लागणारा वेळ - एकूण खिचडीसाठी तसा वेळ कमी लागतो अगदी. १५ मिनिटं.
लागणारे जिन्नस - तांदूळ, डाळ (कोणतीही मूग किंवा तूर) मी तूरीची घेतली आहे. (दोन्ही मिळून अर्धी वाटी, धणे, सुकं खोबरं, जिरे, मीठ, गुळ, कोथिंबिर, ओलं खोबरं. बाकी नेहमीचं फोडणीचं साहित्य. (तेल, मोहरी, हिंग आणि हळद. आणि कढिलिंबाची पानं.
पुर्वतयारी - डाळ आणि तांदूळ खिचडी करण्या अगोदर जितके जास्त वेळ भिजवू तितकं चांगलं. (मी डाळ तांदूळ धुवून त्यात अर्धा तास पाणी तसंच ठेवून दिलं होतं आणि ते काढून टाकल्यावर अजून अर्धा तास ठेवले होते.) या व्यतिरिक्त तव्यावर धणे, जिरे आणि सुकं खोबरं छान भाजून त्याची मिक्सरवर पूड करून घ्यावी. ती अशी दिसते.
क्रमवार पाककृती - कढईत तेल तापवायला ठेवून चांगलं तापलं की त्यात मोहरी तडतडवून घ्यावी. मग हिंग आणि हळद घालून त्यात कढिलिंबाची पाने घालावीत वर सांगितल्याप्रमाणे भिजवलेले तांदूळ आणि डाळ घालून छान परतावं. एकिकडे पाणि गरम करायला ठेवावं. तांदूळ आणि डाळ जितके छान परतू तितकी खिचडी पटकन शिजते, हलकी व मऊ होते.
मग त्यात एकिकडे गरम केलेलं पाणी घालून झाकण ठेवून शिजवावी.
खिचडी शिजत आली की त्यात धणे जिरे खोबर्याची केलेली मसाला वजा पूड, मीठ आणि गुळ घालावा.
एकसारखी करून घेऊन पुन्हा झाकण ठेवून खिचडी पूर्ण शिजवून घ्यावी.
नंतर वरून ओलं खोबरं कोथिंबीर घालून गरम गरम खावी. खाताना वरती तुपाचा गोळा घालायला विसरू नये.
वाढणी प्रमाण - एक माणसासाठी दोन वेळेला किंवा दोन माणसांसाठी एकावेळेला. आवडली तर एकाच माणसाला एकाच वेळेला
माहितीचा स्रोत - कमलाबाई ओगले यांचं पुस्तक
तळटिप - खिचडीबाबत - यात मिरची किंव तिखट नसल्याने आजारी लोक, म्हातारे किंवा लहान मुलं आरामात खाऊ शकतात. नको असल्यास गुळ वगळू शकतो.
आवांतर - मी अजून बेसिकच पदार्थ करायची प्रॅक्टीस करत असल्याने या भाज्या आणि खिचड्या पाहून कृपया मला हसू नये.
एवढ्या सगळ्या ग्रूप्समधे
एवढ्या सगळ्या ग्रूप्समधे काहून टाकलंय ह्या खिचडीला?
मला वाटतं काही ग्रूप राहिलेत.
मला वाटतं काही ग्रूप राहिलेत.
वा छान! एण्ड रिझल्ट
वा छान!
एण्ड रिझल्ट (माझ्यासारखा) कोथींबीराने झाकून टाकल्याने नीट दिसत नाही ..
नक्की किती गृप सिलेक्ट केले आहेत .. जवळ जवळ अर्धं पानभरून गृपची नावं दिसत आहेत .. :|
द्या ना उरलेल्या गृपची नावं,
द्या ना उरलेल्या गृपची नावं, लगेच अॅड करते
अर्र आता सगळेच उडाले. फक्त
अर्र आता सगळेच उडाले. फक्त आहारशास्त्र.. राहिलाय.
next time salachi mugdaL
next time salachi mugdaL vaparun paha..
स्वाती आंबोळे तुम्ही फक्त
स्वाती आंबोळे तुम्ही फक्त इतरांच्या चूका काढणे आणि तिरकस बोलणं इतकंच शिकलेलं दिसताय. तेव्हा एक विनंती आहे माझी, माझ्या कोणत्याही लिखाणावर किंवा धाग्यावर या पुढे प्रतिसाद देण्याचे कष्ट घेऊ नका.
प्राजक्ता सालाची मूगडाळ कशी
प्राजक्ता सालाची मूगडाळ कशी दिसते? पाहिली असेल मी पण आत्ता नक्की आठवत नाहिये.
अय्या, पहिला प्रतिसाद देऊन
अय्या, पहिला प्रतिसाद देऊन दात विचकलेस तेव्हा हे ध्यानात आलं नाही वाटतं. असू दे असू दे. चालायचंच.
एण्ड रिझल्ट (माझ्यासारखा)
एण्ड रिझल्ट (माझ्यासारखा) कोथींबीराने झाकून टाकल्याने नीट दिसत नाही .. >> +१
दक्षुतै.. पार्सल कर प्लीज
तेव्हा फक्त चूक काढली होती.
तेव्हा फक्त चूक काढली होती. नंतरच्या प्रतिसादात तिरकस बोलल्यामुळे घडा भरला
(No subject)
एण्ड रिझल्ट (माझ्यासारखा)
एण्ड रिझल्ट (माझ्यासारखा) कोथींबीराने झाकून टाकल्याने नीट दिसत नाही .. >> अर्रर्र
यापुढे लक्षात ठेविन.
थोडी वेगळी पद्धत आहे. नक्कीच
थोडी वेगळी पद्धत आहे. नक्कीच करुन पहायला हवी..
धणे, जिरे, खोबर्याची पूड ही
धणे, जिरे, खोबर्याची पूड ही कल्पना छान आहे. (माझ्यासाठी नवीन!)
तिखट काही घातलेच नाही आहे का?
शेवटून दुसरा फोटो मस्त आलाय.
शेवटून दुसरा फोटो मस्त आलाय. शेवटचा फोटो खोबरं, कोथिंबीरीमुळे नीट दिसतच नाहीये.
हिरवी सालासकट मूगडाळ वापरून अशीच पौष्टिक खिचडी करता येईल. भरीला हवीतर पिवळी मूगडाळ, थोडे मसूर, तूरडाळ घालता येईल.
सशल आणि प्राजक्ता ह्यांच्या
सशल आणि प्राजक्ता ह्यांच्या सूचनांना १००% सहमती
शेवटच्या फोटोत कोथिंबीर इतकी आहे की कोथिंबिरीची खिचडी असल्यागत वाटते आहे
आणि खिचडीत मराठी माणसे शक्यतो मूगदाळच वापरतात हरभरादाळ माझ्याकडे स्वयपांकाला येणारी बिहारी आंटी वापरते
स्वातीताईंचे सर्व प्रतिसादा अनुमोदनीय !!!!!!
असो
माझी आवडती डिश पा.कृ.त दिल्याबद्दल धन्यवाद कमलाबाई ओगलेंचे विशेष आभार
आणि हो यापुढे प्रतिसाद देवू नका असे मला सांगू नयेत मला तसे ऐकायला जमत नाही
>>आणि खिचडीत मराठी माणसे
>>आणि खिचडीत मराठी माणसे शक्यतो मूगदाळच वापरतात हरभरादाळ माझ्याकडे स्वयपांकाला येणारी बिहारी आंटी वापरते>> तिने तूरडाळ वापरली आहे. हरभरा किंवा चणाडाळ नव्हे.
सायो अहो मला जरा एडिट तरी करू
सायो अहो मला जरा एडिट तरी करू द्यायचात प्रतिसाद ...दिलेला प्रतिसाद किमान ५ वेळा संपादित करायचा शिरस्ता आहे माझा
असो
माझी प्रतिसाद एडिट करण्याची तसदी वाचवल्याबद्दल धन्स
असो पाकृबाबत २-३ सूचना -खिचडी
असो
पाकृबाबत २-३ सूचना
-खिचडी कच्चीपक्की शिजत आल्यावरच कोथिंबीर टाकावी नीट मिक्स करून खिचडी पूर्ण शिजू द्यावी खमंगपणाला चार् चाँद लागतात
-जमल्यास त्या खोबर्याच्या वटणात हलकासा लसूण मिक्स करावा .... नुसत्या वासानेच तोंपासुची गॅरंटी !!!
- शिजलेली खिचडी किमान २५०ग्रॅ. वर किमान ५० ग्रॅ साजूक तूप टाकून नाही खाल्ली तर खिचडीचा अपमान होतो हे विसरू नयेत
~वैवकु
खरं तर तो कोथिंबीरवाला फोटो
खरं तर तो कोथिंबीरवाला फोटो जपून ठेव...पोहे,उपमा,खिचडी, पुलाव बर्ञाच रेसिपीसाठी फायनळ प्रॉडक्ट म्हणून वापरता येईल.
दक्षी वाटणाची आयडीया वापरून करून पाहिली पाहिजे. माझ्या मुलाला खिचडीत मटारदाणेपण हवे असतात...
फोटोबद्दल सशल +१ मसालेदार
फोटोबद्दल सशल +१
मसालेदार नसल्याने आम्ही अशी खिचडी बरेचदा आजारी व्यक्तीसाठी करतो. मूगडाळ वापरून.
तुरीच्या डाळीच्या खिचडीची माझी पद्धत - नुसतं मीठ, गूळ घालून डाळ तांदूळ एकत्र शिजवून घ्यायचे. आणि पानात वाढल्यावर त्यावर वरून लसूण-लाल मिरचीची चुरचुरीत फोडणी घ्यायची.
दक्षिणा पाककृती आणि फोटो खरच
दक्षिणा पाककृती आणि फोटो खरच सुंदर आहेत. मला खिचडी अश्या प्रकारे करावयास आवडेल. तिखट मसाल्यांचा वापर नसल्यामुळे मला आवडेल हि खिचडी. मी नक्की करून पाहीन.
ही पद्धत माहित नव्हती.
ही पद्धत माहित नव्हती. धन्यवाद दक्षिणा.
फक्त ते डाळ-तांदुळ अर्धा तास पाण्यात घालून मग पाणी फेकण्याचे पटले नाही. पोषणमुल्ये र्हास पावत नाहीत का काही प्रमाणात?
मी नेहेमी अशीच करते. मी आईची
मी नेहेमी अशीच करते. मी आईची पद्धत म्हणते त्याला.
बरोबर कढी आणि पोह्या चा
बरोबर कढी आणि पोह्या चा पापड तळून. लोणच्याचा खार हे लोक्स पाहिजेत. मी जस्ट धणे जिरे पूड आणि एवरेस्ट किचन किंग मसाला थोडा टाकते. तेजपत्ता अर्धे पान.
मला तर वाटतं डाळ तांदूळ धुवून
मला तर वाटतं डाळ तांदूळ धुवून ते पाणी फेकल्यामुळे (अनावश्यक) स्टार्च (कार्ब्ज) कमी होऊन खिचडी आणखी सात्विक होत असेल.
अमा पोह्याच्या पापडाची आठवण काढून मला रडू येणार आहे....संपलेत..........भ्याआआआआआआआआआआआआआआआअ
वेका कुरीअर करू का? आमच्या
वेका कुरीअर करू का?
आमच्या जस्ट घराच्या समोर एक कामत्स क्रेझी कोकण नावाचे दुकान आहे. तिथून कालच आणले आहेत आणि आज खिचडीचा बेत आहे रात्री ( हे माझं वीकांताचं एंजॉ य करण!) कुटाच्या मिरच्या, साबुदाणा पापड्या आणि इतर बर्याच खास कोकणी गोष्टी तिथे आहेत. एक ललित पाड्तेच आता. फेड एक्स ने दोन दिवसात मिळेल फिकर नॉट.
अमा, आपने कहा बस और क्या
अमा, आपने कहा बस और क्या चाहिए ..
अॅक्च्युअली आईच्या नेक्स्ट टाइमच्या कुरियरमध्ये आठवणीने सांगेन..म्हणजे कसं असतं ही मुलं इतर वेळी तिखट खात नाहीत पण पोह्याचे पापड मात्र सगळ्यांना गोड(??) लागले त्यामुळे जरा लवकर संपले ....आभार्स ..पुढच्या वेळी कोण हा कामस्त क्रेझी तेका पण शोधावं लागेल
सोपी आहे करायला. हाताशी कमी
सोपी आहे करायला. हाताशी कमी वेळ असला की पटकन करायला बरं.
Pages