एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मगाशी सहज कालचा भाग थोडा बघितला. स्पृहाच्या जागी दुसरी चांगली अभिनेत्री असती तर फसवणूक झालेल्या प्रसंगाचे सोने केले असते पण स्पृहा अजिबातच जरा बरेसुध्दा काम करत नाहीये, एकट्या उमेशसाठी सहन करणे माझ्याच्याने होत नाहीये सो channel बदलले. उमेश नेहेमीच ग्रेट.

कालचा एपिसोड भंपक होता >> खरंय.... मला एक्झॅक्टली हेच वाटलं, पण योग्य शब्द फक्त तुम्हालाच सुचलेत Lol Rofl

ईशा खरंच डोक्यात जायला लागली आहे. पण ओम्या मस्त!!!
त्याच ते, ईशा ऐकतियेस ना?... हो, मला माहितीये ऐकतियेस.....अस रडताना म्हणण भारी होत.

कोणी नोटिस केलं का? टायटल साँग (मलातरी) बदललेले वाटत आहे.
आधीचं चांगलं होतं त्यामानाने..
ह्या नव्यात सचिन जरा घाईघाईत गायलाय असं वाटतंय Sad

ईशा खरंच डोक्यात जायला लागली आहे. पण ओम्या मस्त!!!>>+११

ईशाला मी डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करते आहे... कुठेच काहिच काम जमले नाही याना, इथे काय जमणार!

आजच्या एपिसोडमध्ये ईशाच वागण कालच्या पेक्षा हि विचित्र होत
ती तिच्या आईशी फोनवर बोलण्याचा प्रसंग ,कसलं शेत ,कसली टोळधाड ,काय घार ,
,तो सगळा प्रकार बघण असह्य होत
शी किती ते वेड्यासारख वागण ,

अशी सायको मुलगी वकील कशी काय असू शकते ,
एवढा राग आलाय तर दे ना दोन कानाखाली त्या ओमच्या ,विचार ना धडाधडा अस का केलस म्हणून

हा काय प्रकार चालू आहे
आता उकासाठी सुद्धा बघण शक्य नाही ,

ती तिच्या आईशी फोनवर बोलण्याचा प्रसंग ,कसलं शेत ,कसली टोळधाड ,काय घार ,
,तो सगळा प्रकार बघण असह्य होत़़ >> आचरटपणा चालू होता.

त्यात परत उमेश कामता फार कमी फुटेज होतं. त्यामुळे मी जास्त पाहिलाच नाही.

गेले दोन एपिसोड प्रेक्षकांचा नववर्षाचा खास पचका करायलाच चित्रीत केले असावेत !
मला वाटतं खरे दोषी लेखक, दिग्दर्शक व निर्मातेच आहेत, स्पृहा नाही ; शी इस जस्ट प्लेईंग द रोल गीव्हन टू हर !

मला वाटतं खरे दोषी लेखक, दिग्दर्शक व निर्मातेच आहेत, स्पृहा नाही ; शी इस जस्ट प्लेईंग द रोल गीव्हन टू हर !
>>>>>>>> +१

मला तर त्या टोळ धाडी पेक्षा त्या हसणार्या मुलीचाच राग आला....आणि त्या स्प्रुहा चा पण.... बावळट कुठची.....उमेश कामत ला रडताना बघुन दोन मिनिट मलाच जाऊन त्याला जवळ घ्यावेसे वाटु लागले.... Happy पण दुर्दैव माझं..... Wink

मला वाटतं खरे दोषी लेखक, दिग्दर्शक व निर्मातेच आहेत, स्पृहा नाही ; शी इस जस्ट प्लेईंग द रोल गीव्हन टू हर !>>>>>>>>>>>>>>>. उद्या दिग्दर्शक बोल्ला इशा ला की बिकिनी घालुन शॉट दे उका सोबत आणि छम्मक छल्लो वर डान्स कर तर करणारे का ती???? तेव्हा स्वतःचं डोकं वापरुन नकार दर्शवेल ना??? मग हे काहितरी बावळट पणा करताना अस वाटत नाही का की अरे हे असं कधी असतं का...अशा सिच्युएशन मधे अस कोणी वागु शकतं का....मग?? माझ्या डोक्यात जातय सर्व....पण उमेश कामत आवडल्याने ते बघायच सोडवत पण नाही....

असह्य आहे स्प्रुहा ला बघने.... खरच काय ते टोळ्धाड... मुलगि... काहि हि,... मला आजुन एक भिति आहे ,.. ते मागे महा एपिसोड मधे ...दाखवले... तसे हे स्वप्न नाहि ना....>>>>>>>>>> (,,)

सर्वांना अनुमोदन! कालचा भाग सर्वात रटाळ!>>++++१११

तो सगळा प्रकार बघण असह्य होत़़ >>>>+++१११

मि पन काल टीव्हि बंद केला.:राग:

गेले दोन एपिसोड प्रेक्षकांचा नववर्षाचा खास पचका करायलाच चित्रीत केले असावेत !
मला वाटतं खरे दोषी लेखक, दिग्दर्शक व निर्मातेच आहेत, स्पृहा नाही ; शी इस जस्ट प्लेईंग द रोल गीव्हन टू हर !>>>>>>>>>> मला सुद्धा हेच म्हणायच होत.

त्यात परत उमेश कामता फार कमी फुटेज होतं. त्यामुळे मी जास्त पाहिलाच नाही.>>> +१
मी पण जास्त पाहिलाच नाही. त्याच्यासाठी बाकीच्याना सहन करु शकते पण त्यालाच एवढी कमी स्क्रीन स्पेस दिली तर कोण बघणार..??

मला वाटतं खरे दोषी लेखक, दिग्दर्शक व निर्मातेच आहेत, स्पृहा नाही ; शी इस जस्ट प्लेईंग द रोल गीव्हन टू हर !>>> स्पृहाच्या जागी दुसरी कुणी अभिनेत्री असती तर कसं केलं असतं हा विचार येउन गेला...

आणि ती आई आहे का कोण?
मुलगी डिस्टर्ब्ड आहे हे तिला फोनवरून कळू नये? Uhoh
सर्दी झालेय का? असं विचारते.

<<<आणि ती आई आहे का कोण?
मुलगी डिस्टर्ब्ड आहे हे तिला फोनवरून कळू नये? >>>
>>>हो ना.तिच्या मैत्रिणिला कळ्ले तिच्या आवाजावरुन..पण आईला नाही...

मुलगी डिस्टर्ब्ड आहे हे तिला फोनवरून कळू नये? >< आपली पोरगी रात्री फोनवर काय वाट्टेल ते बडबडतेय, दोन मिनिटांपूर्वी "मला एक माणूस त्रास देतोय" असं सांगते आणि आई "ते आधीचं चित्र किती छान होतं, पिवळं शेत वगैरे तू तेच काढ" वगैरे मठ्ठासारखं बोलत बसली आहे???

आईकडे ओम्याचा नंबर नाही का? त्याला विचारू शकत नाही का ती फोन करून "काय धाड भरली माझ्या लेकीला? कुठल्या वडाखालनं वगैरे गेली का?" काहीही बावळटपणा चालू आहे.

मुळात मला तिचं असं धाडादिशी ओम्याच्या घरी रहायला जाणंच पटलं नाही.
तो काय आश्रमेका?
जो का रंजला गांजला त्यासी ओम्या म्हणे आपुला? Uhoh

काय धाड भरली माझ्या लेकीला? कुठल्या वडाखालनं वगैरे गेली का?" काहीही बावळटपणा चालू आहे.>>> हाहा हाहा हाहा

आपली पोरगी रात्री फोनवर काय वाट्टेल ते बडबडतेय, दोन मिनिटांपूर्वी "मला एक माणूस त्रास देतोय" असं सांगते आणि आई "ते आधीचं चित्र किती छान होतं, पिवळं शेत वगैरे तू तेच काढ" वगैरे मठ्ठासारखं बोलत बसली आहे???

आईकडे ओम्याचा नंबर नाही का? त्याला विचारू शकत नाही का ती फोन करून "काय धाड भरली माझ्या लेकीला? कुठल्या वडाखालनं वगैरे गेली का?" काहीही बावळटपणा चालू आहे.

>> +१

कुठल्या वडाखालनं वगैरे गेली का?">> तुला पिम्पळ म्हणायचय का? मी पिम्पळ ऐकलय असा बाबतीत.
अधिक अचुक माहितीसाठी चाफ्याला पाचारण करुयात का?

आणि तिच्या घरी ताजी दिसणारी केळं, सफरचंदं आणि भाज्या बघुन मला अचाट आणि अतर्क्य बीबी आठवला.
ही ओमच्या घरी.
दाते तिच्या गावाला.
मग ही ताजी फळं आणि भाज्या???

Pages