुन काय सर्व मालवणी माणसं तशीच असतात??? आणि मग इथे त्याच्या बद्दल का बोलत नाहीये कोणी.....फक्त भटांबद्दल थोडं काय दाखवलं तर काहीजण पेटुन का उठलेत??

गौरीम ने जे दगडु आणि प्राजु बद्दल सांगितले आहे ते मला पटले .......

मला हा चित्रपट फार काही वॉव फॅक्टर वाला नाही वाटला....खर बोलायच तर दगडु साठी पाहिला....त्याची बेधडक अ‍ॅक्टिंग बिपी पासुन आवडते....आणि वैभव मांगले ऑस्सम....त्याच्या अभिनयाला तोड नाही.....काही अपवाद वगळता त्याचा बाप मला सेन्सिबल वाटला.... मुलीने वेळेत घरी येणे, तीने करियर मधे पुढे जाणे, आपण दिलेल्या संस्कारांचा भाजीपाला न करणे हे कुठल्याही बापाला वाटत असते......न शिकलेल्या दगडु सारख्या मुलाबरोबर आपली मुलगी हिंडतेय म्हटल्यावर कुठलाही बाप चिडणारच.....मी अजुन आई झाले नाहीये पण मी कॉलेज मधे असताना माझ्या बाबांचे बिहेवियर माझ्यासाठी असच प्रोटेक्टिव्ह होतं.......

दुनियादारी बद्दल न बोलणे उत्तम....टिपी अगदी भंगार नाहीच आहे दुनियादारी च्या तुलनेत........

अनू टाळ्या! यू सेड इट Happy

भजी चोरुन का खातो तर 'बाहेरचं' खाणं पाप आहे असं त्याला मुलीच्या मनावर ठसवायचं असतं Happy
इथे तो बाप कोणत्याही जाती धर्माचा असेल तरी चालेल Happy
भट चाळ का दाखवली? Uhoh
कोणतीही चाळ दाखवावी तशीच भट चाळही कोणतीही चाळ म्हणूनच दाखवली Uhoh
शुद्ध बोलणारा ब्राह्मण? नव्हे फक्त शुद्ध बोलणारा होमीभाभा सेंटर मधला एक लिपिक....
जातीचा काय संबंध? Uhoh
कुठेही काहीही कधीही! असो!

बाकी मालवणी बद्दल अनू +१
मालवण्यांनो, पेटुन उठा बरं तुम्हीही आता Wink
तुमचा अपमान नाही का झाला? Wink तुमची टवाळी करायची फॅशन सुरू झाली तर? Wink

आम्हा मालवण्याना अजिबात वाईट वाटलेले नाही. उलट अशी मालवणी व्यक्तिरेखा दाखवून जर मराठी चित्रपटांचे आर्थिक गणित मजबूत होत असेल तर खुशाल दाखवा. :P:-P:फिदी:

चला हवा येऊ द्या! अरे फिरू द्या कि मराठी तारे-तारकांना सुद्धा बेंझ मधून.

आम्ही मालवणी असलो म्हणूनी काय जाहले... आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार..
चला हवा येऊ द्या>>>> हाहा.....सांगायचा मुद्द हा होता की भट मालवणी फक्त पात्रे म्हणुन दाखवली आहेत....दुसरीही असु शकली असती....तेव्हा उगाच भटांना शिव्या दिल्यात हा गैरसमज दुर करणे.....

>> ब्राह्मण नको
असे मी म्हटले नाहीये फक्त उगाच टवाळी नको.

>>फक्त भटांबद्दल थोडं काय दाखवलं तर काहीजण पेटुन का उठलेत??
पेटलेले आहेत ते दाखवले आहे हे बरोबर म्हणणारे. कुठल्याही गोष्टीत एव्हढे पेटण्यासारखे काय असते हे मला खरेच कळत नाही. किती तो दंगा!!

गौरीम, तुम्ही आता उगाच कीस काढताय. आणि तेही मनचे संदर्भ देवून. चित्रपट पुन्हा पहायची गरज आहे. (भजी ऑफिसमधल्या बापट बाईंनी दिलीयेत असे सांगितले आहे. )

ब्राह्मण अतिशुद्ध बोलतात असे मी नाही चित्रपट म्हणतो आहे. Happy

आता खरेच हवा येऊ द्या.

चित्रपट बेताचा आहे एव्हढे बोलुन मी तुमची रजा घेते. तुमचे चालू द्या.

<<<गौरीम, तुम्ही आता उगाच कीस काढताय. आणि तेही मनचे संदर्भ देवून. चित्रपट पुन्हा पहायची गरज आहे. >>>अदिती… चित्रपटाचा आनंद घ्यायचा सोडून तुम्हीच तुमच्या मनातलं ब्राह्मण्य- त्यांची टवाळी इ इ लिहुन चित्रपट कुठल्या कुठे पोचवलात. ब्राह्मण्य - त्यांची टवाळी इ डोक्यातले किडे बाजूला ठेवुन परत एकदा चित्रपट पाहण्याची तुम्हालाच गरज अहे. त्यामुळे तुम्ही चित्रपटाचा त्रयस्थ म्हणून नक्कीच आनंद घ्याल ही आशा . क लो अ

चित्रपट पुन्हा पहायची गरज आहे. >>> काश ऐसे होता।

आम्ही मालवणी असलो म्हणूनी काय जाहले... आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार..
चला हवा येऊ द्या
.>>>>> १०० मोदक Happy
बरं झालं चित्रपट पाहण्या आगोदर ईथले रिव्ह्युज वाचून नाही गेलो

कालच चित्रपट बघितला, खूप ताणलेला वाटला. शेवट बरा आहे, पण तो केवळ सिक्वेल आणण्यासाठी तसा ठेवलाय की काय असं वाटलं.

बिपी ने अपेक्षा खूप वाढलेल्या, त्या तोडीचा अजिबातच नाही. संवाद आणि पंचेस वर म्हटल्याप्रमाणे चांगले आहेत. तीनही गाणी आवडली मला. केतकीला फार काही काम नाहीये ते बरय. बाकी शाकाल ला खलनायक बनवला नाही हे पण आवडलं, स्पृहाचे संवाद अपेक्षित तरीही आवश्यक होतेच.

ब्राह्मण विरोधी वाटू शकतो हे नवीनच कळले. कैच्याकै

इतकी वैविध्यपूर्ण सेन्सॉरशिप असलेल्या या सिनेमानिरक्षर देशात सिनेमा बनवणे हे उत्तरोत्तर कठीण होत जाणार आहे, हे नक्की. जागतिक दर्जाचा वगैरे सिनेमा बनेल असे स्वप्नही पाहू नये हे उत्तम !>> ++१

दुनियादारीशी तुलना का सुरू आहे ते कळालं नाही.
धन्यवाद!
>>>>>>

कारण दोन्ही चित्रपट आहेत, मराठी आहेत, नवीनच आहेत, दोघांनीही बॉक्स ऑफिसवर मस्त धंदा केला आहे, तर मराठी माणसांच्या समूहावर तुलना तर होणारच ..

वेलकम !

Pages