तर मंडळी, नवीन वर्षाचा टेनीसचा नवीन सिझन सुरू झालाय आणि त्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे १३ तारखेपासून सुरु होते आहे.
पुरूष एकेरीत यंदा बेकर वि. एडबर्ग वि. लेंडल (!) असा सामना रंगणार आहे. (राफा के लिये अंकल टोनी काफी हय!)
अग्रमानांकीत नदालला तुलनेले अवघड ड्रॉ आला आहे (म्हणे!). पहिल्या फेरीत बर्नाड टॉमिक, मग तिसर्या फेरीत मॉन्फिल्स, चौथ्या फेरीत केई निशिकोरी, उपांत्य फेरीत डेल पोट्री आणि उपांत्य फेरीत अँडी मरे अशी फौज त्याच्या मार्गात आहे. १८ वी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणारा ऑस्ट्रेलियन लिटन हेविट पण ह्याच क्वार्टरमध्ये असणार आहे.
गतविजेता आणि दुसरा मानांकित ज्योकोविकसमोर चौथ्या फेरीपासून पुढे फॉगीनी, वावरिंका आणि फेरर ह्यांची आव्हाने असतील.
फेडररच्या मार्गात त्सोंगा असेल आणि पुढे मरे असेल तर फेरर आणि बर्डीच एका क्वार्टरमध्ये आहेत.
महिला एकेरीत अग्रमानांकित सेरेना विल्यम्स विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. तिच्या क्वार्टरमध्ये लॉरा रॉबसन, सॅम स्तोसुर, इव्हानोविक, सारा इर्रानी अश्या खेळाडू आहेत. सेरेनाची उपांत्य फेरी ना ली बरोबर होण्याची शक्यता आहे.
गतविजेत्या अझारेंकाचा ड्रॉ तुलनेत सोपा आहे.
तृतिय मानांकीत शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत यांकोविच बरोबर खेळेल पण तिच्या क्वॉर्टरमधे स्क्विव्होनी आणि पेटकोवीक सारख्या अनुभवी खेळाडू आहेत.
हा धाग्या ह्या स्पर्धेबद्दल गप्पा मारण्यासाठी..
ऑफिशीयल वेबसाईटची लिंक :
http://www.ausopen.com/en_AU/scores/index.html
गेली अनेक वर्षे फेडेक्स,
गेली अनेक वर्षे फेडेक्स, नदाल, जोको या तिघांचीच मक्तेदारी ग्रँड स्लॅम स्पर्धांवर राहिली आहे. अपवाद एखाद्या डेल पोत्रो वा मरे चा. अगदी तोच तो आणि तोच तो पणा आला आहे. यावर्षी तरी एखादा नवीन तारा उदयास येउन जिंकून जावा. अगदी बेकर सारखा, अनसिडेड असलेला. आहे का कोणी असा?.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑस्ट्रेलियन ओपन मधे तरी हे शक्य दिसत नाही.
फेडेक्सच काही खर नाही. त्सोंगा आणि डेल पोत्रो जरा जास्ती कनिस्टंट खेळले, त्यांचा दिवस असला तर वेगळे काही तरी घडवू शकतील. नाहीतर आहेच, ये रे माझ्या नादुल्या वा जोकोल्या.
नदाल्/जोकर/मरे हेच दावेदार
नदाल्/जोकर/मरे हेच दावेदार आहेत. फेडीची मजल उपांत्य सामन्यापर्यंतच असेल असं वाटतयं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
व्हिनसने आता निवृत्त व्हायला
व्हिनसने आता निवृत्त व्हायला हवं.. दरवेळी पहिल्या दुसर्या राऊंडला हरतो..
क्विटोवा हरली... ती वन स्लॅम वंडर रहाणार बहूतेक.. तेव्ह उगीच शारापोव्हाला हरवलं.
काय स्टारस्पोर्ट्सवर काय भलतेच सामने दाखवत होते.. कॉर्ट ३ की कायतरी..
त्रिविक्रम.. जिंकू दे की त्यांना.. तुमचा फेडुल्या जिंकत होता तेव्हा ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हेवीट ५ सेटमध्ये हरला
हेवीट ५ सेटमध्ये हरला आज..
बाकी अझारेंका, फेडरर, नदाल, मरे, राडाव्हान्स्का सगळे गेले पुढच्या फेरीत..
www.maharashtratimes.indiatim
www.maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/Austrailian-Open...
मित्रानो , या ही वर्षी टेनिस
मित्रानो , या ही वर्षी टेनिस मध्ये नदाल, जोकोविक आणि मरे यांच्यात स्पर्धा अटीतटीची होईल अशीच चिन्ह आहेत. रोजर फेडरर नवीन कोच स्टेफन एडबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळल्याने त्याचा फायदा नक्कीच रोजर ला होईल. नदाल , फेडरर आणि जोकोविक यांच्या अचीव्मेंट्स अर्थातच काबिले तारिफ आहेत यात शंकाच नाही पण गेम म्हणून टेनिस ची अधोगती गेल्या काही वर्षात झालेली दिसते.
नवनवीन देशांचे स्पर्धक जसे या गेम मध्ये जॉइन व्हायला लागले तसेच एकेकाळी मक्तेदारी आणि प्रावीण्य असलेले देश यात मागे पडताना दिसतात. उ.दा. अमेरिका , जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स इ.
पीट सँप्रस चा काळ आठवा, किती टफ कॉंपिटेशन होती… सँप्रस, आगासी, बेकर, इवन्सेविक, माइकल चंग, सेडरिक पिओलीन, पॅट्रिक रॅफटर, जिम कुरियर … जबरदस्त टफ कॉंपिटेशन आणि थरारक सामने. आहा.. तो काळ काही अजबच होता. अमेरिका , जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया ला ह्या चॅंपियन्स नंतर एकही चॅंपियन तयार करता येऊ नये हे बघून वाईट वाटते.. सर्व अँड व्हॉली ची गंमत आणि कौशल्य हरवत चालल्या सारखे दिसते…
10-12 वर्षांपूर्वी सामने पहिल्या राउंड पासून बघावेसे वाटत पण हल्ली 3-4 राउंड पासून बघितले तरी चालू शकतात (काही टूर्नमेंट चा अपवाद वगळता) कारण आपल्याला इतके नक्कीच माहीत असते की टॉप 8 मध्ये
नदाल , फेडरर आणि जोकोविक आणि मरे हे नक्कीच येतात ( गेल्या 5 वर्षातल्या रेकॉर्ड्स नुसार काही अपवाद वगळता)
टेनिस मधे बदल खूप वेगात घडतायत… गेम बदलतोय.. All The Best Rafa....
व्हिनसने आता निवृत्त व्हायला
व्हिनसने आता निवृत्त व्हायला हवं.. >>> व्हीनस हारल्याची बातमी वचल्यावर हेच मनात आलं. फारच सातत्याने अर्ली एक्झिट मारतेय व्हीनस.
हेवीट गेला? बरं झालं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरून काम करण्याचं सार्थक झालं
घरून काम करण्याचं सार्थक झालं आज .. टीव्ही लावला तर माझ्या लाडक्या हँडसम ची मॅच ..
बेकरचं दर्शन झालं बर्याच वर्षांनीं ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मधल्याच एका क्लिपमध्ये एडबर्ग चंही .. कोचेस् नांही खेळवा एकदा ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेकर ला स्वतःला बाजूला ठेवून ज्योको ला प्रकाशझोतात राहू देता येईल का ह्याबद्दल बोलत होते आत्ता कॉमेन्टेटर्स ..
सशल.. तुझ्या लाडक्याची लाही
सशल.. तुझ्या लाडक्याची लाही लाही झाली म्हणे काल !
बेकर ला स्वतःला बाजूला ठेवून ज्योको ला प्रकाशझोतात राहू देता येईल का ??? >>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पोव्हा आणि वॉझनीला फारच दमवलं आज प्रतिस्पर्ध्यांनी.. बिचारी पोव्हा.. शेवटचा सेट १०-८ !
एकंदरीत मेलबर्नच्या उन्हाबद्दल यंदा फारच छापून येतय..
>>बिचारी पोव्हा.. शेवटचा सेट
>>बिचारी पोव्हा.. शेवटचा सेट १०-८ !
तिसर्या सेट मधे ५-४ ला तिला ३-४ मॅचपोइन्ट होते....
मी पाहीला शेवटचा सेट.
माझा कयास :
पुरूष एकेरी: फायनल नदाल - जोकोमधेच होणार. (फेडेक्स फार तर सेमिफायनल खेळेल.... मरे आधिच गारद होणार.) .
महिला एकेरी: सेरेनासमोर शारापोव्हा वा इतर टिकणार नाहीत.
एवढ्या जास्त टेम्परेचरमध्ये
एवढ्या जास्त टेम्परेचरमध्ये खेळून वाट लागत असेल.
कव्हर्ड कोर्ट झालेली दिसतात आधीच.
पराग, हो ना .. माझ्या
पराग, हो ना .. माझ्या लाडक्याला खेळवलं (म्हणजे आदल्या दिवशी, १०१ डिग्री) सगळं उघडं-वाघडं होतं बहुतेक .. पण काल फेडरर, नादाल, वॉझ्नियाकी खेळत होते तेव्हा बंद केलं वाटतं .. १०५ डिग्री होतं काल ..
आज रात्री परत लाडका टाईम ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डेल पोट्रो बाहेर.. पाच सेट
डेल पोट्रो बाहेर.. पाच सेट खेळून
लोकहो, व्हर्डास्को विरुद्ध
लोकहो,
व्हर्डास्को विरुद्ध गाबाश्विली हा एक अतिशय दुर्मिळ निकाल आहे. गाबाश्विली जिंकला खरा, पण त्याने व्हर्डास्कोपेक्षा कमी गेम्स जिंकले आहेत.
http://www.ausopen.com/en_AU/scores/stats/day9/1215ms.html
त्यामुळे सामना हरूनही व्हर्डास्कोच्या कामगिरीचं मूल्यमापन गाबाश्विलीपेक्षा बरचसं सरस दिसत आहे.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आ.न.,
-गा.पै.
दुर्मिळ कुठे? बरेचदा असं
दुर्मिळ कुठे? बरेचदा असं होतं.
सिंडरेला, साधारणत: दोनेक
सिंडरेला, साधारणत: दोनेक वर्षांतून एखादा सामना दृष्पत्तीस येतो. यापूर्वीचा असा निकाल आठवत नाही.
आ.न.,
-गा.पै.
सिंडी अनुमोदन.. डेलपोट्रो
सिंडी अनुमोदन..
डेलपोट्रो हरला.. नदालच्या ड्रॉतले बरेच जण गेलेत... म्हणजे तगडे!
ठोसरबाई आणि इव्हानोविकची मॅच भारी झाली.. पहिल्या सेट स्टोसुर पुढे असताना इव्हानोविकचे खूप फाईट मारून टायब्रेकरला घालवला.. पण तो जिंकता आला नाही.. मग पुढचे दोन सेट जिंकले.
रच्याकने.. सोड्या दिसत नाही हल्ली.. शोधायला पाहिजे काय झालय त्याला..
ऑस्ट्रेलियन ओपनच्या मॅचेस
ऑस्ट्रेलियन ओपनच्या मॅचेस वेळेमुळे अजिबात बघता येत नाहीत. वीक एंडला काही बघता आल्या तर बघु.
फेडरर इज् ऑन .. किंवा फेडबर्ग
फेडरर इज् ऑन .. किंवा फेडबर्ग इज् ऑन ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एडबर्ग दिसला गं बाई दिसला .. कामेंटेटर्स म्हणे .. ओल्ड स्कूल रे बॅन, नो हॅट ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एडबर्ग का बघायचा होता तुला?
एडबर्ग का बघायचा होता तुला?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉझ्नी हरली..
आता इव्हिनिंग सेशनला अझारेंका, राफा आणि त्सोंगा आहेत.. पण येडे स्टारस्पोर्ट्स वाले दाखवतील तर ना !!
का म्हणजे ? मला आवडायचा तो
का म्हणजे ? मला आवडायचा तो खेळायचा तेव्हा .. एकदम जण्टल्मन होता आणि दिसायचा आणि अजूनही दिसतो ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फेडरर साठे जबरदस्त कठीण
फेडरर साठे जबरदस्त कठीण ड्रॉ....
So for Federer to win the AO he potentially needs to beat Tsonga, Murray, Nadal and Djokovic. That is a very tall order. But if anyone can do it its Federer.
स्त्रोत ausopen.com
सेरेना विल्यम्स पराभूत
सेरेना विल्यम्स पराभूत !
इव्हानोविकची गेल्या काही सिझन्स मधली ही बिगेस्ट अचिव्हमेंट म्हणावी लागेल..
स्टार स्पोर्ट्स HD 2 वर
स्टार स्पोर्ट्स HD 2 वर सुद्धा ऑ.ओ.दाखवताहेत.
स्टार स्पोर्ट्स ४ वर दुहेरीचे सामने दाखवत होते तेव्हा एचडी२ वर फरेर आणि मग रॉब्रेडो-वावरिंका हे सामने होते.
इथे ऑस्ट्रेलियात सगळ्या मॅचेस
इथे ऑस्ट्रेलियात सगळ्या मॅचेस बघायाला मिळतात. TVवरच.
ऊन्हानी नदालची अवस्था खराब झालेली.
पराग तुझी पोवा गेली की ..
पराग तुझी पोवा गेली की ..
इवानोविच(क) ने सेरीना ला काढलं!!!
पोवा गेली ?? अरेरे !! ती
पोवा गेली ?? अरेरे !!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ती दुसर्या सेटमध्ये ढेपाळली ती ढेपाळलीच बहूतेक.. !
लालू आहे का रोमात? आज महत्त्वाची मॅच आहे ना त्यांची..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सध्या तुमच्या महत्वाच्या
सध्या तुमच्या महत्वाच्या मॅचमध्ये "अश्शी देईन फाईट" ला सामोरं जावं लागत आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राफा निशिकोरीला हरवणार हे
राफा निशिकोरीला हरवणार हे नक्की.. पण चांगलाच कस लागणार आहे.. पहिल्या दोन सेट मध्ये ७-६, ७-५ असा अघाडीवर आहे. आणि ही अघाडी मिळवण्यासाठी पूर्ण दोन तास लागलेले आहेत..
commentetars are so biased
commentetars are so biased against our बाळ्या. त्याला भु झाला म्हणून तो मलमपट्टी करून घेत होता, तर म्हणे बघा किती वेळ घेतोय. चेअर अंपायरबाईपण कशा कानाडोळा करताहेत . तेवढ्यातच त्या अंपायरबाई फक्त तीस सेकंद उरली असे म्हणाल्यावर बरा गप्प बसला.
आमच्या बाळ्याच्या सामन्यात यांची घड्याळे घाईला येतात वाट्ट.
Pages