एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीयू....हे हे....उ.का. चा 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या' झालाय ईशाच्या संगतीत राहून....हिनेच काय डाफरायचं लोकांवर.. ओम भी कुछ कम नहीं....एकुणात या धाग्यावर ईशाच्या वागण्याची जी ' काढली ' जात आहे ते पाहून लेखक लोकांनी ही क्लुप्ती काढली असेल..प्रेक्षकांनी ईशाबयेला ब्रेक देऊन उ.कालाही थोड्या घालाव्या शिव्या म्हणून....हे हे

हो, सर्वांशीच सहमत. अगदी या वेळी त्या ढोल्या उर्फ झ.बा आणि मुक्ताच्या विरुद्ध असलेल्या वक्तव्याला सुद्धा सहमत!!!!

र.च्या.क. ने,

Diploma of Engineering चा रिझल्ट लागलाय. मी पास झाले....७२% मिळाले. हुर्रे....यिप्पी...

ढिन्ग चिका ढिन्ग चिका ढिन्ग चिका ए ए ए, ए ए ए!

त्रिवार अभिनन्दन मधूरा. चल आता पेढे, बर्फी, गुलाबजाम, तीळाच्या वड्या, मोहनथाळ, रसमलाई, मलई सॅन्डविच असे सगळेच गोड पदार्थ लगेच खाऊन ये.:खोखो:

अभिनंदन मधुरा...." झिंग चिका झिंग चिका झिंका, सुख माझ्या दारी घाली पिंगा" स्टेट मधे असशील....अभिनंदन पुन्हा Wink

झबा म्हणजे झपाटलेला बाहुला. तो त्या तात्या विन्चुच्या झपाटलेल्या बाहुल्यासारखा गोलमटोल दिसतो ना म्हणून आपल्या माबोकरानी त्याला झबा नाव दिलय.:फिदी:

अभिनंदन मधुरा..........................

विनिता...धन्यवाद >> आभार.. मला दोनवेळा धन्यवाद दिल्याबद्दल..
त्या "पुण्याच्याविनिता"कडे लक्ष देऊ नकोस.
तो माझा डुआयडी आहे Wink Light 1

कालच्या भागातले इशाच्या आईचे ते संवाद मनाला चटका लावून गेले.....आश्विनी म्हणजे ईशाची मैत्रीण जेव्हा इशाच्या आईला इशाच्या वागण्याबद्दल माफी मागत असते, तेव्हा तिची आई म्हणते, " आम्हाला सवय असते ग याची....तुम्ही पोटात असताना सुद्धा लाथा मारत असताच कि....मग आता काय नवीन त्यात ???" Sad

अश्विनी कारेकर नावाच्या माणसाला भेटते. याने रणजितवर केस केलेली असते, चेक वठला नाही म्हणून. सो, रणजित कसा फ्रॉड आहे हे अश्विनी शोधते आहे. आज दत्ताराम क्रिमिनल आहेत, हेही इशाला समजेल.

ओम सगळ्यांशी मुद्दामच वाईट वागतो आहे.

मला वाटतं आता असं होईल- सगळेजण पांगतील आणि आपापल्या मार्गाला लागतील. मधु, शोभना गेलेच आहेत. धना-जयेशही वेगळा घरोबा करतील आणि काकेही सिनेमासाठी दूर जाईल. सगळेच आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे नाखुश असतील, पण ओमला आपण नको आहोत म्हणून तसेच दिवस ढकलतील.
कालांतराने ओम-इशाचे भांडण मिटेल. ते एकत्र येतील.
मग सगळ्यांना परत जवळ बोलावून घेतील. शेवट गोड होईल

मात्र हे सगळं दाखवणारा प्रवास महाकंटाळवाणा आणि तीनेक वर्षांचा असेल Proud

मला वाटतं आता असं होईल>>> मोठ्या बाबांना हार्ट अ‍ॅटॅक येईल. डॉकटर "अब इन्हे दवा की दुआ की जरूरत है म्हणतील. मोठे बाबा "इशूच्या डोक्यावर अक्षता घालायच्या म्हणतील. इशा त्यांच्या आखरी इच्छेसाठी लग्नाला तयार होइल. लग्नामधे परत सगळी फॅमिली नाटक करेल. मोठे बाबा लग्नानंतर परत टुणटुणीत होतील. मग संक्रांत, मंगळागौर, दिवाळसण वगैरे प्रत्येक वेळेला ओमच्या कुटुम्बाला नाटक करावे लागेल आणि मग सगळी धमाल उडवताना आणि इतर बर्याच वेळेला रडारड इशाची चिडाचिड दाखवतील. ओमचे खरे आईबाबा येऊन परत एक घोटाळा घालतील. या सर्व नाटकामधे ओम इशाचे लफडे (आय मीन लग्न) सुरळीत होईल. प्रत्येक कॅरेक्टरच्या उपस्टोर्या असतीलच सतत.

असं ते एका लग्नाची तिसरी गोष्ट तीन चार वर्षांनी संपेल.

पौताई आणि नंदिनी.. दोघींनी सुचवलेले ऑप्शन तीन-चार वर्ष चालणारे आहेत. हे राम !!!
हि हलकीफुलकी मालिका हलकीफुलकीच ठेऊन पटकन संपवायला हवी ना.

परवा एका मराठी न्यूज channelवर उमेश आणि स्पृहाची छोटी मुलाखत दाखवली तेव्हा स्पृहा म्हणाली की आमची मालिका लिमिटेड एपिसोडची आहे, मला ते ऐकून बरे वाटले, मी बघत नाही पण बघणाऱ्या सर्वांसाठी मला हि गुड न्यूज वाटली.

Pages