किन्वा (Quinoa) पाककृती

Submitted by .. on 4 February, 2014 - 17:31

किन्वा (Quinoa) वापरुन करता येणार्‍या पाककृती, किन्वाचे गुणधर्म वगैरे बद्दल इथे एकत्र चर्चा करण्यासाठी हा धागा. नंतर शोधायला सोपे जाईल म्हणून वेगळा धागा काढत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काल किन्वा थालपिठं केली. काय यम्मी व क्रंची मस्त झाली! Happy

मी किन्वा आयत्यावेळेसच शिजवला. त्यात दाण्याचं कुट, मीठ, तिखट, कोथिंबिर व उपासाची भाजणी घातली. चांगली थापली गेली.. एखाद वेळेस जरा तुटत होतं.. बटाटे संपले होते, म्हणून शंका होती. पण सुंदर झाली! Happy

किन्वा थालिपीठाची आयडीया अत्यंत आवडल्याने लगेच करुन पाहण्यात आले. लै भारी लागले चवीला, काहीच फरक जाणवला नाही नेहेमीच्या उपवास टाईप थालिपीठापेक्षा. मी बटाटे, तिखट-मीठ, जिरेपूड घातलं व बाईंडींग साठी राजगिर्‍याचं पीठ घातलं. किन्वा नेहेमीइतकाच शिजवला. ऐनवेळीच शिजवला, थोडा पसरुन किंचित थंड झाल्यावर मळलं पीठ. हा फोटो, कोणतीही आर्टीस्टिक व्हॅल्यू नसलेला, कामचलावू वगैरे वगैरे. Wink

IMG_8584 - Copy.JPG

आयडियाबद्दल थँक्स दीपांजली. Happy

मवा किन्वाला इतर शब्द काय आहे? मी खुसखुस असाही शब्द ऐकलाय. ते सुपरमार्केटमध्ये बघीतले.( दुबईला, भारतात नाही) भगरी च्या दाण्यासारखेच गोल आणी क्रिम कलरचे असते ना?

कुसकुस वेगळं मिळतं इथे तरी (अमेरिकेत). मी भारतात असताना कधी किन्वा वापरला नव्हता त्यामुळे त्याबद्दल माहित पण नव्हतं. किन्वा ला दुसरं काही नाव मला माहित नाही. पण किन्वा आणि कुसकुस वेगळं आहे.
भगरी च्या दाण्यासारखेच गोल आणी क्रिम कलरचे असते ना?>> हो, भगरीपेक्षा मोठे दाणे असतात.
हे बघा - https://www.google.com/#q=quinoa%20vs%20couscous

सायो, थँक्स. Happy

भारतात खूपच महाग आहे किन्वा असं पुतणीकडून कळलं. तिने २०० ग्रॅम ५००/- रू ना आणला, म्हणजे २५००/- रू. किलो??? Uhoh

एम्बी छान माहिती.
मवा मस्त दिसतेय थालिपीठ ... तंतुसारखे काय दिसतेय... मोड आणलेत का?
किन्वा उपमा पण छान होतो..मनुस्वीनीची रेसीपी आहे जुन्या मा.बो.वर.

तंतुसारखे काय दिसतेय... मोड आणलेत का? >> नाही, ते किन्वा शिजल्यावर तसेच दिसते. एकेक दाणा ट्रान्सपरंट होऊन तसे तंतू दिसायला लागतात.

सुंदर दिसतंय थालिपीठ. नेहमीच्या भाजणीत मिसळून केली थालिपीठं तरी चालतील असं वाटतंय.

भारी दिसतंय की थालीपीठ. Happy

सगळ्या आयडियाज आवडल्या.
मला स्वतःला किन्व्याची साबुदाणा खिचडी 'कशाची केली आहे कळतसुद्धा नाही' असं वाटण्याइतकी आवडली नव्हती. (तशा कुठल्याच 'ककेआकसुना' प्रकारच्या रेसिपीज आवडत नाहीत! पण ते जाऊ द्या. :P)
पण बाकी सॅलड्स वगैरे करून बघेन आता. थालीपीठ नक्कीच करून बघेन.

मी तर नुसता किन्वा शिजवून घेऊन दूध साखर घालूनही खिरी/लापशीसारखा खाते. मला आवडतो.

किन्व्याची साबुदाणा खिचडी 'कशाची केली आहे कळतसुद्धा नाही' असं अजिबात नाही हे मी वेळोवेळी नमूद केलं आहे. ती खिचडी जस्ट एक फ्युजन पदार्थ लागते.

आमच्याकडेही किन्वाला साबुदाण्याची खिचडी म्हणून खपवणं मान्य नाही. त्यापेक्षा महिन्यातून एकदा खाऊन चालेल असं म्हणण्यात आलं.

स्वाती माझे डोके चालवले तर दुखते त्यामुळे 'ककेआकसुन' म्हणजे काय हे सांगावे. Happy

थालिपिठ छान दिसतय मवा. ह्यात पीठ किती व किन्वा किती घातला? कांदा वगैरे घातला का? माझ्याकडे भाजणी नाही, आत जाऊन पहाते कोणते पीठ आहे घरात?

एका मैत्रिणीने तेलात 'dried cranberries', ब्रोकोली, गाजर, मटार, फ्लावर, कोबी, बिन्स. हीरवी मिरची असे सर्व बारीक चिरुन परतले व मग किन्वा घालुन पुन्हा परतुन वाफ आणली. फार छान झाले होते.

आणि बहुतेक सर्वजणी उकळत्या पाण्यात घालुन शिजवतात असे दिसते. पण electric rice cooker मधे पण डबल पाणी घालुन मस्त शिजतो बरं का किन्वा. झाला की फक्त एका चमच्याने किंचित खालपासुन हलवावे म्हणजे आतली वाफ निघुन जाईल व मोकळा होईल. लक्ष द्यावे लागत नाही हा फायदा.

सुनिधी, लिहिलंय ना त्याआधीच्या वाक्यात :
'ककेआकसुना' = 'कशाची केली आहे कळतसुद्धा नाही'
Proud

पॅटी,सॅलड,थालीपीठ सगळचं मस्त दिसत आहे एकदम.
किन्वाच्या खिचडी बद्दल इतरांचे मत बघून सुडोमी झालय मला एकदम. त्यात एकदा कुणीतरी मला दिलेली कोबीची रबडी अ‍ॅड करा म्हणजे झाल. Wink

>>कोबीची रबडी अ‍ॅड करा म्हणजे झाल. >> देवा!!! Uhoh का लोकं असलं काय काय करुन आपल्या सुग्रणपणा सिद्ध करायचा आटापिटा करतात?

थालिपीठ देखणं आहे. Happy

>>नेहमीच्या भाजणीत मिसळून केली थालिपीठं तरी चालतील असं वाटतंय.
म्हणजे थालिपिठाची स्पेशल भाजणी? ती इतकी जास्तं झाली असेल तर इकडे पाठवत जा. पण कृपया वाया घालवू नका. Proud

हो. मृ तु चकली भाजणीची थालीपीठ भाजणी केलेलीस तेव्हाच था. भा.चे तुझ्या द्र्ष्टीने मोल कित्ती आहे ते जाणले होते आम्ही. Proud
सायो, डाएट रेसीपी आहे म्हणे ती. Uhoh कॅलरीज नेहमीच्या रबडीपेक्षा खूप कमी असतात म्हणे.

मी कोबी कलाकंद खाल्लेला आहे .. म्हणजे सायकॉलीजिकल ब्लॉक ओव्हरकम करता आला तर चांगलाच लागला तो पदार्थ .. पण कलाकंद म्हणणं फार(च) अ आणि अ आहे .. Wink

वि. सू.: इथे विषयाला धरूनच बोला Biggrin

विषयाला धरूनच बोलायचं असल्यास आता किन्वा कलाकंद किंवा रबडीचे फोटो येऊ द्या म्हणजे जाण्याआधी बघायचं राहून गेलं असं वाटायला नको Wink

LOL सायो ..

वर स्वाती ने किन्वा खीर किंवा लापशी बद्दल लिहीलंच आहे .. आता ते फुल फॅट दुधात घालून आटवलं की झालं .. Lol

मी किनूआ बीट पुलाव करते. मस्त लागतो. थोड्या तेलात बीट, फ्लॉवर, फरसबी, कॉर्न, पनीर, जे काही असेल ते भरपूर..., आलं लसूण पेस्ट आणि कुठलाही पुलाव / शाही बिर्यानी मसाला घालून तसंच शिजवायचं किंवा राईस कूकरमध्ये शिजवलेलाही किनूआ घालून कर्ता येतो. अजून तरी ज्यांना खाऊ घातलाय त्यांना सगळ्यांना आवडलाय, माझा नवरा सोडून, त्याला किनूआच मूळात आवडत नाही... Happy

बस्केच्या साबूदाणा खिचडी सारखाही छान लागलेला.

थालिपीठाला छान म्हणलेल्या बायांना (आपलं मुलींना ;)) थँक्यू थँक्यू. Happy

हो ती खिचडी आमच्याकडेही साखि ला पर्याय होऊच शकत नाही पण एक हेल्दी व्हेरिएशन म्हणून खाल्ली जायची, पण इथे किन्वाचे बरेच प्रकार आले आहेत तेव्हा आता त्याची कदाचित गरज भासणार नाही.

मवा, फोटो मस्त आलाय थालिपीठाचा Happy

किन्वा खिचडी भगर टाईप लागते. त्यामुळे उपासाचा आणि मराठमोळा पदार्थ म्हणून नक्कीच खपून जाईल. आमच्याकडे तर फार आवडली सगळ्यांना Happy

Quinoa & Sweet Potato Chili

Ingrdients: Quinoa, Sweet Potato, Tomato paste, Vegetable stock, Onion, Garlic, Black Beans, Chilli Powder, Cumin Powder, Oregano, salt, pepper, olive oil
Topped with Sour Cream and Sliced Avacado

photo.JPG

Pages