टोपी उंदीरमामांची ....

टोपी उंदीरमामांची ....

Submitted by पुरंदरे शशांक on 23 January, 2014 - 22:58

टोपी उंदीरमामांची ....

उंदीरमामा पिटकु छान
इवलेसे नाजुक कान

कस्से पहा ऐटीत चाल्ले
वाटेत छोटे कापड दिसले

घेऊन कापड टाण टाण
गाठले शिंप्याचे दुकान

"शिंपीदादा तुम्ही महान
शिवा जरा टोपी छान..."

"गोंडा लावा अस्सा न्यारा
म्हाराजांचा उतरेल तोरा.."

टोपी घालून गोंडेदार
गळ्यात ढोल बोंगेदार
मामा करती हा पुकार -----

ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
टोपी माझी दिमाखदार
राजमुगुट फिका पार

राजा म्हणे -"कोण तो
माझ्यासमोर गरजतो ??"

"काढून आणा त्याची टोपी
मोडेल त्याची मिजास मोठी.."

ढुम ढुम ढुमाक
ढुम ढुम ढुमाक
राजा कस्ला भिकार्डा
टोपीसाठी कर्तोय ओर्डा

Subscribe to RSS - टोपी उंदीरमामांची ....