किन्वा (Quinoa) पाककृती

Submitted by .. on 4 February, 2014 - 17:31

किन्वा (Quinoa) वापरुन करता येणार्‍या पाककृती, किन्वाचे गुणधर्म वगैरे बद्दल इथे एकत्र चर्चा करण्यासाठी हा धागा. नंतर शोधायला सोपे जाईल म्हणून वेगळा धागा काढत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी किन्वा शिजवताना त्यात ए. छोटा चमचा ऑऑ घालून शिजवते. शिजवून भाजीबरोबर वगैरे खायचा प्रयत्न केला पण अगदीच बोअर लागतो म्हणून खालचा प्रकार करते.
किन्वा शिजवून, रंगीत पेपर्स, झुकिनी, गाजर, हवे असल्यास मश्रूम्स, कॉर्न, पातीचा कांदा. भाज्या सगळ्या चौकोनी चिरुन (कांदा, कॉर्न वगळून).
तेलावर लसूण परतून घेऊन त्यावर पातीचा कांदा परतून मग बाकी भाज्या परतून घ्याव्यात. जरा शिजल्यात असं वाटलं की त्यात चिली सॉस, सोया सॉस घालून परतावं. मीठ घालून ढवळून शिजवलेला किन्वा घालून मिक्स करावं. हवं असल्यास कोथिंबीर, बेसील चालेल. तिखटपणाकरता फोडणीत लाल सुकी मिरचीही चालेल.

मी किन्वा फॅन क्लबात टॉप वर आहे , चव आणि कमी कष्टं हे कारण !
या काही पध्दती ::
१.किन्वा शिजवताना पायनॅपल तुकडे - थोडे मक्याचे दाणे-लेमन जूस-तिखट-थोडा किचन किंग मसाला -टिस्पुन तेल घालून शिजवायचं , छान लागतं !
२.
रेचल रे नी एकदा कुसकुस ची रेसिपी दिली होती , ती किन्वाला वापरली परवा , मस्तं लागली ..
भरपूर पुदिना, लसुण-हिरवी मिर्ची आणि भरड क्रश केलेले पिस्ते हे तेलावर परतून मोकळ्या शिजलेल्या किन्वात घालून एक वाफ द्यायची .. अतिशय टेस्टी लागत् !
३.किन्वाचं थालीपीठ:
हे एकदाच केलं होतं त्यामुळे प्रपोरशन आठवत नाही !
साबुदाण्याच्या थालीपीठासारखं , मस्तं खरपूस झालं !
उकडकेला बटाटा कुस्करून , दाण्याच कुट , हिरवी मिर्ची जिरेपोइड इत्यादी जास्त शिजवलेल्या किन्वात मिक्स करून थापल्!
बाइंडींग एजंट म्हणून उपासाची भाजणी अ‍ॅड करु शकता.

अरे वा .. हा किन्वा फॅन क्लब आहे का? Wink

छान आहेत वरच्या सगळ्याच रेसिपीज् ..

मी बरेच वेळेला किन्वा शिजवून, ऑलिव्ह ऑइल, सॉल्ट, पेप्पर, क्वचित कायेन मिक्स् करून कशाही बरोबर खाते .. (उरलेल्या भाज्या, आमट्या, सांबार, कोशींबीर वगैरे)

मोअर लेटर .. Happy

थालिपिठाची थोडी गडबड झाली.

पाणी घालून किन्वा जास्तं वेळ शिजवला. त्यात बटाटा किसून घातला. दाण्याचा कूट, हिरवीमिरची, जिरंपूड घातल्यावर कन्सिसटन्सी जरा थापण्यापलिकडली वाटली म्हणून केप्रची उपास भाजणी मिसळली. थालिपिठं चिवट झाली.

लगदा थापता न येण्याचं कारण बहुतेक सगळं गरम असतानाच एकत्रं केलं हे असेल किंवा भाजणी जास्तं झाली असेल. आता पुढल्या वेळी किन्वा-बटाटा पूर्ण गार होऊ देईन आणि मग अगदी जराशी भाजणी घालेन.

बेसिक किन्वा शिजवताना:
एक वाटीला दुपटीपेक्षा थोडं कमी पाणी घालून , आधी हाय फ्लेम वर उकळी आणायची , त्यात टीस्पुन ऑइल-मीठ घालून मग गॅस बारीक करून साधारण १५ मिनिटं शिजवायचं , वेळ ५ मि इकडे तिक्डे होउ शकतो , गॅस कडे लक्ष ठेवायचं !
व्हेरिएशन करताना :
पहिली उकळी आल्यावर अ‍ॅडीशनल व्हेजीज घालु शकता ( उदा. कॉर्न, मटार, पायनॅपल , मनुका-बेदाणे, ग्रीन बीन्स्न- फ्लॉवर इ. पैकी जे आवडतं ते).
मसाल्याचीही भरपूर कॉबिनेशन्स करता येतात .. किच्न किंग-रजवाडीगरम मसाला, नवाबी मटन मसाला किंवा फक्त आलं आणि टोमॅटो किसून शिजताना इ.
वरून घालायच्या फोडण्यां मधे वर दिलियेत तशी बरीच कॉबो छान लागतात !

डीजे, साबुदाणा खिचडी स्टाइल किनवा करताना साधारण असाच शिजवते. थालिपिठासाठी थोडा मऊ आणि लगदा शिजवता बहुतेक बेअंदाज पाणी घातलं.

मैत्रिणीनं या रेसिपीचा किनवा हांडवो खायला घातला. चवीला अप्रतिम लागला. कृतीत एक बदल म्हणजे लाडूबेसन वापरलं म्हणाली.

मी किन्वा चा उपमा, किंवा किन्वा सॅलड किंवा सूप मधे घालून खाणे एवढेच करते.
उपमा चांगला लागतो. रेसिपी नेहेमीप्रमाणेच.

मी देसी स्टाईल करते.फोडणी वर भरपूर भाज्या( कांदा, टोमॅटो, फरसबी,भोपळी मिरच्या,पालक्,मटार दाणे) परतायच्या. त्यात धणे जिरे पूड, हळद, तिखट, चिमुटभर गरम मसाला आणी मग किन्वा मिक्स करायचा. वरून भरपूर कोथिंबीर.

आम्ही मागे किन्वुदाणा खिचडी करण्यासाठी आणला होता किन्वा.. तो प्रकार खूप काही आवडला नाही.. त्यामुळे उरलेला तसाच पडून राहिला..

किन्वामध्ये खूप प्रोटीन्स असतात त्यामुळे त्यात अजून प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे चिकन, मासे किंवा टोफू वगैरे घालू नये म्हणे...

किन्वा मधे खूप प्रोटीन्स असतात असे नाही तर बॅलन्स्ड प्रोटीन्स (सगळ्या अमिनो अ‍ॅसिड्स चा योग्य बॅलन्स असतो).

पुरुषाला दिवसात ५६ ग्रॅम आणि स्त्रीला साधारण ४६ ग्रॅम प्रोटीन्स ची आवश्यकता असते. इ कप शिजवलेल्या किन्वा मधे साधारण ८ ग्रॅम प्रोटिन्स असतात.

वा वा. भरपूर प्रकार आलेत की. मी कॉस्ट्कोतून आणलेले पाकीट ४ महिन्यात अर्धेच संपले आहे, आता पटापट संपेल. Happy
दीपांजली, सही आहेत सगळ्याच आयड्या.
सशल, मी पण तसाच खायचे पण ते जरा बोअर झाले आता.
एम्बी, उपमा करताना आधी किन्वा शिजवून घ्यायचा का ?

पुण्यात कुठे मिळतो का हा किन्वा...

तिकडून येताना आई घेऊन आली आहे.. त्याचा मस्त खिचडी भात खाल्ला.. पण आणलेला संपल्यावर कुठे शाधायचा हा प्रश्न आहे..

दोराबजी मस्त आहे. कालच जाऊन आले. सोडेक्सो घेतात हा अजून एक फायदा.
पण हे स्पेशल पदार्थ इथे फार म्हणजे फार महाग असतात. एखादवेळी खायला ठीक आहे पण नियमित खायला नाही परवडणार ( मला ). फक्त शानचे मसाले तिथे रिझनेबल रेटमध्ये मिळतात हे मला फारच आवडले Happy

जरा बर्‍या दरात भारतात कुठे मिळत असेल किन्वा तर मलाही सांगा नक्की.

किन्वाची ईडली किंवा डोसा सुद्धा छान लागतो.अर्ध्या प्रमाणात तांदुळ आणि अर्ध्या प्रमाणात किन्वा घेउन करुन बघितला आहे. नुसता किन्वा घेतला तर थोड्या चिकट होतात इडल्या. मला खिचडि आणि सॅलड मधे जास्त आवडतो.

किन्वा शिजवून त्यात ब्लॅक बीन्स, कोथिंबीर, लिंबाचा रस, ऑऑ, मिरपूड, मीठ घालून मस्त लागतं.

शिजवलेल्या किन्व्यात बदामाचे काप, क्रॅनबेरीज, पुदिन्याची पानं (बहुतेक तरी) असा एक प्रकार आमच्या कॅफेटेरियात आणि स्टॉप अँड शॉपच्या सॅलड बारवर बघितला आहे. आज वैद्यबुवांनी पण अशीच एक रेसिपी सांगितली.

किन्वा + रोस्टेड व्हेजी सॅलड पण चांगलं लागतं.

राजगिर्‍याची करतो तशी खीर पण चांगली लागेल असा माझा अंदाज आहे.

धन्यवाद किन्पंख्यांनो. पॅटिसची रेसिपी माबोवरचीच आहे. कोणत्यातरी पाकृ स्पर्धेसाठी कोणीतरी लिहिली होती. वरती मवाने लिंका टाकल्यात त्यातली पहिलीच लिंक आहे देविकाच्या पॅटिसची.

सॅलड मनची रेसिपी वापरून. नक्की आठवत नाही आता पण फोटोवरून ब्लॅक ऑलिव्ज, कांद्याची पात, कॉर्न दाणे, ग्रेप टोमॅटोज, काकडीचे तुकडे आणि लिंबाचा रस, मीठ मिरी असं सगळं शिजवून जरा थंड झालेल्या किन्वात मिक्स केलं बाकी विषेश काही नाही.

शूम्पी, मस्तच आहेत फोटो.

मी काल सलाड ची कृती म्हणाले होते ती अशी - (बहुतेक एपिक्युरियस वरची आहे)

वॉर्म किन्वा सलाड -
पाकिटावरच्या सूचनाबरहुकूम किन्वा शिजवून घ्यावा. शिजवताना आवडीप्रमाणे मीठ, ऑऑ वगैरे घालावे. गार्बान्झो बीन्स शिजवून धुवून ठेवाव्यात. (कॅन मधल्या असतील तर नुसत्या धुवून ठेवाव्यात) रेड पेपर आणि पातीचा कांदा (पात व कांदा दोन्ही) चिरुन घ्यावे.
पॅन मधे ऑलिव ऑईल थोडेसेच तापवून चिकपीज परतून घ्याव्या. त्यातच पेपर परतून घ्यावे. मग गॅस बंद करुन त्यात शिजलेला किन्वा, कोथिंबीर, भरपूर लिंबूरस, मीठ, जिरेपूड, (हवे असल्यास चिली फ्लेक्स किंवा sriracha sauce), हवे ते सिझनिंग्स घालून खावे. हवे असेल तर यात क्रंची बॉकोली कींवा इतर भाज्या, पेपर्स घालू शकता.

यात चिकपीज आहेत, ज्यात परत प्रोटीन्स असतात. चिकपीज नको असतील तर ब्लॅक बीन्स पण चांगल्या लागतात.

Pages