एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पृहा वर्थ इग्नोरिंग आहे.

मधुरा अपडेट्स नक्की टाक, कधी पहायला जमलं नाही तर ष्टोरी तरी कळेल. नक्की टाक.

कामं मस्त होतायत सगळ्यांची. शुभा खोटे जरा ऑकवर्डली करतात पण ठीक आहे. मी सुरुवातीला पाहिली, मग मधे भरपूर एपिसोड्स मिस झाले, आता काही दिवस बघतेय. स्पृहाची फॅमिली अतीगोड आहे. मोहन आगाशे मात्र आवडतात. पण त्यांचा समजूतदार, हुषार, चतूर म्हातारा तोच तोच व्हायला लागला आहे. मोहन जोशी झकास. मला स्पृहाचे कपडेबिपडे काही खटकत नाहीत. सिरियलीतल्या पात्राची आवड असेल तशी कदाचित कपड्यांची. रोजच्या आयुष्यात कुठे कोण स्टायलिश, ड्रेस डिझायनरने ठरवलेले कपडे घालतं कोणी? असं समजते. हा काही पिरियड ड्रामा नाही कपड्यांच्या डिझाइन्स बारकाईने बघायला. मला उमेश कामत तसाही आवडतोच. त्यामुळे तो जास्तच मस्त.

आणि हो. संदेश कुलकर्णी राहिला. खूप छान करतो तो. शुभांगी गोखले बर्‍याच बारीक झाल्यासारख्या वाटत आहेत. मधे लापतागंजमधे पाहिली तेव्हा पेक्षा नक्कीच.

पियू, चालणार असेल सगळ्यांना तर मी नक्कीच टाकीन तेही रोज.... >>>> प्लीज, प्लीज टाक ग अपडेटस. रोज नाही पहाता येत. वाचेन तरी.

काही 'हो' म्हणतायत, काही 'नाही' म्हणतायत.......

मी अपडेट टाकेन, ज्यांना वाचायचेत त्यांनी वाचा.....ज्यांचे एपिसोड मिस होतील त्यांना उपयोगी पडेलच.

१०/१२/२०१३ एपिसोडचे अपडेट्स....

फोनवर ओमच्या परिवाराची स्तुती करून झाल्यावर, इशा आशुजवळ येतेआणि नेहमीप्रमाणे आशु आणि ईशाची लहान असल्यासारखी मस्ती सुरु होते. त्यात ईशा गाडीवरून पडते आणि डायरेक्ट तिची रवानगी इस्पितळात होते. ओमसुद्धा तिथे पोचतो आणि तिचं मन रमवायला गप्पा गोष्टी करायचा प्रयत्न करतो.
डॉक्टरला दाखवण्याकरता रांगेत बसलेले असताना, तिथे एक बुरखा घातलेली स्त्री तिच्या मुलाचा मोडका हात दाखवायला तिथे आलेली असते. ओम तिला बसायला उठून जागा देतो, तिच्या मुलाला चॉकलेट देतो; पण त्याला माहित नसत कि हि बाई बोट पकडायला दिल कि डायरेक्ट हातच पकडेल !!! (वेगळा अर्थ काढू नका....)

तेवढ्यात नंबर लागतो आणि दोघ डॉक्टर च्या केबिनमध्ये आत जातात. डॉक्टर सांगतात कि इशाच्या हाताला हेअर फ्र्याक्चर झालंय आणि पेनकिलर ने बर वाटेल. आता हे पेन किलर म्हणजे इंजेक्शन.....ईशा वेड्यासारखी हसायला लागते, म्हणे इंजेक्शन पाहिल्यावर हायपर होते....(हा सगळा सीन अत्यंत मुर्खासारखा वाटतो.)

बाहेर आल्यावर ती बाई ओमकडे मुलाच्या उपचाराकरिता पैसे मागते. (मुळात जर तिच्याकडे डॉक्टरला द्यायला पैसे नाहीत, तर ती डॉक्टरची अपॉइंटमेंट का घेते??? का तिला माहित असत कि हा ‘राजा हरिश्चंद्र’ तिथे येणारेय???) सांगताना सांगते कि तिच्या नवर्याने तिला दगा दिलेला आहे. तिच्याकडे मुलाच्या उपचारासाठी पैसे नाहीत. ती आत्ता गर्भवती आहे आणि ती आता आधारहीन झालेली आहे. ओम नेहमीप्रमाणे मदतीला तय्यार!!!

ईशा मात्र त्या बाईची कहाणी ऐकून अस्वस्थ होते. अर्थात तिने समाजातली दु:ख जास्त पाहिलेलीच नसतात त्यामुळे तिला त्या बाईचा जबरदस्त कळवळा वाटतो. मग ती ओमला विचारते कि “तू माझ्याशी नक्की लग्न करणार आहेस न?” ओम त्यावर भलत्याच कोरडेपणाने उत्तर देतोय हे पाहून तिचा अस्वस्थपणा अजून वाढतो. पण ओम शेवटी वकीलच ना....तो तिला परत आनंदी करतो आणि त्या निराशेतून बाहेर काढतो....
बाकी पुढच्या एपिसोड मध्ये!!!!

मी क्वचितच बघते ही मालिका त्या उमेशसाठी, स्पृहा अजूनही बंडलच काम करते, तिला अजूनही सूर सापडला नाहीये. उमेश काय नेहेमीच मस्त, सहज काम करतो. मला खूप आवडतो.

उमेश कामत खरच छान काम करतो पण इमोशनल सीन म्हणजे रडायचे-बिडायचे सीन स्वप्नील जोशीच जास्त छान करतो अस आपलं माझ मत आहे. स्पृहा कुहूच काम छान करायची पण ईशाच काम तिला जमत नाहीये.

पण हे मान्य करावच लागेल कि ए.ल.दु.गो पेक्षा जास्त छान कथा ए.ल.ति.गो.मध्ये आहे. ए.ल.दु.गो मध्ये कलाकार जास्त छान अभिनय करत होते आणि कथेत तसा दम नव्हता. पण या मालिकेत कथा जास्त छान आहे पण बाकी म्हणजे अभिनय, दिग्दर्शन वगैरे तितक परिणामकारक नाही.

मधुरा एकदा चघळली गेलेली कथा आहे ही...दम बिम कुठे दिसला तसा तुला?
असो! तुझ्याशी काही बोलण्यात तसाही अर्थ नाहीच आहे म्हणा!

जास्ती विचार न करता पाहिली तर सध्या सगळ्यांत धमाल चाललेली मालिका हीच आहे असं वाटतं! उ.का.एक नंबर! मोहन जोशी तर फुल्टू सुटले आहेत! ते माझी उंदरं hilarious होतं! स्पृहाची मैत्रीण पण धमाल आहे! अर्थात फार विचार करायचा नाही आणि कोणतेही प्रश्न पडू द्यायचे नाहीत हे मुख्य!

मला दोन्ही (दुसरी आणि तिसरी गोष्ट) कथानकं आवडली. दुसरी गोष्ट जास्ती बांधीव होती आणि मुख्य म्हणजे प्रत्येक character ला सूर सापडला होता! पुन्हा youtube वर पाहताना विनय आपटेंना पाहून फार दुःख झालं Sad काय कमाल काम केलंय त्यांनी!

तिसरी गोष्ट predictable नाहीये..म्हणजे छान हलकीफुलकी पण राहू शकते किंवा कम्प्लीट सिरीयस होऊ शकते! बघू कशी पुढे नेतात ही गोष्ट!

उमेश कामत ला १०० पैकी १००० गुण. स्पृहाची छाप पडत नसूनही, तिची बाजू कमकुवत असूनही त्याने स्वतःच्या ताकदीवर तारून नेली आहे ही जोडी. स्पृहाबाई पण कधीतरी पेटतील आणि आणखी मजा येईल अशी आशा.

रच्याकने....आजची ती इस्पितळातील मुस्लिम बाई पाहून प्रचंड हसू आले. ती जेव्हा ओमला सांगत होती की एक लहान मुलगा आहे पण माझा नवरा मला सोडून गेला, दुसरंही बाळ ऑन द वे आहे, वगैरे, तेव्हा. त्यावेळी तिने स्वतःच्या पोटावर हात ठेवला, तेव्हा दिसले की मुलाच्या व स्वतःच्या खाण्यापिण्याची आबाळहोईपर्यंत पैशाची चणचण असूनही हात मात्र मस्त मॅनिक्युअर केलेले आणि लांब लांब नखं लालभडक नेलपेन्ट लावलेली असू शकतात. Wink

मला वाटतं स्पृहा ही मालिका फार्सिकल आहे असे समजून काम करतेय. (आणी ते बरोबर आहेच) पण इतर अभिनेते तेवढे फार्सिकल होत नाहीयेत म्हणून तीच एकटी ऑड वन आऊट वाटते. पण मला तिचं कॅरेक्टर आणि वागनं आवडतं. रीअल लाईफ्मधे पण असा एखादा नमुना असतोच की आप्ल्या आजूबाजूला.

उमेश कामत (प्लीज एक तर उमेश लिहा नाहीतर ओम लिहा, हे उका काये???) कडे जी सहज्ता आहे ती त्याने तो सध्याचा रोमॅन्टिक हीरो तरून नेतोय. याच रोलमधे सुमीत राघवनने अक्षरशः धमाल केली होती. त्याला "बिच्चारा" रोल परफेक्ट जमतात. उमेशलाही ते छान जमेल असं वाटतंय.

परवा उमेश तिला म्हणतो "तुला माहित नाही तू किती हुश्शार आहेस ते" तेव्हा त्याचे एक्स्प्रेशन फुल्टू होते.

एलदुगो आणी या मालिकेचा शीर्षक् सोडल्यास काहीही संबंध नाही, त्यामुळे तुलना व्यर्थ आहे, पण तरीही या मालिकेमधील पात्रं जास्त परिणामकारक आहेत. (सध्याचा इतर कुठल्याही मरठी मालिकेपेक्षाही)

मी तुलना करतीये कारण या दोन्ही मालिका मला आवडतायत. अजून एक गोष्ट, ए.ल.ति.गो ची कथा चघळलेली आहे असं खूप जण म्हणत आहेत. मुळात ती कथा 'सजन रे झूट मत बोलो' या मालिकेवरून घेतलेली आहे असेही खूप जणांचे मत आहे. पण माझ्या साठी हि कथा नवीन आहे कारण मी 'सजन रे झूट मत बोलो' ही मालिका पाहिलेलीच नाहीये....फक्त पोस्टर्स आणि एखाद-दोन सीन पाहिले असतील ! त्यामुळे माझ्यासाठी हा कन्सेप्ट नवीन आहे.
__________________________________________________________________________

रिये, नाहीये न माझ्याशी बोलण्यात काही अर्थ, मग कशाला वेळ फुकट घालवतेस कॉमेंट करण्यात?

हात मात्र मस्त मॅनिक्युअर केलेले आणि लांब लांब नखं लालभडक नेलपेन्ट लावलेली असू शकतात. डोळा मारा>> करेक्ट! मी अगदी हेच लिहायला आले. काल मारे इतकं कौतुक केलं सिरियलचं, आणि कालच रात्री मेकप केलेली, नेलपेन्ट लावलेली 'गरीब' बाई दाखवली! Biggrin

पण त्या नंतरचा रोम्यांटिक सीन अगदी गोड. 'मी आहे तुझ्याबरोबर' किती गोऽड म्हणतो ओम! Wink Happy

हो, हेही खरय, तिला फेशियल आणि मॅनिक्युअर करायला पैसे मिळतात आणि मुलाच्या उपचारासाठी नाही???? खरच अशी बाई गरीब असेल तर आपण किती श्रीमंत बनू???

हात मात्र मस्त मॅनिक्युअर केलेले आणि लांब लांब नखं लालभडक नेलपेन्ट लावलेली असू शकतात.>> हो मि पन नवर्‍याला तेच दाखवले ... तो पन हसायला लागला ...ऊगाचच तो सीन टाकला आहे .

मधुरा, तुमच्यासाठी कथा नवीन म्हणजे "कथाच नवीन" असा अर्थ निघत नसतो. कथा पूर्णपणे सजनरे झूट मत बोलोवरच बेतलेली आहे. मालिकेचे ऑफिशीअल प्रेस रीलीज पाहिलेत का?

अपडेट्सब्द्दल दोन शब्दः या मालिकेमधे विशेष काहीही घडत नाही. जे घडतं ते प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे. मी इथे मारे कितेही वर्णन केलं की मोहन जोशी ते "माझी उंदरं वाट ब्घताहेत" किती धमाल करत होते तरीपण तो सीन बघण्यात जी मजा आहे ती त्या लिखाणात निस्छितच्च येणार नाही. त्यामुळे अपडेट्स टाकले तरी त्याचा उपयोग काय होइल देव जाणे. इथून पुढे लग्नानंतर कथा जेव्हा खूप विनोदी होत जाईल तेव्हा बघायला खूप मज्जा येईल. कथेमधे फारसे काही घडणार नाही.

Pages