तर मंडळी, नवीन वर्षाचा टेनीसचा नवीन सिझन सुरू झालाय आणि त्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे १३ तारखेपासून सुरु होते आहे.
पुरूष एकेरीत यंदा बेकर वि. एडबर्ग वि. लेंडल (!) असा सामना रंगणार आहे. (राफा के लिये अंकल टोनी काफी हय!)
अग्रमानांकीत नदालला तुलनेले अवघड ड्रॉ आला आहे (म्हणे!). पहिल्या फेरीत बर्नाड टॉमिक, मग तिसर्या फेरीत मॉन्फिल्स, चौथ्या फेरीत केई निशिकोरी, उपांत्य फेरीत डेल पोट्री आणि उपांत्य फेरीत अँडी मरे अशी फौज त्याच्या मार्गात आहे. १८ वी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणारा ऑस्ट्रेलियन लिटन हेविट पण ह्याच क्वार्टरमध्ये असणार आहे.
गतविजेता आणि दुसरा मानांकित ज्योकोविकसमोर चौथ्या फेरीपासून पुढे फॉगीनी, वावरिंका आणि फेरर ह्यांची आव्हाने असतील.
फेडररच्या मार्गात त्सोंगा असेल आणि पुढे मरे असेल तर फेरर आणि बर्डीच एका क्वार्टरमध्ये आहेत.
महिला एकेरीत अग्रमानांकित सेरेना विल्यम्स विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. तिच्या क्वार्टरमध्ये लॉरा रॉबसन, सॅम स्तोसुर, इव्हानोविक, सारा इर्रानी अश्या खेळाडू आहेत. सेरेनाची उपांत्य फेरी ना ली बरोबर होण्याची शक्यता आहे.
गतविजेत्या अझारेंकाचा ड्रॉ तुलनेत सोपा आहे.
तृतिय मानांकीत शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत यांकोविच बरोबर खेळेल पण तिच्या क्वॉर्टरमधे स्क्विव्होनी आणि पेटकोवीक सारख्या अनुभवी खेळाडू आहेत.
हा धाग्या ह्या स्पर्धेबद्दल गप्पा मारण्यासाठी..
ऑफिशीयल वेबसाईटची लिंक :
http://www.ausopen.com/en_AU/scores/index.html
नको.. चेन्नाई ओपनमध्ये
नको.. चेन्नाई ओपनमध्ये खेळल्याने खूप तयारी झाली असं म्हण.. म्हणजे अजून बरेच खेळाडू येतील इथे पुढच्या वर्षीपासून..
आजची फायनल (अरररर सेमी फायनल)
आजची फायनल (अरररर सेमी फायनल) खरी. फेडबर्ग चे नेट अप्रोच वाढले का? नदाल ऑन द रन पासिंग शॉट मारण्यात वाकब्गार आहे एस्पेशली ऑन फोरहॅन्ड साईड. cannot writeoff nadal even if he is injured.
चक् दे फेड्या
"""The 27-year-old Nadal has
"""The 27-year-old Nadal has been forced to play the season opening grand slam with strapping across his left hand due to the sore, which is painful enough to compromise his aggressive style of play.
Holding the racket is not a problem and he remains able to hit his powerful topspin forehand but the world number one has found it increasingly difficult to control his serve as the tournament has progressed. “Serving with this injury leads to problems with the rest of my game,” he said. “When you lose confidence with one shot, an important shot, then you are not able to feel comfortable about the rest of your shots.
“I will try to improve that. If not, I won’t have a chance of being in the final.”""""
भाप्रवेत किती वाजता असते मॅच
भाप्रवेत किती वाजता असते मॅच टीव्हीवर आणि कोणत्या चॅनलवर?
Must read for Roger fans ;
Must read for Roger fans ; )
http://www.firstpost.com/sports/federer-and-that-thing-called-hope-13555...
मेलबोर्नला नॉट बिफोर
मेलबोर्नला नॉट बिफोर संध्याकाळी ७:३० भारत : दुपारी २:०० स्टार स्पोर्ट्स
स्टार स्पोर्ट्स ४ , स्टार स्पोर्ट्स एचडी २.
मला लाइव्ह बघता येणार नाही
अरे.. ते सानिया मिर्झाच्या
अरे.. ते सानिया मिर्झाच्या मॅचमध्ये नक्की काय झालं ??
मिर्झाबाईंची मिक्स्ड डबल्स
मिर्झाबाईंची मिक्स्ड डबल्स सेमीफायनल आत्ताच संपली. शेवटचा सेट मॅच टायब्रेकरवर (हा काहीतरी नवा प्रकार होता १०-२) ९-२ (मॅच पॉइंट)वरच मिर्झाबाईंनी आनंद साजरा केला. मग अजून पडदा पडला नाही हे कळल्यावर 'मी केलेला वेंधळेपणा'त एक एन्ट्री जमा झाली.यामुळे विरुद्ध पक्ष हतोत्साहित होऊन त्यांनी डबल फॉल्ट केला.
ओह, दुपारी २. धन्यवाद मयेकर.
ओह, दुपारी २.
धन्यवाद मयेकर.
मॅच टायब्रेकर.. ? तरीच
मॅच टायब्रेकर.. ? तरीच काहितरी १०-२ झालं.. म्हंटलं हा काय प्रकार ??
लेडीज डबल्स बघतय का कोणी ?
लेडीज डबल्स बघतय का कोणी ? छान चालू आहे.. रॅलीज सही होतायत एकदम..
इर्रानी आणि व्हिंची
इर्रानी आणि व्हिंची जिंकल्या.. !!
आज पण परत ब्लॅक आणि मिर्झाच्या मॅच सारखीच परिस्थिती होती.. तिसर्या सेटमध्ये ५-२ मागे असताना सलग ५ गेम जिंकत तिसरा सेट ७-५ जिंकला ! इर्रानीने सिंगल्स स्टाईल बेसलाईन वरून जोरात खेळली.. आणि व्हिंचीने नेट जवळ वेळ साधली. इर्रानीने अव्वल दर्जाने लॉब्स मारले ! इव्हडे सातत्याने आणि बिनचुक लॉब्स मारणं अवघड आहे !!
मजा आली..
पण खरी मजा आता सुरु होईल..
पहिला सेट टायब्रेकर मध्ये.
पहिला सेट टायब्रेकर मध्ये.
घेतला.. !
घेतला.. !
पहिला सेट गेला... रॅलीज लवकर
पहिला सेट गेला...
रॅलीज लवकर संपवायला पहिजेत राव... नाहीतर नदाल लांब रॅलीज खेळण्यात पटाईतच आहे..
छ्या... बॅकहँड मधे केवढ्या
छ्या... बॅकहँड मधे केवढ्या अनफोर्स्ड एरर्स .. कम ऑन रॉजर्!
एडबर्गने बहुतेक सांगीतलेले दिसते कि किप गोइंग टु द नेट अँड बि अग्रेसिव्ह!
लेट्स होप इट्स अ ५ सेटर!
कुछ जम्या नही . फारच वन
कुछ जम्या नही .
फारच वन साईडेड व्हायला लागलीये हळू हळू .
फेडरर २ सेट ने मागे....
फेडरर २ सेट ने मागे....
२००८ विंबल्डन फायनल मधे तो नदाल बरोबर २ सेट ने मागे पडुनही जिंकला होता.. २०१४ मधे त्याची पुनरावृत्ती होउ शकेल काय?
मुकूंद, २००८चं विंबल्डन नदाल
मुकूंद, २००८चं विंबल्डन नदाल जिंकला होता की..
राफा ! राफा !!! A bit too
राफा ! राफा !!!
A bit too easy win for Rafa . Wasn't expecting that .
Surprised seeing the one sided match
संपल की सगळ! हो रे पराग..
संपल की सगळ!
हो रे पराग.. २००७ व २००८ च्या फायनल मधे गोंधळ झाला .. २ न्ही ५ सेटर होते व एक नदाल जिंकला होता व एक फेडरर..
पण घोर निराशा.. आजच्या मॅच मधे..:(
अँटी क्लायमॅक्स. राफाच्या
अँटी क्लायमॅक्स.
राफाच्या याआधीच्या दोन मॅचेस पाहिलेल्या. भरपूर घाम गाळावा लागला होता.
फेडररची ऑओतली ही पहिलीच पाहिली. अगदी पहिल्यासारखा खेळतोय वगैरे ऐकले होते.
आधीच्या सामन्यांत खेळणारे हेच ते दोन खेळाडू का असा प्रश्न पडला.
मागील पानावरून पुढे चालू. इतकी पाने उलटूनही उत्तरे मिळालेली नाहीत.
एडबर्गची हेअरलाइन सामन्यादरम्यान एका इंचाने मागे गेली.
लईच वाट लागली की राव...
लईच वाट लागली की राव...
पहिल्या सेट नंतर राफानी मेडिकल टाईम आऊट घेतला होता.. तेव्हा त्याच्या हाताला झालेली जखम दाखवली.. ती बघितल्यावर तो किते जिद्दीचा खेळाडू आहे ते दिसून आले..
राफाला फायनल परत एका स्वीस खेळाडूशी खेळायला लागणार..
काय बोरींग मॅच.. ! ज्योको
काय बोरींग मॅच.. !
ज्योको परवडला मग.. ह्यापेक्षा टफ फाईट देतो राफाला..
राफाने नेहमीप्रमाणे इनसाईड आऊट फोरहँड जबरी मारले.. काही काही क्रॉसकोर्ट बॅकहँडही भारी..
फेडररचे फोर हँड सुसाट जात होतो.. पण नेट जवळ किती चुका ! आणि इतक्या चुका होत आहेत तरी परत नेटजवळच.. ४२ पैकी २३ पॉईंट जिंकले फक्त..
बहुतेक ह्या दोघांमधली सर्वात साधारण मॅच !
कमॉन राफा.. गो गेट इट !
काय हे सरळ ३ सेट मधे घरी?
काय हे सरळ ३ सेट मधे घरी? वाखाणलो ..... आणि ..... देवळात! मरे ला तरी जाउ द्यायचा पुढे.
(No subject)
पहिला सेट बराच वेळ चालला का?
पहिला सेट बराच वेळ चालला का? मी ५ वाजल्यापासून बघितली मॅच तेव्हा दुसरा सेट सुरूच होत होता. शेवटच्या सेटमधे तर अगदी निष्प्रभ वाटला फेडरर. मॅच पॉइंट असताना सेकंड सर्व्हवर अनफोर्स्ड एरर मारून मॅच दिली
नादालचा इंटव्ह्यु बघितला का? त्याला १४ टायटल झाल्यावर सँप्रासशी बरोबरी होइल असं सांगितल्यावर त्याने उलट वावरिंकाची तारीफ करून त्याला इक्वली चान्सेस आहेत सांगितलं. सुरुवातीला पण फेडररचं अगदी तोंड भरून कौतूक करत होता. त्याचे एथिक्स वाखाणण्यासारखे आहेत अगदी.
ज्योको परवडला मग.. ह्यापेक्षा टफ फाईट देतो राफाला >>>> पण आता काय ना?
पहिला सेट गेला.. !!! कमॉन
पहिला सेट गेला.. !!!
कमॉन राफा.. !
दोन सेट गेले.. राफा
दोन सेट गेले.. राफा इंज्युअर्ड वाटतो आहे.. पाठदुखीनी मान वर काढल्यासारखी वाटते आहे.
नशिब १ सेट घेतला... नाहीतर
नशिब १ सेट घेतला... नाहीतर मला वाटले होते की १९८३ च्या .. जॉन मॅकेन्रो विरुद्ध ख्रिस लुइस यांच्यातल्या विंबल्डन फायनल पेक्षाही ही ग्रँड स्लॅम फायनल जास्त एकतर्फी होते की काय...:(
हिमांशु.. पाठ्दुखी नाही रे.. नदाल च्या शुज चा रंग बघ कसला भयानक आहे.. त्याचा परिणाम...:)
Pages