कविता माझी वाच, कथा माझी वाच
लेख नक्की वाच, लेखकु म्हणे
आपुली जी रिक्षा, दुसर्याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी
ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर
टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि
आव पिडीताचा, सात्विक संतापाचा
वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो
वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट
इतरांची लावू वाट, दिसता क्षणी
ओलावले डोळे, भारावले मन
शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे
दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद
वर आणण्याचा नाद, लेखनाला
इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान
काढी फेसबुकी पान, स्वत:चे
नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित
सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा ||
--------------------------------------------------------------------------------------------------------
नारबाची वाडी पाहून नारो म्हणेच्या धर्तीवर लिहायचे होते.
अचानक लिहीता लिहीता हेच लिहून झाले.
ही काहीच्या काही कविता आहे. त्याच अर्थाने घ्यावी.
कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही. धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------------
काही कडवी एकदम चपखल आहेत.
काही कडवी एकदम चपखल आहेत.
जबरी दर तेरावाच काय, दर
जबरी दर तेरावाच काय, दर दुसराही बघितला आहे
छान आहेत ओव्या! असेच लिहीत
छान आहेत ओव्या!
असेच लिहीत राहिलात तर तुम्हालाही पुष्पक विमानात बसता येईल.
दर तेरावा प्रतिसाद, देई
दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद
वर आणण्याचा नाद, लेखनाला
काकाक - काव काव कविता ?
असेच लिहीत राहिलात तर
असेच लिहीत राहिलात तर तुम्हालाही पुष्पक विमानात बसता येईल
आपुली जी रिक्षा, दुसर्याची
आपुली जी रिक्षा, दुसर्याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी
>>>
स्वानुभव वाट्टं
भारीये
अनेक लोकांना अनेक महिन्यांनतर लोकांन धन्यवाद द्यायची हुक्की येते आणि लेख / कथा/ कविता वर काढले जातात. अनेक लोकं खाजगीतुन अनेकांना माझ्या कवितांवर प्रतिसाद द्या सांगतात आणि कविता वर काढुन घेतात ते ही राहिलं...
वाढवं ओव्या भारी जमतील
पोटेंशिअल तो तुझमे है ही
(No subject)
कविता तर छान आहेच पण बेफींचा
कविता तर छान आहेच पण बेफींचा प्रतिसाद विशेष आवडला..
छान!
छान!
नारबाची वाडी पाहून नारो
नारबाची वाडी पाहून नारो म्हणेच्या धर्तीवर लिहायचे होते.
अचानक लिहीता लिहीता हेच लिहून झाले. >> बोअर वाटेल तुम्हाला पण छंद समजून लिहिलं असतं तर जमलंही असतं. ६ - ६ - ६ - ४ अशी अक्षरसंख्या आणि दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत यमक इतकं सोप्पं आहे ते. पुन्हा प्रयत्न करा !
ही काहीच्या काही कविता आहे. >> मान्य !
असेच लिहीत राहिलात तर
असेच लिहीत राहिलात तर तुम्हालाही पुष्पक विमानात बसता येईल.>>>
कोथरूडला चांदणी चौकातून खाली आली की लागते ते पुष्पक विमान का?
बरी वाटली बाकिच्या कवींतान
बरी वाटली बाकिच्या कवींतान पेक्षा
हा तेरावा प्रतिसाद म्हणून
हा तेरावा प्रतिसाद म्हणून सगळ्यांचे धन्यवाद
(No subject)
लै भारी!!
लै भारी!!
ठा... मस्तच. रोज एकेकाला
ठा... मस्तच.
रोज एकेकाला स्वतंत्र धन्यवाद देत जा ! तेरा दिवस त्यातच जातील.
<<वाढुनी ठेवता ताट, स्तुती
<<वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट
इतरांची लावू वाट, दिसता क्षणी<,
<,आपुली जी रिक्षा, दुसर्याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी<,
हे भारीयेत
यू आर बॅक >>>> मस्त!!
यू आर बॅक >>>>
मस्त!!
(No subject)
दिनेशजी. लेखकाची स्तुतीसुमने
दिनेशजी.:हाहा:
लेखकाची स्तुतीसुमने आवडली.
दिनेशदा तुमच्या
दिनेशदा तुमच्या सूचनेनुसार
.
.
.
.
.
.
सर्व नवीन प्रतिसादकांचे धन्यवाद
प्रतिसादाची आवर्जून दखल
प्रतिसादाची आवर्जून दखल घेतल्याबद्दल आभार !
आभारा बद्दल धन्यवाद
आभारा बद्दल धन्यवाद
(No subject)
दिनेशदांच्या सूचनेला मी
दिनेशदांच्या सूचनेला मी दिलेल्या आभाराबद्दल मला उदयने धन्यवाद दिल्याबद्दल त्याचे आभार
ठा, शंभरी गाठायची का ? आपण
ठा, शंभरी गाठायची का ? आपण तरी का मागे हटायचे ?
(No subject)
बरोब्बर दिनेशदा
बरोब्बर दिनेशदा
ती पण धागा न भरकटवता, नाहीतर
ती पण धागा न भरकटवता, नाहीतर काय होईल.. दोन पायाच्या माणसागत, आपले शेपूट झडून जाईल.
आवडली कविता
आवडली कविता
Pages