निवासी अपंग कल्याण केंद्र, सटाणा

Submitted by साजिरा on 25 April, 2012 - 06:46

आपण किती तक्रारी करत असतो सतत. एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही म्हणून. नोकरी-धंद्यात प्रश्न उभे राहिले म्हणून. आर्थिक आणि शारिरिक दुखणी उद्भवली म्हणून. वीज-रस्ते-पाणी भरपूर मिळत नाही म्हणून. सरकार आणि प्रशासन नालायक आहे म्हणून. प्रेमभंग झाला म्हणून आणि आज जेवण फार बरं नाही मिळालं म्हणूनही.

खरं तर हे सारं आपण हातीपायी धड असतो म्हणून. तसे नसतो तर काय झालं असतं? सोपं आहे- देवाने दुसरं काही दिलं नाही तरी चालेल, पण हे नशीबात नको द्यायला होतं- असं रोज वाटलं असतं.

वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सटाण्याच्या अपंग कल्याण केंद्राला भेट दिली तेव्हा तिथल्या सामान्य-निरोगी आयुष्याचा, समाजात इतरांच्या बरोबरीने जगण्याचा मिसळण्याचा हक्क नाकारल्या गेलेल्या दुर्दैवी जीवांना बघितलं आणि अक्षरशः मिटून जायला झालं. आपण सुदैवी असल्याच्या जाणीवेबरोबरच निसर्गाशी लढाई करत आनंदाने जगणार्‍या या शेकडो मुलांना बघून अंतर्मुख व्हायला झालं.

साधारण दीड तपापूर्वी पुण्याच्या मामासाहेब मोहोळ प्रतिष्ठानने ही निवासी अपंग शाळा सटाण्यात सुरू केली, तेव्हापासूनच प्रवास आपल्याला थक्क करून टाकतो. झोकून देऊन काम करणार्‍या इथल्या शिक्षकांनी अन कार्यकर्त्यांनी गावोगावी खेडोपाडी फिरून अपंग मुलं गोळा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अनेक ठिकाणाहून हाकलून देण्यात आलं. कारण ही कुटुंब गरीब होती आणि जमेल तसं काम करण्यात आणि भीक मागण्यातही या दुर्दैवी मुलांची त्या कुटुंबांना मदत होत होती. शालेय शिक्षण तर या मुलांपासून लाखो मैल दूर- अशी परिस्थिती.

केंद्राला जागा कशीबशी मिळाली, पण त्यानंतर खरा संघर्ष सुरू झाला. इमारत बांधणे, शाळेची आणि अपंगांसाठी लागणारी साधनसामग्री, त्यांचं रोजचं जेवण, कपडे आणि इत्यादी लाखो गोष्टी सरकारी अनुदानाशिवाय कशा उभ्या करायच्या हा यक्षप्रश्न पुण्यामुंबईनाशिकच्या तसंच स्थानिक देणगीदारांनी हळुहळू सोडवायला सुरूवात केली. हा सारा प्रवास खरं तर चार ओळींत लिहिता येण्यासारखा नाहीच.

सरकारी अनुदान तर आजही नाही, आणि कधी मिळेल तेही सांगता येत नाही. मात्र अठरा वर्षांनंतर आज संस्थेची स्वतःची मुख्य इमारत, शाळेची इमारत, व्यायामशाळा, संगणक खोली आणि यांत लागणारे बहुतेक सारं साहित्य आहे. हे सारं पाहून आता अपंग व्यक्तीच्या कुटुंबांचा विश्वास बसू लागला आहे. आपल्या दुर्दैवी मुलांच्या आयुष्यात थोडाफार उजेड भविष्यात आहे, याची खात्री वाटू लागली आहे.

काही छायाचित्रांद्वारे या संस्थेची ओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न.

***

संस्थेच्या आवारात प्रवेश केल्यानंतरची ही दर्शनी इमारत. सगळीकडे स्वच्छता, टापटीप आणि नीटपणा डोळ्यांत भरण्याजोगा. ही साफसफाई जमेल तशी मुलंच करतात. शिक्षक आणि स्वयंसेवक त्यांना मदत करतात.
darshani imaarat.jpgmain passage.jpg

त्याशेजारची शाळेची इमारत आणि मैदान. जमेल तशी सजावट आणि नेटकेपणा इथंही आहे. कचरा नावालाही नाही.
school & ground.jpg

मुलांनी स्वतः खपून संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी बाग तयार केली आहे, जपली आहे.
baag.jpgbaag1.jpg

शालेय शिक्षणापुरतंच मुलांना मर्यादित न ठेवता इथून ती बाहेर पडतील तेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहू शकतील अशा प्रकारे इथल्या व्यावसायिक शिक्षणाचंही डिझाईन करण्यात आलं आहे. संगणक प्रशिक्षण हा त्यातलाच एक भाग. हे सारं अर्थातच ठिकठिकाणच्या देणगीदारांच्या कामातूनच उभं राहिलं आहे.
computer room.jpg

व्यायामासाठी जागा. ही सजवलीही आहे मुलांनीच इथल्याच एका चित्रकार शिक्षकांच्या मदतीने.
इथलं साहित्य आणि उपकरणं अशीच कुणीकुणी दिलेली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काही फिजिओथेरपिस्ट इथं नेमाने येऊन मुलांकडून व्यायाम करून घेतात. आजवर कधीच उभं राहू न शकलेली मुलं स्वतःच्या पायांवर उभं राहतात तेव्हाचा आनंदाची तुलना कशाशी करता येईल बरं?
vyayamshala.jpgphysio 1.jpgphysio 2.jpgphysio 3.jpg

सांगितल्याबरहुकूम व्यायाम करून दाखवला की मग खाऊ, बक्षिस. म्हणजे काय, आनंदच. पण कधी तरी उभं राहता येईल- या आशेचा आनंद जास्त मोठा!

physio 4.jpg

निवासाची जागा. आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहणारी आनंदी मुलं.
niwas.jpgniwas- girls.jpg

इतर शाळांत होतात तसे इथेही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम वेळोवेळचं औचित्य साधून होतात. कुणाचा नाच छान आहे, तर कुणाचा आवाज दैवी. कुणी नाटकबाज आहे तर कुणी भाषणबाज..!
activity.jpgActivity 1.jpgActivity 2.jpgActivity 3.jpgActivity 4.jpg

अपंग दिनानिमित्त खास स्पर्धाही होतात. जिल्ह्याच्या आणि राज्यस्तरीय स्पर्धांतूनही बाजी मारलेले काही बहाद्दर. यांना दुर्दैवी तरी कसं म्हणावं?

Activity 5.jpgActivity 6.jpgActivity 7.jpg

आणि यांत बक्षिसं आणि प्रशस्तीपत्रं मिळाल्यावर झालेला डोंगराएवढा आनंद!
baxisvijete.jpg

ही दिनचर्या. सार्‍यांची पाठ आहे अगदी. आपण कुणी पाळतो एवढ्या काटेकोरपणे अशी दैनंदिनी?
dainandini.jpg

ही भोजनशाळा. जेवायला बसायच्या आधी नित्यनेमाने श्लोक, प्रार्थना.
bhojan.jpg

मुख्य इमारत, शाळा, भोजनालय, स्वच्छतागृहे, झोपण्याच्या खोल्या आणि सगळ्या परिसरात मुलांना आधारासाठी अशी हँडरेल्स लावली आहेत.
helping handrails.jpg

आपल्याला असतो तसा त्यांनाही मोकळा वेळ असतोच की. मग ही मुले असं खेळून स्वत:ला आणि एकमेकांना रिझवतात. इतकंच काय, पण कधी दंगाही करतात!
khelnari mule.jpg

झेंडावंदन. स्वत:च्या पायावर धड उभं तर राहायचं आहेच, पण देशाबद्दलही काहीतरी वाटतंच आम्हाला. काय वाटतं ते वेळ आल्यावर करूनच दाखवू थेट.
zendavandan.jpg

आमच्या हातात कलाही आहे म्हटलं. शोभेच्या वस्तू बनवण्यापासून रोपं तयार करण्यापर्यंत अनेक कामं आम्ही दिवसभर करत असतो. इतकंच नाही, तर आम्ही केलेल्या वस्तू चक्क विकल्याही जातात. बघायचंय? हसू नका. शाबासकी द्या.
handicraft.jpghandicraft1.jpghandicraft2.jpghandicraft3.jpghandicraft3.jpghandicraft4.jpg

काही नाही. या जगातलं आमचं स्थान शोधतोय. चिंता नको. आम्ही तयार करूच ते, नसलं तरी.
swatacha shodh.jpg

ही घ्या पोझ! मी माझ्या पायावर उभा आहे. आनंदात आहे. सध्या फोटोच काढा. भविष्यात यालही एखादे वेळेस माझ्याजवळ ऑटोग्राफ घ्यायला!
swatantrydin.jpg

***

बर्‍यापैकी सुसज्ज परिपूर्ण असं हे निवासी अपंग कल्याण केंद्र असलं तरी अजून निधीची आवश्यकता आहे. अनेक गोष्टींबाबत वस्तुरूप मदत अजून हवी आहे. महिन्याला लाखो रुपये खर्च असणार्‍या या केंद्रात सध्या शंभराच्या वर मुलं आहेत आणि दहावीपर्यंत शाळा आहे. जवळपास चारशे मुलं आजवर इथून बाहेर पडली आहेत, आणि त्यातली काही उच्चपदस्थही आहेत. बाकीची समाधानाने आणि मानाने समाजात जगत आहेत.

दुर्दैवी मानल्या जाणार्‍या मुलांना मानाने जगण्याचा, शिक्षणाचा, रोजगाराचा आणि प्रतिष्ठेचा हक्क देणार्‍या या अशा संस्था म्हणजे आमची मंदिरं आहेत. नतमस्तक व्हायला यापेक्षा चांगली जागा ती कोणती सापडणार?

***
***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाळीत सटाणा संस्थेला संयुक्ता सुपंथ मायबोली परिवारातर्फे भेटीदाखल दिलेल्या पुस्तकांची यादी व आभारपत्र :

letter 2.jpg

ह्या वर्षी निवासी अपंग कल्याण केंद्र शाळेतील मुलांसाठी क्रमिक पुस्तके व वह्यांची शाळेला गरज आहे असे शाळेने कळवले आहे. जे कोणी अशा स्वरुपाची देणगी देऊ शकतात व इच्छितात त्यांनी इथे तसे लिहिले तर आपल्याशी संपर्क साधता येईल.

तसेच कोणत्या संस्था जर अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना वह्या व क्रमिक पुस्तकांची मदत करत असतील व त्याबद्दल आपल्याला माहित असेल तर तसेही कृपया इथे लिहावे. याबद्दल मिळणार्‍या माहितीचे व मदतीचे स्वागतच आहे.

अकु, माझ्या आईला या उपक्रमासाठी मदत करायची इच्छा आहे. प्लीज मला इमेल कर.

स्वाती२ च्या आई व या उपक्रमासाठी मदत करणार्‍या अन्य २ देणगीदात्यांचे मनःपूर्वक आभार! Happy
अपंग संस्थेला लागणार्‍या शैक्षणिक साहित्याची खरेदी केल्यावर त्यानुसार येथे अपडेट देऊच!

दिनांक१९ ऑगस्ट रोजी मायबोलीकर साजिरा (श्री. दीपक ठाकरे) यांनी सटाण्याच्या शाळेला भेट देऊन मायबोलीकरांनी संयुक्ता सुपंथ तर्फे दिलेली शैक्षणिक साहित्य रूपी मदत शालाप्रमुखांकडे सोपविली. शाळेने दिलेले पत्र मिळाले की ते इथे पोस्ट करूच.

सदर उपक्रमासाठी रुपये १२,३२५ मूल्याचे शैक्षणिक साहित्य शाळेने सांगितलेल्या गरजेनुसार आपण शाळेला घेऊन दिले. सदर साहित्यात निरनिराळ्या प्रकारच्या वह्या, पेन्सिली, रंगीत खडू, चित्रकला वह्या इत्यादींचा समावेश होता.
पुण्यातील विजय एंटरप्रायजेस या होलसेल शैक्षणिक साहित्य विक्रेत्या दुकानातून सदर वस्तू घेण्यात आल्या व त्या वस्तू संस्थेत साजिरा यांनी पोहोचविल्या.

शैक्षणिक साहित्याचे हे बिल :

apang sanstha bill 10 august 2013.JPG

मायबोलीकरांच्या सहकार्यामुळे हा उपक्रमही यशस्वीपणे पार पडला! देणगीदात्यांचे आणि या उपक्रमाला हातभार लावणार्‍या सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद!! Happy

शाळेत शैक्षणिक साहित्य देणगीदाखल देताना घेतलेले हे काही फोटोग्राफ्स :

१]

photo1.jpg

२]

photo2.jpg

३]

photo3.jpg

४]

photo4.jpg

Happy

photo5 copy.jpg

सटाणा निवासी अपंग कल्याण केंद्र संस्थेने मायबोली व संयुक्ता सुपंथचे आभार प्रदर्शित करणारे पत्र पाठविले आहे :

satana apang sanstha august 2013 donation letter.JPG

अत्यंत स्तुत्य उपक्रम
यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असणा-या सदस्यांचे अभिनंदन आणि आभारही
अशा उपक्रमामुळे माबोकर असल्याचा अभिमान वाटतो. Happy

सटाण्याच्या अपंग संस्थेला आपल्या एका संयुक्ता मायबोलीकरणीने खेळाचे साहित्य देणगीदाखल नुकतेच देऊ केले. शाळेत मुलांना खेळण्यासाठी क्रिकेटचा जुना सेट आणि लगोरीचा जुना सेट यांपलीकडे जास्त काही साहित्य नव्हते. देणगी दिलेल्या साहित्यात क्रिकेटचे दोन संच, रबरी रिंग्जचा डझनाचा संच, बॅडमिंटन रॅकेट्स व शटलकॉक्स, बुद्धिबळाचे संच, निरनिराळे बोर्ड गेम्स, पझल्स, बिल्डिंग ब्लॉक्स, रुबिक क्यूब्ज, डार्ट बोर्ड इत्यादी बरेच वेगवेगळ्या प्रकाराचे खेळ आहेत. मुलांना खेळांमुळे शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी उत्तेजन मिळेलच ह्यात शंका नाही.

देणगी देणार्‍या संयुक्ता मायबोलीकरणीने मुलांची नेमकी काय गरज आहे ह्याची माहिती घेतली आणि स्वतः हिंडून ह्या साहित्याची खरेदी केली, ती खरेदी पुण्यात साजिरा यांच्याकडे सुपूर्द केली आणि साजिरा ह्यांनी शाळेला भेट देऊन तिथे हे खेळाचे साहित्य हस्तांतरित केले. साजिरा व देणगी देणार्‍या संयुक्तेचे खास आभार व अभिनंदन! Happy

हे खेळाचे साहित्य शाळेला दिले तेव्हाचे काही फोटोग्राफ्स :

satana2.jpg

संस्था , तिची इमारत, परिसर, कार्य सगळेच सुंदर आहे.उपयुक्त माहिती . धन्यवाद साजिरा. 'त्या' संयुक्तेचेही अभिनंदन.

ही संस्थेकडून मिळालेली पोच : खेळाचे काय काय साहित्य संस्थेला देणगीदाखल मिळाले आहे ते तपशीलात दिले आहे.

don lett2.JPG

मायबोलीकरांनी (किंवा मायबोलीकरणीने म्हणूयात!) दिलेल्या खेळाच्या साहित्याचा वापर मुलं करत आहेत का? त्यांना खेळ आवडले का? ह्या आमच्या प्रश्नाचे उत्तर संस्थेने पाठवलेल्या ह्या फोटोग्राफ्सनी दिले. Happy

१]
SANY0053.jpg

२]
SANY0055.jpg

३]
SANY0057.jpg

४]
SANY0059.jpg

Pages