युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा अमांनी पेट थेरपीऐवजी दीपचे समोसे सुचवलेत? ऐतेन!

मिसळीत गरम रस्सा असतो त्यामुळे आधी सूप नको. त्याऐवजी नेहमीचे यशस्वी असले तरी पनीर टिक्का टाइप्स पदार्थ मी तरी ठेवेन. मिसळ खाल्ल्यावर रसमलई खायला फार सुदिंग वाटतं.

>>अश्विनीमामी | 7 February, 2014 - 02:16
दीपचे फ्रोझन सामोसे. अमेरिकेत सर्वत्र मिळतात.>> Lol मी कमिशन शेअर करणार नाही Proud

तळून हलके (!) झालेले पदार्थ चालणार असतील तर साबुदाण्याच्या पापड्या, कुरडया, मिरगुंडं किंवा पोह्याचे / बटाट्याचे पापड इ.इ. किंवा मसाला पापड. उडदाचे पापड भाजूनही मसाला पापड बनवता येईल.

तिखटाचे आप्पे - चटणी.

स्टार्टर्ससाठी चीज क्यूब - नुसते किंवा क्रॅकर्ससोबत वगैरे ठेवता येतील.
सोलकढी रूम टेम्परेचरला पितात - ती करू शकता.
नंतर रसमलाई ठेवायची आयडिया मस्त आहे.

खरं तर मेन कोर्स मिसळ असताना अ‍ॅपेटायझर असे वेगळे द्यावेत का? मिसळ, सॅलड किंवा काकडीची खमंग कोशिंबीर, पनीर टिक्का/जे काही असेल ते असं एकत्रच सर्व्ह करता येइल.

शेव बटाटा पुरी करा. चटण्या मिसळीला लागतीलच. त्यामुळे एकात एक दोन पदार्थ होतील. मी जनरली मिसळ केली की दहीवडा ठेवते जोडीला. तिखट जाळ मिसळी नंतर उतारा म्हणून. रसमलई चांगला ऑप्शन आहे किंवा नानक चा मुग डाळ हलवा पण बेस्ट.

मी खाल्लाय एकदा कुठेतरी. मला विशेष आवडला नाही. फार गोड मिट्ट लागला. पुन्हा एकदा ओपन माईंडने ट्राय करायला हवा Wink

मिसळ आणि रसमलई छान वाटतय. तेच ठेवेन.
मुलं मिसळ तिखट असल्याने खाणार नाहियेत, त्यांना पोळी, आणि मिसळीसाठी केलेली मटकी उसळ, बटाट्याची भाजी अस ठेवेन.
थॅन्क्स.

मुलांसाठी गोडसर मिसळ करू शकाल त्याच उसळीत फरसाण/चिवडा, दही आणि गोड चटणी घालून. छान लागते. म्हणजे पोळ्या करत बसायला नको.

इडली+चटणि, मिसळ , ग्रीन राईस (जीरा राईस मध्ये सगळ्या ग्रीन भाज्या घालून) ,रसमलाई असा बेत मस्त होईल. मुलांसाठी चपाती करायची गरज पडणार नाही.

अमा आणि सिंडरेला Rofl

शेवपुरी स्टाटरसाठी करताना आधी केली तर मऊ होते का? की नुस्तं वेगवेगळं सामान ठेऊन ज्याची त्यांनी करायची असं ठेवतात...(पुढेमागे ठेवायची असल्यास उपयोगी पडेल म्हणून विचारतेय ;)) मी एकदा असं चीज सँडवीचेसचे त्रिकोण कापून मस्त सजवून ठेवले आणि काही तास आधी केले तर चीजने बाहेर दात दाखवायला सुरूवात केली मग लक्षात आलं की केल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवायला हवे होते. तसा शेवपुरीचा काही धडा असल्यास अनुभवींनी प्रकाश टाकावा Happy

वेका! मी गेट्-टुगेदर्ला पूर्‍या प्लेटमधे लावुन त्यावर बटाटा घालुन ठेवते..बाकि चटण्या,शेव,दही सग्ळे आपआपल्या आवडिने घालुन घेतात..
अनुश्री सुरळिच्या वड्या,ढोकळा, हांडवा, चिप्स आणि डिप्स अस ठेवु शकतेस्..गोडाला रसमलई बेस्ट किंवा गाजर-हलवा..

ह्म्म्म गोडसर मिसळ छान वाटेल मुलांना. चीज पण आणून ठेवेन म्हणजे मिसळ पाव नको असेल तर चीज सॅन्ड्विच पण खाऊ शकतील मुल.
प्राजक्ता सुरळीच्यावड्या आधी सुचल्याच न्हवत्या, त्या हेवी पण होत नाहित. शिवाय करायला पटकन आणि सोप्या Happy
वेका , शेवपुरी ला मी पण तयारी करुन ठेवते सगळे आपआपल्या आवडीने घेतात. नाहीतर स्कुप चिप्स मध्ये बटाटा, कांदा असल घालुन ठेवायच आणी घट्ट्सर गोड आणि तिखट अश्या करुन ठेवायच्या पाहिजे तस घेता येत.
https://www.google.com/search?q=scoop+chips&tbm=isch&tbo=u&source=univ&s...
ह्या लिंक मध्ये दिसतायत तसे चिप्स.

पेट थेरपी फॉर स्टार्टर्स>> हे खालील जमेल का ते बघा.

कॉर्न डॉग : वीनर काडीला लावून वरून कॉर्न मिक्स लावून तळतात.

हॉट डॉग्ज ( ह्यात एक व्हेज व्हराय्टी पण मिळते ती काय असते मला माहीत नाही ) अर्धे किंवा एका सबचे तीन भाग असे.

हश पपीज: हे खरेच स्टार्टर आहे. सदर्न यू एस मध्ये पार सिविल वॉर काळापासून भटके फिरते लोक ही अशी भजी बनवून खातात. ब्लेस देम.

कॉर्न पपीज, कॅरोलिना डॉग, मॅक अँड चीज डॉग, रुबन डॉग, स्विस स्टाइल चीज डॉग हे ही व्हरायटीज आहेत.

हे तळीव पदार्थ असल्याने जास्त खाल्ल्यास पेट को थेरपी की जरुरत पड सकती है.

अरे माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही दिला कोणी.. सोपा प्रश्न आहे म्हणुन ऑप्शनला टाकला Uhoh
मटार पनीर मधले मटार हिरवेच राहवेत म्हणुन काय करायचे?

फ्रोजन मटार वापरत असशील तर मायक्रोवेव मधे थॉ करून घे. असे मटार ग्रेव्ही मधे फार शिजवायची गरज पडत नाही. ग्रेव्ही तयार झाली की उतरवायच्या आधी ३-४ मिनिटं हे मटार घालायचे. फार उकळत बसलीस तर रंग फिका होईल मटारचा.

वेका, मी पण सगळी तयारी करून ठेवते. पुर्‍या किंवा चिप्स प्लॅटरमध्ये लावून ठेवायच्या. सर्व्ह करायच्या वेळेस त्यावर पटापट बटाटे, कांदे आणि इतर साहित्य घालायचं.

मिसळ असताना स्टर्टर्स असल्यास मिसळीवर आणि मिसळप्रेमींवर अन्याय होतो!!! अर्थात पाहुणे पट्टीचे मिपाप्रेमी असावेत! एकदा एका मैत्रीणीकडे मिपा चा बेत फसलाही आहे... काही लोकं नॉर्थ इंडियन होती.
मिपानंतर जिलबी, मोतीचुर लाडू आणि मग एक आलेदार चहा असं कॉम्बो आमच्या मित्रमंडळीत पळतं.
मी मिपासोबत थोडा दहीबुत्ती राईस किंवा मटार राईस (कमी तिखट आणि बेताचा मसालेदार) करते. जस्ट इन केस काही लोकांना आणि लहान मुलांना भात आवडतो म्हणून.

बाकी अमा आणि सिंडी यांना जोरदार टाळ्या. Biggrin

सुरळीच्यावड्या करायला पटकन आणि सोप्या >>> सोप्या Uhoh मी तंतोतंत रेसीपीने केले तरी गोल करताना तुटतात माझ्या. अनुश्री टीप दे Happy

केशर इकडे मायक्रोवेव्हमधल्या सुरळीच्या वड्याची रेसिपी आहे बघा..मलापण (इकडे पण हा शब्द शिकाऊ अर्थी घ्यायला हरकत नाही) जमल्या होत्या.

मिसळीबरोबर मी तरी एकदा फक्त बटाटावडाच ठेवला होता आणि सगळं एकदम सर्व्ह केलं. गोडाचं जे काय कराल ते नंतर किंवा सोबत कसंही देऊ शकता. पाहुणे खूप आधी येणार असतील तरच स्टाटरची गरज भासेल असं वाटतंञ.

सायो, प्रॅडी .. मी फ्रोजन मटार धुवुन घेतले .. कांदा/टोमॅटो प्युरी नि पनीर थोडं शिजल्यावर मग घातले .. तर नंतर फिकट झाला रंग..

Pages