'पितृऋण' प्रिमिअर - फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 6 December, 2013 - 00:53

प्राध्यापक व्यंकटेश कुलकर्णी यांना साईटवर असताना अचानक त्यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी एक व्यक्ती दिसते आणि सुरू होतो एक शोध, एक प्रवास वर्तमानकाळातुन भूतकाळाचा. वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची एका मुलाची धडपड म्हणजे ’पितृऋण.

सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची कथा, सचिन खेडेकर यांची दुहेरी भूमिका, प्रदीर्घ काळानंतर तनुजा यांचे मराठी चित्रपटात पुनरागमन, 'महाभारत' या मालिकेमुळे नितीश भारद्वाज अभिनेते म्हणून सर्वांच्या परिचयाचे झाले. 'पितृऋण' हा त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा सिनेमा, कौशल इनामदार यांचे कर्णमधुर संगीत, वाई, कोकण, सातारा येथील मनमोहक लोकेशन्स आणि महेश अणे यांची सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये.

सचिन खेडेकर यांचा व्यंकटेश कुलकर्णी (दोन्ही) आणि तनुजा यांनी साकार केलेली "भागिरथी" केवळ अप्रतिम!!!

सचिन खेडेकर, तनुजा, सुहास जोशी यांच्या कसदार अभिनयाने नटलेला आणि मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेला हा चित्रपट दिनांक ६ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आवर्जुन पहावी अशी हि कलाकृती आहे.

सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आणि आयएमई मोशन पिक्चर्स निर्मित व नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितृऋण' या चित्रपटचा प्रिमिअर काल मुंबई येथे पार पडला त्याच सोहळ्याचा हा फोटो वृतांत. या प्रिमिअरला मायबोलीकर वल्लरी, सामी, घारूअण्णा, विनय भिडे आणि जिप्सी यांची उपस्थिती होती.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
सचिन खेडेकर आणि तनुजा

प्रचि ०४
तनुजा

प्रचि ०५
श्रीरंग गोडबोले, सचिन खेडेकर आणि तनुजा

प्रचि ०६
नितिश भारद्वाज

प्रचि ०७
नितिश भारद्वाज, तनुजा आणि काजोल

प्रचि ०८
तनुजा आणि काजोल

प्रचि ०९

प्रचि १०
सचिन खेडेकर

प्रचि ११

प्रचि १२
काजोल

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
श्रीरंग गोडबोले

प्रचि १७
सुनिल बर्वे

प्रचि १८

प्रचि १९
नेहा शरद

प्रचि २०
सुहिता थत्ते आणि सुनिल बर्वे

प्रचि २१
सुहिता थत्ते

प्रचि २२
सुहिता थत्ते आणि ऐश्वर्या नारकर

प्रचि २३
ऐश्वर्या नारकर

प्रचि २४
पूर्वी भावे

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
गायिका हम्सिका अय्यर (चेन्नई एक्स्प्रेस फेम)

प्रचि २८

प्रचि २९
सुमित राघवन

प्रचि ३०
फुलवा खामकर

प्रचि ३१
संदिप कुलकर्णी, सुमीत राघवन, श्रीरंग गोडबोले, तुषार दळवी

प्रचि ३२
पल्लवी सुभाष

प्रचि ३३
अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष

प्रचि ३४
तुषार दळवी

प्रचि ३५
मृणाल देव कुलकर्णी

प्रचि ३६
आशुतोष गोवारीकर

प्रचि ३७
तनुजा आणि सई परांजपे

प्रचि ३८
नेहा जोशी

प्रचि ३९
संदिप कुलकर्णी

प्रचि ४०
टिम 'पितृऋण'

प्रचि ४१

प्रचि ४२
केतकी विलास

प्रचि ४३
ओंकार कुलकर्णी

प्रचि ४३

प्रचि ४४
महेश मांजरेकर

प्रचि ४५
मृणाल देशपांडे

प्रचि ४६
राजन भिसे

प्रचि ४७
सौरभ गोखले

प्रचि ४८
सिद्धार्थ चांदेकर

प्रचि ४९
विजय पाटकर आणि विजय कदम

प्रचि ५०
संगीतकार कौशल इनामदार

प्रचि ५१
अमृता सुभाष

प्रचि ५२
महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी (उजवीकडुन पहिले)

प्रचि ५३
नागेश भोसले

प्रचि ५४
केतकी विलास आणि पूर्वी भावे

प्रचि ५५
दया डोंगरे
स्टार मायबोलीकर्स Happy
सामी, सामीची आई, वल्लरी, घारूअण्णा आणि विनय भिडे
प्रचि ५६

प्रचि ५७

प्रचि ५८

प्रचि ५९

प्रचि ६०

प्रचि ६१
मायबोलीकर घारूअण्णा, जिप्सी, सामीची आई, वल्लरी आणि सामी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

अजुन काही नावे अपडेट केली आहेत. Happy

प्रचि ४३ दोनदा लिहिले गेलेय. तर दुसर्‍या प्रचि ४३ मध्ये पार्श्वभूमीवर ज्येष्ठ (हिंदुत्ववादी) पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी आहेत का>>>>ते प्रख्यात दिग्दर्शक "राजदत्त" आहेत का?

खुप सुन्दर फोटो !!!!!!!!!!
तनुजा, सचिन खेडेकर, काजोल फारच सुरेख......
हे घारुअण्णा कोण आहेत??? त्यान्ना कुटेतरि पाहिल्यासा़रखे वाट्तेय!!!!!!!!!!!!!!!!!
घारुअण्णा तुम्हि कळ्व्याला कुठेतरि राहता का?????

जिप्सी, तू पत्रकार आहेस, फोटोग्राफर आहेस कि अजून काही???

फोटो एकदम मस्त!! किती मेगापिक्सेल्स चा आहे कॅमेरा ज्याने फोटो काढलेस????

फोटो न. ३८ मधली मुलगी कोण?>>>नेहा जोशी >>> थँक्स मयुरेश , तीने ' कोकणस्थ' मध्ये मस्त काम केलयं, आवाज थोडासा घोगरा आहे .

मायबोली मुळे हा प्रिमियर बघायची संधी मिळाली...
खरी खुरी कलाकार मंडळी माझ्यासारख्या सामान्य माणसाला बघायला मिळाली ती ही इतक्या जवळुन यात जामच आनंद झाला.

चित्रपट कथा अतिशय सुंदर आहे , सचिन आणि सर्वच कलाकार मंडळींचा अभिनय अतिशय वाखाणण्यासारखा आहे.

तांत्रिक बाबतीत चित्रपट उजवा आहे , फक्त मागील काळातील त्याही कोकणातील काही घटना उभ्या करताना दिग्दर्शक चुकला आहे.

तनुजा यांना मराठी पडद्यावर बघुन फार आनंद झाला.

आयोजकांचे आभार.

जिप्सीने कॅमेराचा प्रश्न टाळला की काय? उत्तर दे रे भाऊ.>>>>>सॉरी, प्रतिसाद द्यायचा राहुन गेला. Happy
कॅमेरा Canon EOS 550D with 18-135 lense. मी External Flash वापरलाय. Happy

जिप्स्या सर्व फोटो सुंदर....
एक गंमत......
जिप्स्याबरोबर प्रिमियरला दोन्दा गेलोय. फोटो म्हट्ले की याचे दोन्ही हात आणि डोळे पटापट क्लिक क्लिक करतात.त्यामुळे आजुबाजुला कोणी नवीन सेलीब्रिटी /कलाकार यायला लागले की कोणीतरी याला सांगाव लागत " अरे इकडे ये !!" ,तिकडे बघ ते आले!!! माझ्या सुदैवाने मागच्या आणि यावेळी ते काम मला कराव लागलं.
आणि नाळ्याबरोबर गाड्याची यात्रा तसं मलाही या सगळ्यात मजा करता आली. पण हा पक्का!!! मी हळुच नजर चुकवुन राहन भिसें शी बोलत होतो तर याने तो क्षण् ही टिपला... आणि खरोखरच मी त्यावेळी त्यांना जुने रेप्फ्रन्स द्याचा प्रयत्न करुन काही कामाचे बोलत होतो.
सर्वेषा होय तुमचा अंदाज बरोबर आहे मी कळ्व्यातच राहातो आपणे इथेच राहाता का.....( कलवेकर रॉक्स ..संख्या वाढ्तेय)
सुंदर अनुभवात सहभागि करुन घेतल्याबद्दल माबो प्रशास आनि चिनुक्स चे आभार....

चित्रपट आत्ताच सोनी मराठीवर बघितला. कोणी परीक्षण केले आहे का याचा शोध घेत होते तर हा धागा सापडला. सर्व फोटो अप्रतिम आहेत. आठ वर्षांपूर्वी चित्रपट आला होता आणि तेव्हा नवखे असलेले कलाकार आज बऱ्यापैकी प्रसिद्ध झाले आहेत.

नीतिश भारद्वाज यांच्यामध्ये बदल नाही. तेच सुंदर हास्य.
पितृऋण पाहीला. सिनेमा छान आहे. तनुजाचे काम आवडले. खेडेकर यांचेसुद्धा.

Pages