एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते जयेश आणि धनाचं काय यडपटगिरी दाखवतात. कैपण!!!>> +१२३४! महाएपिसोडने अपेक्षाभंग केलाच, कालचा भाग त्याहून बोअर. आजही पायावर जॉली वगैरे (रच्याकने, पायावर????????? आम्ही भाबड्या तळहातावर जॉली लावायचो :फिदी:). सिरियलने भलतीच जम्प मारली की. पण जमत नाहीये काही नीट Sad

मला तरी वाट्टंय की लोक फक्त इथे उमेश कामत साठे सिरीयल बघत असावेत........त्या स्पृहा ने पण मायबोली वर येउन जरा आपल्याबद्दलचे छान छान अभिप्राय वाचावेत....नाहीतर आपल्या फॅशन चे धागे वाचावेत......खात्री आहे मला की ७०% तरी इंप्रुव्हमेन्ट दिसेल.....

आजही पायावर जॉली वगैरे>>>>>>>>>>> कोण स्पृहा???? पागलच आहे मग तर.......आणि तीचं सिरीयल मधल नाव काये???? मला तिच ते कठीण नाव टाईप करायला जाम कंटाळा येतो.....

आणि तीचं सिरीयल मधल नाव काये???? मला तिच ते कठीण नाव टाईप करायला जाम कंटाळा येतो.....>> ईशा.

इशा. सिरियलीतलं नाव सोपं आहे Proud तिचे किंवा सिरियलीतले प्रत्येकाचेच कपडे वेशभूषा संकल्पकाकडून येतात. त्यामुळे आपण त्यांना नावं ठेवूया Wink

त्या नवीन लग्न झालेल्या जोडीचा काय लोचा आहे?? आणि ती इशा तिला काय समजावत होती? बॉरींग.
जेव्हा आजीने डीक्लेर केले उद्या तुझं लग्न करायचं तेव्हा अंधारात मास्तरांकडुन काय शिकत होती म्हणे ही??

स्पृहाचे पाय कित्ती घाणेरडे आहेत>> दक्षे, तुझ्या सगळ्या कॉमेण्टसवर बारीक लक्ष आहे हं माझं. Wink

बा द वे, तो एपिसोड करायच्या आधी तरी पायाची निगराणी करायची होती.
क्लोज अप मध्ये नीट दिसणार नाही ते हे लक्षात यायला हवं होतं. कमीत कमी फोटोशॉप असतं तसं एडिटिन्ग मध्ये तरी...

छ्या!!

मी नाहीच बघत ही सिरीयल, एकतर झूठ बोले.. बघितली आहे त्यामुळे साधारण स्टोरी माहितेय. फक्त उमेशसाठी बघावी असे वाटते पण त्याच्याबरोबर स्पृहा असतेना, नाहीच बघवत तिला, पार डोक्यात जाते त्यामुळे सिरीयल बघतच नाही.

अरे त्या स्पृहाला आवरा.. जयेश-धनाच्या लग्नाला किती वर्ष झाली, त्यांना मुलं का नाही अजुन ह्याची काळजी हिला कशाला? :रागः त्यांच ते बघुन घेतील ना..

स्पृहाच्या पात्राची गणना आता टीव्हीतल्या अ. आणि अ. पात्रांमध्ये करायला पाहिजे. एवढी मोठी घोडी आहे, वर पेशाने वकील आहे, पण दिवे गेल्यावर घरात एकटी घाबरते, स्वतःच्या घरात मेणबत्ती कुठे आहे माहीत नाही ( म्हणजे पहिल्यांदा दिवे गेल्यावर शक्य आहे, पण पुन्हा दिवे गेल्यावर कुणालाही नक्की पटकन आठवेल), हट्ट करून होऊ घातलेल्या सासरीच काय राहायला जाते, बरं तिकडे जाऊन घराला नवीन रंग लावा असले वाग्बाण काय सोडते ( एखादं नॉर्मल घर असतं तर भावी सासूने टोटल रिजेक्ट मारली असती असली ' कानामागून आली तिखट झाली' भावी सून आणि नवर्या मुलाच्या नाकी नऊ आले असते आईची समजूत काढता काढता), मैत्रिणीशी दंगामस्ती करत हातच काय मोडून घेतेआणि आता भावी नवर्याचं डोकं खातेय त्याचा (लुटुपुटीचा) भाऊ आणि वहिनी चान्स का घेत नाहीत म्हणून. अजब कारभार....
उ.का. मात्र प्रचंड गुणी अभिनेता हो, काहीही प्रसंग / डायलॉग 'पदरी ' पडले तरी ते 'पवित्र' मानून मन लावून करतो ' बिच्चारा' Wink

मोहन जोशींचं कॅरेक्टर आवडलय मला. धमाल आणतात .
कसलेला अभिनेता लपून रहात नाही.
शुभांगी पण छान, पण तिच्यात मधेच शामल डोकावते.

उ.का. मात्र प्रचंड गुणी अभिनेता हो, काहीही प्रसंग / डायलॉग 'पदरी ' पडले तरी ते 'पवित्र' मानून मन लावून करतो ' बिच्चारा' Wink >> १००० वेळा सहमत अबोलीजाह्नवी.

स्पृहाचे कॅरेक्टर इतके बावळे आणि येडपट का घेतलं असेल काय माहित.
स्पृहाबद्दलच्या सगळ्या मतांबद्द्ल दक्षिणाशी सहमत.>> अ‍ॅम्ही अ‍ॅमच्या घॅरी जेवणॅअ‍ॅधी प्रॅथ्रॅना म्हणतो, तुम्ही काय करता? Angry >> हे जाम आवडले Happy

अती भोचक वागतेय ती.वैताग नुसता. काल मोहन जोशीना किती पकवत होती संशोधनाबद्दल विचारून.त्या धना-गुरुजींच्या चान्सबद्दल काय बोलत असते ,जॉली काय्,घराला फ्रेश रंग काय लावूया Angry
उका ने या स्थळाचा पुनर्विचार करावा असं माझं मत आहे.:डोमा:

उमेशने या स्थळाचा पुनर्विचार करावा, एकदम सहमत माशा. प्रेम आंधळे असतं म्हणतातना, उमेशचे तसंच झालेय बिचाऱ्याचे पण स्पृहासारख्या भोचक-भवानी charactorचे मात्र प्रेम डोळस आहे, चांगला मुलगा हाताला लागलाय.

स्पृहाने अग्निहोत्र आणि उंच माझा झोकामध्ये जरा बरे काम केले होते पण कुहू आणि ईशा हे दोन्ही रोल मला अजिबात आवडले नाहीत.

स्पृहासारख्या भोचक-भवानी charactorचे>>>>>>> हाहाहाहाहाहाहाहाहा.....मी असं काही म्हणाले असते घराचा रंग बिंग...तर मला आधीच नो एंट्री होती ती कायमची नो एंट्री झाली असती......

सगळ्या पोस्टींना मम! Proud
अरे त्या 'चान्स'च्या शॉटला तर माझ्या डोक्यालाच शॉट लागला.
Angry
मुर्ख होत चाल्ललीये सिरिअल Sad

ती सिरीयल आधी पासुनच पकाउ होती.....उमेश आहे म्हणुन लोक बघताहेत तरी नाहीतर कोणी पाहिली पण नसती.....मला तर त्या इशा साठी एकच शब्द सुचतो... " बंडल "

उ.का. मात्र प्रचंड गुणी अभिनेता हो, काहीही प्रसंग / डायलॉग 'पदरी ' पडले तरी ते 'पवित्र' मानून मन लावून करतो ' बिच्चारा' डोळा मारा>>>+++११११११११११

'ईशा' हे character कसं असावं याबद्दल लेखक आणि दिग्दर्शकांच्या डोक्यात केमिकल लोच्या आहे बहुतेक....

काल घरात एक पाल आलेली....आणि पाल दिसल्यावर माझा नवर्याची भितीने गाळण उडणे वगैरे ठिक पण त्याला असही ठाम पणे वाटत असतं की ती पाल त्याच्याकडेच बघत आहे.... तो जोरात ओरडला ईईईईई ......श्या.........पाल आली आहे घरात.......त्याचं ते ईईईईई....श्या..........ऐकुन मला उगाचच ईशा आठवलं........आणि कहर म्हणजे नवरा तेव्हाच बोल्ला ( म्हणजे त्या पालीला रितसर मारुन बिरुन झाल्यावर....अर्थातच मी मारलं ) की ही पाल त्या कुहु सारखी दिसतेय.......मला चेहर्यावर नक्की कोणते भाव दाखवावेत हे २ मिनिटं कळ्ळंच नाही......

अनिश्का शूरवीर आहेस, आमच्याकडे पाल, झुरळ इ. ना मी घाबरते, ओरडते, नवरा नाही. पण तुझ्या मिस्टरांची 'पाल कुहूसारखी दिसते' ही कमेंट जाम आवडली मला, सहीच आहे, खूप हसले मी.

पाल त्या कुहु सारखी दिसतेय >> पालिचा अपमान? Angry
अनिश्का अख्ख्या पाल जातीकडून तुझ्या नवर्‍याचा झायिर णिशेढ

Pages