सखे कुणाला नकोच सांगू कधीच पण हे असेच झाले
पुन्हा एकदा मला भेटताना मी दचकून चक्क उडाले!!!
दिवस असे की घरात माझ्या मलाच झाले अनोळखी मी
मला पाहूनी माझे डोळे हसले, म्हटले - ’अतिथि आले!’
झुळूक उष्णशी अंगावरूनी अशी लहरली... शहारले मी...
कसे तिच्या श्वासांस कळावे तिच्यात मी नखशिखांत न्हाले!
कुठे जरासे धडधडणारे थडथडते ते बघूदे तरी...
म्हणून गेले जरा खोल अन् ह्रदयाला मी डिवचून आले...!
तिथे कुठेसे कोपर्यात ते जीर्ण फाटके तुकडे होते
मला पाहूनी स्वप्ने माझी रुसली, मीही कातर झाले...
जिथे तिथे साठून धुळीचा ठसका जाब विचारित होता
धूळ नव्हे ती राख... अपेक्षांची तीही मी झटकून आले.
मलाच नव्हते माहीत की मी आहे इतुकी खोल खोल गं
आता माझ्या आत-आतल्या मला बघून मी अवाक झाले!
कितीक नावे त्या भिंतींवर कितीक गाणी गुणगुणणारी
किती फुल्या खोडल्यात मी अन् कितीक चाली बदलून आले...
अता मला भेटलाच तो तर म्हणेल का की ’आवडले मी...?’
नसो तिचे चाहते कुणी पण तिला मीच कडकडून आले!
अधे मधे फिरकले पाहीजे इथे... कशी मी गहाळ इतुकी?
उपेक्षुनी एवढे मला मी, कसे म्हणू की जगून झाले?
मानसी!!!!!!!!!!!!!!!!!! कित्त
मानसी!!!!!!!!!!!!!!!!!!
कित्त्त्त्ती गं सुंदर!
सुंदर!
सुंदर!
अग, अग, अग.... हजार गावे तीही
अग, अग, अग.... हजार गावे तीही स्वप्नांसकट इनाम ग तुला
अग, अग, अग.... हजार गावे तीही
अग, अग, अग.... हजार गावे तीही स्वप्नांसकट इनाम ग तुला
आज माझ राज्यतुझ्या नावे
आज माझ राज्यतुझ्या नावे
थेट आत आत
थेट आत आत भिडणारी.....................आणि भावणारी......
धन्यवाद! अवल, पल्ली...>>>
धन्यवाद!
अवल, पल्ली...>>>
आवडेश
आवडेश
आवडली गं!
आवडली गं!
खल्लास !!!
खल्लास !!!
धन्यवाद!
धन्यवाद!
अधे मधे फिरकले पाहीजे इथे...
अधे मधे फिरकले पाहीजे इथे... कशी मी गहाळ इतुकी?
उपेक्षुनी एवढे मला मी, कसे म्हणू की जगून झाले?
व्वा ...
धन्यवाद प्रसाद.
धन्यवाद प्रसाद.
सुंदर मानसी!
सुंदर मानसी!
मुग्धमानसी सिग्नेचर कविता!!
मुग्धमानसी सिग्नेचर कविता!!
छान
छान कविता.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
लयीत लिहिली असावी असे जाणवले. तसे असल्यास काही ठिकाणी लय नीटशी सापडली नाही.
त्यात बदल्/सुधारणा केल्यास कविता अधिक प्रभावी होऊ शकेल असे वैम.
मलाच नव्हते माहीत की मी आहे
मलाच नव्हते माहीत की मी आहे इतुकी खोल खोल गं
आता माझ्या आत-आतल्या मला बघून मी अवाक झाले! >> ओहोहो कमाल !
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
सुंदर आहे. आवडली.
सुंदर आहे. आवडली.
धन्यवाद अंजू
धन्यवाद अंजू
सुन्दर काव्य । शब्द प्रभावी ।
सुन्दर काव्य । शब्द प्रभावी । लय मात्र काही ठिकाणी बिघडली आहे ।
धन्यवाद!
धन्यवाद!
खूप खूप सुंदर. अवलला हजार
खूप खूप सुंदर.
अवलला हजार मोदक वर तुपाची धार. खरच अगगग झालीये कविता
धन्यवाद दाद!
धन्यवाद दाद!
वा...... सुंदरच
वा...... सुंदरच
छानशी....आवडले
छानशी....आवडले
धन्यवाद!!
धन्यवाद!!