तर मंडळी, नवीन वर्षाचा टेनीसचा नवीन सिझन सुरू झालाय आणि त्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे १३ तारखेपासून सुरु होते आहे.
पुरूष एकेरीत यंदा बेकर वि. एडबर्ग वि. लेंडल (!) असा सामना रंगणार आहे. (राफा के लिये अंकल टोनी काफी हय!)
अग्रमानांकीत नदालला तुलनेले अवघड ड्रॉ आला आहे (म्हणे!). पहिल्या फेरीत बर्नाड टॉमिक, मग तिसर्या फेरीत मॉन्फिल्स, चौथ्या फेरीत केई निशिकोरी, उपांत्य फेरीत डेल पोट्री आणि उपांत्य फेरीत अँडी मरे अशी फौज त्याच्या मार्गात आहे. १८ वी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणारा ऑस्ट्रेलियन लिटन हेविट पण ह्याच क्वार्टरमध्ये असणार आहे.
गतविजेता आणि दुसरा मानांकित ज्योकोविकसमोर चौथ्या फेरीपासून पुढे फॉगीनी, वावरिंका आणि फेरर ह्यांची आव्हाने असतील.
फेडररच्या मार्गात त्सोंगा असेल आणि पुढे मरे असेल तर फेरर आणि बर्डीच एका क्वार्टरमध्ये आहेत.
महिला एकेरीत अग्रमानांकित सेरेना विल्यम्स विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. तिच्या क्वार्टरमध्ये लॉरा रॉबसन, सॅम स्तोसुर, इव्हानोविक, सारा इर्रानी अश्या खेळाडू आहेत. सेरेनाची उपांत्य फेरी ना ली बरोबर होण्याची शक्यता आहे.
गतविजेत्या अझारेंकाचा ड्रॉ तुलनेत सोपा आहे.
तृतिय मानांकीत शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत यांकोविच बरोबर खेळेल पण तिच्या क्वॉर्टरमधे स्क्विव्होनी आणि पेटकोवीक सारख्या अनुभवी खेळाडू आहेत.
हा धाग्या ह्या स्पर्धेबद्दल गप्पा मारण्यासाठी..
ऑफिशीयल वेबसाईटची लिंक :
http://www.ausopen.com/en_AU/scores/index.html
सशल... जिंकेल पुढच्या वेळी..
सशल... जिंकेल पुढच्या वेळी.. हॅपन्स.. !
मुळात त्याने बेकरला घ्यायलाच नको होतं आपल्या टीममध्ये.. बोर आहे बेकर..
अगासीने आपल्या पुस्तकात त्याला बर्यापैकी शिव्या घातल्यात (ह्याचा ज्योकोच्या जिंकण्या/हरण्याशी संबंध नाही.. पण जनरल..)
अझारेंका राडाव्हान्स्का तुंबळ सुरु आहे ! राडाव्हान्स्का तिसर्या सेटमध्ये ४-० पुढे आहे.
एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते
एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते आहे, ती म्हणजे १९८०-९० च्या दशकातले सगळे दिग्गज आज कोचच्या भुमिकेत आहेत.
जसे बेकर-जोकोविच; एडबर्ग-फेडरर; चँग- निशिकोरी. या सगळ्यामध्ये एडबर्गचा प्रभाव फेडररच्या खेळावर चांगल्या रितीने झाल्याचे जाणवत आहे, विशेषतः सोंगाविरुध्द. फक्त हे डावपेच राफा/मरे समोर असताना यशस्वीरित्या वापरू शकतो का हे पहाणे मनोरंजक असेल.
वन सेट डाउन. दिमित्रोव्हच्या
वन सेट डाउन. दिमित्रोव्हच्या सुपरसर्व्हला उत्तर शोधायला लागेल.
पहिल्या चार सर्व्हिस गेम्समध्ये त्याचे फर्स्ट सर्व्ह विन पर्सेंटेज १०० होते. मग सर्व्हिंग फॉर सेट : एक डबल फॉल्ट आणि मग सेकंड सर्व्हवर पॉइंट गेला. पण नंतर तीन अनरिटर्नेबल सर्व्हज/एसेस,
आता दुसरा सेट पाहता येणार नाहीए.
वन ऑल .. टफ फाईट सुरू आहे पण
वन ऑल ..
टफ फाईट सुरू आहे पण आता तिसर्यात राफा ला ब्रेक मिळाला .. तो डिमिट्राव्ह अचानक चुका करायला लागला ..
राफा सॉल्लिड पळवतोय त्याला ..
हो जोरात सुरु आहे... अॅगाने
हो जोरात सुरु आहे...
अॅगाने विकाला कच्चं खाल्लं ! शेवटचा सेट ६-० !
या वर्षी एकही मॅच बघता आली
या वर्षी एकही मॅच बघता आली नाही
दीमेट्रोव म्हणे फेडरर सारखा खेळतो? परत सिंगल हँडेद बॅकहँड वि. राफा.
किती वेळ श्वास रोखून धरायचा?
किती वेळ श्वास रोखून धरायचा? तिसर्या सेटच्या टायब्रेकरमध्ये ३-१ वर येताना राफाने दिमित्रोव्हच्या घशातून पॉइंट काढून पुन्हा त्याच्या तोंडाशी दिला आणि मग एकदाचा गिळला. दिमित्रीने नेटजवळून मारलेला फटका त्याने कसाबसा वाटेल असा उचलून मारला आणि त्याला परतवता येणार नाही अशा समजुतीत गाफील राहिला. दिमित्रोव्हने तो दोन पायांतून मागे मारला. मग पुन्हा अटीतटी.
राफा ! राफा !
राफा ! राफा !
अखेर राफा जिंकला...
अखेर राफा जिंकला... दिमिट्रॉव्ह चांगला खेळला.. सातत्याने नीट खेळला तर दोन चार ग्रँडस्लॅम जिंकू शकेल..
मला राफा न आवडण्याचं कारण अखेर सापडलं.. त्याचा गेम सहज वाटत नाही.. खूप कष्ट घेऊन खेळतो असंच वाटत राहतं... कदाचित तसं नसेलही पण.. फेडरर, जोको, खूप सहज खेळताना दिसतात..
हिम्सकूल, मला नेमक्या त्याच
हिम्सकूल, मला नेमक्या त्याच कारणासाठी राफा आवडतो.
याचा अर्थ त्यामुळे जोको, फेडरर आवडत नाहीत असा नाही.
हिम्सकूल, मला नेमक्या त्याच
हिम्सकूल, मला नेमक्या त्याच कारणासाठी राफा आवडतो. >> +१
He is more a Dravid than a Sachin .
व्हॉट अ मॅच! दिमित्रिव्ह
व्हॉट अ मॅच!
दिमित्रिव्ह मस्तच खेळला पण त्याच्या नवशिकेपणामुळे तो आज हरला बिचारा...
शेवटच्या सेटमधे अगदी नाउमेद झाला बिचारा... तिसर्या सेटचा टायब्रेकर ज्या पद्धतीने हरला त्याने तो पुरता हताश झाला..
पण नाण्याची दुसरी बाजु.... राफाइतका नेव्हर से डाय अॅटिट्युड असलेला खेळाडु अजुन मी तरी पाहीला नाही.. चिवटपणा हे त्याचे मधले नाव! राफिअॅल चिवट नदाल.... खेचुन आणला त्याने हा सामना.. (तेही हाताला ब्लिस्टर झाले असताना)
जबरदस्त मजा आली पाहताना...
जिंकला !! सगळ्या मॅचेसना
जिंकला !!
सगळ्या मॅचेसना ऑफिसातून स्कोअर फॉलो करून समाधाना मानावं लागतय.. !
दुसरी सेमिफायनल उद्या
दुसरी सेमिफायनल उद्या आहे.
फायनलपूर्वीची मेगाफायनल परवा आहे. किती काळाने समोरासमोर? किती काळाने सेमीफायनलमध्ये?
हुर्रे मॅच पॉइंट घालवून
हुर्रे
मॅच पॉइंट घालवून शेवटी जिंकला म्हणजे लौकिकाला साजेसाच म्हणावं लागेल 
शुक्रवारी पहाटे तीन वाजता उठणे आहे.
वा वा! सेमी फायनल जोरात असणार
वा वा! सेमी फायनल जोरात असणार की ..
जस्ट लाईक गूड ओल्ड डेज!!
जस्ट लाईक गूड ओल्ड डेज!! लालूला बोलवा!!
आत्ता राफाच्या मॅचचे
आत्ता राफाच्या मॅचचे हायलाईट्स पाहिले.. कसल्या भारी रॅलीज होत्या !!! लाइव्ह बघायला मजा आली असेल ती मॅच.. एकदम श्वास रोखून ठेवणारी !..
मी तिसरा सेट बघितला ..
मी तिसरा सेट बघितला .. तोपर्यंत इमिट्राव्ह थोडा ढेपाळायला लागला होता ..
राफा एकदम त्वेषाने दणादण मारत होता .. बल्गेरियन ऑडियन्स् राफाच्या तोंडावर जोरजोरात डिमिट्राव्ह ला चीअर करत होते ..
डीमिट्रॉव्ह दुसरा सेट जिंकला
डीमिट्रॉव्ह दुसरा सेट जिंकला असता तर राफाला नक्कीच अवघड गेले असते.. पहिले दोन सेट तो जबरीच खेळत होता..
लेडीज फायनल चिबुलकोव्हा आणि ली ना...
आता आज बर्डीच - वावरिंका..
आणि उद्या फेडेक्स - राफा...
१, ६, ७, ८ सीडेड खेळाडू..
ऑल स्वीस फायनल होणार का???
मला वाटतं नाही व्हायची ..
मला वाटतं नाही व्हायची .. नादाल च्या चेहेर्यावर एव्हढा खुन्नस दिसत असतो की तो उगीचंच हरणार नाही असं वाटतं .. पण ब्लिस्टर्स बद्दल काय कळत नाही ..
सशल, निशिकोरीविरुद्धची मॅच
सशल, निशिकोरीविरुद्धची मॅच पाहिलीत ना तुम्ही? तेव्हा त्याच्या तळव्यातून रक्त येत होतं. इन्ज्युरी टाइम घेऊन त्याने ड्रेसिंग बिसिंग करून घेतलं, त्याबद्दल मी मागच्या पानावर जे काही लिहिलं ते तुम्हीच तर एक्स्प्लेन केलंय.
क्वा. फा.नंतरच्या इंटरव्ह्युत म्हणाला की बँडेजशिवाय खेळता येत नाही.
क्वा फायनलमधला तिसरा सेट कसा जिंकलास ? तर म्हणे निव्वळ नशीबाच्या जोरावर. सेन्स ऑफ ह्युमर सुधारलाय. रोमानियन प्रेक्षकांचे विशेष आभार मानलेन.
मयेकर, मग तुम्ही काय म्हणताय
मयेकर, मग तुम्ही काय म्हणताय ते कळत नाहीये ..
मी म्हणतेय की नादाल ला हरवणं फार कठीण असेल .. हाताच्या इंज्युरी बद्दल मात्र मला काही कळत नाही .. ह्यात काय चुकीचं बोलले का?
नादालपेक्षा मला जोकोचा खेळ
नादालपेक्षा मला जोकोचा खेळ अर्न्ड वाटतो, नॅचरल वाटत नाही. जोकोपेक्षा अँडी मरे सुद्धा नॅचरल खेळतो. आता तर काय जोकोचं करीयरच संपलं म्हणा
नादाल आणि फेडरर दोघांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगलाच आहे. जोकरचाळे करून प्रेक्षकांना हसवत नाहीत म्हणून काय झालं
नादाल आणि त्याच्या दुखापती!
इस्टकोस्टवाल्यांनी गजर लावला का?
>> रुमेनियन तुम्हाला
>> रुमेनियन
तुम्हाला बल्गेरियन म्हणायचंय का?
<पण ब्लिस्टर्स बद्दल काय कळत
<पण ब्लिस्टर्स बद्दल काय कळत नाही ..> यावरून तुम्हाला ब्लिस्टर्स प्रकरण माहीत नाही असे वाटले. जाऊ दे डबल फॉल्ट.
>> ब्लिस्टर्स प्रकरण माहीत
>> ब्लिस्टर्स प्रकरण माहीत नाही असे वाटले
ओह् !
मला म्हणायचं होतं ब्लिस्टर्स् घात करतात की काय माहित नाही/कळत नाही .. असो!
सिंडे.. किती ते टोमणे
सिंडे.. किती ते टोमणे मारशील..

पण होतं असं कधीकधी.. तुमचं नाही का झालं गेल्यावर्षी..
वावरिंका जोरात आहे एकदम.. आजचे हायलाईट्स पाहिले.. छान खेळला.. !
तुमचं नाही का झालं
तुमचं नाही का झालं गेल्यावर्षी >>> पण आम्ही करीयर संपलं असं अजिबात म्हंटलं नाही
वावरिंका जिंकला तर त्याचं कारण केवळ एक दिवसाची जास्तीची विश्रांती असणारे आधीच सांगून ठेवतेय
>> पण आम्ही करीयर संपलं असं
>> पण आम्ही करीयर संपलं असं अजिबात म्हंटलं नाही
आम्ही बुद्धीप्रामाण्यवादी बोलतो .. खेळ सुधारून परत पहिल्यासारखा झाला तर आनंदच आहे ..
फेडरर पार्टीला तर पूर्ण कल्पना असेलच चढ-उतारांची .. आम्ही आमचा लाडका सोडून बाकीच्या जगाला कायम पाण्यात बघत नाही एव्हढंच ..
Pages