एकदा असंच सहजच...
पाय मोकळे करायला
निघाले मी संध्याकाळी
माझ्याचसोबत फिरायला.
हात धरला घट्ट तशी
वैतागले मी माझ्याचवर
’लहान नाही राहिले आता...
सोड हात मोकळं कर!’
दिला सोडूनी हात तरी पण
मीही जराशी काळजीतच
पुन्हा उधळली सैरभैर तर?
हरवलीच जर सांजेतच?
समुद्र ऐसा लुळावल्यागत
आणि मी अशी खुळावल्यागत
किनार्यावरी अंथरते मी
स्वप्न जुनेरे उलगडल्यागत
बघत राहते मीच मला मग
क्षितीजापाsssर उडताना
मणभर जडशीळ पाऊल माझे
वाळूत खोल खोल रूतताना
वळून पाह गे एकदातरी
परतून येणे नसे जरी
तुझा पिंजरा दहा दिशांचा
माझ्या भिंती चार घरी...
माझ्यातुन मी अशी कितीदा
उडून जाते होऊन अत्तर
एकेदिवशी उरेल येथे
कुपी रिकामी नुसती पोकळ
स्वप्न जुनेरे घडी घालुनी
घट्ट पकडते छातीशी
उरलेली मी एकटीच मग
पुन्हा परतते घरट्याशी
बरेचदा आताशा खुपदा
दिवस रांगडा सरताना
सांज बिचारी मला टाळते
माझ्या घरी उजळताना!
(No subject)
सुन्दर रचना.... <<स्वप्न
सुन्दर रचना....
<<स्वप्न जुनेरे घडी घालुनी
घट्ट पकडते छातीशी
उरलेली मी एकटीच मग
पुन्हा परतते घरट्याशी
बरेचदा आताशा खुपदा
दिवस रांगडा सरताना
सांज बिचारी मला टाळते
माझ्या घरी उजळताना!>>
खुपच सुंदर मानसी! कित्त्ती
खुपच सुंदर मानसी!
कित्त्ती कित्त्त्त्त्त्त्त्ती सुंदर लिहिशील अगं?
खुपच सुंदर मानसी!>>+१
खुपच सुंदर मानसी!>>+१
धन्यवाद!
धन्यवाद!
छान....
छान....
केवळ अप्रतिम!! खूप आवडली!
केवळ अप्रतिम!! खूप आवडली!
इतकं भिडणारे लिहितेस ग
इतकं भिडणारे लिहितेस ग ...
जियो
इतकं भिडणारे लिहितेस ग
इतकं भिडणारे लिहितेस ग ...
जियो
छान....
छान....
कोट करायला संपुर्ण कविताच
कोट करायला संपुर्ण कविताच पुन्हा पोस्टावी लागेल!
छान!
धन्यवाद!
धन्यवाद!
कित्त्ती कित्त्त्त्त्त्त्त्ती
कित्त्ती कित्त्त्त्त्त्त्त्ती सुंदर लिहिशील अगं?<<<<
रिया +१०००००००००००.... !!!!!
खूपच सुन्दर.
खूपच सुन्दर.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
खूप खूप धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद!
छान
छान
मानसी, फार म्हणजे फारच सुरेख
मानसी, फार म्हणजे फारच सुरेख लिहिलंयस, अफलातून कल्पना आहे ही...
मस्तच १दम... सुचतात कसे इतके
मस्तच १दम... सुचतात कसे इतके सुन्दर शब्द... अजुन वाचायला आवडेल....
धन्यवाद!
धन्यवाद!
अहा... खुपच सुंदर! तरल कविता!
अहा... खुपच सुंदर! तरल कविता!
माझ्यातुन मी अशी कितीदा उडून
माझ्यातुन मी अशी कितीदा
उडून जाते होऊन अत्तर
एकेदिवशी उरेल येथे
कुपी रिकामी नुसती पोकळ >>>>>>> आहा
मानसी ...तुझ्या कवितांना दाद द्यायला शब्द कमी पडतात खरंच
धन्यवाद आर्या, मयी...!
धन्यवाद आर्या, मयी...!
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
मनात खूप खोलपर्यंत पोचणारी
मनात खूप खोलपर्यंत पोचणारी रचना
माझ्यातुन मी अशी कितीदा
उडून जाते होऊन अत्तर
एकेदिवशी उरेल येथे
कुपी रिकामी नुसती पोकळ
हे तर प्रचंड आवडलेलं कडवं!
समुद्र ऐसा लुळावल्यागत आणि
समुद्र ऐसा लुळावल्यागत
आणि मी अशी खुळावल्यागत
व्वा...
सुंदर कविता
धन्यवाद!
धन्यवाद!
क्लास....
क्लास....
वाह खुप सुंदर रचना.....
वाह खुप सुंदर रचना.....
धन्यवाद.
धन्यवाद.
Pages