कैच्याकै उगाचच.... काहिसुद्धा कारण नाही!
आत्ता तर खिडकीबाहेर जरासुद्धा पाऊस नाही!
मस्त कोवळं पडलंय उन,
तेही उबदार खिडकीतून...
तुकड्या तुकड्यात हलतंय पान
काही नवं, बरंच जून...
दूर दूर सुद्धा कुणी आर्त वगैरे आळवत नाही
उगीच जवळ बसून कुणी हळवं-बिळवं बोलत नाही
तरिसुद्धा कहितरी
बिनसलेलं आहे राव
कळत नाही नक्की कुठे
वाट चुकलंय माझं गाव!
किबॉर्डाच्या कडकडाटात गहिवरून काय येतंय...
एसीहूनही गार माझं, मन निपचित होऊन जातंय...
ओळख नाही, पाळख नाही तरी रांग लावून
पाहुण्यासारखं एकेक दु:ख मला ’पहायला’ येतंय
हे काही खरं नाही
असं होणं बरं नाही
गूढ डोह असेन मी पण
पाणवठ्याचं तळं नाही!
आत्ता या क्षणी इथलं वरचं छप्पर उडून जावं
आणि आकाशातून थेट इंद्रधनुष्य अवतरावं
एकट्या मलाच उचलून त्यानं असं सहज वर वर न्यावं
मी जाताना सगळ्या स्टाफनं माना वळवत पहात रहावं!
सीतेनं सांडले अलंकार तसे सांडत जाईन मी माझं असणं...
’त्या’च्यापाशी पोहोचेल माझं... माझ्यापाशी काहिच नसणं!
सरतेशेवटी एकदा मला
विसरायचंय माझं नाव...
कळत नाही नक्की कुठे
वाट चुकलंय माझं गाव!
ओळख नाही, पाळख नाही तरी रांग
ओळख नाही, पाळख नाही तरी रांग लावून
पाहुण्यासारखं एकेक दु:ख मला ’पहायला’ येतंय
>>>
अगं मानसी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
कस्लं भारी..कळत नाही नक्की
कस्लं भारी..कळत नाही नक्की कसं ते ..मला पण असच कैतरी वाटतय राव..
खूपच छान!
खूपच छान!
सही, कसलं मस्त लिहील
सही, कसलं मस्त लिहील आहे....
अस वाटल कि पाडगावकरांचीच कविता वाचतेय... खूप छान...:)
ह्म्म्म्म...मलाही, जरासा
ह्म्म्म्म...मलाही, जरासा बोलगाण्याचा झाला भास...पण मी अगदी प्रेमात म्हणजे प्रेमात..
अरे!!!! किती सहज
अरे!!!! किती सहज उतरलंय!
व्व्वाआआआ!
भल्तच सुरेख.
भल्तच सुरेख.
>>भल्तच सुरेख. >>+१
>>भल्तच सुरेख. >>+१
व्वा!
व्वा!
झकास.... मस्त लिहील आहे....
झकास.... मस्त लिहील आहे....
धन्यवाद!
धन्यवाद!
छान. सादरीकरणायोग्य कविता.
छान.
सादरीकरणायोग्य कविता.
धन्यवाद उल्हास...
धन्यवाद उल्हास...
मस्त ग मानसी. खुप खुप मनातलं
मस्त ग मानसी. खुप खुप मनातलं लिहितेस.
’त्या’च्यापाशी पोहोचेल
’त्या’च्यापाशी पोहोचेल माझं... माझ्यापाशी काहिच नसणं!...........अहाहा......मस्तच !!
सुंदर... !!
सुंदर... !!
ओळख नाही, पाळख नाही तरी रांग
ओळख नाही, पाळख नाही तरी रांग लावून
पाहुण्यासारखं एकेक दु:ख मला ’पहायला’ येतंय......... हे भारीये!
मुमा..... अप्रतीम लिहितेस तू!
अहाहा > सीतेनं सांडले अलंकार
अहाहा
> सीतेनं सांडले अलंकार तसे सांडत जाईन मी माझं असणं...< शब्दच नाहीत
> सीतेनं सांडले अलंकार तसे
> सीतेनं सांडले अलंकार तसे सांडत जाईन मी माझं असणं...
>>>
हो हे कोट करायचं राहिलं होतं!
जेंव्हा जेंव्हा धागा वर येतोय तेंव्हा तेंव्हा पुन्हा वाचतेय
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
झकास, झकास .....
झकास, झकास .....
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
(No subject)