समद्या सातारा जिल्हयची खादाडी

Submitted by गौतम७स्टार on 22 June, 2009 - 10:51

मित्रहो,

आपल्या साताराची खादाडी ईथे सान्गा.

१ पेढे

आशोक मोदी, लाटकर स्वीट मार्ट.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रांनो,
सुपणेकरांचा पॅटीस विसरलात का? आणि सम्त्राटचा वडापाव.......
राजवाड्यावरच्या समोरची राजाची भेळ.... वाय्.सि. च्या समोरचा भगवानरावचा (बहुतेक प्ततिक हॉटेल असावे..)चहा... भारतभुवनची मिसळ....... नाक्यावरच्या राजपुरोहितची बासुंदी..... राऊतांची जिलेबी (२६ जनेवारी आणि १५ ऑगस्ट).....
वाईला कोणत्यातरी सरकारी ऑफिससमोर मिसळपाव लईच भारी मिळतो.
प्रत्येकाची चव अजुन जिभेवर आहे.

.

कराडला शिकायला असताना आम्ही मेसवर जेवायचो. >>
योगेश कराड ला कॉपरेटिव्ह मेस होत्या..मुलानी चालवलेल्या Happy तू कुठल्या मेस मध होता ?.. मी १ वर्ष होतो कराड मधे..

तरी कराड मधली ऐश म्हणजे हॉटेल पंकज मधे जायचे... गेट टुगेदर साठी एक नंबर ठिकाण..
आणि कनसे ढाबा... तसेच अतीत च्या बस स्टँड वरचा वडा-पाव Happy

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

.

>> दुसर्‍या वर्षी सरळ सोमवार पेठेत खोली घेतली. तिथेही वेगवेगळ्या मेस ट्राय केल्या.
क्या योगायोग है. मी पण.

.

>>गावात यशोधन म्हणून एक खानावळ होती पशुधन म्हणायचो.
हो हो , जिना चढून जावे लागायचे.

>>सातारला खालच्या रस्त्यावर भीमराव हलवाईची खोबरा चिक्की खाल्लीय का कुणी? जबडा दुखायचा चघळून.
सही रे Happy खराच जबडा दुखायचा चघळून.

दगडुशेठ हलवाई (राजवाडा पालेकर बेकरी बाजुला) ची जिलेबी १ no असते.

राजवाडा पालेकर बेकरी, बटाटा पटीस (दुपारी ४ ते सम्पेपर्यन्त) पण लयी भारी असते, खावुन पहा

.

>>गावात यशोधन म्हणून एक खानावळ होती पशुधन म्हणायचो... Lol
आता बंद झाली आहे ही भुर्केंची खानावळ..

आता चावडी चो॓कात पाटला॑ची मेस चा॑गली आहे.
महाविर चा फरसाण एकदम छान. कराडातिल सर्वात महाग पण सर्वात छान. म॑डई जवळील अनुग्रह होटेल दिसायला एकदम खराब पण इथला वडा सा॑बार छान असतो.
गुरुवार पेठेत कोयना होटेल पण चा॑गले आहे. त्याच्या वर असणारे विजय भवन मधील पेढे , बर्फी , गुलाबजाम अप्रतिम असतात.
हिन्दुस्तान डेअरी चे आम्रख॑ड खुप छान आहे.

अरे वा , अनुग्रह अजून सुरु आहे? मी तिथे पन्नास पैशात चहा प्याला आहे. यावरून माझ्या वयाचा अन्दाज येइल.

.

अभय/ विजय, १९९३-९५ च्या आसपास अनुग्रह कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये प्रसिध्द होते,
पण आता सुरु असले तरी अवस्था चांगली नाही...

.

मित्रांनो, मी कराड मध्ये २ महिने होतो, १९९९ सालात. स्टँड शेजारी, बहुतेक त्रिमुर्ती असावे, माझी मेस होती. माझ्या आयुष्यातील सर्वात घाणेरडी मेस होती. अजुनही तिथले जेवण आठवले कि आंगावर काटा येतो.

नितीन,
कराडच्या मेसना तु २ महिन्यांत विटलास. आम्ही ४ वर्षे तिथे कशी काढली असतील विचार कर.

मला वाटते कोणत्याही शहरात स्टँड शेजारी असलेली मेस वाईटच असावी.
सोमवार पेठेत असलेल्या घरगुती मेस बर्‍या होत्या. विशेषतः इतक्या कमी पैशात.

सन्ध्याकाळी कॉलेजमधून परत येताना दिवेकर च्या वड्याचा वास यायचा.
मग पुढे काय ते पाच तारीख आहे की पंचवीस यावर.

फायनल ला आम्ही को ऑपरेटिव्ह मेस काढली होती. साखर कारखान्यात होणार नाहीत तेवढी भांडणे झाली.

कराडमध्ये माझी आवडती ठिकाणे अजूनहे आहेत वाचून तिथे जायचा मोह होतोय.
जाता जाता, तिथे नगरपालिका वाचनालयात इन्ग्रजी पुस्तके खूप होती. त्यातून्च मला इग्रजी वाचनचे वेड लागले.

१. कराडमधे डालूचे आईसक्रीम मस्त असायचे आता असते की नाही माहिती नाही.
२. कॉलेजजवळ आबुबरोबर भोजाचे कँटीन फेमस. अगदी पूर्वी भोजा सायन्सकॉलेज (म्हणजेच यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज) चे कँटीन चालवत असे. पप्पांबरोबर कॉलेजच्या गॅदरिंगला गेल्यावर तिथे जाउन टोमॅटो ऑम्लेट खायला जात असु.
३. महेश कोल्ड्रिंकस मधली मस्तानी, फालुदा अप्रतीम.
४. प्युअर वेज जेवाणासाठी शनिवार पेठेतले हॉटेल सरस्वती - जेवण मस्त असायचे तिथे.
५. पंकजचे जेवण बरे असे तेव्हा.
६. साई गार्डन गाडगे महाराज कॉलेजसमोर नविन निघाले होते अगदी सुरुवातीला त्याच्याकडे पावभाजी बरी असे.
७. घाटावर ते कॉफी, ज्युस वगैरे विकायचे एक दुकान आहे (तो व्यंकटेश भेळवालाच आहे बहुदा) त्याला थम्सअप + आईसक्रीम हा प्रकार मी शिकवला होता अजुनही करतो का ते माहिती नाही.
८. एकेकाळी मिलन फरसाण वाल्यांचा फरसाण आणि ढोकळा, दिवेकरचा ब्रेड, दिवेकरचा बटाटावडा, मॉडर्न बेकरीची खारी, मॉडर्न बेकरीचे पॅटिस वगैरे बरेच फेमस होते. हे सगळे जवळपास इतिहास जमा झालेय आता.
मिलन वाले सुरेशमामा आता बेंगलोरला असतात. मॉडर्नवाले मामा पण कराड सोडुन गेले त्यांनी आपली बेकरी कोणालातरी चालवायला दिलिय पण जावे वाटत नाही आता तिथे. दिवेकरानी आता सोमवारपेठेतल्या मोठ्या मशिदीसमोर टाकलिय बेकरी पण कितपत चालते देव जाणे.
त्यामुळेच राजपुरोहितचा धंदा जोरात सुरु आहे. कळकट्ट माणसे बघुन आता तिथे काही खायची इच्छाच होत नाही.
कराडचे दिवेकर (म्हणजे मॉडर्न बेकरीवाले), गुंजीकर (म्हणजे दिवेकर बेकरीवाले), सातारचे पालेकर बेकरीवाले सगळे एकमेकांचे नातलग.
९. घाटावर एकजण कट डोसा देतो तो मस्त असतो.
१०. गणेश भेळवाल्याची भेळ, पाणीपुरी, एस.पी.डी.पी मस्त.
११. शिवकृपा चुरमुरेवाले आहेत एक मुनिसिपाल्टीच्या समोर (प्रभात टॉकिजजवळ) त्यांच्याकडे चुरमुरे, खारे दाणे, फुटाणे वगैरे मस्त ताजे असतात.

बास मला वाटते येवढेच आता. फार भुक लागली.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

.

कराड मधली जुनी हॉटेल आता बिघड्ली आहेत.

महेश कोल्ड्रिंकस आता नाश्ता से॑टर झाले आहे. आईसक्रीम साठी आता मयुरा चा॑गले आहे.
गाडगे महाराज कॉलेजसमोरील साई गार्डन एकदम बकवास. मी एकदा बायको बरोबर गेलो होतो ते॑व्हा पावभाजी मध्ये चवळीची उसळ घालुन दिली होती न॑तर दोन महिने कुठेच पावभाजी खाण्याची ईछ्छा झाली नाही.
हीच परिस्थिती शनिवार पेठेतले हॉटेल सरस्वती ची आहे.
पंकजचे जेवण अजुनही चा॑गले आहे पण Rate & Quantity व्यस्त प्रमाणात आहे. service एकदम slow.
स॑गम हॉटेल ची पण परीस्थिती चा॑गली नाही.
दिवेकरचा बटाटावडा आणि दिवेकर बेकरी आता ईतिहास जमा झाले आहेत.
घाटावर खायचे झाले तर व्य॑कटेशची भेळ - पाणीपुरी, र्रॉयल ची पावभाजी, ल॑केश चा वडा. डोसा आ॑बोळी खायची तर Bombay Hotel गाठावे.
जेवणासाठी पाटण रोड ला शिवराज ढाबा झाला आहे. जेवण एकदम चा॑गले आहे. Family साठी वेगळी सोय आहे.
उ॑ब्रज चा गणेश ढाबा all time hit. पण नाव निट पाहुन जावे त्याच नावाचे ४/५ ढाबे तिथे आहेत.
Stand समोरील अल॑कार हॉटेल ची गुजराथी थाळी पण चा॑गली आहे.
वेगळ्या प्रकारच्या गुजराथी जेवणासाठी आहुजा पटेल समोर Laxmi Gujarat चा॑गले आहे पण Family घेउन जाण्या सारखे नाही.
हायवे ला कोल्हापूर बाजुला धनी म्हणून नवीन हॉटेल निघाले आहे. जेवण बरे आहे. मालक सोमवारातीलच आहेत. पण ओळखी चे लोक भेट्ले की बोलुन पकवतात.

आणखी माहिती न॑तर च्या भागात.

हायवे ला कोल्हापूर बाजुला धनी म्हणून नवीन हॉटेल निघाले आहे. जेवण बरे आहे. मालक सोमवारातीलच आहेत. पण ओळखी चे लोक भेट्ले की बोलुन पकवतात. >> हे धनी कुलकर्णी यांचे आहे. शुक्रवार पेठेत स्थालीपाक नावाचे एक घरगुती जेवण देणारे धनींचे मेस टाईप रेस्टॉरंट आहे. तिथे ४०-५० लोकांचे कार्यक्रम नीट करता येतात. साधे सुधे मराठी जेवण ही यांची खासियत.

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

कराड-कोल्हापुर रोड वर रायगड ढाबा असल्याचा आठवतोय...जेवण खुप चांगले असायचे तिथले.. तो आहे का अजुन तिथे ?

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

स्थालीपाक>> माझा साखरपुडा आणि माझ्या मुलाचे जावळ याच ठीकाणी झाले होते. जेवण बरे होते.
Stand समोरील अल॑कार हॉटेल ची गुजराथी थाळी पण चा॑गली आहे.>>> अनुमोदन
दिवेकरचा बटाटावडा आणि दिवेकर बेकरी आता ईतिहास जमा झाले आहेत>>> बहुदा त्यांच्या सुनेच्या खुन प्रकरणानंतर त्यांचा धंदा बसला.
असो, या वेळी चक्क कराडला जावुन घाटावर काहीही न खाता परत आलो.
प्रभुणे तू मला डिप्लोमाला सिनीअर होतास का? मी १९९२ चा पास आउट आहे. तु प्रभुणेसरांच्या घरी रहात होतास का?
मंदार

स्थालीपाक चांगले आहे. मी सध्या रात्रीचे जेवण तिथेच करतोय. वैजयंता (चावडी चौकात) नावाची पाटलांची मेस पण चांगली आहे. स्थालीपाकपेक्षा थोडी तिखट-जळजळीत असते जेवण पण चव झक्कास.

.

पी.डी. पाटीलांच्या घरासमोरचा नवनाथ सरवंतीवाला. याच्याकडचा रस अप्रतीम असतो.
स्टँडसमोर होराईझन बेकरी होती अजुनही असावी. त्यांच्याकडे मिल्कब्रेड मस्त मिळायचा. मनोर्‍याच्या खाली श्रोत्रींच्या फोटोस्टुडीओशेजारी एक आईसक्रीमचे दुकान आहे. त्यांचे मिल्कशेक्स चांगले असायचे.

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

अरे काय खाता का काय करता Happy मला मिरजेत भेळ कुठे चांगली मिळते असे विचारले तरी ठामपणे सांगता येणार नाही (आता हे म्हणु नका की मिरजेत चांगली भेळ मिळतच नाही. मिळते हो तिथे पण Proud )

बाकी सकाळच्या नाष्ट्याला संगम बाद एकदम.. परवा तिथे ऑम्लेट घेतले तर ब्रेड वेगळा घ्यायला लागला Sad आणि किंमती पण अवाच्यासव्वा आहेत..

मित्रहो, काय ईतक्यात संपली का खादाडी? अजुन सांगा...

काकडे जुस सेंटर मधे जुस छान मिळतो. पत्ता - देवी चौक, सातारा.

Pages