Submitted by पुरंदरे शशांक on 23 January, 2014 - 22:58
टोपी उंदीरमामांची ....
उंदीरमामा पिटकु छान
इवलेसे नाजुक कान
कस्से पहा ऐटीत चाल्ले
वाटेत छोटे कापड दिसले
घेऊन कापड टाण टाण
गाठले शिंप्याचे दुकान
"शिंपीदादा तुम्ही महान
शिवा जरा टोपी छान..."
"गोंडा लावा अस्सा न्यारा
म्हाराजांचा उतरेल तोरा.."
टोपी घालून गोंडेदार
गळ्यात ढोल बोंगेदार
मामा करती हा पुकार -----
ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
टोपी माझी दिमाखदार
राजमुगुट फिका पार
राजा म्हणे -"कोण तो
माझ्यासमोर गरजतो ??"
"काढून आणा त्याची टोपी
मोडेल त्याची मिजास मोठी.."
ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
राजा कस्ला भिकार्डा
टोपीसाठी कर्तोय ओर्डा
"द्या रे परत टोपी त्याची
दाखवा त्याला वाट घरची.."
ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
राजा कसा भ्यायला
लागला टोपी द्यायला
शिपाई धावती मामांमागे
मामा घुसले बिळात वेगे
ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक
मामा हसती मिशीत कसे
राजाचे झाले हसे.........
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोड्डं .. फोटोपण क्युटच
गोड्डं .. फोटोपण क्युटच
सुंदर कविता गोंड्यासकटचा
सुंदर कविता गोंड्यासकटचा पिटुकला मामा तर गोडूच!! किती धन्यवाद देऊ? आवडत्या गोष्टींपैकी आता दुस-या गोष्टीसाठी आम्हाला गाणं मिळालेलं आहे...
पहिलं आवडतं गाणं सिंह-उंदीरमामांच्या गोष्टीनंतर 'लहानसुद्धा महान असती ठाऊक आहे तुम्हाला'.. माझा लेक खरंतर आता या गोष्टींच्या टप्प्यावरून थोडा पुढे सरकला आहे, पण तरीही नव्यांसोबत याही ऐकायच्या असतातच, त्यामुळे तुम्हाला आता फर्माईशी द्याव्याशा वाटतायत!