लागणारा वेळ - एकूण खिचडीसाठी तसा वेळ कमी लागतो अगदी. १५ मिनिटं.
लागणारे जिन्नस - तांदूळ, डाळ (कोणतीही मूग किंवा तूर) मी तूरीची घेतली आहे. (दोन्ही मिळून अर्धी वाटी, धणे, सुकं खोबरं, जिरे, मीठ, गुळ, कोथिंबिर, ओलं खोबरं. बाकी नेहमीचं फोडणीचं साहित्य. (तेल, मोहरी, हिंग आणि हळद. आणि कढिलिंबाची पानं.
पुर्वतयारी - डाळ आणि तांदूळ खिचडी करण्या अगोदर जितके जास्त वेळ भिजवू तितकं चांगलं. (मी डाळ तांदूळ धुवून त्यात अर्धा तास पाणी तसंच ठेवून दिलं होतं आणि ते काढून टाकल्यावर अजून अर्धा तास ठेवले होते.) या व्यतिरिक्त तव्यावर धणे, जिरे आणि सुकं खोबरं छान भाजून त्याची मिक्सरवर पूड करून घ्यावी. ती अशी दिसते.
क्रमवार पाककृती - कढईत तेल तापवायला ठेवून चांगलं तापलं की त्यात मोहरी तडतडवून घ्यावी. मग हिंग आणि हळद घालून त्यात कढिलिंबाची पाने घालावीत वर सांगितल्याप्रमाणे भिजवलेले तांदूळ आणि डाळ घालून छान परतावं. एकिकडे पाणि गरम करायला ठेवावं. तांदूळ आणि डाळ जितके छान परतू तितकी खिचडी पटकन शिजते, हलकी व मऊ होते.
मग त्यात एकिकडे गरम केलेलं पाणी घालून झाकण ठेवून शिजवावी.
खिचडी शिजत आली की त्यात धणे जिरे खोबर्याची केलेली मसाला वजा पूड, मीठ आणि गुळ घालावा.
एकसारखी करून घेऊन पुन्हा झाकण ठेवून खिचडी पूर्ण शिजवून घ्यावी.
नंतर वरून ओलं खोबरं कोथिंबीर घालून गरम गरम खावी. खाताना वरती तुपाचा गोळा घालायला विसरू नये.
वाढणी प्रमाण - एक माणसासाठी दोन वेळेला किंवा दोन माणसांसाठी एकावेळेला. आवडली तर एकाच माणसाला एकाच वेळेला
माहितीचा स्रोत - कमलाबाई ओगले यांचं पुस्तक
तळटिप - खिचडीबाबत - यात मिरची किंव तिखट नसल्याने आजारी लोक, म्हातारे किंवा लहान मुलं आरामात खाऊ शकतात. नको असल्यास गुळ वगळू शकतो.
आवांतर - मी अजून बेसिकच पदार्थ करायची प्रॅक्टीस करत असल्याने या भाज्या आणि खिचड्या पाहून कृपया मला हसू नये.
अरुंधती, अगदी नॉस्टॅल्जिक
अरुंधती, अगदी नॉस्टॅल्जिक वर्णन मुगडाळ खिचडी बहुतेकांच्या जिव्हाळ्याची असते
मेरी फेवरेइट डिश. मी
मेरी फेवरेइट डिश.
मी कमलाबाई ओगले स्कूल ऑफ कूकिंगची असल्याने कायम अशीच करते. मधेच कधीतरी गोडा मसला किंवा पूनम म्हणाली तसं सुकं खोबरं गॅसवर भाजून. लई बेष्ट!!
शेंगदाणे नसलेल्या खिचडीला
शेंगदाणे नसलेल्या खिचडीला आम्ही खिचडी म्हणत नही.....
दक्षु, मस्त झाली गं खिचडी.
दक्षु, मस्त झाली गं खिचडी. त्यात गाजर मटर, कुटलेली हिमि., थोडा लसूणही घातला. यम्मी!
कमलाबाई ओगले स्कूल ऑफ कूकिंग
कमलाबाई ओगले स्कूल ऑफ कूकिंग
विदर्भात ही खिचडी आमच्या घरी
विदर्भात ही खिचडी आमच्या घरी अगदी रोज व्हायची अगदी मी अकोला सोडेपर्यंत.
दक्षिणा डोळे भरुन आलेत जुने दिवस आठवून. आमच्या घरी तुरीची खिचडी, कढवलेल्या लाल मिरच्या, घरचे उडीदाचे पापड, चिरलेला कांदा, खिचडीवर जिर्याचे ओतलेले तेल आणि वाडगेभरुन दाण्याचे कुट घातलेली चिंचोणी असा बेत नेहमी असायचा. मी आणि माझ्या ५ बहिणी आणि शेजारची मित्र मंडळी गोलाकार करुन भगोन्यातील खिचडी आतील काळपट खरोड्यासहीत चट्टामट्टा खरुन संपून टाकायचो. आमच्या घरी पितळेचे एक ताट आणि त्यात लाल मिरच्या नेहमी उन्हात वाळवत घातलेले असायचेच अगदी.
वाडगेभरुन दाण्याचे कुट
वाडगेभरुन दाण्याचे कुट घातलेली चिंचोणी >> म्हणजे काय रे बी? मी पहिल्यांदाच ऐकलंय या पदार्थाचं नाव.
चिंचोणी - गोड पिकलेल्या
चिंचोणी - गोड पिकलेल्या चिंचेचा गर काढून त्यात पाणी घालून गुळ विरघळू द्यायचा. जिरे आणि हिरव्या मिरचीची फोडणी घालून त्यात हा रस घालायचा. भाजूलेले शेंगदाण्याचे साल काढून त्याला अर्धे अर्धे करुन घ्यायचे. एक उकळू फुटली की हे दाणे त्यात घालायचे. रस्सा हा पातळ असायला हवा. दाणे कडकच छान लागतात. भातावर हा रस्स गरम गरम फार छान लागतो. मिरच्या थोड्या जास्त आणि अख्ख्या उभट चिरून घालायच्या. आच मंदच ठेवावी.
बी, चिंचोणे म्हणजे गजानन
बी, चिंचोणे म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीत 'चिंचवणे' उल्लेख आहे तो प्रकार का? रेसिपी जमली तर दया.
चिंचोणी म्हणजे चिंचवणं का?
चिंचोणी म्हणजे चिंचवणं का? श्रीगजाननविजय मध्ये त्या पदार्थाचा उल्लेख आहे. खास वर्हाडातील असावा.
धन्यवाद बी, मी पोस्ट
धन्यवाद बी, मी पोस्ट करेपर्यंत तुमची रेसिपी आली.
मी पोस्ट टाकेपर्यंत अन्जूची
मी पोस्ट टाकेपर्यंत अन्जूची पोस्ट आली
अश्विनी, मला वाटते पोथीत
अश्विनी, मला वाटते पोथीत उल्लेख आहे तोच प्रकार असावा. अक्षय-तृतीयेच्या दिवशी विदर्भात करतात बहुतेक. जास्त माहिती 'बी' देतील.
ह्या बीला मारा धरुन कुणीतरी.
ह्या बीला मारा धरुन कुणीतरी.:राग: पालकाची पचपचीत भाजी खाल्ल्यावर असे पदार्थान्चे वर्णन वाचताना किती किती भरुन आले असेल ( खाण्यासाठी) याला काय माहीत? ज्याचे जळते...:अरेरे:
धन्यवाद बी, चिन्चोणी कृतीबद्दल.:स्मित:
अश्विनी, मला वाटते पोथीत
अश्विनी, मला वाटते पोथीत उल्लेख आहे तोच प्रकार असावा. अक्षय-तृतीयेच्या दिवशी विदर्भात करतात बहुतेक>>> हो महाराजांच्या पोथीमध्ये उल्लेख आहे.
बाकी दक्षु ताय भारी खिचडी हं...
अक्षय तृतीयेला मान असतो
अक्षय तृतीयेला मान असतो म्हणून चिचवनी/चिंचोणी करावीच लागते. त्यावेळेसची गंमत वेगळीच असते. बाजारात गवले-कचुला हा खास मसाला उपलब्ध असतो तो जर चिचवनीमधे घातला तर तिची चवच अगदी बदलून जातो. असली अप्रतिम चव असते ना गवल कचुल्याची! आमच्या घरी मी राजकन्याताईकडे अक्षयतृतीयेला अवचित गेलो आणि तिने चिचवनी आणि तळलेल्या कुरडया दिल्यात खायला. मी अगदी भर उन्हात गारेगार झालो. सोबत वाळ्याचे पाणी.
गजानन महाराजांना प्रिय होते ते काशीकोहळ्याची भाजी, बेसन आणि भाकरी. हाच त्यांचा आहार असे.
अमरावतीच्या मेसमधे आमची बाई दर रविवारी चिचवनी करायची. तेंव्हा आम्ही काय हे ढम पाणी केले म्हणून नावे ठेवायचे. आता मिळाले तर केवढे भारी वाटेल.
बी, आता गवले-कचुला मसाला काय
बी, आता गवले-कचुला मसाला काय असतो सांगा? माझ्यासारख्या मुळच्या कोकणातल्या आणि मुंबईजवळ राहिलेल्यांना हि सगळी नावेच नवीन आहेत.
गवला कचरा हे नाव वाचलंय.
गवला कचरा हे नाव वाचलंय. शिकेकाई मधे घालायला सुगंधी पावडर मिळते ती.
अन्जू, मसाल्याची नावे आहेत
अन्जू, मसाल्याची नावे आहेत ती. गवल कचुला हा मसाला खास अक्षय तृतीयेला मिळतो. आमच्या विदर्भात खास करुन अकोल्यामधे अक्षय तृतीयेचा खूपच मोठा आणि वेगळा बाजार भरतो. इतका वेगळा की कल्पनाच करवत नाही असाही बाजार भरु शकतो. त्यावर काही लिहायचे झाले तर छायाचित्रे हवीच हवी. तू जर पत्ता दिला तर तुला हा मसाला मेमधे मी पाठवेन. अगदी आनंदाने. इतर कुणाला हवा असेल तर त्यांनाही पाठवेन.
प्राडी त्याला कापडकचुरा
प्राडी त्याला कापडकचुरा म्हणतात. गवलं कचुलं वेगळ आहे.
बी, thank u so much. मला असे
बी, thank u so much. मला असे विचारायचे होते कि तो मसाला कसा करतात, कदाचित तुमच्या आईला वगैरे माहिती असेल.
तुम्हाला जमले तर जरूर ह्याचे फोटो आणि कृती टाका.
अन्जू, तो मसाला रात्रभर
अन्जू, तो मसाला रात्रभर पाण्यात भिजवायचा आणि पाट्यावर वाटून चिचवनीत सोडायला.
तुम्हाला जमले तर जरूर ह्याचे
तुम्हाला जमले तर जरूर ह्याचे फोटो आणि कृती टाका.
>> प्रयास करेन. (प्लीज तू म्हण. तुम्ही ऐकवत नाही मला. :))
ओके बी, तू म्हणेन
ओके बी, तू म्हणेन आता.
दक्षिणा धन्यवाद ग, तुझ्या खिचडीमुळे 'चिंचवणे' हा प्रकार कसा करतात ते कळले, एरवी फक्त गजानन महाराजांच्या पोथीत वाचले होते.
विष्णू मनोहरांच्या 'विष्णूजी
विष्णू मनोहरांच्या 'विष्णूजी की रसोई'मध्ये चिंचवणी कधीकधी असते. नागपूर, ठाणे, पुणे इथे त्यांच्या शाखा आहेत.
http://kharedi.maayboli.com/shop/manufacturers.php?manufacturerid=48
चिनूक्स धन्यवाद, ठाणा जवळ आहे
चिनूक्स धन्यवाद, ठाणा जवळ आहे कधी जायला जमले तर बघेन.
बी तु आता चिंचवणीचा वेगळा
बी तु आता चिंचवणीचा वेगळा बीबी काढ, फोटो टाक... सविस्तर पाकृ पण लिही त्या निमित्ताने.
आपण विषय थोडा मुळ पदाकडे
आपण विषय थोडा मुळ पदाकडे आणायचा का?
मी अशी करते खिचडी -
१ वाटी brown rice
१ वाटी मुग डाळ
५ वाट्या कापलेल्या भाज्या(गाजर , मटार , corn , flower ,सिमला मिरची - हे माझे आवडते combination)
गोडा मसाला(१ -२ चमचे)
मीठ
जीरे आणि तुप फोड्णी साठी
brown rice आणि मुग डाळ धुउन भिजवुन ठेवा( मी साधारण पणे १ तास भर ठेवण्याचा तरी प्रयत्न करते- अगदीच घाई असेल तर अर्धा तास)
कापलेल्या भाज्या, brown rice आणि मुग डाळ ,गोडा मसाला आणि मीठ एकत्र pressure cooker मधे भरपुर पाणी घालुन शिजवुन घ्या
जेवायच्या वेळी तुपावर जीरे फोड्णीस द्या.
अगदी one dish meal तयार !! जोडीला लोणचं आणि दही /ताक म्हणजे तर अगदी पुर्ण परब्रह्म!!
ब्राऊन राईस फक्त अर्धा किंवा
ब्राऊन राईस फक्त अर्धा किंवा एक तास भिजलेला पुरेसा होतो का? मला किमान ४-५ तास भिजवून पुन्हा कुकरलाही जास्त वेळ ठेवावा लागलाय आत्तापर्यंत, म्हणुन विचारलं.
सई- अहो आपण दोघी "सई" आणि
सई-
अहो आपण दोघी "सई"
आणि brown rice बराच वेळ घेतो शिजायला - pressure cooker मधे जवळ जवळ अर्धा तास - आणि मी ही खिचडी थोडी पळिवाढी पातळ करते
Pages