समद्या सातारा जिल्हयची खादाडी

Submitted by गौतम७स्टार on 22 June, 2009 - 10:51

मित्रहो,

आपल्या साताराची खादाडी ईथे सान्गा.

१ पेढे

आशोक मोदी, लाटकर स्वीट मार्ट.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरुर योगेश भाऊ.. नाव बदलले Happy

आपली मते द्या

आणखी, पान बरोबर जागी लावल्या बद्दल धन्यावाद!!!

.

येस...रिटकवली चिवडा झक्कास सातारा अनी कराड स्टन्ड वर Gauri Special Bhadang lai bhari

कणसे चि चव तिच आहे, फक्त मी VEG असल्यने वशाट खात नाही रे...
बॉम्बए rest. समोर बालाजी धाबा हि झक्कास आहे...

रजतद्रि (पोवइ नाका) ची आम्बोलि खल्लास आहे.

श्री राम दूग्ध मन्दिरात (राजवाड) मसाला दूध भारी असाते.

नागठाण्याच्या दरबार हॉटेलमधली मिसळ एक नंबर असते.

जात धर्म न मानणाय्रांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय? Wink
AndyFromHeaven

.

कराडला एस. टी स्टँड जवळ १ वडा-पाव ची गाडी लागते (Near Gujar Hospital). बेस्ट १
बहुतेक श्रीक्रुष्णा वडा-पाव

अतीत एस. टी स्टँडमधील नाश्ता झकास. >> अगदी... सांगली-पुणे नॉनस्टॉप गाडीचं ते एक आकर्षण होतं.. तिथला वडा-पाव, भजी आणि शिरा-उप्पीट मिक्स एकदम मस्त..

.

.

कराडच्या चावडी चौकातल्या बॉम्बे रेस्टॉरंटमधील आंबोळी बेश्ट वाटली
इतकी छान आंबोळी मी जगात कुठेच खाल्ली नाही.
शिवाय दत्त चौकात एका ठिकाणी मिळणारी मिसळ.
रेव्हेन्यु क्लब मध्ये नॉन व्हेज.

विकु, दत्त चौकात मिळणारी मिसळ म्हणजे गजानन हाटेलातली..

ओह्हो...१दा खायला हवी बॉम्बे रेस्टॉरंटमधील आंबोळी मग
कराडला अजुन काय काय famous?

आपलं सातारा तस खादाडीसाठी कधीच प्रसिध्द नव्हतं!
तरी काही काही ठिकाणी काही काही पदार्थ बेष्ट मिळतात....

सहजी आठवतायत तशी काही नावं टाकतोय.... सवडीनं अपडेट करीन....

राजवाडा चौपाटी (आणि त्यातसुध्दा सुपनेकरचा बटाटेवडा आणि पॅटिस!)
एसपीएस शेजारी मिळणारा धावडेचा वडापाव...
सम्राटचा वडापाव.....
राजपुरोहीतची समोसा, कचोरी.....
नाक्यावरची पेशवाई भेळ....
कणसेची काजुकरी....
अशोक मोदीचे कंदी पेढे आणि आंबा बर्फी....
शाहुपुरी चौकातल्या हॉटेलमधली पुरी भाजी....
मोतीचौकातल्या मामीच्या गाड्यावरचे मसाला दुध....
युनिकचा (समर्थ शेजारी) आइसक्रीम सोडा....
इत्यादी इत्यादी....

खादाडी (कमी) कम गप्पांचे (जास्त) अड्डे :

शाळा आणि एसपीएसच्या दिवसात: धावडेचा वडापावचा गाडा
अभाविपच्या दिवसातः यादोगोपाळातल जय कॅफे
वाय सी ला असताना: कॉलेजसमोरच सबमरीन हॉटेल

सही रे स्वरूप्....शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या....

राजवाडा चौपाटी - All India Sp Bhel
चार भिन्ती - Swad Evening Spot
पोवाई नाका - कछ्ची दाबेली
K B P - माधवराव मिसळ

साताराची आणखी काही ठीकाणा,

श्री राम दूग्ध मन्दिरात (राजवाडा) येथिल चहा पीवून पहाच... तसेच स्वाद अम्रुततुल्य मधेही चहा झक्कास असतो.

कबाडी ची पाव-भाजी (पोवई नाका)...

सिटी पोस्टाबाजुला वडा-पाव मस्त असतो,
१-ढोणे वडा-पाव (सकाळी ११ - रात्री ७)
२-बोले मामा वडा-पाव (रात्री ६.३० - रात्री ८.३०)

सुपनेकरचा जेवण कसा असाता रे स्वरूप?

@ गौतम

के. बी. पी. जवळ आनंदराव कोण आणि कुठे आहे?

का माधवराव म्हणायच होत?

जात धर्म न मानणाय्रांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय? Wink
AndyFromHeaven

अरे आनंदराव नव्हे .... माधवराव असतील...
पुसेसावळीला उसाचा रस फार छान मीळतो. देशी उसाचा रस बहुदा सातारा जिल्ह्यात कोठे मीळत नसावा.
म्हसवडला भेळ फार छान मिळते.
तसा सातारा पेढे, वेडे आणि घोडे यासाठीच प्रसिद्ध आहे.
मायणीला पेरु फार छान मीळतात.
कराडला पर्वती restaurant ची coffee फार छान आहे...

.

Lol बरोबर तो माधवराव च आहे रे. धन्यवाद!!!

>> राजवाडा बस स्टॉपशेजारचे कडक खारेदाणे आणि हळद लावलेले वाटाणे १-number असतात.

पिलीव ची डाळ, पेरु, अन्जीर पण प्रसिद्धरस्ता (सातारा-पन्ढरपुर रस्ता)

.

अरे कराडला भारतराजची लस्सी मिळते का रे अजुन. १९९४-१९९५ ला फार प्रसिद्ध होती. फार्मसी college समोर मीळायची.

कराडच्या चावडी चौकातल्या बॉम्बे रेस्टॉरंटमधील आंबोळी बेश्ट वाटली
इतकी छान आंबोळी मी जगात कुठेच खाल्ली नाही. >> सहमत
कराडमध्ये गजानन हॉटेल आणी बॉम्बे रेस्टॉरंट ही आंबोळी आणी मिसळ साठी प्रसिद्ध आहेत, पण इतरही पदार्थ चांगले असतात.
पाटण रोडला नविन शिवराज ढाबा झाला आहे तिथे अक्खा मसूर ही स्पेशालीटी आहे.. मस्तच
बाकी योगेशने सांगितलेले उंब्रज ढाबा तर प्रसिद्ध आहेच.
स्टँडजवळ वडापाव मिळतो ती साईनाथ वडापावची गाडी, तिथेच तृप्ती वडापावची गाडीसुद्धा आहे.
कोयना दूध संघाची बासुंदी सुद्धा प्रसिद्ध आहे..

.

योगेश,
ते संगम असावे. चुभुदेघे.

बरोबर योगेश आंबा बर्फी आणी मावा बर्फी खल्लास असते.

तसेच तुळजाराम, बाळाप्रसाद मोदी हेसुद्धा पेढे झक्कास बनवतात.

योगेश,
विजय ने बरोबर सांगितले आहे, त्याचे नांव संगमच आहे,
आणी पंकू >> कराडला पर्वती restaurant ची coffee फार छान आहे... पर्वती restaurant नव्हे, पार्वती..
ते बंद होऊन खूप वर्षे झाली Sad

.

पुणे बंगलोर हायवेवर कुठलेतरी एक हॉटेल आहे. अस्सल सातारी जेवण मिळते. मस्त होतं एकदम. वेटर मावळ्याच्या ड्रेसमधे वगैरे होते.
मला नाव आठवत नाहिये हॉटेलचे. पण ठिकाण आवडले होते.
--------------
नंदिनी
--------------

सातार्‍यात एवढी खादाडी झाल्यावर "भावे बडिशेप" हवीच.
>>कराडला शिकायला असताना आम्ही मेसवर जेवायचो. त्यावेळी संगम सारख्या हॉटेलांत जायची भीती वाटायची.
अगदी अगदी.
मी तर एकदाच बी ई झाल्यावर गेलो होतो.

Pages