Submitted by मिल्या on 3 December, 2013 - 07:22
मानायचो मी ज्यास माझा आरसा
पारा उडाला नेमका त्याचा कसा?
चिरकाल टिकणारे असे तू दु:ख दे
नाही मला दुसर्या कशाची लालसा
केले जरी हे विश्व पादाक्रांत मी
नाही कुठेही उमटवू शकलो ठसा
दगडास आपण ह्याचसाठी पूजतो
उरला कुठे आहे स्वतःवर भरवसा
आलो तुझ्या दारी भिकार्या सारखा
काळोख मी, तू दे मला चांदणपसा
झोपेल हे मन शांतचित्ताने अता
होणार आहे राज्य त्याचे खालसा
मौनातुनी संवाद चाले आपला
वाती-दिव्याचा चालतो अगदी तसा
स्वागत असे तू संकटांचे कर जसे
फुलपाखरांना फूल म्हणते या... बसा
लागू नको मागे सुखाच्या तू असा
हातामधे येतो कधी का कवडसा?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप आवडली गझल . अगदी खोलवर
खूप आवडली गझल . अगदी खोलवर उतरणारे अर्थ..
>.झोपेल हे मन शांतचित्ताने अता
होणार आहे राज्य त्याचे खालसा
मौनातुनी संवाद चाले आपला
वाती-दिव्याचा चालतो अगदी तसा
स्वागत असे तू संकटांचे कर जसे
फुलपाखरांना फूल म्हणते या... बसा >>
चांदणपसा आणि स्वागत असे तू
चांदणपसा
आणि
स्वागत असे तू संकटांचे कर जसे
फुलपाखरांना फूल म्हणते या... बसा
लागू नको मागे सुखाच्या तू असा
हातामधे येतो कधी का कवडसा?
हे दोन शेर सर्वात विशेष वाटले.
त्यातही फुलपाखरू आणि कवडसा हे खासच.
स्वागत असे तू संकटांचे कर
स्वागत असे तू संकटांचे कर जसे
फुलपाखरांना फूल म्हणते या... बसा<<< वा वा!
खालसा आणि कवडसा हे शेरही आवडले. नेहमीप्रमाणेच सुबक व संयत गझल!
सुरेख गझल.. मस्त वाटले
सुरेख गझल.. मस्त वाटले वाचून.
अनेक शेर आवडलेत मिल्या ! कुठलाही एक कोट करत नाही.
>>दगडास आपण ह्याचसाठी पूजतो
>>दगडास आपण ह्याचसाठी पूजतो
उरला कुठे आहे स्वतःवर भरवसा
खास..!
दगडास आपण ह्याचसाठी
दगडास आपण ह्याचसाठी पूजतो
उरला कुठे आहे स्वतःवर भरवसा<<< हो, हाही शेर आवडला मिलिंद
स्वागत असे आणि चांदणपसा
स्वागत असे आणि चांदणपसा आवडले...
दगडास आपण ह्याचसाठी
दगडास आपण ह्याचसाठी पूजतो
उरला कुठे आहे स्वतःवर भरवसा
>>
वाह!
चांदणपसा >> हा शब्द खुप आवडला
सुरेख गझल, सुंदर वाचनानुभव.
सुरेख गझल, सुंदर वाचनानुभव.
अथ पासून इति पर्यंत अप्रतीम !
अथ पासून इति पर्यंत अप्रतीम ! खूप आवडली
धन्स मिल्याशेठ
कवडसा अफाट....एकूणच गझल
कवडसा अफाट....एकूणच गझल आवडेश.
मत्ला छान आहे. स्वागत असे तू
मत्ला छान आहे.
स्वागत असे तू संकटांचे कर जसे
फुलपाखरांना फूल म्हणते या... बसा
विचार वाचून गंमत वाटली. एक लूझ एन्ड जाणवला.
मनात आले फूल झाल्याशिवाय कसे कळायचे की त्याला काय वाटते.
केले जरी हे विश्व पादाक्रांत मी
नाही कुठेही उमटवू शकलो ठसा
ह्यावरून माझा एक शेर आठवला:
उभे आयुष्य आकाशात रमणा-यांतला तू
नभाचा रंग पंखाला न लागावा, नवल हे
धन्यवाद.
फूल झाल्याशिवाय कसे कळायचे
फूल झाल्याशिवाय कसे कळायचे <<< बात मे दम है बॉस्स !!
अतीशय खोलातून विचर केलात समीरजी एका उत्तम शायराच्या उत्तम शेराला दुसर्या उत्तम शायराने दिलेली अतीशय उत्तम दाद आहे ही !!!
एखाद्या बाबीकडे वेगवेगळे शायर कश्या एंगलने विचार करतात हे शिकायला मिळते
.
अप्रतिम गजल ....
अप्रतिम गजल ....
अतिशय सुंदर गझल.... व्वा !
अतिशय सुंदर गझल....
व्वा !
खूप दिवसानी. अप्रतीम!
खूप दिवसानी. अप्रतीम!
गझल छान. मतला आणि ठसा हे शेर
गझल छान.
मतला आणि ठसा हे शेर विशेष आवडले.
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद
चिरकाल टिकणारे असे तू दु:ख
चिरकाल टिकणारे असे तू दु:ख दे
नाही मला दुसर्या कशाची लालसा
व्वा...
*** द्रौपदीने अशी मागणी भगवंताजवळ केल्याचा महाभारतात उल्लेख आहे.
केले जरी हे विश्व पादाक्रांत मी
नाही कुठेही उमटवू शकलो ठसा
दगडास आपण ह्याचसाठी पूजतो
उरला कुठे आहे स्वतःवर भरवसा
मौनातुनी संवाद चाले आपला
वाती-दिव्याचा चालतो अगदी तसा
स्वागत असे तू संकटांचे कर जसे
फुलपाखरांना फूल म्हणते या... बसा
लागू नको मागे सुखाच्या तू असा
हातामधे येतो कधी का कवडसा?
या सर्व द्विपदी सुंदर...
hats off. खूप आवडली...
hats off.
खूप आवडली...
वा! वा! वा! खास 'मिल्या' टच.
वा! वा! वा!
खास 'मिल्या' टच. अत्यंत सुंदर.
छान, मिल्या. काही शेर खूप
छान, मिल्या. काही शेर खूप आवडले. फुलपाखरू, कवडसा छान. चांदणपसा शब्द आवडला.
दु:खाची मागणी कुंतीने कृष्णाकडे केल्याचे ऐकले. असो, या शेरामुळे आठवण झाली खरी.
भरवसा आणि दिया-वातीचे मौनरागही आवडले.
खूप दिवसांनी तुझं काही वाचलं. लिहीत जा!
निवडक १० त . धन्यवाद !
निवडक १० त .
धन्यवाद !
दगडास आपण ह्याचसाठी
दगडास आपण ह्याचसाठी पूजतो
उरला कुठे आहे स्वतःवर भरवसा
केले जरी हे विश्व पादाक्रांत मी
नाही कुठेही उमटवू शकलो ठसा
>> वाह !
लागू नको मागे सुखाच्या तू असा
हातामधे येतो कधी का कवडसा?
मौनातुनी संवाद चाले आपला
वाती-दिव्याचा चालतो अगदी तसा
स्वागत असे तू संकटांचे कर जसे
फुलपाखरांना फूल म्हणते या... बसा
>> व्वाह व्वाह !
परत एकद धन्यवाद
परत एकद धन्यवाद सर्वांना
सुप्रियाजी : विशेष धन्यवाद.. निवडक १० बद्दल