Submitted by गौतम७स्टार on 22 June, 2009 - 10:51
मित्रहो,
आपल्या साताराची खादाडी ईथे सान्गा.
१ पेढे
आशोक मोदी, लाटकर स्वीट मार्ट.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्थातच खाल्लाय! रायभोग,
अर्थातच खाल्लाय!
रायभोग, आंबेमोहोर, तामसाळ, चिमणसाळ.. आणि इतर अनेक (नावही आठवत नाहीत आता) - खरतर रोजच्या जेवणाला बासमती पेक्षा हेच जास्त छान वाटतात.. तामसाळ चा भात कसला मस्त ओशट आणि मऊ होतो!! (तोंडाला पाणी सुटलं)
तुक्याचा वडापाव आमच्याही लहानपणी होता.. पण पुढे तो नगरसेवक झाला आणि मग त्यानी गाडा बंद केला बहूतेक. तुक्याचा, पोपटचा, वडाखालचा! वा! कधी एकदा भारतात परतून वडापाव खाईन असं झालं एकदम! (सध्या वडाखालचा एक नंबर!)
केरळा बेकरीची खारी खरच असायची भारी! (अजूनही असेल)
आणि पंजाबचा गरम गरम पाव.. मऊ, लुसलुशीत! त्याच्या स्लाईसही व्हायच्या नाहीत इतका गरम असायचा..
कृष्णाबाईच्या प्रयोजनाला तर तोडच नाही.. रादर सगळ्याच उत्सवाला.. मस्त.. एकदम नॉस्टॅल्गिक झाले!! धागा सुरु केल्याबद्दल गौतमचे आणि बाकीच्या आठवणी काढल्याबद्दल योगेशचे आभार!
वाईला जाऊन वडापाव खाईन तेव्हा तुमची आठवण काढेन!
कोल्हापूरची एक मैत्रीण एकदा
कोल्हापूरची एक मैत्रीण एकदा चेतनाची भेलपुरी (मै. असच म्हणते) खायला घेऊन गेलेली.. आहाहा.. मस्त..
आणि मिसळपण!
वाईत गेलात कधी तर तितलीही मिसळ भन्नाट असते.. मिसळ आणि भजी..
आजचा दिवस काही खरा दिसत नाहिये.. घसा गेलाय कामातनं आणि कसले कसले पदार्थ आठवतायत!!!
गडबड ice-cream नावाप्रमाणेच
गडबड ice-cream नावाप्रमाणेच असतं....
३ प्रकारचे ice-cream flavours... बारीक शेवया... वेगवेगळ्या फळांचे तुकडे आणि वर wafers आणि cherrys ची सजावट.... १ नंबर........
एकट्यानं संपत नाही.... कोणीतरी partner हवा ते खाताना.....
हे आख्खा मसूर काय प्रकरण
हे आख्खा मसूर काय प्रकरण असते?
कराड ते सातारा मध्ये मला ५-६ धाब्यांवर तरी आख्खा मसूरचे बोर्ड दिसले.
मी लहान होते तेंव्हा आम्ही एक
मी लहान होते तेंव्हा आम्ही एक प्रकार खायचो....
उडिदाचे पापड तळायचे... ते चुरून त्यात मटकी, बारिक चिरलेला कांदा, तिखट आणि मीठ टाकून खायचं... ही गोष्ट इतकी अप्रतिम लागते... कि बास... आत्त्ता पण तोंडाला पाणी सुटलंय....
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
राजवाडा चौपाटीवर हिरापन्नाची
राजवाडा चौपाटीवर हिरापन्नाची भेळ एकदा खाऊन बघाच जबरदस्त खुप छान आहे.
आख्खा मसूर धाबा टाइप असते..
आख्खा मसूर धाबा टाइप असते.. ही त्यांचीच चेन आहे का माहीत नाही. . जयसिंगपूरजवळ एकदा खाल्ले आहे.. आख्खा मसुरच मागवला होता. स्वच्छता होती.. चवही चांगली होती.
हे आख्खा मसूर काय प्रकरण
हे आख्खा मसूर काय प्रकरण असते?>>> स्वरूप, कणसे धाब्यावर छान मिळते आख्खा मसूर. आम्ही सातार्याला गेलो की एकदा तरी कणसेचा दालफ्राय खातोच. मस्त असतो.
राजवाडा चौपाटी , लाटकर स्वीट
राजवाडा चौपाटी , लाटकर स्वीट मार्ट, कणसे धाबा.........अरेरे.....लहाणपणीच्या आठवणि .........
पाचगणीला मॅप्रो गार्डनमध्ये
पाचगणीला मॅप्रो गार्डनमध्ये सॅन्डविचेस खुप सही मिळतात.... आणि तिथुन थोडे पुढे गेल्यावर वेण्णा लेकच्या थोडे अलीकडे बगीचा म्हणून एक ठिकाण आहे तिथले मिल्कशेक खुपच जबरा असतात... आणि मार्केटमध्ये मिळणारा वॉलनट फज तर अगदीच १ नंबर
बगीचा म्हणून एक ठिकाण आहे
बगीचा म्हणून एक ठिकाण आहे तिथले मिल्कशेक खुपच जबरा असतात>>> बगिचा स्ट्रॉबेरी विथ क्रीम साठी प्रसिद्ध आहे अहाहा... स्ट्रॉबेरी विथ क्रीम च्या नुसत्या आठवणीनंच तोंडात पाणी आलं...
पुण्याहून सातारयाला जाताना
पुण्याहून सातारयाला जाताना गेल्या रविवारी खंबाटकी घाटाच्या आधी भैरवनाथ नावाचं छोटं हॉटेल आहे, तिथे मिसळ खाल्ली मस्त होती. तर्री वेगळी आणून देतात मस्त झणझणीत मिसळ!
कोल्हापूरहून पुण्याकडे जाताना
कोल्हापूरहून पुण्याकडे जाताना सातार्यात हायवेवर खंबाटकी बोगदा गेल्यानंतर लगेच "वैशाली ढाबा" आहे तिथे मस्त जेवण मिळते. भाकरी, भरली वांगी, तेल वांगे, मेथी पिठले, कांदा पिठले, भात, मसालेभात, ताक, दही, लस्सी.
हा तिथला मिरची-लसूण ठेचा.
मित्रांनो, माधवराव मिसाळवाला
मित्रांनो, माधवराव मिसाळवाला म्हणजे तोच का ज्याची सायन्स कॉलेज बाहेर चहा ची टपरी होती पूर्वी? मोती चौकात 'जीवन' म्हणून हॉटेल होते आता बंद झाले १९८५ ते ८९ पडीक असायचो तिथे मिसळ लई भारी असायची. आणि न्यू इंग्लिश च्या मागे पाटील खानावळ होती मांसाहारी! ७ रु. ला मटन ताट मिळायचे १ नं. कणसे म्हणजे शिवराज पंपा बाहेरचा का?
कणसे म्हणजे शिवराज पंपा
कणसे म्हणजे शिवराज पंपा बाहेरचा का?>>> हो.
माधवरावची टपरी आम्च्या केबीपीच्या बाहेरही होती.
माधवरावची टपरी आम्च्या
माधवरावची टपरी आम्च्या केबीपीच्या बाहेरही होती.>>>>>>> केबीपीच्या बाहेर म्हणजे आता सैनिक स्कुल च्या समोर आहे तिथे का? कारण मी असताना त्या कॉलेज चे नाव रयत शिक्षण संस्थेचे पॉलीटेक्निक कॉलेज असे होते. आम्ही RSS Polytechnic college असेच लिहायचो आणि ते सायन्स कॉलेज च्या मागे डीजी कॉलेज आहे तिथे होते. आणि माधवरावाची टपरी जुन्या हायवे वरून सायन्स कॉलेज ला वळतो त्याच्या सुरुवातीलाच होती.
ह्या शनिवार रविवारी
ह्या शनिवार रविवारी सातार्यात मुक्काम असणार आहे.
सातारा सिटी मध्ये खखादाडीची ठिकाणे सुचवाल का?
श्रावण महिना असल्याने शाकाहारी ठिकाणे सुचवा.
राहुल, नाक्यावर कबाडी ची
राहुल, नाक्यावर कबाडी ची पावभाजी आणि पुलाव खा. चौपाटीवर ऑल इंडियाची भेळ, सुपनेकरचा साबुदाणा वडा.
राहूल ज्यूस सेंटर कडे आइस्क्रीम. अंजीर-बदाम फ्लेवर मस्त आहे तिथला.
राजपुरोहितकडे पापु, कचोरी, ढोकळा.
सम्राटचा वडापाव.
जेवायचे असेल तर राधिका, राजतारा, नाक्यावरचे महाराजा चांगले आहे. नाक्यावरच पेशवाईची भेळही छान आहे.
मोदीकडे पेढे घ्या नक्की. (वाईसारखे मिळत नाही...पण तरीही :फिदी:)
हॉटेलमध्ये राहणार आहात का? जर
हॉटेलमध्ये राहणार आहात का? जर कोणाच्या घरी राहणारअसाल तर हेडगेंची बासुंदी आणा नक्की.
मित्र मित्र जाणार असाल तर कणसे धाबा ला नक्की जा. दालफ्राय, आख्खा मसूर, काजू मसाला छान मिळतो तिकडे. घरीसुद्धा पॅक करून आणता येईल.
प्राची, छान माहिती. शनिवार
प्राची,
छान माहिती.
शनिवार आणि रविवारची संध्याकाळ हाताशी आहे.
मुक्काम एस टी डेपो जवळ होटेलात आहे.
तुम्ही सांगत आहात तो नाका तिथुन जवळ आहे का?
हो. जवळच आहे. तसेही
हो. जवळच आहे. तसेही सातार्यात फिरणे जास्त अवघड नाही. मुख्य बाजारातही सहज जाऊ शकाल. रिक्षा/बस मिळेल सहज.
ह्म्म.. पालेकर बेकरीची खारी ,
ह्म्म.. पालेकर बेकरीची खारी , टोस्ट , नानकटई घ्यायला विसरु नका
प्राची, कणसे धाबा चालुये का
प्राची, कणसे धाबा चालुये का अजुन? य वर्षे झाली कणसे धाब्यामधे जेवुन.
हो. आता तर बराच बदलला आहे.
हो. आता तर बराच बदलला आहे. नूतनीकरण झाले आहे. फॅमिली रूम्स वगैरे.
काय गर्दी असते त्याच्याकडे पण !!!!
त्यापेक्षा वाईला जाऊन केरळा
त्यापेक्षा वाईला जाऊन केरळा बेकरीचे टोस्ट आणि बटर बिस्कीटे, नानकटाई आणा
त्यापेक्षा वाईला जाऊन केरळा
त्यापेक्षा वाईला जाऊन केरळा बेकरीचे टोस्ट आणि बटर बिस्कीटे, नानकटाई आणा >>> गेल्या आठवड्यात वाईला जाउनही हे जमले नाही.
आता होम डिलीव्हरीसाठी लापि वाजवावी लागेल.
प्राची..... हेडगे नाही
प्राची..... हेडगे नाही हेगडे.... त्यांचे आउटलेट आहे नाक्यावर!
कबाडीची पावभाजी चालू आहे का अजुन? ..... मला कधीच आवडली नाही ती..... पेशवाईची भेळ मात्र एक नंबर!
तिखट आवडत असेल तर राजवाड्यावर ऑल इंडियावाल्याकडे जाउन "झंकार" भेळ मागा
आणि रात्री मोती चौकात मसाला दूध
पेढे घेणार असाल तर अशोक मोदीकडे घ्या.... त्याच्याकडे आंबाबर्फी पण मस्त असते
पालेकर बेकरीच्या प्रॉडक्ट्समध्ये आता ते नाविन्य राहीलेले नाही!
ओह...माझे नेहमी कन्फ्युजन
ओह...माझे नेहमी कन्फ्युजन होते. हेडगेंचे इलेक्ट्रिकल्चे दुकान आहे ना?
हेगडेंचे नाही हेडेंचे
हेगडेंचे नाही हेडेंचे इलेक्ट्रिकल्चे दुकान आहे.
Pages